14 July Current Affairs

14 July Current Affairs
14 July Current Affairs

टेनिसपटू सिमोना हॅलेप: 2019 विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती

रोमानियाची टेनिसपटू सिमोना हॅलेप हिने कारकिर्दीतले दुसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळविताना 23 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणार्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा पराभव करीत यंदाची विम्बल्डन स्पर्धा जिंकली.
सिमोना हॅलेपचे हे पहिलेच विम्बल्डन विजेतेपद आहे. तर विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी ती रोमानियाची पहिली महिला टेनिसपटू आहे.
विम्बल्डन अंतिम स्पर्धा ही टेनिस क्रिडाप्रकारातली सर्वात जुनी (सन 1877 सालापासून) आणि सर्वोच्च आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा लंडन (इंग्लंड) येथील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकुएट क्लब येथे खेळली जाते. विंबल्डन विजेत्याला ऑल इंग्लंड क्लबचे सभासदपद दिले जाते.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) ही जागतिक टेनिस, व्हीलचेयर टेनिस आणि बीच टेनिस स्पर्धांसाठीची प्रशासकीय संस्था आहे. 1913 साली ‘आंतरराष्ट्रीय लॉंन टेनिस महासंघ’ म्हणून याची स्थापना केली गेली. याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. आज या संघटनेशी 211 राष्ट्रीय टेनिस संघटना आणि सहा क्षेत्रीय संघटना संलग्न आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी), फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यूएस ओपन (ऑगस्ट-सप्टेंबर) या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा ITF तर्फे आयोजित केल्या जातात.
 

जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत एका प्रयत्नात 3 विक्रम मोडले

भारताचा युवा भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगा याने समोआ देशात सुरू असलेल्या 2019 राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (11 जुलैला) एका प्रयत्नात तब्बल 3 विक्रम मोडीत काढले.
16 वर्षाच्या जेरेमीने दिमाखदार कामगिरी करताना 67 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 136 किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला. त्याच्या या उचलीमुळे त्याने थेट युवा विश्वविक्रम, आशियाई स्पर्धांमधील विक्रम आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधील विक्रम असे 3 विक्रम मोडले. या आधीचा युवा विश्वविक्रम आणि आशियाई विक्रम हा देखील जेरेमीच्याच नावावर होता. त्याने एप्रिल महिन्यात चीनच्या निग्बो येथे 134 किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला होता.
स्पर्धेबद्दल:-
राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रकुल भारोत्तोलन महासंघ (CWF) कडून केले जाते. राष्ट्रकुल भारोत्तोलन महासंघ (CWF) याची स्थापना सन 1947 मध्ये झाली होती. यात राष्ट्रकुल समुहाच्या देशांमध्ये पाच महाद्वीपांचा समावेश आहे आणि आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने (IWF) मान्यता दिली आहे.
राष्ट्रकुल बद्दल:-
राष्ट्रकुल (Commonwealth of Nations) हा 53 स्वतंत्र राज्यांचा एक आंतरराष्ट्रीय समूह आहे. ग्रेट ब्रिटन (UK) आणि एके काळी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय गरजेतून एक शतकापूर्वी वसाहतींच्या परिषदेच्या (कलोनियन कॉन्फरन्स) रूपात राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) या संस्थेचा उदय झाला. भारत देखील याचा एक भाग आहे.
1917 सालाच्या सुमारास कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना वसाहतींच्या स्वराज्याचा दर्जा मिळाला होता. 1931 साली सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण ब्रिटिश सरकारने जाहीर केले. ग्रेट ब्रिटनच्या संसदेने स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा करून राष्ट्रकुलाला 1931 साली मान्यता दिली आणि साहजिकच इम्पीअरिअल कॉन्फरन्स ही संज्ञा कालबाह्य ठरून ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’ ही संज्ञा रूढ झाली. 1947 साली ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ या नावातून ब्रिटिश हा शब्द वगळण्यात आला. राष्ट्रकुलाचा प्रभाव कायद्याच्या स्वरूपाचा नसून राजकीय स्वरूपाचा आहे आणि माध्यम राजनैतिक स्वरूपाचे आहे.
पूर्वप्रथेनुसार राष्ट्रकुलाचे प्रमुखपद ब्रिटिश राजमुकुटाकडे (म्हणजे राजा किंवा राणीकडे) (सध्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे) आहे, जे की आता संघटनेचे प्रमुख आहेत. 1965 साली राष्ट्रकुलाचे लंडन (UK) या शहरात स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले.
 

14 July Current Affairs
14 July Current Affairs

११ दिवसांत हिमा दासने केली सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक

भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. पाच आणि आठ जुलै रोजी हिमा दासने २०० मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.
वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत ११ दिवसांत भारताला तीन सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत.
 

UNCCD परिषदेचे ‘COP-14’ सत्र प्रथमच भारतात होणार

संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या ‘COP-14’ म्हणजेच संबंधित देशांच्या परिषदेच्या 14 व्या सत्राचे यजमानपद भारताला मिळाले असून ग्रेटर नोएडा या शहरात 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2019 या काळात ही परिषद भरविली जाणार आहे.प्रथमच भारतात होणार्या परिषदेचे आयोजन भारत सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय UNCCDच्या भागीदारीने करणार आहे.
या परिषदेसाठी 197 देशातले 5 हजार प्रतिनिधी सहभागी होण्याचे अपेक्षित आहे. परिषदेत वाळवंटीकरण, जमीन नापिक होणे आणि दुष्काळ अशा जागतिक संकटांच्या मुद्द्यांवर उपाययोजना शोधल्या जातील आणि त्यावर चर्चा केली जाणार आहे.
वाळवंटीकरणासंबंधी सद्यपरिस्थिती:-
जगभरात 169 देशांमध्ये वाळवंटीकरणाची समस्या निर्माण झालेली आहे. चीनमध्ये तर सर्वाधिक लोकसंख्या असून तिथली समस्या सर्वाधिक आहे.
मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी होणार्या अनैसर्गिक कार्यांमुळे, आज जगात 2 अब्ज हेक्टरपेक्षा जास्त उत्पादक भूमी नापीक झालेली आहे आणि 1.5 अब्जहून जास्त लोक अश्या भागात वास्तव्यास आहे. तसेच दरवर्षी 12 दशलक्ष हेक्टर उत्पादक जमिनीची हानी होत आहे.
2017 सालामधील तीव्र दुष्काळामुळे नायजेरिया, येमेन, दक्षिण सुदान, सोमालिया या चार देशांमध्ये 25 दशलक्षांपेक्षा जास्त लोक भुक आणि दुष्काळाचा सामना अजूनही करीत आहे.
UNCCD बाबत :-
संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (United Nations Convention to Combat Desertification -UNCCD) याची स्थापना करण्याची संकल्पना रिओ कराराच्या 21 व्या उद्देशातल्या थेट शिफारशीतून निर्माण झाली. त्यात 196 आणि युरोपीय संघ (EU) सदस्य राज्ये आहेत.
फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहरात दिनांक 17 जून 1994 रोजी रिओ करार स्वीकारण्यात आला आणि ही संघटना अस्तित्वात आली. संघटना डिसेंबर 1996 मध्ये कार्यरत झाली. संघटनेचे स्थायी सचिवालय जानेवारी 1999 पासून बॉन (जर्मनी) या शहरात आहे.
ही जमिनीच्या वाळवंटीकरणाची समस्या हाताळण्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असलेली एकमेव जबाबदार आंतरराष्ट्रीय संघटना आहे. कॅनडा (28 मार्च 2013 रोजी) हा UNCCD मधून माघार घेणारा पहिला देश आहे.
 

14 July Current Affairs
14 July Current Affairs

येत्या सप्टेंबरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार

येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार आहे. शिवाय दोन वर्षांच्या आत सर्व 36 राफेल विमानं भारताला मिळणार आहेत. फ्रान्स कंपनी दसॉल्ट एव्हिएशन राफेल विमानांची निर्मिती करत असून अत्याधुनिक अशा 2 इंजिनांनी राफेल विमान युक्त आहे.
पहिलं राफेल विमान येत्या सप्टेंबर महिन्यात भारताला मिळेल, असं संरक्षण उत्पादक विभागाचे सचिव अजय कुमार यांनी पीटीआयला सांगितलं. तसेच फ्रान्सचे भारतातील राजदूत अॅलेक्झँडर जीगलर यांनीही सांगितलं होतं की, अपेक्षित वेळेच्या आधी राफेल विमानं भारताला मिळतील. त्यामुळे भारताला राफेल विमान दोन महिने आधीच मिळणार आहे.
भारताने फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीकडून एकूण 36 विमानांची खरेदी केली आहे. पुढील दोन वर्षांना हे सर्व  विमानं भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल होतील. राफेल विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यात सक्षम आहे. तसेच या विमानमध्ये आण्विक अस्त्रांचा वापर करण्याचीही क्षमता आहे.
राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावरुन राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
 

अंधांना चलनी नोटा ओळखता येण्यासाठी नवे अॅप

अंधांना चलनी नोटा सहज ओळखता याव्यात, यासाठी एक अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) रिझर्व बँक ऑफ इंडियाने विकसित करण्याचे ठरवले असून सध्यातरी रोखीच्या व्यवहारांना महत्त्व असल्याने त्याचा वापर करता येणार आहे.
सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५००, २००० या नोटा चलनात असून एक रुपयाची नोट केंद्राने जारी केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे, की नोटा ओळखणे अंधांना सोपे नसते. त्यामुळे या नोटांमधील खुणांच्या माध्यमातून त्या ओळखणे आवश्यक असते त्यासाठी १०० व त्यावरील चलनाच्या नोटात अंधांसाठी खास ओळख पटवणाऱ्या सुविधा आहेत पण त्या त्यांना माहिती नाहीत. नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरणानंतर पाचशे व हजाराच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाचशे व दोन हजाराच्या नवीन नोटा चलनात आल्या.
अंधांना या नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व बँक प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी मालिका व महात्मा गांधी नवी मालिका यातील नोटांच्या प्रतिमा  घेऊन प्रस्तावित मोबाइल अनुप्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
या अनुप्रयोगात ध्वनीच्या माध्यमातून सूचनेचा पर्याय राहील. त्यात प्रतिमा योग्य प्रकारे घेतली तर ती नोट कुठल्या किमतीची आहे हे समजू शकेल. देशात ८० लाख अंध लोक असून त्यांना या अनुप्रयोगाचा फायदा होणार आहे. जून २०१८ मध्ये बँकेने अंधांना नोटा ओळखता याव्यात, यासाठी उपकरण किंवा अनुप्रयोग तयार करण्याचे सूतोवाच केले होते. दुकानदारांनीच अंधांना असा प्रकारचे अॅप (अनुप्रयोग) उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही आधी बँकेने मांडली होती.
 

14 July Current Affairs
14 July Current Affairs

जल धोरण बनवणारे मेघालय बनले पहिले राज्य

देशात पावसाळा सुरू झाला असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही अजूनही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. भविष्यातील पाण्याचे आव्हान पाहता मेघालय राज्याने पाण्यासाठी जल धोरण बनवले आहे. असे धोरण बनवणारे मेघालय हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
उपक्रमाचा मुख्य उद्देश:-
सहकारी तत्वावर शाश्वत पाण्याचे स्रोत वाढवणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. तसेच जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि नदी प्रदूषण सारख्या समस्यांचा या धोरणामध्ये समावेश आहे.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »