11 July Current Affairs

11 July Current Affairs
11 July Current Affairs

नवजात बालकांमध्ये क्षयरोग संसर्गात वाढ

शहरी भागांतही लागण; पालकांना काळजी घेण्याचे आवाहन
पोलिओपाठोपाठ क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न होत असले तरी बालकांमधील वाढता क्षयरोग संसर्ग चिंतेचा विषय बनला आहे. मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात राज्यातील सहाशे एकोणसाठ बालकांना क्षयरोगाची लागण झाली. विशेष म्हणजे या बालकांचा वयोगट नवजात शिशू ते एक वर्ष असा असून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरी भागांमध्येही क्षयरोगाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. २०१७ मध्ये राज्यात एक लाख अठय़ाहत्तर हजार दोनशे पंचावन्न जणांना क्षयरोगाची लागण झाली होती. सन २०१८ मध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या दोन लाख अकरा हजार एवढी होती. त्यापैकी मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ मध्ये सहाशे एकोणसाठ बालकांना क्षयरोग संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
बालकांमध्ये जन्मत: क्षयरोग होण्याची अनेक कारणे असतात. गर्भवती महिलेला क्षयरोग झाला असल्यास तिच्या बाळाला त्याची लागण होण्याची शक्यता असते. कुटुंबात किंवा जवळपास क्षयाचे रुग्ण असतील तरी लहान मुलांना त्याचा संसर्ग लगेच होण्याचा धोका असतो, असे राज्य आरोग्य विभागाच्या क्षयरोग सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.
ससून सवरेपचार रुग्णालयाच्या क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड म्हणाले, बाळाच्या सहवासात येणाऱ्या व्यक्ती उदा. आंघोळ घालणाऱ्या मावशी, सांभाळणारे मदतनीस यांना क्षयरोगाची लक्षणे नाहीत ना, याची खात्री करावी.

दीर्घ काळ सातत्याने येणारा ताप, खोकला ही लक्षणे असल्यास बाळाची क्षयरोगाची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. क्षयरोगाची लागण झाल्यास बाळाचे वजन वाढत नाही. भूक कमी झाल्याने त्याचा आहार मंदावतो. बाळ चिडचिड करते किंवा सतत थकल्यासारखे राहाते. क्षयाचे निदान होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडून बाळाची तपासणी करून घ्यावी तसेच जन्मत:च बाळाला बीसीजी लस द्यावी.
काय काळजी घ्यावी?
बाळाला जन्मत:च बीसीजी लस द्यावी.
क्षयाचे निदान झाल्यास तातडीने औषधोपचार सुरू करावेत.
घरातील, जवळपासच्या भागात क्षयाचे रुग्ण असल्यास बाळाला त्यांच्यापासून लांब ठेवावे.
डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधोपचार थांबवू नये.
एक वर्ष वयापर्यंत बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळेदेखील त्यांना क्षयाची लागण होते. तीन वर्षे वयापर्यंत बाळाचे क्षयाच्या संसर्गापासून रक्षण करणे आवश्यक आहे. क्षयाचा संसर्ग आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावेत, मात्र क्षयाची औषधे दीर्घकाळपर्यंत घेणे गरजेचे असते.
 

ग्रीन कार्ड वरील मर्यादा उठणार?

अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य आणि काम करण्याची परवानगी असणाऱ्या 'ग्रीन कार्ड'वरील मर्यादा उठविण्याच्या विधेयकावर अमेरिकेमध्ये स्थानिक वेळेनुसार मंगळवारी मतदान होणार आहे. या लोकप्रतिनिधींनी कौल दिला, तर प्रत्येक देशासाठी असलेली सात टक्क्यांची मर्यादा संपुष्टात येणार आहे. त्याचा फायदा अमेरिकेमध्ये अनेक वर्षांपासून राहात असणाऱ्या आयटी क्षेत्रातील हजारो भारतीयांना होऊ शकतो. 

अमेरिकेच्या आयटी क्षेत्रामध्ये हजारो भारतीय काम करत असून, ते प्रामुख्याने एच-१बी व्हिसावरच ते अमेरिकेमध्ये राहात आहेत. अमेरिकेत राहात असणाऱ्या भारतासह अनेक देशांचे नागरिक 'ग्रीन कार्ड' मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, प्रत्येक देशासाठी सात टक्क्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या अर्जांमध्ये भारतीयांची संख्या मोठी असून, एका संशोधनानुसार सध्याच्या मर्यादेनुसार भारतीयांचे अर्ज मार्गी लावण्यासाठी किमान ७० वर्षांचा कालावधी लागू शकतो. 

अनेक दिवसांपासून 'ग्रीन कार्ड'वरील मर्यादा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या विधेयकाला लोकप्रतिनिधीगृहातील ४३५पैकी ३१०पेक्षा जास्त प्रतिनिधींचा पाठिंबा आहे. यामध्ये २०३ डेमोक्रॅटिक आणि १०८ रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी २९० मतांची गरज आहे. याशिवाय, भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरिस यांनी मांडलेले याच विषयावरील अन्य एक विधेयक लवकरच चर्चेला येणार आहे. हे विधेयक मंजूर झाले, तर तीन लाख भारतीयांना एच-१बी व्हिसा मिळविण्यासाठी फायदा होऊ शकतो. 

ट्रम्प पॅरिस करारावर बरसले 

वॉशिंग्टन : हवामान बदलाशी सामना करण्यासाठी पॅरिस करारावर सही केल्यावरून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर जोरदार टीका केली. हा करार सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या देशांसाठीच फायदा देणारे असून, अमेरिकेच्या ऊर्जा क्षेत्रावर या करारामुळे युद्ध लादले गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. 'या करारामुळे आपल्याच कामगार, उत्पादकांना शिक्षा मिळत आहे. या कराराचा काहीच परिणामकारक नाही आणि सर्वांत जास्त प्रदूषण करणाऱ्या सवलती देण्यात आल्या आहेत,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 
मे यांच्यावर टीका:-
'ब्रेक्झिट'च्या काळातील ब्रिटनच्या माजी पंतप्रधान थेरेसा मे आणि ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत किम डॅरक यांच्यातील वादग्रस्त चर्चा जगजाहीर झाल्यामुळे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे यांच्यावर सोमवारी जोरदार टीका केली. डॅरक यांनी मे यांच्याशी संपर्क करताना, ट्रम्प हे अयोग्य असून, त्यांचे अध्यक्षीय कार्यालय निष्क्रिय असल्याचे म्हटले होते. ही संवादाची केबल जगजाहीर झाल्यानंतर, ट्रम्प भडकले आहेत.
 

11 July Current Affairs
11 July Current Affairs

दोन हजारांची नोट अधिक स्वस्त

दोन हजार रुपयाची नोट छापण्याचा खर्च पूर्वीच्या तुलनेत ६५ पैशांनी कमी झाला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांची एक नोट छापण्यासाठी ४.१८ रुपये खर्च येत होता. २०१८-१९ अखेरीस या खर्चात ६५ पैशांची बचत होऊन तो प्रतिनोट ३.५३ रुपयांपर्यंत घटला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि.तर्फे (बीआरबीएनएमपीएल) केली जाते. 
बीआरबीएनएमपीएलतर्फे छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटेच्या छपाईसाठी २०१८-१९ अखेरीस २.१३ रुपये तर, दोनशे रुपयांच्या नोटेसाठी २.१५ रुपये खर्च येत होता.
 

अमेरिकी वस्तूंवरील भारताचे कर अस्वीकारार्ह

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेत व्यापारविषयक मुद्दे निकालात काढण्यावर मतैक्य झाले असताना ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा भारताला लक्ष्य केले. अमेरिकी वस्तूंवर भारतात आकारला जाणारा कर अवाजवी असून, तो अस्वीकारार्ह आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओसाका येथे २८ जून रोजी जी -२० शिखर बैठकीवेळी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी  दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापारातील अडचणी सोडवण्यासाठी व्यापारमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याचे मान्य केले होते. मात्र, ट्रम्प यांनी भारतात अमेरिकी वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या कराचा मुद्दा मंगळवारी पुन्हा उपस्थित केला. भारताने आतापर्यंत अमेरिकी वस्तूंवर भरमसाठ कर लादून भरपूर फायदा वसूल केला आहे. यापुढे हे खपवून घेणार नाही, असे ट्टिवट ट्रम्प यांनी केले आहे.या आठवडय़ात वॉशिंग्टन येथे महत्त्वाची भारतकेंद्री बैठक होत असून, त्यात अमेरिकी व्यापार मंत्री विल्बर रॉस व ऊर्जामंत्री रिक पेरी हे मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारतीय कराबाबत केलेला पुनरूच्चार महत्त्वाचा मानला जातो.
अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध सुरू असताना तशीच स्थिती भारत आणि अमेरिका यांच्यातही निर्माण होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भारताने अमेरिकेच्या एकूण २८ वस्तूंवरचे कर वाढवले असून त्यात बदाम, डाळी, अक्रोड, सफरचंद यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी भारताचा व्यापारअनुकूल देशाचा दर्जा काढून घेतल्याने आता भारताच्या वस्तूंवरील आयात करात मिळणारी सवलत रद्द झाली आहे. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने अमेरिकेच्या २८ वस्तूंवरचे कर पन्नास टक्के वाढवले होते.
 

11 July Current Affairs
11 July Current Affairs

जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै

दरवर्षी 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या माध्यमातून हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने, महिलांसाठी मेड्रोक्झिप्रोगेस्टेरॉन एसीटेट (MPA) नावाची नवी गर्भनिरोधकाची नवीन पद्धत म्हणजेच इंट्रामस्क्यूलर इंजेक्शन्सद्वारे गर्भनिरोधकाची रिव्हर्सिबल मेथड उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले आहे.
पार्श्वभूमी:-
11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) संचालक मंडळाने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक लोकसंख्येबद्दलची आकडेवारी
एप्रिल 2019 पर्यंतची जागतिक लोकसंख्या - 770 कोटीजागतिक लोकसंख्येला 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 2 लक्ष वर्षांचा कालावधी लागला. तर जागतिक लोकसंख्येनी 100 कोटींवरुन 700 कोटींचा आकडा अवघ्या 200 वर्षांमध्ये गाठला.सन 1955 ते सन 1975 या काळात जागतिक लोकसंख्या वाढ सर्वाधिक म्हणजे वर्षाला 1.8 टक्क्यांनी वाढली. सन 2010 ते सन 2015 या काळात जागतिक लोकसंख्येची वाढ 1.2 टक्क्यांनी घटली.सन 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्येचा आकडा 1 हजार कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सन 2100 मध्ये जागतिक लोकसंख्या 1100 कोटी इतकी असण्याची शक्यता आहे.सन 2018च्या आकडेवारीनुसार जागतिक लोकसंख्येचे सरासरी वयोमान 30 वर्षे 4 महिने इतके आहे.सर्वाधिक लोकसंख्या असणारे खंड: आशिया (लोकसंख्या: 443.6 कोटी); आफ्रिका (121.6 कोटी); युरोप (73.8 कोटी); उत्तर अमेरिका (57.9 कोटी); दक्षिण अमेरिका (42.2 कोटी); ऑस्ट्रेलिया (39.9 कोटी); अंटार्टिका (1200 अस्थायी बहुतेक संशोधक).सन 2014 च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश (प्रथम दहा): चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायझेरिया, बांग्लादेश, रशिया, जपान. 438 कोटी लोक या दहा देशांमध्ये राहतात. हा आकडा जागतिक लोकसंख्येच्या 57 टक्के इतका आहे.सन 2027 मध्ये भारत चीनला मागे टाकत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होण्याची शक्यता आहे.
भारत:-
आज भारताची लोकसंख्या 133 कोटी इतकी आहे, जी जागतिक लोकसंख्येच्या जवळपास 17.5 टक्के आहे. भारत 2020 सालापर्यंत जगातला सर्वात तरुण देश बनणार आहे, ज्यात 64 टक्के तरुण असतील.
गर्भधारणा-संबंधित गुंतागुंतीमुळे दररोज सुमारे 800 महिला मृत्युमुखी पडतात आणि यापैकी 20 टक्के मृत्यू भारतात होतात. भारतात प्रसूतीदरम्यान मृत्यूचा दर सन 2007च्या तुलनेत 83 टक्के कमी झाला आहे म्हणजेच 2012 साली प्रत्येक 100,000 जन्मात 178 मृत्यू झाले, जे 2007 साली 212 होते.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »