10 Oct Current Affairs

10 Oct Current Affairs
10 Oct Current Affairs

पंतप्रधान क्षेपणास्त्र सज्ज विमानांतून प्रवास करणार

 • देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी असलेल्या विमानांमध्ये आता अत्याधुनिक 'मिसाइल डिफेन्स सिस्टम' असणार आहे. या विमानांचे उड्डाण एअर इंडियाचे वैमानिक नव्हे, तर हवाई दलाचे वैमानिक करतील.
 • एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना बोईंग ७७७ विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते जुलै २०२०पासून बोईंग ७७७ या विमानातून प्रवास करतील.
 • देशाच्या पंतप्रधानांसाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज विमाने असतील. या विमानांचे उड्डाण हवाई दलाचे वैमानिक करणार आहेत. एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. जुलै २०२० पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या विमानांतून प्रवास करणार आहेत.
 • अमेरिकी प्लांटमध्ये या विमानांची निर्मिती होत आहे. अमेरिकी बी ७७७ विमानात लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटर मेजर्स (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्शन सुइट्स (एसपीएस) असणार आहेत. ही विमाने जुलै २०२०मध्ये भारतात आणली जाणार आहेत.
 • देशातील सर्वोच्च पदांवर असलेले नेते या अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज विमांनांतून प्रवास करणार आहेत. पहिल्यांदाच या नेत्यांना घेऊन उड्डाण भरणाऱ्या विमानांचे सारथ्य एअर इंडियाचे वैमानिक करू शकणार नाहीत. वैमानिक बदलणार असले तरी, या विमानांची देखभाल करणारे पथक एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडचे (एआयईएसएल) असणार आहे. या विमानांमध्ये एअर इंडियाचे क्रू मेंबरच सेवा देतील.

हवाई दलाचे वैमानिक घेताहेत प्रशिक्षण:-

 • बी ७७७ विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण घेतलेले एअर इंडियाचे वैमानिक हवाई दलाच्या वैमानिकांना मुंबईच्या कलिना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देत आहेत.
 • बी ७७७ विमानांसाठी हवाई दलाच्या चार ते सहा वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हवाई दलाच्या अन्य वैमानिकांनाही प्रशिक्षण दिलं जाणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

..म्हणून हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देणं गरजेचं:-

 • 'हवाई दलाचे वैमानिक प्रशिक्षित आहेत. मात्र, ते लढाऊ विमाने किंवा हवाई दलाच्या विशेष विमानांचे उड्डाण करण्यात तरबेज असतात. नव्या बोईंग ७७७ विमानांचा वापर व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यांसाठी होणार आहे. ही कमर्शियल प्रकारातील विमाने आहेत. त्यामुळं भारतीय हवाई दलातील वैमानिकांना कमर्शियल विमानांचे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे,' असं एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

नव्या विमानांचा व्यावसायिक वापर नाही!:-

 • सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी एअर इंडियाकडे बोईंग ७४७ ही विमाने आहेत. या विमानांना एअर इंडिया वन हे नाव देण्यात आलं आहे. एअर इंडियाचे वैमानिक या विमानांचे उड्डाण करतात. ही विमाने सर्वोच्च पदावरील व्यक्तींसाठी उड्डाणे भरत नसतील तर त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो.
 • मात्र, जुलै २०२०पासून व्हीव्हीआयपींसाठी दोन बोईंग ७७७ विमाने असणार आहेत. त्यांचा वापर केवळ सर्वोच्च पदांवर असलेल्या व्यक्तींसाठीच केला जाणार आहे.

विराटनं केला हा विक्रम

 • टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली गुरुवारी पुण्यातील मैदानावर नाणेफेकीसाठी पोहोचला आणि त्यानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली ५० कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटच्या आधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ५० हून अधिक कसोटी सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.
 • क्रिकेट विश्वातील रनमशीन असलेला विराट कोहली विविध विक्रमांना गवसणी घालत आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्येही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीनं आतापर्यंत ५० कसोटी सामन्यांचं नेतृत्व केलं आहे.
 • तो जगातील १४ वा आणि दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. या कसोटीआधी विराट भारतीय कर्णधारांच्या यादीत सौरव गांगुलीसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर होता. ४९ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणारा सौरव गांगुली तिसऱ्या स्थानावर आहे.
 • महेंद्रसिंग धोनीनं २००८-२०१४ या कालावधीत ६० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केले आहे. तो सर्वाधिक कसोटी सामन्यांत संघाचं नेतृत्व करणारा पहिला भारतीय कर्णधार आहे.
 • कर्णधार विराट कोहलीनं २०१४मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. याच कसोटी मालिकेत महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.
 • त्यानंतर भारतीय कसोटी संघाची धुरा विराट कोहलीकडे सोपवण्यात आली होती. जगात सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणाऱ्यांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ पहिल्या स्थानी आहे.
 • १९व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणाऱ्या स्मिथनं १०९ कसोटी सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यानं ११७ कसोटी सामन्यांत संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यातील १०९ कसोटी सामन्यांत त्यानं कर्णधारपद सांभाळलं आहे.
 • त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर यांनी ९३ कसोटी सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं आहे. ते दुसऱ्या स्थानी आहेत. ८० कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग तिसऱ्या स्थानी आहे.
 • दरम्यान, विराट कोहली आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हा विक्रम विराट मोडणार असल्याची दाट शक्यता आहे. या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर विराटचा समावेश मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या 'क्लब'मध्ये होणार आहे.
 • दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामन्यात एक हजारपेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या तिघांचा समावेश आहे. विराटला या यादीत येण्यासाठी मोठ्या खेळीची आवश्यकता आहे. सध्याचा विराटचा फॉर्म पाहता विराट या मालिकेतच हा विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे.
10 Oct Current Affairs
10 Oct Current Affairs

मयांक अग्रवालचं शतक सेहवागशी बरोबरी

 • भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर मयांक अग्रवालनं पुणे कसोटी सामन्यातही चमकदार कामगिरी केली. येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्यानं कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे.
 • सलग दोन कसोटी सामन्यांत दोन शतके ठोकून त्यानं माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सेहवागनंही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००९-१०मध्ये सलग दोन कसोटी सामन्यांत दोन शतके तडकावली होती.
 • मयांक अग्रवालनं फिलँडरच्या चेंडूवर चौकार लगावून शतक पूर्ण केलं. याआधीच्या केशव महाराजच्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन खणखणीत षटकार ठोकून तो ९९ धावांवर पोहोचला होता. त्यानंतर फिलँडरच्या चेंडूवर त्यानं चौकार ठोकला आणि शतक पूर्ण केलं.
 • पुणे कसोटीच्या आधी विशाखापट्टणममध्ये कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं द्विशतक झळकावलं होतं. त्यानं २१५ धावा कुटल्या होत्या. गुरुवारपासून पुण्यात दुसरा कसोटी सामना सुरू झाला. मयांक अग्रवाल सलामीला आला.
 • सुरुवातीपासूनच तो आत्मविश्वासानं फटके मारत होता. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सुरुवातीला चांगली झाली. पण मयांकनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. दिवसाच्या पहिल्या सत्रात त्यानं ८६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात त्यानं अवघ्या १३ चेंडूंमध्येच शतक पूर्ण केलं.
 • मयांकनं आपल्या शतकी खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार लगावले. शतकी खेळीनंतर तो जास्त धावा करू शकला नाही. कगिसो रबाडाच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
 • दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसनं त्याचा झेल टिपला. तत्पूर्वी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारतानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पहिला सामना शतकांची बरसात करून पहिली कसोटी गाजवणारी मयांक आणि रोहितची जोडी आज मैदानात उतरली. मात्र, सलामीची जोडी आज लवकर फुटली.
 • रोहित शर्मानं ३५ चेंडूत अवघ्या १४ धावा केल्या. कागिसो रबाडानं त्याला बाद केलं. त्याच्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारासोबत मयांकनं खेळपट्टीवर नांगर टाकला आणि शतक पूर्ण केलं. पुजारानंही त्याला उत्तम साथ देत अर्धशतक साजरं केलं. त्यानं ११२ चेंडूत ५८ धावा केल्या. पुजारा देखील रबाडाच्याच एका चेंडूवर फसला आणि झेलबाद झाला.
 • त्यानंतर रबाडानेच मयांकला फाफ ड्युप्लेसिसकरवी झेलबाद केले. मयांकनं १९५ चेंडूत १०८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके ठोकणाऱ्या मयांकनं माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागशी बरोबरी केली. त्यानं २००९-१०मध्ये ही कामगिरी केली होती.
 • सध्या सुरू असलेल्या मालिकेत रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या सलामीच्या जोडीनं चौथं शतक ठोकलं आहे. याआधी भारतीय सलामीवीरांनी चार शतकं झळकावण्याचा पराक्रम तीन वेळा केला आहे.
 • दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने गोलंदाजीत कमाल केली. टीम इंडियाचे पहिले तीन फलंदाज कागिसो रबाडाने तंबूत धाडले. रोहित शर्माला बाद करून त्यानं सलामीची जोडी फोडली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व मयांकला बाद केले.

इराणच्या महिलांना मिळणार प्रवेश

 • इराणच्या महिला आता फुटबॉल स्टेडियमवर जाऊन लढतींचा आनंद घेता येणार आहे. फिफाने इराणला निलंबनचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. इराणने महिलांवर फुटबॉल स्टेडियमवर जाऊन लढती बघण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे ४० वर्षांनंतर प्रथमच इराणच्या महिला फुटबॉल आणि इतर स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार आहेत.
 • गुरुवारी इराणची २०२२ वर्ल्ड कप पात्रता फेरीची लढत कंबोडियाविरुद्ध होणार आहे. ही लढत तेहरानच्या अझादी स्टेडियममध्ये होणार आहे. तेव्हा तासाभरातच तिकिटांचा पहिला टप्पा संपला.
10 Oct Current Affairs
10 Oct Current Affairs

बीएसएनएल एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव

 • वाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 • या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र ही कल्पना आता मागे पडली असून या कंपन्या पूर्णपणे बंद करून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी विभागात सामावून घेणे व अन्य कर्मचाऱ्यांना व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती) देणे या पर्यायाची सरकार चाचपणी करत आहे.
 • या दोन्ही कंपन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहेत. बीएसएनएलचा विचार केल्यास या कंपनीत तब्बल १.६५ लाख कर्मचारी असून एकूण महसुलातील ७७ टक्के रक्कम या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च होते. यामुळे या कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडले असून खासगी कंपन्यांच्या स्पर्धेतही त्या मागे पडल्या आहेत.
 • बीएसएनएलच्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हीआरएस दिल्यास सरकारला ९५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा अंदाज प्रथम व्यक्त करण्यात आला होता. मात्र या कर्मचाऱ्यांची तीन गटांत विभागणी केल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
 • बीएसएनएल व एमटीएनएलमध्ये तीन प्रकारचे कर्मचारी आहेत. या कंपन्यांनी थेट भरती केलेले कर्मचारी पहिल्या गटात मोडतात. तर, सरकारी विभाग व अन्य सरकारी उपक्रमांतून या कंपन्यांत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
 • याशिवाय, या कंपन्यांत भारतीय दूरसंचार सेवा विभागातूनही (आयटीएस) काही कर्मचारी घेण्यात आले आहेत. आयटीएसमधून आलेले हे कर्मचारी अन्य सरकारी विभागांत सामावून घेता येतील. तर, प्रामुख्याने तांत्रिक विभागात कार्यरत असणाऱ्या व वयाने कमी असणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ देऊन नोकरीतून कमी करणे शक्य आहे. या प्रकारच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रमाण साधारण १० टक्के आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना मात्र आकर्षक व्हीआरएस पॅकेज द्यावे लागेल.

तोटा वाढतच जाणार:-

 • गेल्या आर्थिक वर्षअखेरीस बीएसएनएलला १३,८०४ कोटी रुपयांचा तोटा झाला असून मार्च २०२० अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहिल्यास तोट्याचा आकडा १८ हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
 • कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात या दोन्ही कंपन्यांना जवळपास प्रत्येक महिन्यात अडचण येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सर्व घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे.

 

ओल्गा तोकार्झूक आणि पिटर हँडके यांना साहित्यातला नोबेल जाहीर

 • पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकार्झूक यांना २०१८ सालचा तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडके यांना २०१९ चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी या पुरस्काराला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे २०१८चा पुरस्कार या वर्षी जाहीर करण्यात आला आहे.
 • ५७ वर्षीय ओल्गा या पोलीश लेखिका, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि बुद्धीजीवी व्यक्ती आहेत. त्या आपल्या पिढीतील व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी एक आहेत. २०१८मध्ये त्यांना ‘फ्लाईट्स’ या आपल्या कांदबरीसाठी मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजने गौरविण्यात आले होते. हा गौरव प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत.
 • तर ऑस्ट्रिअन कादंबरीकार आणि अनुवादक पीटर हँडके (वय ७६) यांनी आपल्या आईच्या आत्महत्येने प्रभावित होऊन ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले होते. पीटर यांनी चित्रपटांसाठी लेखनही केले आहे.
 • त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाला १९७८ मध्ये कान फेस्टिवलमध्ये १९८० मध्ये गोल्ड अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. तसेच १९७५ मध्ये त्यांना पटकथा लेखक म्हणून ‘जर्मन फिल्म अॅवॉर्ड इन गोल्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून ते नावारुपाला आले होते.
 • १९०१ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराला सुरुवात झाली होती. आजवर ११६ साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यात सर्वाधिक इंग्रजी भाषिक साहित्यिकांचा समावेश आहे. चार वेळा संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 • साहित्यातील नोबेल सर्वात कमी वयात जिंकण्याचा मान ‘द जंगल बुक’ हे पुस्तक लिहिणाऱ्या रुडयार्ड किपलिंग यांच्या नावावर आहे, त्यावेळी त्यांचे वय ४१ वर्षे होते. त्यांचा जन्म ब्रिटिशशासित मुंबईमध्ये झाला होता.
10 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »