11 Sep Current Affairs

11 Sep Current Affairs
11 Sep Current Affairs

ईस्टर संडे च्या धक्क्यातून सावरत श्रीलंकेची नवी झेप

 • पर्यटकांसाठी कोलंबोत ‘नव्या दुबई’ ची उभारणी
 • ‘ईस्टर संडे’ला म्हणजेच २१ एप्रिल रोजी तीनशेहून अधिक निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरलेली श्रीलंका अवघ्या चार महिन्यांत पूर्वपदावर आली आहे. 
 • एवढेच नव्हे, तर ‘युद्धाचा देश’ अशा प्रतिमेच्या पलीकडे जात जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.
 • या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.
 • दोन ते तीन दशके लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम( एलटीटीई) सोबत चाललेला रक्तरंजित संघर्ष मार्च २००९मध्ये संपुष्टात आल्यानंतर गेल्या काही वर्षांत जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र २१ एप्रिल रोजी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेने श्रीलंका पुन्हा हादरून गेला. 
 • मात्र या हल्ल्यातून सावरून या देशाने केवळ चार महिन्यांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांना धडा शिकवीत देशातील परिस्थितीही पूर्वपदावर आणली आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक पातळीवर देशाला भक्कम करण्यासाठी तेथील सरकारने एक नवा प्रयोग हाती घेतला आहे. 
 • देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे. चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे. 
 • विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 • या ठिकाणी देश-विदेशातील कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून त्यांना ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्टय़ाने जमीन दिली जाणार (चीनच्या बाबतीत याचा अर्थ तुम्ही analysis करू शकता) आहे. या प्रकल्पामुळे श्रीलंकेचा भौगोलिक आणि वित्तीय चेहराही बदलणार असून लवकरच जागतिक नकाशावर देशाची नवी ओळख निर्माण होईल, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

होणार काय?:-

पुढील २० वर्षांत श्रीलंकेमध्ये कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी विकसित केली जात आहे.

यात जागतिक दर्जाचे व्यापार केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य, शिक्षणसंस्था, मरिना पार्क, पंचतारांकित हॉटेलसह ११० एकरमध्ये पब्लिक पार्क, ३०० एकरमध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि मनोरंजन पार्क, रिसॉर्ट उभारण्यात येणार आहेत.

या ठिकाणी जगभरातील किमान ५०० कंपन्या येतील आणि त्यातून देशातील लोकांसाठी ८० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

प्रा चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रीय हिंदी सन्मान

 • मराठी व हिंदीचे ज्येष्ठ कवी, अनुवादक, समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 
 • ज्या अिहदी भाषिक लेखकांनी आपल्या सृजनशील लेखनातून हिंदी भाषेला समृद्ध केले आहे, अशा ज्येष्ठ आणि लिहित्या लेखकांसाठी हा सन्मान गेल्या तीन वर्षांपासून दिला जातो.

स्वरूप:-

 • एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१८ या वर्षांसाठी निवड समितीने पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. १४ सप्टेंबर रोजी भोपाळ येथे हा पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. पाटील:-

 • मराठी व हिंदी भाषेत डॉ. पाटील यांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 
 • त्यांना यापूर्वी भीष्म साहनी यांच्या ‘तमस’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. 
 • ‘कवितांतरण’ या त्यांच्या काव्य संपादनासाठी अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. 
 • साहित्य अकादमीतर्फे भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून चीन व विश्व हिदी संमेलनात दक्षिण आफ्रिका येथे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
   
11 Sep Current Affairs
11 Sep Current Affairs

पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

 • दक्षिण आशियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले आहे.
 • भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील ही पहिली आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईन आहे. मोतीहारी ते अमलेखगंज या दोन्ही शहरांमधील ही पाईपलाईन भारत आणि नेपाळच्या मैत्रीचे प्रतीक ठरेल. 
 • नरेंद्र मोदी म्हणाले, दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय स्वरूपाची पाईपलाईन विक्रमी वेळेत पूर्ण झाली हा आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. नियोजित वेळेपेक्षा आधीच ही पाईपलाईन पूर्ण झाली आहे.
 • १९९६ मध्ये पहिल्यांदा या दोन्ही देशांमध्ये पेट्रोलसाठी पाईपलाईनचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 

पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या नेपाळ भेटीमध्ये या पाईपलाईनच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नवी दिल्लीमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.

दहशतवादाचा प्रश्न अधिकाधिक उग्र

अल् कायदा:-

 • 'अल् कायदा' या दहशतवादी संघटनेकडून न्यूयॉर्कमध्ये ९ सप्टेंबर २००१ रोजी चार दहशतवादी हल्ले करण्यात आले. हल्ल्यांचे पडसाद आजही जगभर उमटत आहेत. या हल्ल्यांत सुमारे तीन हजार लोक मृत्युमुखी पडले आणि सहा हजार नागरिक जखमी झाले. 
 • न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर हल्लेखोरांनी विमान धडकवले. त्यामुळे या इमारती उद्ध्वस्त झाल्या. या हल्ल्यांना १८ वर्षे पूर्ण होऊनही अद्याप जगभरातील दहशतवादाचा प्रश्न पूर्वीपेक्षाही उग्र बनत चालला आहे.
 • ९/११ नंतरचे जगातील चित्र
 • दहशतवादात वाढ आणि फैलाव.
 • आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देश दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनले.
 • इस्लामिक स्टेटसारख्या नव्या दहशतवादी संघटनांचा उदय.
 • दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान.
 • कारवायांसाठी नवी पद्धती.

गरज:-

 • दहशतवाद्यांना रोखण्यासाठी नवे धोरण हवे.
 • हिंसाचार आणि कट्टरवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी नवी नीती.
 • बचावात्मक दृष्टिकोन.
 • आव्हाने ओळखणे.
 • कट्टरवादाशी लढा धेण्यासाठी बळाच्या वापरापेक्षा अन्य मार्गांचा विचार.
 • सर्वंकष दूरगामी विचार.

दहशतवादी संघटना:-

 • अल् कायदा, लष्करे तैयबा, हिज्बुल मुजाहिदिन, इंडियन मुजाहिदिन, इस्लामिक स्टेट, जमाते इस्लामी, तेहरिक ए तालिबान पाकिस्तान, जैशे महंमद आदी.
 • अल् कायदा : ओसामा बिन लादेनने अफगाणिस्तानात जाऊन सोव्हिएत युनियनच्या विरोधात या संघटना स्थापन केली. अमेरिकी सैन्याने सौदी अरेबियातून बाहेर पडावे, यासाठी त्याने १९९६ व १९९८ अशा दोन वेळा फतवे काढले. त्यानंतर अमेरिकेविरोधात 'पवित्र युद्ध' पुकारले. २००१च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अल-कायदाची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली. अखेरीस २०११मध्ये लादेन मारला गेला. त्यानंतर आयमन अल्-जवाहिरीने त्याची जागा घेतली. २०१७मध्ये सीरियामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात जवाहिरी ठार झाला, असे म्हणतात. त्याचप्रमाणे ओसामा लादेनचा मुलगा हमजा याचाही अमेरिकेच्या हल्ल्यात अलीकडेच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

अमेरिकी व अल कायदा:-

 • अलीकडील काही वर्षांत अमेरिकेच्या धोरणांमधून अल् कायदाचा प्राधान्यक्रम खालावला आहे. इस्लामिक स्टेटच्या पाडावानंतर एकूणच आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा जोर कमी झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे.
 • त्याचप्रमाणे दहशतवादविरोधी लढ्यासंबंधीच्या धोरणांमध्ये शैथिल्य आल्याचे म्हटले जाते. काही राजकारण्यांकडून अल् कायदाच्या कारवायांबाबत अद्याप चिंता व्यक्त केली जात असली, तरी गेल्या काही वर्षांमध्ये अल् कायदाने एकही आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ला केलेला नाही. 
 • जवाहिरीपाठोपाठ हमजाचा मृत्यू झाल्यामुळे एकूण संघटना क्षीण जाली आहे. इस्लामिक स्टेटसारख्या जिहादी संघटनेमुळे अल कायदाचे वर्चस्वही कमी झाले आहे.
 • मात्र, अल् कायदा राजकीय दृष्ट्या दुर्बल ठरवली जात असली, तरीही या संघटनेने आपले अमेरिकाविरोधी धोरण कायम ठेवले असून, छुप्या कारवायाही सुरू आहेत.
   
11 Sep Current Affairs
11 Sep Current Affairs

तालिबानसोबतची चर्चा मृत

 • तालिबानसोबतची अफगाण शांतता चर्चा 'मृत' झाली आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. 'गेल्या चार दिवसांत अमेरिकेने तालिबानबाबत कठोर भूमिका जाहीर केली आहे. गेल्या दहा वर्षांत अशी भूमिका घेण्यात आली नव्हती,' असेही ट्रम्प यांनी सांगितले.
 • अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि तालिबानच्या म्होरक्यांसोबत वॉशिंग्टनजवळील कॅम्प डेव्हिड येथे होणारी गुप्त चर्चा रद्द केल्याचे ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केले होते. त्यानंतर सोमवारी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी अफगाण शांतता चर्चा मृत झाल्याचे सांगितले. 
 • अमेरिकेने तालिबानसोबत शांतता चर्चा सुरू केली होती. त्यानुसार करार होण्याची आशा वाटत होती. त्यानुसार अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सैनिक मागे घेणार होती; तसेच तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करू नये याची हमी घेतली जाणार होती. मात्र, गेल्या आठवड्यात काबूल येथे तालिबानने स्फोट केला होता. त्यात एका अमेरिकी सैनिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ट्रम्प यांनी कॅम्प डेव्हिड येथील चर्चा रद्द केली.
 • 'ते (तालिबानसोबतची चर्चा) मृत झाले आहे,' असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांना सांगितले. 'हे काय होते आहे. आम्ही चर्चा करत आहोत, आम्ही सरकारसोबत चर्चा करत आहोत, आम्ही अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा करत आहोत. आपण पाहू या,' असे ट्रम्प म्हणाले. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडेल. मात्र, आम्ही योग्य वेळी तेथून बाहेर पडू, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 'दहशतवादी हल्ला करून ताबिलानने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. लोकांना मारले म्हणजे चर्चेमध्ये चांगले स्थान मिळेल, असे त्यांना वाटले... तुम्ही माझ्यासोबत हे करू शकत नाही,' असे ट्रम्प यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 • शांतता कराराच्या मसुद्यानुसार करार झाल्यानंतर १३० दिवसांच्या आत ५४०० सैनिक अफगाणिस्तानातून माघारी घेण्याचे अमेरिकेने मान्य केले होते. मात्र, आता कराराचा हा मसुदाही रद्द झाला आहे. 
 • दरम्यान, अफगाणिस्तानातून ठरावीक संख्येने सैनिक माघारी घेतले जाणार आहेत. मात्र, ही संख्या माध्यमांना सांगितली जाणार नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. भविष्यात तालिबानसोबत चर्चेची शक्यताही ट्रम्प यांनी फेटाळून लावली आहे.

'भारत-पाक तणाव कमी':-

 • काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव दोन आठवड्यांच्या तुलनेत आता कमी झाला आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी दोन्ही देशांना मदत करण्याच्या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.(again)
 • मात्र, दोन्ही देशांची इच्छा असेल, तरच मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. भारताने जम्मू-काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे.

तालिबानचा लढाईचा इशारा:-

 • तालिबानसोबतची चर्चा मृत झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानात अमेरिकी सैन्याविरोधात लढाई कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 
 • वाटाघाटी रद्द केल्याचा अमेरिकेला पश्चाताप होईल, असेही तालिबानने म्हटले आहे. आमच्याकडे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे जिहाद आणि लढाई, तर दुसरे म्हणजे चर्चा आणि वाटाघाटी,' असे तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे.
 • 'जर ट्रम्प यांना चर्चा थांबवायची इच्छा असेल, तर आम्ही पहिल्या मार्गाचा अवलंब करू,' असेही त्याने सांगितले.
   

सोनं गाठणार पन्नास हजारांचा टप्पा

 • सोन्याचे दर गगनाला भिडणार असून वर्षअखेरपर्यंत सोने प्रति तोळे ५० हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. १ हजार ५५० डॉलरवर असलेले प्रति औंस सोन्याचे दर २ हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर सुमारे ३९ ते ४० हजारांच्या आसपास आहे.
 • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति औंस १ हजार ५५० डॉलर प्रमाणे १ लाख ८ हजार ५०० रुपये प्रति ग्रॅम म्हणजे सुमारे ३ हजार ८२७ रुपये, इतके सोन्याचे सध्याचे दर आहेत. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम आणि १ डॉलर म्हणजे ७० रुपये). हे दर प्रति औंस दोन हजार झाल्यास सोन्याची किंमत प्रति तोळे ५० हजारांच्या आसपास पोहोचणार आहे.
 • आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांची पावले सोन्याकडे वळू लागली असल्याचेही कारण सोन्याच्या भाववाढीमागे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या भारतासह जगभरात मंदीने आपले बस्तान बसविल्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत असून, प्रॉपर्टी बाजारही थंड पडले आहेत.
 • अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षक आणि सुरक्षित वाटू लागली आहे.
11 Sep Current Affairs
11 Sep Current Affairs

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नाहीच संयुक्त राष्ट्राचा पाकला दणका

 • काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात आलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही दणका दिला आहे. 
 • भारत आणि पाकिस्तानने हा विषय चर्चेने सोडविण्याचा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. 
 • विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचं संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
 • संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे. यूएनचे सेक्रेटरी जनरलचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मध्यस्थेबाबतची आमची भूमिका कायम आहे. त्यात काही बदल होणार नाही. 
 • तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाने दोन्ही देशांच्या सरकारशी संपर्कही साधला आहे, असं दुजारिक यांनी स्पष्ट केलं.
 • दोन्ही देशांनी काश्मीरचा मुद्दा शांततेत आणि चर्चेने सोडवावा. दोन्ही देशांना काश्मीरवर शांततेनेच तोडगा काढावा लागेल, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. 
 • काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा असून त्यात मध्यस्थी करण्याची तिसऱ्या पक्षाची गरज नसल्याचं भारताने यापूर्वीच ठणकावून सांगितलं आहे. त्यातच आता संयुक्त राष्ट्र संघानेही त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »