12 August Current Affairs

12 August Current Affairs
12 August Current Affairs

१३ भारतीय मुत्सद्यांनी पाकिस्तान सोडले

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात पाकिस्तानातील १३ भारतीय मुत्सद्द्यांनी कुटुंबासह पाकिस्तान सोडले आहे. शनिवारी हे सर्वजण वाघा बॉर्डरहून मायदेशी परतले आहेत. परंतु, या सर्वांनी पाकिस्तान कायमस्वरूपी सोडले की तात्पुरते सोडले यासंबंधीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने यावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानच्या या तडकाफडकी निर्णयामुळे आतापर्यंत १३ भारतीय मुत्सद्द्यांनी आपल्या कुटुंबासह पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. आज शनिवारी हे सर्व जण वाघा बॉर्डरहून मायदेशी परतले आहेत. पाकिस्तान सोडणाऱ्या १३ मुत्सद्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतु, त्यांनी पाकिस्तान कायमचे सोडले की तात्पुरते सोडले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 
जम्मू-काश्मीरसंबंधी भारत सरकारने निर्णय घेतल्यानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाकिस्तानमधून भारतात परत जाण्यास सांगितले होते. तेव्हापासून भारत-पाकिस्तान या दोन देशांतील संबंध अधिक बिघडले होते.
 

अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपास विरोध अध्यक्ष अश्रफ घनी

अफगाणिस्तानमधील कारभारात कुठल्याही परकी सत्तेच्या हस्तक्षेपास अफगाण सरकारने विरोध दर्शवला. अफगाणिस्तानमधील विद्यमान सरकारला डावलून अमेरिका-तालिबान यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी हा विरोध केला. अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये लवकरच शांतता करार होण्याची शक्यता आहे. 

घनी यांनी ईदनिमित्त आयोजित प्रार्थनेनंतर पत्रकारांशी संवाद साधला. घनी म्हणाले, 'पुढील महिन्यातील अध्यक्षीय निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. दीर्घकालीन युद्धानंतर येथील जनता अध्यक्षांना निवडून देईल आणि कुठलाही निर्णय घेण्यासाठी आवश्यक तो जनादेश मिळेल. अफगाणिस्तानचे भवितव्य या ठिकाणीच ठरेल. आमच्या कारभारात बाहेरील कुणीही हस्तक्षेप करू नये.' अफगाणिस्तानमधील निवडणुकांपूर्वी अमेरिकेचे राजदूत झल्मय खालिलजाद हे तालिबानबरोबर शांतता करार मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहेत. कतार येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात बोलणी होत आहेत. अमेरिका आणि नाटोचे सैन्य २० हजारांनी कमी करण्याच्या निर्णयावर मतैक्य होण्याची शक्यता आहे. त्याबदल्यात अफगाणिस्तान हा पुन्हा दहशतवाद्यांचा अड्डा बनणार नाही, अशी हमी अफगाणिस्तानला द्यावी लागण्याची शक्यता आहे. कतारमधील तालिबान प्रवक्ता सुहैल शाहीन याने सांगितले, की चर्चेच्या फेऱ्यांनंतर (अमेरिकेसोबत) करार अपेक्षित आहे. पुढील ईद अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक सत्तेखाली होईल, अशी अपेक्षा आहे. अफगाणिस्तानात कुठलीही परकी फौज नसेल आणि शांतता या ठिकाणी कायमस्वरूपी नांदेल.' अमेरिकेचे बाहुले संबोधून तालिबानने विद्यमान अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला आहे.
 

12 August Current Affairs
12 August Current Affairs

पाकला प्रत्युत्तर दिल्ली लाहोर बससेवा रद्द

भारताने पाकिस्तानवर चांगलाच पलटवार केला आहे. भारताने पाकिस्तानच्या कारवाईला जशाच तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून बंद करण्यात आलेली समझोता एक्स्प्रेसनंतर भारताने दिल्ली-लाहोर बससेवा सोमवारी रद्द केली. दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) ने आज याची माहिती दिली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळणारे कलम ३७० भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने चांगलीच आगपाखड केली. भारताच्या या निर्णयाच्या विरोधात पाकने समझोता एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला. 

पाकिस्तानकडून भारत-पाक यांच्यातील समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याची घोषणा केली होती. गुरूवारी पाकिस्तानने वाघा बॉर्डरवर ही एक्स्प्रेस थांबवली आणि आपल्या ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्डला समझोता एक्स्प्रेससोबत भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजस्थान सीमेमार्फत भारतात येणारी 'धार एक्स्प्रेस' सुद्धा पाकिस्तानकडून बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. 

पाकिस्ताननं गुरूवारी दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा देखील निर्णय घेतला. गुरुवारी संध्याकाळी दिल्लीहून लाहोरकडे निघालेल्या पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसमध्ये अवघे चार प्रवासी होते. पाकिस्तानच्या या एकतर्फी निर्णयानंतर भारताने आज दिल्ली-लाहोर ही बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही बस लाहोरसाठी रवाना होणार होती. परंतु, बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली-लाहोर बस सेवेची सुरूवात १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
 

भारतीय रेल्वेने केली समझोता एक्स्प्रेस रद्द

लाहोर ते अटारीदरम्यान धावणारी समझोता एक्स्प्रेस भारतीय हद्दीत रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. पाकिस्तानने त्यांच्या बाजूला ही रेल्वे चालविण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. 

समझोता एक्स्प्रेस ही नवी दिल्लीहून अटारीपर्यंत भारतीय रेल्वे चालवते. तेथे प्रवासी स्थानक बदलतात. पाकिस्तान लाहोर ते अटारीपर्यंत चालविते. पाकिस्तानने लाहोर ते अटारीपर्यंत समझोता एक्स्प्रेस न चालविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे दिल्ली ते अटारीदरम्यानची लिंक एक्स्प्रेस रद्द करण्यात येत असल्याचे उत्तर रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले. रविवारी या गाडीसाठी दोन प्रवाशांनी तिकिट आरक्षित केले होते. 
भारताने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्स्प्रेस आणि थार एक्स्प्रेस न चालविण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही, तर गेल्या आठवड्यात समझोता एक्स्प्रेस भारताच्या हद्दीवरच थांबविण्यात आली. पाकिस्तानी चालकांनी ही रेल्वे भारतीय हद्दीत नेणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन ही रेल्वे माघारी आणली होती. त्यानंतर आज ही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 

12 August Current Affairs
12 August Current Affairs

काश्मिरी खेळाडूंसाठी धोनी सरसावला

क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत
भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय. धोनीने सध्या २ महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करतो आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम केंद्रीय गृहमंत्रालयाने काढून टाकल्यानंतर, सध्या काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे काश्मिरी जनतेच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या उभरत्या आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धोनीने आपल्या खांद्यावर घेतल्याचं समजतंय. आगामी काळात धोनी आपल्या या योजनेबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला माहिती देणार आहे. 
धोनी सध्या दक्षिण काश्मीर परिसरात आपल्या सैन्यदलातल्या तुकडीसोबत गस्त घालण्याचं काम करतोय. विश्वचषक संपल्यानंतर धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत होता, मात्र धोनीने अद्याप अधिकृतरित्या आपल्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये. त्यामुळे भविष्यकाळात केंद्रीय क्रीडा मंत्रालय धोनीच्या या योजनेला पाठींबा दर्शवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रिकी पाँटींगला मागे टाकत विराट कोहली ठरला यशस्वी कर्णधार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर, दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने विंडीजसमोर २८० धावांचं आव्हान ठेवलं. विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेताना विराटने १२५ चेंडूत १२० धावा केल्या.

वन-डे कारकिर्दीतल विराटचं हे ४२ वं शतक ठरलं, तर कर्णधार या नात्याने विराटचं विंडीजविरुद्धचं हे सहावं शतक ठरलं.
एका प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगला मागे टाकलं आहे.

12 August Current Affairs
12 August Current Affairs

युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात भारत चौथा देश

भारताची कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) आणि अमेरीकेच्या CBRE या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालाच्या मते, स्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात तिसर्‍या क्रमांकाचे गंतव्यस्थान आहे तसेच युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाचा देश आहे.
युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत सध्या अमेरीका हा देश प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि चीनचा क्रम लागतो.
2018 साली भारतात आठ युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार झाले आहेत, ज्यात झोमाटो, ओयो, बायजूज, पेटीएम मॉल, उडान आणि स्विगी या कंपन्यांचा समावेश आहे.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »