14 Sep Current Affairs

14 Sep Current Affairs
14 Sep Current Affairs

बांगलादेशला नमवत भारताला आशिया चषकाचे जेतेपद

 • अत्यंत चुरशीच्या सामन्यात अथर्व अंकोलेकरने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला ५ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे. 
 • भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना कोलंबो येथे रंगला होता.
 • आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले होते. मात्र, डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने २८ धावांत टिपलेल्या ५ गड्यांमुळे भारताने जेतेपदावर नाव कोरले. बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर बाद झाला. 
 • अकबर अली (२३) व मृत्यूंजय चौधरी (२१) यांचा अपवाद वगळता बांगलादेशचे अन्य फलंदाज जास्त काळ मैदानावर टिकू शकले नाही. अथर्वला आकाश सिंहने ३, तर विद्याधर पाटील व सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत चांगली साथ दिली.
 • दरम्यान, १९ वर्षांखालील भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. ८ धावांवर भारताचे ३ फलंदाज बाद झाले. कर्णधार ध्रुव जुरेलने ३३ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 
 • शाश्वत रावतने १९ धावा करत त्याला साथ दिली. करण लालने अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी केल्यामुळे भारताला शंभरी गाठता आली. करणने ३७ धावा केल्या. अखेर भारताचा संपूर्ण संघ ३२.४ षटकामध्ये १०६ धावाच करू शकला.
   

चंद्रकांत पाटील यांना मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार

 • मराठी आणि हिंदीतील जेष्ठ कवी आणि समीक्षक चंद्रकांत पाटील यांना आज, शनिवारी मध्य प्रदेश सरकाराच्या सांस्कृतिक विभागातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय हिंदी सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
 • ज्या अहिंदी भाषिक लेखकांनी हिंदी साहित्यामध्ये मोलाची भर घातली त्या लेखकांना हा पुरस्कार देण्यात येतो. 

स्वरूप:-

 • एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१८ या वर्षाच्या पुरस्कारासाठी पाटील यांची निवड मध्य प्रदेश सरकारने केली आहे.

चंद्रकांत पाटील:-

 • चंद्रकांत पाटील यांची आजवर ५० पुस्तके प्रसिद्ध झाली असून भीष्म सहानी यांच्या 'तमस' या कादंबरीच्या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. 
 • महाराष्ट्रातील १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. 
 • हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला. त्यांना मराठवाडा साहित्य परिषदेने आपला सर्वोच्च सन्मान 'जीवनगौरव' देऊन गौरविले आहे.
 • ‘कवितांतरण’ या त्यांच्या काव्य संपादनासाठी अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. 
 • साहित्य अकादमीतर्फे भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून चीन व विश्व हिदी संमेलनात दक्षिण आफ्रिका येथे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

पाटील यांना मागच्याच आठवड्यात राष्ट्रीय हिंदी सन्मानाने ही गौरवण्यात आले होते आपण ही बातमी ११ सप्टें रोजी कव्हर केली होती (REVISION)

प्रा चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रीय हिंदी सन्मान

 • मराठी व हिंदीचे ज्येष्ठ कवी, अनुवादक, समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 
 • ज्या अिहदी भाषिक लेखकांनी आपल्या सृजनशील लेखनातून हिंदी भाषेला समृद्ध केले आहे, अशा ज्येष्ठ आणि लिहित्या लेखकांसाठी हा सन्मान गेल्या तीन वर्षांपासून दिला जातो.

स्वरूप:-

 • एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१८ या वर्षांसाठी निवड समितीने पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. १४ सप्टेंबर रोजी भोपाळ येथे हा पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 

14 Sep Current Affairs
14 Sep Current Affairs

जगाचा भारतावरच विश्वास

 • काश्मीर प्रश्नावर जगभरातून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत, पण पाठिंबा मिळत नाही. जगभरामध्ये पाकिस्तानपेक्षा भारतावरच विश्वास ठेवला जातो, अशी कबुली पाकिस्तानच्या एका मंत्र्याने दिली. त्यामुळे काश्मीर प्रश्नावर जगभरातील ५८ देशांनी पाठिंबा दिल्याच्या बाता मारणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांच्याच मंत्र्याच्या या वक्तव्याने तोंडघशी पडले आहेत.
 • पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री ब्रिगेडियर (निवृत्त) इजाज अहमद शाह असे या मंत्र्याचे नाव असून, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही कबुली दिली. इजाज अहमद शाह हे इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील प्रभावशाली मंत्री मानले जातात. ते इम्रान खान आणि लष्कर या दोघांच्याही निकटवर्तिय असल्यामुळे त्यांच्या या विधानाला महत्त्व आहे. 
 • एका प्रश्नाला उत्तर देताना शाह म्हणाले, 'काश्मीरमध्ये भारताने संचारबंदी लादली आहे, तेथे औषधे मिळत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो. मात्र, आमच्या जग विश्वास ठेवत नाही. त्यापेक्षा भारताकडून जे सांगण्यात येते, त्यावर जगाचा विश्वास आहे.'
 • पाकिस्तानच्या भूमिकेला ५८ देशांनी पाठिंबा दिला असून, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसह प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते. मात्र, शाह यांच्या विधानामुळे ते उघडे पडले आहेत. 
 • पाकिस्तानकडून जमात उद दावा आणि अशा दहशतवादी संघटनांना पोसले जाते. त्यावरून अनेक वेळा टीका होत असते. जमात उद दावा व अशा संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाकिस्तानने लाखो रुपये खर्च केले आहेत. या संघटनांमधील लोकांचे हृदयपरिवर्तन करण्याची गरज आहे. या संघटनांविरोधातील कारवाईही सुरू आहे. 

इम्रान-ट्रम्प दोन वेळा भेटणार:-

 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान न्यूयॉर्कला जात असून, या दौऱ्यामध्ये ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोन वेळा भेटणार आहेत. या दौऱ्यामध्ये २१ सप्टेंबर रोजी इम्रान खान न्यूयॉर्कला पोहोचत आहेत, तर २७ सप्टेंबर रोजी त्यांचे आमसभेमध्ये भाषण होईल. 
 • पंतप्रधान झाल्यापासून इम्रान खान यांचा हा दुसरा अमेरिका दौरा असून, जुलैमध्ये झालेल्या पहिल्या दौऱ्यात त्यांनी ट्रम्प यांच्याशी काश्मीर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव देऊन वाद ओढवून घेतला होता.

'पाकच्या मदतीवरच दहशतवाद्यांचा नायनाट अवलंबून':-

 • दहशतवादविरोधातील कारवाईमध्ये पाकिस्तानने त्यांच्या तळांचा वापर करून दिला, तर अमेरिकेला दहशतवादाचा पिडित होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बिडेन यांनी केले. पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बिडेन डेमोक्रॅटिक पक्षाकडून इच्छुक आहेत. अफगाणिस्तानातील कारवाईमध्ये पाकिस्तानने त्यांचे हवाई तळ वापर्यास देण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

काय आहे ऑनलाइन घोटाळा

 • ऑनलाइन घोटाळ्यांच्या एका जागतिक कारवाईत सुमारे ३०० लोकांना अटक करण्यात आल्याचे नायजेरियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कंपन्या आणि व्यक्तींकडून 'वायर ट्रान्सफर हायजॅक'प्रकरणी ही कारवाई महिन्याभर सुरू होती.
 • 'ऑपरेशन रि-वायर्ड'ने तथाकथित व्यावसायिक ई-मेल तडजोड योजना (बीईसी) सुरू करून, अनेक गट, बहुराष्ट्रीय गुन्हेगार टोळ्यांचे गट तोडले आहेत. या योजनांद्वारे ते पैशांची चोरी करतात. या योजना नायजेरियातील असून, त्या जगभरात पसरल्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितले. २०१८मध्ये जगभरात १.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. हे नुकसान मागील वर्षीच्या दुप्पट आहे.
 • 'नायजेरियाच्या आर्थिक आणि वित्तीय गुन्हे आयोगाने (ईएफसीसी) मे आणि सप्टेंबरदरम्यान केलेल्या 'स्वीप' ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची सायबर गुन्हेगारी संपविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,' असे 'एफबीआय'चे अहमदी उचे यांनी मंगळवारी लागोसमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. 
 • सायबर गुन्हेगारीप्रकरणी नायजेरियातील १६७, अमेरिकेतील ७४, तुर्कस्तानातील १८, तर घानातील १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुतेक नायजेरियाचे नागरिक आहेत.
 • फ्रान्स, इटली, जपान, मलेशिया, ब्रिटन आणि केनिया या देशांतील २८१ जणांना अटक करण्यात आली असून, 'ऑपरेशन रि-वायर्ड'मध्ये ३७ लाख डॉलर्स जप्त करण्यात आल्याची माहिती न्याय विभागाने दिली आहे.

काय आहे ऑनलाइन घोटाळा?:-

 • ई-मेल हॅक करून, फसवणूक केली जाणाऱ्या घोटाळ्यांचे अनेक प्रकार आहेत. गुन्हेगार एखाद्या कंपनीचा अधिकारी किंवा त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्लायंटचा अधिकारी म्हणून ऑनलाइन आणि ई-मेलमध्ये येतात. इतर कर्मचाऱ्यांना गुन्हेगाराच्या खात्यात पैसे हस्तांतरण किंवा देयके देण्यास सुचवितात. इतर गुन्ह्यांत ते समान टप्प्यासाठी कर्मचाऱ्यांचे ई-मेल अपहृत करतात. 
 • अमेरिकेत सक्रिय ऑनलाइन फसवणुकीचे नेटवर्क हाताळण्यासाठी 'एफबीआय'ने मे २०१९ मध्ये नायजेरियाच्या 'अँटी-ग्रॅफ्ट एजन्सी'सह अनेक देशांसह एकत्र काम करण्यास सुरवात केली आहे.
   
14 Sep Current Affairs
14 Sep Current Affairs

विकासदर अपेक्षेहून कमी-आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

 • चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या विकासदरात झालेल्या घसरणीची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दखल घेतली आहे. भारताची आर्थिक वाढ ही अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, अशी स्पष्टोक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. 
 • मात्र ही घसरण होऊनही जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताचीच असेल, अशी पुस्तीही नाणेनिधीने जोडली आहे.
 • कंपन्या आणि पर्यावरणीय नियमांतील अनिश्चितता आणि काही बिगर बँकिंग संस्थांची खराब कामगिरी भारताचा विकासदर खालावण्यास कारणीभूत असल्याचे निरीक्षण नाणेनिधीने ताज्या अहवालात नोंदवले आहे.
 • अधिकृत आकडेवारीनुसार, भारताचा विकासदर २०१९-२० वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या पाच वर्षांतील हा नीचांक ठरला आहे. नाणेनिधीने जुलैमध्ये भारताच्या २०१९ आणि २०२० मधील विकासदराचे अंदाजित आकडे जाहीर केले होते. 
 • त्यात ०.३ टक्क्यांची घट करून सुधारित आकडे जाहीर करण्यात आले. नव्या अंदाजानुसार, २०१९ आणि २०साठी भारताचा विकासदर अनुक्रमे ७ आणि ७.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत मागणी घटल्याचे प्रतिबिंब या आर्थिक पाहणीत उमटले आहे. 
 • 'भारताच्या आर्थिक विकासाची नवी आकडेवारी आली आहे. विकासदर अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे,' असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राइस यांनी गुरुवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
 • यापूर्वी जानेवारी ते मार्च २०१२-१३ या तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर सर्वांत कमी ४.३ टक्के होता. २०१८-१९ या वर्षाच्या याच तिमाहीत तो ८ टक्के होता. '२०११-१२च्या किमतीच्या आधारे २०१९-२०च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ३५.८५ लाख कोटी रुपये असेल. २०१८-१९च्या तिमाहीतील हाच आकडा ३४.१४ लाख कोटी रुपये होता.' अशी आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केली आहे.
 • 'पुढील आढाव्यात आम्ही या आकडेवारीचा समावेश करू,' असे राइस यांनी म्हटले आहे.

अहवाल काय म्हणतो?:-

 • उत्पादन क्षेत्रातील तीव्र मंदी आणि कृषिक्षेत्रातील घसरणीमुळे विकासदरात घट
 • विकासदर खालावणार असला तरीही भारतच जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था
 • कॉर्पोरेट जगतातील आणि बिगर बँकिंग क्षेत्रातील काही संस्थांच्या खराब कामगिरीचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम
 • भारताच्या आर्थिक स्थितीकडे नाणेनिधीचे लक्ष
 • जागतिक जीडीपीला व्यापारयुद्धाचा फटका

अमेरिका-चीन व्यापारयुद्ध:-

 • अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसेल असा इशाराही नाणेनिधीने दिला आहे.
 • या व्यापारयुद्धामुळे २०२० मध्ये जागतिक जीडीपीमध्ये .८ टक्क्यांनी घसरण होईल व ही स्थिती कायम राहिली तर भविष्यात जीडीपीला आणखी फटका बसेल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.

मनमोहन सिंह यांचे अर्थव्यवस्थेसाठी पाच सल्ले

 • सध्या आपण आर्थिक मंदीचा सामना करत आहोत. त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटीवर टीका केली. मरगळलेल्या अर्थव्यव्यस्थेला बळकटी देण्यासाठी दिवसेंदिवस अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब होत आहे. मनमोहन यांनी मंदीविरोधात लढण्यासाठी सहा उपाय सुचवले आहेत.

शेतीचं पुनरुज्जीवन:–

 • शेतीचं जीडीपीमध्ये तब्बल १५ टक्केंच योगदान आहे. ग्रामीण भागाची खरेदी करण्याची क्षमता वाढवण्यासाठी लवकरात लवकर मार्ग सरकारने काढणं गरजेचं आहे. त्यासोबतच शेतीचं पुनरुज्जीवन करुन शेतकऱ्यांच्या अडचणी कमी कराव्यात. त्यासाठी सरकारला आपल्या कृषी धोरणात आणखी अमुलाग्र बदल करावे लागतील.

जीएसटीमध्ये आणखी सुलभता:-

 • आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सरकारला जीएसटीमध्ये मोठे बदल करावे लागतील. थोड्यावेळासाठी महसूल बुडाला तरी चालेल पण जीएसटीमध्ये आणखी सुलभता येणं गरजेच आहे.

निर्यातीला प्रोत्साहन:–

 • चीन आणि अमेरिका या दोन राज्यात व्यापार युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे ज्या देशाचं मार्केट आपल्यासाठी खुलं झालं आहे. ते शोधून व्यापाराला प्रोत्साहन द्यावे.

भांडवल निर्मिती:–

 • भांडवल निर्मिती करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर सरकारने मात करायचा प्रयत्न करायाला हवा. भांडवल निर्मिती न झाल्यामुळे सरकारी बँकासह एनबीएफसीलाही फटका बसला आहे.

रोजगार केंद्रीत क्षेत्रावर भर:-

 • टेक्स्टाईल, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स आणि परवडणारे घरं या नोकऱ्या देणाऱ्या क्षेत्रांवर सरकारने भर द्यावा. विशेषतः कर्जाची हमी द्यावी.

पायाभूत सुविधा:-

 • खाजगी गुंतवणुकीसह मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची गरज.


 

14 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »