पृथ्वी व नेपच्यून यांच्या मधल्या ग्रहांच्या आकाराच्या आपल्या ग्रहमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. त्यातून या ग्रहाचे स्वरूप व त्याची निर्मिती यावर प्रकाश पडणार आहे.
अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या स्पिटझर व हबल दुर्बीणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा एकही ग्रह आपल्या सौरमालेत नाही, पण या प्रकारचे ग्रह इतर ताऱ्यांभोवती दिसून येतात असे नासाने म्हटले आहे.
ग्लिस ३४७० बी (जीजे ३४७० बी) हा ग्रह पृथ्वी व नेपच्यूनच्या मधल्या आकाराचा असून त्याचा खडकाळ गाभा हा हायड्रोजन व हेलियमच्या वातावरणात गुरफटलेला आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा जास्त तर नेपच्यूनपेक्षा कमी आहे. असे अनेक ग्रह नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधून काढले आहेत. २०१८ मध्ये या केपलर दुर्बीणीचे काम बंद झाले आहे. आपल्या दीर्घिकेतील ८० टक्के ग्रह हे या वस्तुमानाच्या टप्प्यात येतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. जीजे ३४७० बी या ग्रहाच्या वातावरणाचे घटक उलगडताना या ग्रहाचे स्वरूप व मूळ याबाबतही माहिती मिळत आहे. ग्रहांची निर्मिती कशी होते यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे. हा ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालत असून तो गुरूच्या पेक्षा ३१८ पट जड आहे. कॅनडातील माँट्रियल विद्यापीठातील बिजोर्न बेनेक यांनी सांगितले की, तेथील वातावरण हे हायड्रोजन व हेलियमचे आहे. आपल्या सौरमालेतील ग्रहात असा प्रकार आढळून येत नाही. हबल व स्पिटझर दुर्बीणींनी जी ३४७० बी या ग्रहाच्या माध्यमातून प्रथमच वातावरणाचा अभ्यास केला आहे. यात ग्रहाची बारा अधिक्रमणे व २० ग्रहणे तपासण्यात आली होती. कुठल्याही ग्रहाची वर्णपंक्तीय वैशिष्टय़े प्रथमच शोधण्याची ही पहिली वेळ आहे.
या ग्रहावरील वातावरणात जड मूलद्रव्यांचा समावेश आहे. इतर बाह्य़ग्रह हे तप्त गुरूसारखे आहेत ते त्यांच्या ताऱ्याभोवती फार दूर अंतरावर तयार झाले व नंतर जवळ गेले. जीजे ३४७० बी हा ग्रह लाल बटू ताऱ्याभोवती जवळच्या अंतरावर तयार झाला. त्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या निम्मे आहे.
ग्रहाचे वेगळेपण:-
या ग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे तो गुरूसारखा मूळ ताऱ्यापासून दूर नाही शिवाय त्याच्यात ग्रहनिर्मिती वेळचा हायड्रोजन आहे त्यामुळे त्याचे हे वेगळेपण हे संशोधकांसाठी महत्त्वाचे आहे.
बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री (RIL) देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरनं घेतलेल्या उसळीनं कंपनीचं बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांच्या पार केलं आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या 2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सरकारी कंपनी इंडियन आईल कॉर्पोरेशन (IOC)ला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्री सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात विस्तारलेल्या आरआयएलनं वर्ष 2018- 19मध्ये एकूण 6.23 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर आयओसीनं 31 मार्च 2019मधल्या वित्त वर्षात 6.17 लाख कोटी रुपयांचं व्यवहार केला होता. आरआयएलनं आयओसीच्या दुप्पट फायदा कमावून देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्री कंपनीचे शेअर्स (नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 2:15वाजताच्या दरम्यान) दोन टक्क्यांनी वाढून 1278 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे कंपनीचं बाजार भागभांडवल 8.07 लाख कोटी रुपये झालं. आता दुसऱ्या नंबरवर टीसीएस ही कंपनी आहे. देशातली टॉप 10 कंपन्यांची लिस्ट
(1) रिलायन्स इंडस्ट्रीज
(2) टीसीएस (टाटा कंस्लटन्सी सर्व्हिसेस)
(3) HDFC बँक
(4) HDFC लिमिटेड
(5) HUL (हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेड)
(6) ITC (इंडियन टोबॅको कंपनी)
(7) SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया)
(8) इन्फोसिस
(9) कोटक महिंद्रा बँक
(10) ICICI बँक
भारत सरकारची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्तराखंड राज्य हे देशातल्या पाच सर्वोत्तम कामगिरी दर्शविणार्या राज्यांपैकी एक ठरले आहे. जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या (SRB) बाबतीत उत्तराखंडने सर्वोत्तम कामगिरी दर्शविलेली आहे.
उत्तराखंडच्या व्यतिरिक्त, हरियाणा राज्याने जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या बाबतीत सातत्यपूर्ण कामगिरीसाठी एक राज्यस्तरीय आणि दोन जिल्हास्तरीय पुरस्कारांसह एकूण तीन पुरस्कार जिंकले आहेत. हरियाणाच्या भिवानी आणि महेंद्रगड या दोन जिल्ह्यांनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवलेत.
सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तर सरासरीने 161 जिल्ह्यांमध्ये वाढले असून ते प्रमाण सन 2015-16 मधील 909 मुली (प्रत्येक 1000 मुलांमागे) यावरून सन 2018-19 मध्ये 919 मुली एवढे होते.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना:-
बेटी बचाओ बेटी पढाओ (मुलगी वाचवा मुलगी शिकवा) (BBBP) हया उपक्रमाचा शुभारंभ हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी झाला. या उपक्रमात बाल लिंग गुणोत्तरात (child sex ratio) होणारी घसरण तसेच महिला सक्षमीकरण संदर्भातल्या मुद्दयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे.
उद्दिष्टे -
पक्षपाती लिंग निवड प्रक्रियेचे उच्चाटन करणे.
मुलींचे अस्तित्व आणि संरक्षण याची खात्री करणे.
मुलींच्या शिक्षणाची खात्री करणे.
पूर्वग्रह व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा-1994' कायद्याची अंमलबजावणी, देशभर जनजागृती आणि सल्ला ही मोहीम राबवणे तसेच बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्या 100 जिल्ह्यांमध्ये बहु-विभागीय उपाययोजना करणे यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात प्रशिक्षण, जनजागृती यामध्ये वाढ करणे तसच सामुहिक एकत्रीकरण याद्वारे समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते, लाडली लक्ष्मी, मुलींसाठी शाळेचा शुल्क माफ, मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत प्राधान्य, ‘सर्वांना घर’ योजनेच्या अंतर्गत अनुदान, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत विनामूल्य LPG जोडणी आणि अन्य अश्या विविध योजना राबविल्या जातात.
राष्ट्र कल्याण मंत्री एस. जयशंकर (सुब्रह्मण्यम जयशंकर कृष्णास्वामी) यांनी 8 जुलै 2019 रोजी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या सभासद पदाची शपथ घेतली.
गेल्याच आठवड्यात भाजपने केंद्रीय मंत्री अमित शाह आणि स्मृति ईरानी यांच्या रिक्त झालेल्या दोन राज्यसभेच्या जागा जिंकल्या. निवडणुकीत भाजपचे नामनिर्देशित उमेदवार परराष्ट्र कल्याण मंत्री एस. के. जयशंकर आणि जुगलकिशोर ठाकोर विजयी झाले असून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी त्यांचे नाव निश्चित झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात एस. जयशंकर यांचा करण्यात आला आहे. जयशंकर यांनी दिनांक 30 मे 2019 रोजी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 1977 सालाच्या भारतीय परराष्ट्र सेवा तुकडीचे अधिकारी असलेल्या जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयात विविध पदांवर काम केलेले आहे. ते अमेरिका आणि चीनसारख्या महत्वपूर्ण देशांमध्ये भारतीय राजदूत होते. ते जानेवारी सन 2015 ते जानेवारी 2018 या कालावधीत परराष्ट्र सचिव होते.
राज्यसभा:- राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उप-राष्ट्रपती वेंकय्या नायडू हे सध्या राज्यसभेचे सभापती आहेत. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक दिनांक 13 मे 1952 रोजी झाली.
भारताचा माजी क्रिकेट कर्णधार आणि 'अंडर-१९' क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने काल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड केली आहे.
हायलाइट्स
• राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड
• राहुल द्रविड युवा खेळाडूंना, प्रशिक्षकांना मार्गदर्शन करणार
• राष्ट्रीय महिला व पुरुष संघांसोबतही राहुल द्रविड काम करणार
• पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी यांची कारकीर्द घडवण्यात राहुलचा मोठा वाटा
या अकादमीत राहुल द्रविड युवा खेळाडूंना, प्रशिक्षकांना मार्गदर्शन करणे, सराव करून घेणे, शिवाय खेळाडू, प्रशिक्षक व साहाय्यक खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडणार आहे.
राष्ट्रीय महिला व पुरुष संघांसोबतही राहुल द्रविड काम करणार आहे. शिवाय भारत अ, अंडर-१९ व अंडर-२३ वर्षांखालील संघांच्या विकासात द्रविडचा हातभार असणार आहे.
सध्याच्या घडीला भारतीय संघात असणारे पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विजय शंकर यांची कारकीर्द घडवण्यात राहुल द्रविडचा मोठा वाटा आहे.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या भारतीय क्रिकेट संघाने १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुरू असलेल्या 'समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत' सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत तिनं १०० मिटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी करीत भारताला अवघ्या ११.२ सेकंदात सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. शिवाय या जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे याआधी एकाही भारतीय स्पर्धकाला युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीत पात्रता फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती.
या स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या अँजला डेल पोंटेने ११.३३ सेकंदात १०० मीटर अंतर पार करत रौप्य पदक पटकावले आहे. तर जर्मनीच्या क्वायाईने ११.३९ सेकंदात ब्राँझ पदक पटाकावले.
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ३० सप्टेंबरपूर्वी बँकिंग क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. यामुळे ज्या भारतीयांची २०१८ पासून स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये खाती आहेत त्यांच्याबाबतची माहिती भारतातील कर अधिकाऱ्यांना पाठविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ (एईओआय) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून तो गेल्या वर्षीपासून अंमलात आला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने स्विस अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि स्विस फेडरल कर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत लेखी उत्तर आले. भारताचा विचार करता काही माहिती पाठविणे आवश्यक आहे, असे स्विस फेडरल कर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बँक खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येणारा भारत हा ७३ देशांपैकी एक देश आहे. गेल्या वर्षी एईओआयची ३६ देशांबरोबर याबाबत अंमलबजावणी झाली आहे.
बँकिंग क्षेत्राबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी कायदेशीर आणि संसदीय पद्धतींची पूर्तता करण्यात आली आहे, असे स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बँकिंग माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
होणार काय?:-
किमान शेकडो बँक खात्यांबाबतची माहिती भारताला मिळण्याची शक्यता आहे. या देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी वृद्धिंगत होतील, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर ही माहिती स्वीकारण्याची आम्ही तयारी केली आहे असे दिल्लीतील ‘फॉरेन टॅक्सेशन अॅण्ड टॅक्स रीसर्च’च्या (एफटी अॅण्ड टीआर) अधिकाऱ्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
सुनील छेत्री, आशालता देवी हे वर्षातले सर्वोत्कृष्ट खेळाडू:-
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर 2018-19 या हंगामासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
भारत आणि बेंगळुरू फूटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री ह्याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (AIFF) 2018-19 या हंगामासाठी वर्षाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. तर, केरला ब्लास्टर्स फूटबॉल संघाची आशालता देवी हिने वर्षाची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकला.
छेत्रीला मिळालेला हा पुरस्कार एकूणच कारकिर्दीतला सहावा पुरस्कार असून त्याने भारतीय फूटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा AIFFचा सर्वोच्च पुरस्कार जिंकल्याचा नवा विक्रम रचला आहे. छेत्रीच्या नावावर 70 गोल आहेत आणि तो नामांकित खेळाडू क्रिस्टीआनो रोनाल्डो (149) याच्या मागे असून सध्या सक्रिय आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे.
अन्य AIFF पुरस्कारांची संपूर्ण यादी:-
बेस्ट ग्रासरूट्स डेव्हलपमेंट प्रोग्राम – जम्मू व काश्मीर फूटबॉल संघ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक पंच (रेफरी) - जोसेफ टोनी (केरळ)सर्वोत्कृष्ट पंच (रेफरी) – आर. व्यंकटेश (तामिळनाडू)
वर्षाचा उदयोन्मुख खेळाडू (महिला) - डांगमेई ग्रेस (मणीपूर)
वर्षाचा उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) - सहल अब्दुल समद (केरळ)
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ३० सप्टेंबरपूर्वी बँकिंग क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. यामुळे ज्या भारतीयांची २०१८ पासून स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये खाती आहेत त्यांच्याबाबतची माहिती भारतातील कर अधिकाऱ्यांना पाठविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ (एईओआय) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून तो गेल्या वर्षीपासून अंमलात आला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने स्विस अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि स्विस फेडरल कर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत लेखी उत्तर आले. भारताचा विचार करता काही माहिती पाठविणे आवश्यक आहे, असे स्विस फेडरल कर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बँक खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येणारा भारत हा ७३ देशांपैकी एक देश आहे. गेल्या वर्षी एईओआयची ३६ देशांबरोबर याबाबत अंमलबजावणी झाली आहे.
बँकिंग क्षेत्राबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी कायदेशीर आणि संसदीय पद्धतींची पूर्तता करण्यात आली आहे, असे स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बँकिंग माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
होणार काय?:-
किमान शेकडो बँक खात्यांबाबतची माहिती भारताला मिळण्याची शक्यता आहे. या देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी वृद्धिंगत होतील, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर ही माहिती स्वीकारण्याची आम्ही तयारी केली आहे असे दिल्लीतील ‘फॉरेन टॅक्सेशन अॅण्ड टॅक्स रीसर्च’च्या (एफटी अॅण्ड टीआर) अधिकाऱ्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.