10 Sep Current Affairs

10 Sep Current Affairs
10 Sep Current Affairs

आफ्रिकेत गांधीजींच्या विचारांचा प्रसार

 • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आवडत्या गीतांवर आधारावर शांतीचा संदेश देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत एका दृक-श्राव्य संगीत-नाटक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 • शनिवारी या कार्यक्रमाचा प्रीमियर वीटवॉटर्सलँड युनिव्हर्सिटीच्या ग्रेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता; तसेच गांधी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
 • ‘गांधीजींच्या मूल्यांच्या माहितीबरोबरच आम्ही शांततेच्या प्रचारासाठी सार्वत्रिक संदेश देत आहोत. तरुणांनी याकडे आकर्षित व्हावे यासाठी ही योजना तयार केली आहे. परंतु कार्यक्रमादरम्यान असे लक्षात आले की, उपस्थित प्रेक्षकांमधील ज्येष्ठ मंडळींनीदेखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला, ’ असे संगीतकार भार्गव-केदार यांनी सांगितले. 
 • तर, ‘हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार झाला. खरे तर हा कार्यक्रम आमच्या लेनासियाच्या गांधी हॉलमध्ये व्हायला पाहिजे होता,’ असे हॉलची देखभाल करणाऱ्या जीवन रामजी यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान गांधीजींच्या जीवनातील ठळक वैशिष्ट्ये आठवण करून देणारी आणि गुजरातला पर्यटनस्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठीच्या १९ विशाल पॅनेलचे प्रदर्शन करण्यात आले होते.

महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिका:-

 • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म १९६९ मध्ये झाला. त्यांनी २१ वर्षे दक्षिण आर्फिकेत घालवल्यानंतर ते १९१५ मध्ये भारतात परतले. आफ्रिकेत असताना त्यांना तेथे वर्णभेदाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे राजकीय विचार बदलले. 
 • गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरमिट्यानी(?) गांधीना नोकरी दिली. 
 • 'भारतीयत्व' सर्व धर्म आणि जातींमध्ये उतरले आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधीनी या सर्वाना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण सांधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता, आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले. येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्‍न केला.
 • दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकालांगाची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृती यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले.
 • दक्षिण आफ्रिकेत गांधीना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकार्‍यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीमधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. (७ जून १८९३). गांधीनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणार्‍या त्या रेल्वे अधिकार्‍यास ते अद्दल घडवू शकले असते. पण सूडभावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता.
 • पुढे एकदा, प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.
 • तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. 
 • हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इ.स. १८९४ मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. इ.स. १८९७ मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर दरबानमध्ये उतरत असताना काही गोर्‍या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्‍न केला. आणि केवळ पोलीस अधीक्षकाच्या पत्‍नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते.
 • इ.स. १९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या ११ सप्टेंबर ला, गांधींनी, पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या आवाहनाला साद दिली आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे, नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे, नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला, चाबकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही खाल्या. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तिआन स्मट्स याला भाग पडले. शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली.
 • १९०६ मध्ये इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहित केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांच्या पाठींबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यानी केला. ब्रिटिशानी गांधींची ही मागणी मान्य केली. आणि २० जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती. दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले. या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणार्‍या मिलिटरी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशाजनक आहे - त्यानी ठरवून टाकले कि याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अश्या अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल. नंतर जेंव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेंव्हा गांधीना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकात घोषित करण्यात आले.
 • गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले असून, यानिमित्त दक्षिण आफ्रिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे गांधीजींच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे.
   

नाणेनिधीच्या प्रमुखपदी जॉर्जिव्हा

 • जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या नावाला कोणीही विरोध केलेला नाही. 
 • बल्गेरियाच्या असलेल्या जॉर्जिव्हा या माजी व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तिन लॅगार्ड यांची जागा घेणार आहे. लॅगार्ड यांनी युरोपीयन सेंट्रल बँकेच्या प्रमुखपदी निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी:-

 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund, IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 
 • आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे आणि कर्जे, पुनर्रचना किंवा मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आपली आर्थिक धोरणे अधिक उदार बनवावयास लावून विकास घडवून आणण्याचे घोषित ध्येय असणारी ही संस्था आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते. तिचे मुख्यालय संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलम्बिया इथे आहे.

उद्दिष्टे:-

 • आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे.
 • परदेशी व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी परदेशी चलन प्राप्त करून देणे.
 • चलनविषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे.
 • एखाद्या देशाचे देय चलन फेडण्यासाठी अन्य चलन देण्याची सुविधा आस्तित्त्वात आणणे.
 • परदेशी चलन विनिमय दरात स्थैर्य प्राप्त करणे.
   
10 Sep Current Affairs
10 Sep Current Affairs

ब्रेक्झिट लांबणीवर

 • युरोपीय समुदायाबरोबर कोणताही करार झाला नाही तर ब्रेक्झिट लांबणीवर टाकण्याचा अधिकार सरकारला देणाऱ्या कायद्यावर राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सोमवारी सही केली. हाउस ऑफ लॉर्ड‌्सने ही माहिती दिली. दरम्यान, हाउस ऑफ कॉमन्सचे सभापती जॉन बेर्को यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. संसदीय नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप ब्रेक्झिटच्या कडव्या समर्थकांनी केला होता. त्यावर, बेर्को यांनी आज राजीनाम्याची घोषणा केली. काहीही झाले तरी आपण ३१ ऑक्टोबर रोजी राजीनामा देणार असल्याचे बेर्को यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय जरी खासदारांनी घेतला तरी आपण निवडणुकीला उभे राहणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ब्रेक्झिट म्हणजे काय:-

 • युनायटेड किंग्डमची युरोपीय संघातून बाहेर पडण्याची घटना ब्रेक्झिट म्हणून ओळखली जाते. ब्रिटिश आणि एक्झिट या दोन इंग्लिश शब्दांच्या जोडीतून हा शब्द तयार झाला.
 • १९७३-२०१५ मध्ये झालेल्या मतदानात जास्ततर मते युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपिय संघात राहण्याच्या बाजूने होते.१९७३-२०१५ मध्ये झालेल्या मतदानात जास्ततर मते युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपिय संघात राहण्याच्या बाजूने होते.३ जून २०१६ रोजी आयोजित सार्वमतात ५२% मते युरोपियन युनियन सोडून जाण्याच्या नावे होते, यूके सरकार मार्च २०१७ च्या अखेरीस पर्यंत युरोपियन युनियन सोडण्यामागे औपचारिक प्रक्रिया, तह कलम ५० चालू करु इच्छिते. 
 • ह्या करार अटीनुसार, यूके मार्च २०१९ पर्यंत युरोपियन युनियन सोडेल. पुराणमतवादी सत्ताधारी पक्षाने सार्वमताने निवडून आलेल्या, पंतप्रधान तेरेसा मे ह्यांनी युरोपीय समुदाय कायदा १९७२ रद्द करण्याचे व विद्यमान युरोपियन युनियन कायदयाना यूके घरगुती यूके घरगुती कायदयांमध्ये अंतर्भूत करण्याचे आश्वासन केले आहे. 
 • जानेवारी २०१७ मध्ये, मे ह्यांनी वाटाघाटी उद्देशाने १२ बिंदू योजना घोषित केली व यूके सरकार एकच बाजार सदस्यता चालू ठेवण्यात इच्छित नाही अशी पुष्टी केली आहे. बाहेर पडण्याच्या अटी अद्याप वाटाघाटी केल्या गेल्या नाही आणि या दरम्यान, यूके युरोपियन युनियनचा पूर्ण सदस्य आहे.
 • यूके,युरोपीय संघाचा पूर्वज असलेल्या युरोपियन आर्थिक समुदाय (EEC) मध्ये १९७३ रोजी सामिल झाला व १९७५ रोजी ६७% सार्वमताने सदस्यतेची पुष्टी दिली. १९७३-२०१५ मध्ये झालेल्या मतदानात जास्ततर मते युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपिय संघात राहण्याच्या बाजूने होते. परंतु आता मात्र चित्र पालटले असल्याचे दिसून येते.
   

पाच वर्षांत १३० अब्ज डॉलर

 • येत्या पाच ते सात वर्षांत तिन्ही सैन्यदलांच्या आधुनिकीकरणावर १३० अब्ज डॉलर खर्च करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. शेजारी देशांकडून सुरक्षेला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एका सरकारी कागदपत्रात आहे.
 • लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्या आधुनिकीकरणाला गती देण्याचे सरकारने निश्चित केले आहे. यात मारक अस्त्रे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, पाणबुड्या आणि युद्धनौका खरेदीचा समावेश असेल. येत्या काही वर्षांत ही शस्त्रसामग्री सैन्यदलांच्या हाती सोपविण्यात येईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
 • 'सध्या पायदळाचे आधुनिकीकरण त्वरेने करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पायदळाला २६०० चिलखती वाहने आणि १७०० अतिप्रगत चिलखती वाहने पुरविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हवाई दलासाठी ११० बहुपयोगी लढाऊ विमानेही खरेदी केली जाणार आहेत. सरकार पाच ते सात वर्षांत तिन्ही सैन्यदलांच्या आधुनिकीकरणासाठी १३० अब्ज डॉलर खर्च करेल,' असे एका सरकारी कागदपत्रात म्हटले आहे.
 • पश्चिम आणि उत्तर आघाडीवर एकाच वेळी लढण्याची वेळ आल्यास त्या दृष्टीने सज्जता असावी, यासाठी लष्कर तातडीने आधुनिकीकरणावर भर देत आहे. चीन हवाई आणि सागरी मारक क्षमता वाढवित असल्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. त्यामुळे आपले हवाई दल आणि नौदलही चीनशी तुल्यबळ राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 • दिल्ली आणि मुंबईसह भारताची एकूणच हवाई हद्द अभेद्य करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. त्याच प्रमाणे संरक्षण क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देणे तसेच, काही महत्त्वाच्या धोरणात्मक घोषणाही येत्या काही महिन्यांत केल्या जाण्याची शक्यता आहे, असेही सरकारी सूत्रांनी सांगितले.

कोणाला काय मिळणार?
लष्कर:-

 • २६०० चिलखती वाहने
 • १७०० अतिप्रगत चिलखती वाहने

नौदल:-

 • २०० युद्धनौका
 • ५०० विमाने व हेलिकॉप्टर
 • २४ मारक पाणबुड्या

हवाई दल:-

 • ११० बहुपयोगी लढाऊ विमाने
 • पाच हजार किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता असलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे
   
10 Sep Current Affairs
10 Sep Current Affairs

राफेल साठी तुकडी

 • हवाई दलातील १७ क्रमांकाची 'गोल्डन अॅरो' ही तुकडी पुनरुज्जीवित होणार आहे. कारगिल युद्धात शौर्य गाजवलेली ही तुकडी हवाई दलातून मिग-२१ बाद होऊ लागल्यानंतर रद्द झाली होती.
 • अंबाला हवाई तळावर आज, मंगळवारी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ ही तुकडी औपचारिकपणे ताफ्यात अंतर्भूत करतील. कारगिल युद्धानंतर रशियन बनावटीची मिग २१ लढाऊ विमाने टप्प्याटप्प्याने बाद करण्यास सुरुवात झाली. 
 • 'गोल्डन अॅरो' या तुकडीत मिग २१ विमाने होती. त्यानंतर सन २०१६मध्ये ही तुकडी बंद करण्यात आली. सप्टेंबर अखेरीस भारताच्या भात्यात पहिले राफेल विमान येणार आहे. हे विमान या 'गोल्डर अॅरो' तुकडीत दाखल करून घेण्यात येणार आहे. तर, राफेलची दुसरी तुकडी पश्चिम बंगालमध्ये असेल.
   

संयुक्त राष्ट्रांना काश्मिरींची चिंता!

 • मानवी हक्क जपण्याचे भारत आणि पाकिस्तान दोघांनाही आवाहन
 • भारत आणि पाकिस्तानने काश्मिरी जनतेच्या मानवी हक्कांची जपणूक करावी, असे संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा मिशेल बॅचेले यांनी सोमवारी दोन्ही देशांना सांगितले.
 • संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या ४२ व्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविकातच बॅचेले यांनी काश्मीर विषयाला स्पर्श केला. काश्मिरींच्या भवितव्याविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्या निर्णयप्रक्रियेत काश्मिरींनाही सहभागी करून घेतले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. आसाममध्ये १९ लाख लोकांचे नागरिकत्व धोक्यात आल्याने त्यांच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
 • जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आगपाखड सुरू केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय नेण्याची घोषणा केली होती.
 • उभय देशांमधील तणाव वाढत असताना आपल्याकडून काश्मिरी जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ नये, याची काळजी दोघांनीही घेतली पाहिजे. उभय बाजूंकडील काश्मीरमध्ये मानवी हक्कांच्या स्थितीबाबत आम्हाला वेळोवेळी अहवाल मिळत असतात.
 • भारत सरकारने काश्मीरमध्ये घातलेल्या र्निबधांबाबत तीव्र चिंता व्यक्त करीत बॅचेले म्हणाल्या की, ‘‘इंटरनेट  तसेच लोकसंपर्कावरील कठोर निर्बंध, नेत्यांना झालेली अटक किंवा स्थानबद्धता याबद्दल मला चिंता वाटते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना मी आवाहन केले असले तरी भारताला मी विशेषत्वाने सांगते की, त्यांनी सध्याची संचारबंदी शिथिल करावी आणि जे अटकेत आहेत त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे.’’

प्राणहानी टाळण्यास अग्रक्रम:-

 • जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. इंटरनेट आदी र्निबधांबाबत काश्मिरी जनतेत नाराजी आहे, याची कबुली देत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शनिवारी सांगितले होते की, ‘‘इंटरनेट अस्तित्वात येण्याआधीही लोक जगत होतेच. इंटरनेट सेवा सुरू असती तर अतिरेक्यांनी त्याचा गैरवापर केला असता आणि त्याने काश्मिरींच्या जीवितासच धोका निर्माण झाला असता. त्यामुळे आम्ही इंटरनेटपेक्षा त्यांच्या प्राणांना अग्रक्रम दिला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. आता ९२.५ टक्के भूभागावरील निर्बंध पूर्ण उठवले गेले आहेत.’’

(ही परिषद कोठे सुरु आहे हे लक्षात ठेवा)

10 Sep Current Affairs
10 Sep Current Affairs

रवीशकुमार यांना मॅगसेसे प्रदान

 • ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सोमवारी येथे प्रदान करण्यात आला. रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियाचा नोबेल पुरस्कार मानला जातो. रवीश कुमार एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत. वास्तववादी वार्तांकन करण्याकडे कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच रवीश कुमार यांचा कल राहिला आहे. 
 • सर्वसामान्यांचे सहसा प्रसारमाध्यमांकडून दखल न घेतले जाणारे प्रश्न मांडणे यावर त्यांचा भर राहिला आहे. 

2019 मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी:-

 1. रवीशकुमार, भारत
 2. को स्वे विन, म्यानमार
 3. अँगखाना नीलापैजित, थायलंड
 4. रेमुंडो पुंजान्ते कायाब्याब, फिलिपाइन्स
 5. किम जो की, दक्षिण कोरिया
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »