11 Oct Current Affairs

11 Oct Current Affairs
11 Oct Current Affairs

जीएसटीबाबत केंद्राची समिती

 • जीएसटी संकलनात अपेक्षित वाढ होत नसल्यामुळे केंद्र सरकारने महसूलवाढीचे उपाय सुचविण्यासाठी गुरुवारी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली. महसूलवाढीचे प्रभावी उपाय सुचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीला १५ दिवसांत जीएसटी परिषदेला अहवाल सादर करायचा आहे.
 • जीएसटी परिषद सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, १२ अधिकाऱ्यांच्या या उच्चस्तरीय समितीत केंद्राच्या आणि राज्यांच्या प्रत्येकी पाच सदस्यांचा समावेश असेल. तसेच जीएसटी परिषदेचे संयुक्त सचिव आणि जीएसटीएनच्या कार्यकारी उपाध्यक्षांचाही समितीमध्ये समावेश आहे. या समितीत महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाबच्या जीएसटी आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. जीएसटी परिषद सचिवालयाला पत्र लिहून कुठल्याही राज्याला या समितीत सहभागी होता येणार आहे.
 • आर्थिक मंदी आणि मागणीतील घट यामुळे चालू आर्थिक वर्षात जीएसटी संकलनात घसरण सुरू असून महसूल वसुलीत अपेक्षेपेक्षा ४० हजार कोटींनी घट होण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. जीएसटी संकलनाने यंदा सप्टेंबर महिन्यात ९१ हजार ९१६ हजार कोटींसह १९ महिन्यांचा नीचांक गाठला आहे. त्यापूर्वी, ऑगस्ट महिन्यात ९८ हजार २०२ कोटींची करवसुली झाली होती.

करचोरी रोखणे, कायद्यात बदलांच्या शिफारशी:-

 • महसूलवाढीचे उपाय, उद्योग व्यवसायांकडून नियमांचे उत्स्फूत पालन, नियमांचा दुरुपयोग रोखणे, करांचा पाया व्यापक करणे, डेटा अॅनालिटिक्स आणि उत्तम प्रशासकीय समन्वयाच्या माध्यमातून जीएसटी चोरी रोखणे तसेच कायद्यात आवश्यक बदल करण्याच्या शिफारशी या समितीला करावयाच्या आहेत.

 

मोदी जिनपिंग यांची ऐतिहासिक स्थळांना भेट

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. जिनपिंक आज भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास तमिळ पेहराव केला होता.
 • राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या राष्ट्रपतींना महाबलीपूरममधील ऐतिहासिक स्थळं दाखवली. त्यांची इंत्यभूत माहिती सांगितली. या स्थळी फिरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांनी नारळ पाण्याचा आस्वाद सुद्धा घेतला. शी जिनपिंग यांच्या या भारत भेटीमुळे भारत-चीन संबंध अधिक दृढ होतील, असे बोलले जात आहे.
 • चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले. दिल्लीत येण्याऐवजी ते प्रथमच केरळमध्ये आले. जिनपिंग यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्रजी, तमिळ आणि मंडारिन भाषेत ट्विट केले होते. जिनपिंग या ठिकाणी पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, राष्ट्रपती शी जिनपिंग, भारतात तुमचं स्वागत आहे.
 • हे स्वागत मोदींनी तीन भाषेत केले आहे. याआधी मोदींनी आज सकाळी जिनपिंग यांच्यासोबत अनौपचारिक शिखर चर्चेसाठी पोहोचण्यासाठी तीन भाषेत ट्विट केले. मी चेन्नईला पोहोचलो. मी तामिळनाडूच्या भूमीवर येऊन आनंदी आहे. तामिळनाडू अद्भूत संस्कृती आणि आदरातिथ्यसाठी ओळखले जाते, असे मोदींनी म्हटले. आनंदाची बाब म्हणजे तामिळनाडू राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं स्वागत करणार आहे. या अनौपचारिक शिखर चर्चेमुळे भारत-चीनचे संबंध आणखी दृढ होणार, अशी मला आशा आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील पारंपारिक पोशाख केला होता. दक्षिण भारतमधील हा खास पोशाख असून त्याला 'वेश्टी' असं म्हणतात. भारत दौऱ्यावर आलेल्या चीनच्या राष्ट्रपतींनी मात्र साधा पेहराव केला होता. मोदी आणि शी जिनपिंग हे महाबलीपूरममधील अर्जून येथील तपोस्थळी येथे गेले.
 • अर्जूनने या ठिकाणी तपश्चर्या केल्याची अख्यायिका आहे. त्यानंतर मोदींनी शी जिनपिंग यांना पंच रथ आणि शोर मंदिर या ठिकाणी नेले. या ऐतिहासिक स्थळाची माहिती त्यांना दिली. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर चीनचे राष्ट्रपतींचा हा पहिलाच भारत दौरा आहे. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीन हा एकमेव देश आहे. चीनने संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.
11 Oct Current Affairs
11 Oct Current Affairs

पाकिस्तानकडून या वर्षात तब्बल २३१७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

 • पाकिस्तानकडून वारंवार केले जाणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन ही जरी आपल्यासाठी नित्याचीच बाब झालेली असली तरी देखील, सतत इशारा देऊनही पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा समोर आलेला आकडा हा थक्क करणारा आहे. पाकिस्तानकडून या वर्षात १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत म्हणजेच कालपर्यंत, तब्बल २ हजार ३१७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
 • तर, भारतीय जवानांकडून एलओसीवरील व काश्मीर खोऱ्यातील विविध कारवायांमध्ये १४७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
 • याबरोबर ही देखील माहिती समोर आली आहे की, काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी जवळपास ५०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांकडून एलओसीवरील जवानांना दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पूर्णपणे मोकळीक देण्यात आल्याची देखील माहिती आहे. दहशतवाद्यांची एक मोठी टोळी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे.
 • केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानसह दहशवादी संघटना अधिकच चवातळल्याचे दिसत आहे. काश्मीर खोरे अशांत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान नव्या बनावट नोटांद्वारे भारताला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील माहिती समोर आली होती.
 • याचबरोबर पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतात घातपात घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे. पाकिस्तानी सेना व आयएसआयच्या मदतीने लश्कर ए तैयबा (एलइटी), हिजबुल मुजाहिद्दीन(एचएम) आणि जैश ए मोहम्मद (जेएम) या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरसह भारताच्या अन्य काही भागात दहशतवादी कारवायांसाठी एकत्र येत जबाबदाऱ्या वाटून घेतल्या असल्याची देखील माहिती समोर आली होती.
 • गुप्तचर संस्थांकडून प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानचे पाठबळ असलेल्या या दहशतवादी संघटनांना जम्मू-काश्मीरसह भारतातील काही भागात हल्ले करणे, याचबरोबर पोलीस कर्मचारी व राजकीय नेत्यांची हत्या घडवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘जेएम’ वर राष्ट्रीय महामार्गावर हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 • तर ‘एलइटी’ ला अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सांगितले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनवर काश्मीर खोऱ्यात बंद घडवण्याबरोबरच पोलीस व नेत्यांची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती मिळालेली आहे. याचबरोबर स्थानिक लोकांना लक्ष्य करत जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण केली जाणार आहे.

सौदी अरेबियाच्या समुद्रात इराणच्या तेल टँकरवर रॉकेट हल्ला

 • लाल समुद्रातून जाणाऱ्या इराणच्या तेल टँकरवर शुक्रवारी रॉकेट हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून या भागात इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. रॉकेट हल्ल्यामुळे इराण आणि सौदी अरेबियाचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासंबंधी सौदी अरेबियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
 • रॉकेट हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटामध्ये तेल टँकरवरील दोन स्टोअर रुमचे नुकसान झाले असून समुद्रात तेल गळती सुरु आहे. इराणच्या सरकारी तेल कंपनीच्या मालकीचा हा तेल टँकर होता. सौदीच्या जेद्दा बंदरापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
 • लाल समुद्रात घडलेल्या या घटनेची आपल्याला कल्पना आहे पण त्यावर कोणीतीही प्रतिक्रिया देण्यास अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीटच्या प्रवक्त्याने नकार दिला.
 • १४ सप्टेंबरला आखातामधील सौदी अरेबियाच्या दोन तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे सौदीला तेल उत्पादन निम्म्याने कमी करावे लागले. येमेनमधील हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आखातमध्ये याआधी सुद्धा तेल टँकरवर हल्ले झाले होते. अमेरिकेने या सर्व हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरले होते. पण इराणने हे सर्व आरोप फेटाळून लावले.
 • होरमुझच्या खाडीत तेल टँकरवर झालेले हल्ले, इराणने पाडलेले अमेरिकेचे ड्रोन या घटनांमुळे मागच्या काही महिन्यात या भागात मोठया प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. युद्धाचे इशारे दिले जात होते.
 • अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचीही तयारी केली होती. पण अखेरच्या क्षणी डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरचा अण्वस्त्र करार रद्द केला व त्यांच्यावर निर्बंध लादले तेव्हापासून आखातमध्ये संघर्षाला सुरुवात झाली.
11 Oct Current Affairs
11 Oct Current Affairs

स्वत:चा विक्रम मोडण्याचा विक्रमही किंग कोहली च्या नावावर

 • पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली. विराटने भारताच्या डावाला आकार देताना धमाकेदार २५४ धावा केल्या.
 • त्याच्या या खेळीच्या बळावर भारत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आणखी मजबूत स्थितीत पोहोचला. आधी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि नंतर रवींद्र जाडेजा याच्यासोबत शतकी भागीदारी करताना विराटने कसोटी कारकिर्दीतील ७ वी द्विशतकी खेळी केली.
 • कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ३३६ चेंडूत २५४ धावांची खेळी केली. त्या खेळीत त्याने ३३ चौकार आणि २ षटकार लगावले. विराटने या खेळीसह कसोटी कारकिर्दीतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
 • कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच २५० धावांचा टप्पा ओलांडला. यासह त्याने आपला २४३ धावांचा सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. महत्त्वाची बाब म्हणजे स्वत:च्या सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम सर्वाधिक वेळा स्वत: मोडण्याचा विक्रम कोहलीने केला. त्याने सर्वाधिक तब्बल १५ वेळा स्वत:चा सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला.
 • याशिवाय, विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडला. सचिनने कसोटीत २४८ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. तो विक्रमही कोहलीने मोडला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद २१ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांमध्येही विराटने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दिग्गजांचा विक्रम मोडला.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »