14 August Current Affairs

14 August Current Affairs
14 August Current Affairs

महाराष्ट्रातील ४६ पोलिसांचा राष्ट्रपती पदकानं सन्मान

  • स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा
  • महाराष्ट्रातील एकूण ४६ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर
  • महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं गौरवणार
  • ४१ पोलिसांचा गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मान होणार

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ४६ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहायक पोलीस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे असिस्टंड कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रामचंद्र जाधव यांना हे तिसरे राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तर राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. होमगार्ड, नागरी सेवा आणि अग्निशमन विभागात महाराष्ट्राला एकही पदक मिळाले नाही.
 

शाह फैसल यांना विमानतळावरच रोखलं

  • माजी सनदी अधिकारी आणि पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैसल यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे.
  • दिल्ली विमानतळावर अटक केल्यानंतर शाह फैसल यांची रवानगी काश्मीरला करण्यात आली आहे. तसेच त्यांना काश्मीरमध्ये त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
  • पब्लिक सेफ्टी अॅक्ट (पीएसए) अंतर्गत शाह फैसल यांना अटक करण्यात आली आहे. शाह फैसल हे इस्तंबूलकडे जाण्यासाठी आज सकाळी दिल्ली विमानतळावर आले होते, त्यावेळी त्यांना अटक करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. 
  • दरम्यान, शाह फैसल यांनी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन राज्य निर्माण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता.
  • त्याविरोधात ते सातत्याने भडकविणारे भाषण देत होते. त्यामुळे सरकार त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून होती.
14 August Current Affairs
14 August Current Affairs

स्वातंत्र्य दिनी पाकची मिठाईची देवाण घेवाण बंद

पाकिस्तानात आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु, अटारी वाघा-बॉर्डरवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिठाईची देवाण-घेवाण करण्यात आली नाही. भारताने जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष राज्याच दर्जा रद्द केल्याने पाक चांगलाच खवळला आहे. 
भारत-पाकिस्तानमधील समझोता एक्स्प्रेस, दिल्ली-लाहोर बससेवा बंद करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय सीमेवर धार्मिक उत्सव साजरा करताना दोन्ही देशांत होणाऱ्या मिठाईची देवाण-घेवाण बंद केली आहे.
पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्टला तर भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला आहे. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून भारत-पाकिस्तानचे जवान वाघा बॉर्डवर १४ ऑगस्ट रोजी मिठाईची देवाण-घेवाण करून स्वातंत्र्य दिन साजरा करतात. अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा यावर्षी पाकिस्तानने मोडली आहे. यासंबंधी पाकिस्तानकडून कोणतेही स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आले नाही. 
अटारी वाघा बॉर्डरवर सोमवारी बकरी ईद असल्याने सीमा सुरक्षा दलाला यावर्षी मिठाई देण्यात आली नाही. भारताने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्स्प्रेस आणि थार एक्स्प्रेस न चालविण्याचा निर्णय घेतला होता. 
एवढेच नाही, तर गेल्या आठवड्यात समझोता एक्स्प्रेस भारताच्या हद्दीवरच थांबविण्यात आली. पाकिस्तानी चालकांनी ही रेल्वे भारतीय हद्दीत नेणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन ही रेल्वे माघारी आणली होती.
 

पूरग्रस्तांसाठी ५०० घरं बांधणार नाना पाटेकर

#Inspirational

तुम्ही काळजी करू नका. छप्पर आलं की सगळं काही नीट होईल. आपण सर्व मिळून पुनर्वसन करू, असं आश्वासन देत अभिनेते नाना पाटेकर यांनी आज कोल्हापुरातील पूरग्रस्तांना दिलासा दिला. शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी सर्वांच्या सहकार्यानं ५०० घरे बांधून देण्याची आमची योजना आहे. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन लोकांना आवाहन करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. 
कोल्हापूर, सातारा आणि सांगलीवर महापुराचं संकट कोसळलं. लोकांचे संसार उघड्यावर आले. घरे वाहून गेल्यानं अनेकांना छप्परही राहिलं नाही. पूरग्रस्त आता उद्ध्वस्त झालेला संसार सावरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला सरकार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक जण धावून गेले आहेत. भीषण दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीलाही धावले आहेत. त्यांनी आज कोल्हापुरातील शिरोळमधील पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. छप्पर आलं की सगळं नीट होईल, असं म्हणत त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. शिरोळमध्ये पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार असल्याची घोषणा करून त्यांनी मोठा आधार दिला.


लालबागचा राजा' मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत
सरकारने पूरग्रस्तांसाठी काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देत आहोत. नाम संस्था, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंना या मदतीचे श्रेय नको. जे काही करतोय ते आपण सर्व जण एकत्र मिळून करतो आहोत. सध्या अनेक जण मदतीसाठी स्वतःहून पुढे आले आहेत. प्रत्येकाने यात वाटा उचलायचा आहे. मदतकार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मी सुद्धा मदतीसाठी लोकांकडे हात पसरणार आहे. अनेक जण आर्थिक मदत सुद्धा करतात. त्यांना विश्वास आहे म्हणून ते मदतीसाठी पुढे येतात. ज्या ठिकाणी कमतरता भासेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच उभे राहतो, असंही नाना म्हणाले. 
शिरोळमध्ये आल्यानंतर येथील परिस्थिती कळाली. त्यामुळं ५०० घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता सगळ्यांना मदतीसाठी आवाहन करणार आहे. टाकळेवाडीत तीन हजार घरांच्या प्रकल्पासाठी आढावा घेणार आहे. पूरग्रस्तांना छप्पर मिळालं की सगळं नीट होईल. काळजी करू नका. 'नाम' संस्थाच नाही तर सर्वांकडून मदत घेण्यात स्वीकारली जाईल. सरकारला सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळं आपण सगळे मिळून पूरग्रस्तांचं पुनर्वसन करायचं आहे, असं आवाहनही त्यांनी केलं. मदतीसाठी पुढे येणाऱ्या सर्वांचेच त्यांनी यावेळी आभार मानले. 
दुष्काळ पडला त्यावेळी नाम संस्थेने लोकवर्गणीतून ६० कोटी रुपये दिले. सरकारनेच सर्व केले पाहिजे असं नेहमी म्हणतो. पण सरकार म्हणजे माणसंच आहेत ना! त्यामुळं आता रडायचं नाही. सगळ्यांनी मिळून या संकटाला तोंड द्यायचं, अशा शब्दांतही त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला.
 

14 August Current Affairs
14 August Current Affairs

भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीछाया

गेल्या वित्त वर्षांत पाच वर्षांच्या तळात राहिलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीची छाया अधिक गडद होत आहे.
चीन, अर्जेटिनामधील जागतिक अस्थिरतेच्या घडामोडींनी मंगळवारी येथील भांडवली बाजार पोळून निघाला.
गेल्या महिन्यात देशातील वाहन विक्रीने तब्बल दोन दशकांतील सुमार कामगिरी बजाविल्याच्या आकडेवारीने अर्थचिंतेत अधिक भर घातली.
वारंवार उसळणारे सोने-चांदीचे दर व डॉलरसमोरील रुपयाचा सहामाही तळ हेही भारतीय अर्थस्थितीसमोर आव्हान म्हणून उभे राहिले आहे.
देशातील वाहन क्षेत्रात सलग नवव्या महिन्यात घसरण नोंदली गेली आहे. यंदाच्या जुलैमध्ये येथील वाहन निर्मिती कंपन्यांनी विक्रीतील गेल्या दोन दशकांतील मोठी विक्री घसरण नोंदवली.
त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल १५,००० रोजगार कपातीला या क्षेत्राला सामोरे जावे लागल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. 
जुलैमध्ये सर्वच गटातील वाहने वार्षिक तुलनेत दुहेरी अंक प्रमाणात खाली आली आहेत.
अर्जेटिनाच्या पेसो या चलनाचे सोमवारी अवमूल्यन १५ टक्क्यांपर्यंत झाल्याने तसेच तेथील भांडवली बाजारातील समभागांचे मूल्य ४८ टक्क्यांपर्यंत आपटल्याने येथील सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकाने महिन्यातील तळप्रवास अनुभवला. 
तसेच हाँगकाँगमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे चीनमधील व्यापार युद्ध भडकण्याची धास्ती निर्माण झाल्याने दोन्ही निर्देशांक एकाच व्यवहारात दीड टक्क्यांहून अधिक प्रमाणात खाली आले.
 

जायकवाडी धरण ९० टक्के भरले

जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने मराठवाडय़ातील अनेक तहानलेल्या गावांसाठी गोदावरी खोऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुराने कहर केला असतानाही काही भागांत पाऊस नसल्याने  टँकर्स सुरू आहेत, अशी माहिती  अधिकाऱ्यांनी दिली.
नाशिक परिसरात अतिवृष्टी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तेथील धरणांमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरण  ९० टक्के भरले आहे. मराठवाडय़ात फारसा पाऊस नसताना जायकवाडीत एवढा मोठा पाणीसाठा झाल्याचा फायदा तेथील जनतेला होणार आहे. 
जायकवाडी धरणातून गोदावरी खोऱ्यात पाणी सोडल्यास त्याचा फायदा शेकडो गावांना होईल. त्यामुळे हे पाणी सोडण्याची विनंती जलसंधारण मंत्री बबनराव लोणीकर व काही आमदारांनी केली. तेव्हा किमान एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.
 

14 August Current Affairs
14 August Current Affairs

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक रुपया लवकरच ७२ पर्यंत

सोन्याने चेन्नईमध्ये नवा उच्चांक गाठला असून मंगळवारी(दि.१३) येथील सराफ बाजारात प्रतितोळा सोने ३९ हजार ४९० रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचले. भांडवली बाजारात निर्देशांकांची मोठी पडझड आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची गटांगळी सुरू असताना, मौल्यवान धातू सोने-चांदी मात्र तुफान तेजीवर स्वार दिसत आहेत. मंगळवारच्या व्यवहारात मुंबईतील सराफ बाजारात स्टॅण्डर्ड सोने तोळ्यामागे ६०० रुपयांची, तर चांदी किलोमागे तब्बल १,२०० रुपयांनी उसळून अनुक्रमे ३७,७९५ रुपये आणि ४४,२८० रुपये पातळीवर गेली आहे.
जागतिक अर्थ-राजकीय अनिश्चिततेने समभाग बाजाराला मंदीचे ग्रहण लागले असताना, अशा अस्थिर स्थितीत सुरक्षित आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या सोने-चांदीकडे गुंतवणूकदारांचा होरा वळला आहे. परिणामी सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत निरंतर तेजी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत ‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, चांदीने तब्बल २,००० रुपयांच्या किंमतवाढीसह विक्रमी ४५,००० रुपयांचा विक्रमी स्तर ओलांडला आहे. मुंबईच्या सराफ बाजारात ‘आयबीजेए’ने प्रसिद्ध केलेल्या घाऊक किमतींनुसार, स्टॅण्डर्ड सोने (०.९९५ शुद्धता) मंगळवारच्या व्यवहाराअंती ३७,७९५ रुपये, शुद्ध सोने (०.९९९ शुद्धता) ३७,९५० रुपये तर ०.९१६ शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ३४,७६० रुपयांवर होते. या घाऊक किमती असून, किरकोळ बाजारात स्थाननिहाय किमती आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. चांदीमध्ये (०.९९९ शुद्धता) किलोमागे ४४,२८० रुपये या पातळीवर मंगळवारचे घाऊक व्यवहार संपुष्टात आले. किरकोळ बाजारात चांदीचे भाव किलोमागे ४६,००० वर गेले आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीने न्यूयॉर्क बाजारात प्रति औंस (२८.३५ ग्रॅमसाठी) १,५२०.३७ डॉलरचा, तर चांदीने प्रति औंस १७.३२ डॉलरचा स्तर गाठला आहे. जागतिक तेजीच्या पाश्र्वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या भारतातील किंमतीनेही चढता क्रम कायम ठेवला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही वाटाघाटीसाठी ते तयार नसल्याचे विधान करून आगामी महिन्यांतील चीनबरोबरच्या व्यापारविषयक चर्चेच्या निष्फळतेकडे निर्देश केला आहे. त्या परिणामी जगभरात सर्वत्र भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणात घसरण दिसून आली आणि गुंतवणूकदारांनी शाश्वत मूल्य असलेल्या सोने-चांदीकडे पैसा वळवून आश्रय मिळविल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सोने ४० हजार पार करणार!
सोन्याची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला आणि सर्वात मोठा आयातदार देश असलेल्या भारतात, तरी या मौल्यवान धातूच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहारांवरच ठरत असतात. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींनी सोमवारपर्यंत वार्षिक १७ टक्क्यांनी वाढ दर्शविली आहे. प्रति औंस १,५२०.३७ डॉलर हा त्याचा सहा वर्षांतील उच्चांकी स्तर आहे. भारतात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होत असलेल्या घसरणीने, सोन्यातील तेजीला आणखीच बळ दिले आहे. ते पाहता काही दिवसांत सोन्याने तोळ्यामागे ४०,०००चा अभूतपूर्व स्तर गाठल्यास नवलाचे ठरणार नाही. मागील एका आठवडय़ात सोने १,९३० रुपयांनी वधारले आहे, तर मंगळवारच्या एका दिवसांत त्याने ६०० रुपयांनी उसळी घेतली आहे. किंमती वाढत असून स्थानिक बाजारात सोन्याची मागणी चढीच आहे. आगामी काळातील लग्न मुहूर्त आणि सणोत्सवाचा हंगाम पाहता, किमती वाढण्याच्या शक्यता गृहीत धरून लोकांकडून आगाऊ खरेदी सुरू असल्याचे सराफ बाजाराचा कानोसा घेतला असता दिसून येते.

रुपया लवकरच ७२ पर्यंत?
औद्योगिक उत्पादन दर, महागाई दर तसेच व्यापार तूट आदींचा कल रुपयाला नजीकच्या कालावधीत डॉलरच्या तुलनेत ७२ पर्यंत घेऊन जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय अर्थघडामोडींनी स्थानिक चलन मंगळवारीच सहा महिन्यांच्या तळात पोहोचले आहे. मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत थेट ६२ पैशांनी आपटत ७१.४० पर्यंत खाली आला. रुपयाचा हा गेल्या सहा महिन्यांतील नीचांक ठरला. अर्थव्यवस्थेबाबतची काही आकडेवारी येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे; तेव्हा रुपया ७२ पर्यंत घसरल्यास आश्चर्य वाटू नये, असे आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे चलन व वायदे वस्तू संशोधक विश्लेषक ऋषभ मारु यांनी म्हटले आहे.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »