12 Sep Current Affairs

12 Sep Current Affairs
12 Sep Current Affairs

आता नासानेही पाठवला 'विक्रम'ला संदेश

 • चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटलेल्या चांद्रयान २ चं लँडर विक्रमशी संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचे अखेरचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत 'हलो' मेसेज पाठवला.
 • चांद्रयान २ मधून विलग झाल्यानंतर ७ सप्टेंबर रोजी हार्ड लँडिंग झाल्याने विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर पडलं आणि त्याचा इस्रोशी संपर्क तुटला.
 • नासाने पाठवला रेडिओ संदेश:-
 • नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्क (DSN)च्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून विक्रमला एक रेडिओ संदेश पाठवला आहे. नासाच्या सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, नासा इस्रोच्या परवानगीनंतर रेडिओ संदेशद्वारे विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
 • सहा दिवस झाले तरी विक्रम लँडरशी संपर्क न झाल्याने संपर्काच्या आशा हळूहळू मावळू लागल्या आहेत. इस्रोने दिलेल्या प्री-लाँच अनुमानानुसार, विक्रमला केवळ एक चांद्र दिवसासाठी (म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस) सूर्याचा थेट प्रकाश मिळणार आहे. म्हणजेच पृथ्वीवरील केवळ १४ दिवसांसाठीच विक्रमला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे. परिणामी हे १४ दिवस संपर्काचे सर्व प्रयत्न सुरू राहतील. १४ दिवसांनंतर एक मोठी काळी रात्र चंद्रावर असेल तीही अर्थात पुढील १४ दिवस असेल. विक्रमची लँडिंग यशस्वी झाली असती तरी तो केवळ १४ दिवसच तेथे काम करू शकणार होता. अशात येत्या २० ते २१ सप्टेंबरपर्यंत जर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही तर संपर्काच्या सर्व आशा मावळतील.
   

मतदारांची संख्या आठ लाखांनी वाढली

 • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याकरिता राबविण्यात आलेल्या मोहिमेला नवमतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुमारे १० लाख मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 • दुबार नोंदणी झालेल्या किंवा स्थलांतरित झालेल्या दोन लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असून लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आठ लाखांपेक्षा अधिक मतदार वाढल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिली. 
 • राज्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे कमी प्रमाण ही चिंताजनक बाब असून ते वाढविण्यासाठी राज्यभर मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
 • राज्यात १५ जुलैपूर्वी ४ कोटी ६३ लाख २७ हजार २४१ पुरुष आणि ४ कोटी २२ लाख ५७ हजार १९३ महिला तसेच २५२७ तृतीयपंथी असे एकूण ८ कोटी ८५ लाख ८६ हजार ९६१ मतदार होते.
 • मात्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेले महिनाभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १० लाख ७५ हजार ५२८ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने १८-२१ वर्षे वयोगटातील तरुण मतदारांची संख्या अधिक आहे.
 • राज्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे दर हजारी प्रमाण ९१४ एवढे कमी असून ते वाढविण्याठी राज्यभरात मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 • कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ांत पुरामुळे कागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्रे देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. तसेच या दोन्ही जिल्हय़ांतील निवडणुका पुढे ढकलण्याची कोणताही आवश्यकता नाही.
 • मतदान यंत्रे पूर्णत: सुरक्षित:-
 • मतदान यंत्रे पूर्णत: सुरक्षित, सक्षम आणि दोषविरहित असून कोणत्याही बाह्य़ हस्तक्षेपाद्वारे त्याची सुरक्षितता भेदता येणे अशक्य आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्येदेखील या यंत्रणेला योग्य ठरविण्यात आले आहे. 
   
12 Sep Current Affairs
12 Sep Current Affairs

ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘वर्क व्हिसा’ मिळणार

 • [हा Brexit चा एक परिणाम असू शकतो का? तुंम्हाला काय वाटते???]
 • ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना आता तेथे कामाचा अनुभव घेणेही शक्य होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरी किंवा काम करण्यासाठी आवश्यक व्हिसाही मिळणार आहे.
 • गेल्या काही वर्षांपासून भारतातून ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा जून महिन्यांपर्यंत आकडेवारीनुसार २२ हजार भारतीय विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिक्षण घेत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा ब्रिटनमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४२ टक्क्य़ांनी वाढली आहे. 
 • विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान शाखांतील पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी ब्रिटनला प्राधान्य देतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथे काम करण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरीसाठी आवश्यक असलेला व्हिसा देण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना ‘स्किल्ड वर्क व्हिसा देण्यात येईल. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होईल. त्याचबरोबर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरील निर्बंधही काढून टाकले आहेत.
 • व्हिसा मिळवण्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत ९६ टक्के अर्जदार विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला आहे.
 • भारतीय विद्यार्थी आणि ब्रिटन दोघांच्याही दृष्टीने हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. परदेशी शिक्षणासाठी जाऊ  इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे. या निर्णयामुळे भारतीय विद्यर्थ्यांना जागतिक पातळीवर त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
   

सापाची नक्कल करणाऱ्या माशाचा शास्त्रीय अभ्यास

 • सापासारख्या दिसणाऱ्या आणि सापाची मिमिक्री करणाऱ्या पायटोप (मोनोप्टेरस इंडिकस) या माशाविषयीचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी पुढाकार घेतला आहे. देशी प्रजातीच्या या माशाला इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे घोषित केले असून ही प्रजाती वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
 • ‘पायटोप हा सापसदृश मासा पश्चिम घाट परिसरात आढळतो. शेतजमीन, चिखल, दमट जागी या माशाचे वास्तव्य असते. स्वतचा बचाव करण्यासाठी तो सापाची नक्कल करतो. आपल्यावर हल्ला होणार असल्याचे जाणवताच तो सापासारखा फणा काढण्याचा प्रयत्न करतो. 
 • तसेच चावण्याचाही प्रयत्न करतो. त्याच्याकडे हे कौशल्य कसे आले हा संशोधनाचा विषय आहे. त्याशिवाय या माशाविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्याच्या प्रजोत्पादनाचा काळ, प्रजोत्पादनाची पद्धती, त्याची शरीररचना, रक्ताभिसरण या सगळ्याचाच शास्त्रीय अभ्यास करणे आवश्यक आहे. 
 • या माशाच्या अभ्यासासाठी आम्ही कोयना, तैलबैला, ताम्हिणी, लोणावळा, आंबोली, राधानगरी या परिसरात भेटी दिल्या,’ अशी माहिती गणेशखिंड येथील मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक चांदनी वर्मा, पंकज गोरुले, मनोज पिसे आणि प्रदीप कुमकर यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात येत आहे.
 • ‘दमट वातावरणात राहणारा हा मासा बाहेरही येऊन राहू शकतो. आतापर्यंत केलेल्या अभ्यासातून हा मासा गाडीखाली येऊन मरण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आढळून आले आहे. साधारणपणे जून ते जुलै हा त्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ असावा, असा अंदाज आहे. मात्र, विकास कामांमुळे, शेतीमध्ये रसायनांच्या वापरामुळे त्याच्या अधिवासाला धक्का लागून त्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे,’ असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले.
 • पायटोप या सापसदृश माशाविषयी माहितीच नसल्याने त्याला साप समजून मारले जाते. ही देशी प्रजाती वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी त्याचा शास्त्रीय अभ्यासही आवश्यक आहे. त्या दृष्टीनेच या माशाविषयीचे संशोधन सुरू केले आहे. सखोल शास्त्रीय संशोधन होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील.
   
12 Sep Current Affairs
12 Sep Current Affairs

पी के मिश्रा पंतप्रधानांचे मुख्य सचिव

 • पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमोद कुमार मिश्रा यांना पदोन्नती देऊन त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे.
 • तर माजी केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा यांची पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • पतप्रधान कार्यालयातील मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी राजीनामा दिल्यानंतर हे दोन बदल करण्यात आले आहे.
 • नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती केली होती.
 • दरम्यान, नवे प्रधान सचिव असलेले पी. के. मिश्रा हे गेल्या पाच वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयातच कार्यरत होते. 
 • गेल्या दोन दशकांपासून मोदी आणि मिश्रा एकमेकांना चांगल्या परिचयाचे आहेत. 
 • नरेंद्र मोदी यांनी २००१मध्ये पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा
 • पी. के. मिश्रा हे मुख्यमंत्री कार्यालयात वरिष्ठ पदावर काम करत होते. या वेळी दोघांनी काही वर्षे सोबत काम केले आहे.
   

जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूल

 • बीकेसीच्या धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेने जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये स्थान मिळविले आहे. 
 • ब्रिटनमधील 'एज्युकेशन ऍडक्हायजर्स लिमिटेड'ने केलेल्या मूल्यांकनानुसार 'जागतिक सर्वोच्च 50 आयबी शाळा 2019' यादीत या शाळेने स्थान मिळविले असून ही पहिलीच हिंदुस्थानी शाळा ठरली आहे.
 • जगातील सर्वोच्च शाळेची निवड 2019 मधील सरासरी आयबी डिप्लोमा गुणांकर आधारित आहे. 
 • आयबी डिप्लोमा वर्ग 12 च्या परीक्षांमध्ये डीएआयएसच्या विद्यार्थ्यांनी 45 गुणांमध्ये सरासरी 39.5 गुण मिळकले. 
 • हे गुण दक्षिण आशिया आणि हिंदुस्थानातील सर्व शाळांमध्ये प्रथम क्रमांकाचे, आशियामध्ये 6 व्या स्थानाचे आणि जगातील 10 व्या स्थानाचे आहेत.
12 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »