15 August Current Affairs

15 August Current Affairs
15 August Current Affairs

पाकिस्तानकडून गोळीबार भारताचं चोख प्रत्युत्तर

•    पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
•    केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार
•    भारतीय जवानांचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
•    गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न
•    घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारतीय लष्कराला यश

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असतानाच, आज गुरुवारी पाकिस्ताननं पूँछमधील केजी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय भारतानं घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. भारतीय लष्करही सतर्क असून, जवानांनी पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर आज पुन्हा पूँछ जिल्ह्यातील केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. 
मिळालेल्या माहितीनुसार, कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर दहशतवादी हिंसाचार घडवून आणण्याची शक्यता आहे. तर गुप्तचर यंत्रणांतील सूत्रांच्या माहितीनुसार, कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न होऊ शकतो. त्यासाठी पाकिस्तानी सैन्यांकडून वारंवार गोळीबार करण्यात येत आहे.

काश्मीरमध्ये नरसंहाराच्या तयारीत भारत इम्रान खान बिथरले

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. काश्मीरप्रश्नी चीन आणि तुर्कस्तान वगळता जगभरातील अन्य देशांकडून सहानुभूती न मिळाल्यानं अस्वस्थ झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर खोटेनाटे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार जम्मू-काश्मीरमध्ये नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत आहे. स्रेब्रेनिकामधील हत्याकांडाप्रमाणं काश्मिरातील मुस्लिमांची हत्या होऊ शकते, असं ते म्हणाले. काश्मीर प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही तर, जगभरातील मुस्लिमांमध्ये कट्टरता वाढून हिंसाचाराचं सत्र सुरूच राहील, असंही ते म्हणाले.
काश्मीरप्रश्नी सहानुभूती मिळवण्यासाठी दारोदारी हिंडल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली. चीन आणि तुर्कस्तान वगळता अन्य देशांनी पाकिस्तानला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं इम्रान खान कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आता भारताविरोधात आग ओकण्यास सुरुवात केली आहे. 'हे जग निमूटपणे स्रेब्रेनिकासारखा आणखी एक नरसंहार काश्मीरमध्ये पाहणार का? असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'असं होऊ दिलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जगभरातील मुस्लिमांमध्ये कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराचं हे सत्र सुरूच राहील, असंही ते म्हणाले. 
तत्पूर्वी, इम्रान खान यांनी काल स्वातंत्र्यदिनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमधील जनतेला संबोधित करताना भारताला धमकी दिली. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याला भारत जबाबदार असेल. या प्रश्नी आम्ही संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ, असं त्यांनी सांगितलं. तुमच्याकडून एक प्रयत्न झाला तर आमच्याकडून त्याच्या दहापटीनं प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी धमकीही त्यांनी दिली.

15 August Current Affairs
15 August Current Affairs

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. हृदय व फुफ्फुसाच्या विकारानं त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'पती, पत्नी और वो', 'तुम्हारे लिए', 'सफेद झूठ', 'मुक्ती' 'सबूत' अशा गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या विद्या सिन्हा यांची मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला, भाभी, बहुरानी, कबूल है, चंद्र नंदिनी या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. 'कुल्फी कुमार बाजेवाला' मालिकेतील त्यांची बेबे ही भूमिका विशेष गाजली होती. मधल्या काळात त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. बऱ्याच वर्षांनी त्या सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात दिसल्या होत्या. 
मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयाचा आजार बळावल्यानं डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी अँजिओप्लास्टी करण्यास नकार दिला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
 

निर्यातीत वाढ देशाची वित्तीय तूट घटली

निर्यातीमध्ये २.२५ टक्क्यांनी वाढ झाल्याने देशाच्या वित्तीय तुटीमध्ये घट झाली आहे. जुलैमध्ये २,२५ टक्के वाढीसह भारताने २६.३३ दशलक्ष अमेरिकी डॉलरची निर्यात केली. त्याचवेळी आयातीमध्ये १०.४३ टक्के घट झाल्याने वित्तीय तुटीस फायदा झाला. जुलैमध्ये १३.४३ दशलक्ष अमेरिकी डॉलर वित्तीय तूट नोंदवली गेली. जुलै २०१८मध्ये हा आकडा १८.६३ दशलक्ष अमेरिकी डॉलर होता.

15 August Current Affairs
15 August Current Affairs

निर्देशांकात धुगधुगी

भारतीय शेअर बाजारांतील चढउतार सत्र अद्याप कायम आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मंगळवारी ६२३ अंकांची आपटी खाल्ल्यानंतर बुधवारी सेन्सेक्स सावरला. दिवसभरात ३५३ अंकांची कमाई करून हा निर्देशांक ३७३११वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने १०३ अंकांची वृद्धी साधत ११०२९चा टप्पा गाठला. यामुळे सेन्सेक्सने ३७ हजार तर, निफ्टीने ११ हजारांचा आश्वासक स्तर गाठल्याचे पुन्हा दिसून आले. 
अमेरिका व चीनमधील व्यापारसंघर्षात आलेली शिथिलता व देशांतर्गत अतिसूक्ष्म आर्थिक परिणाम सकारात्मक नोंदवले गेल्याने गुंतवणूकदारांचे मनोधैर्य उंचावल्याचे दिसून आले.

चीनच्या वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या प्रस्तावित अतिरिक्त शुल्काची अंमलबजावणी लांबवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजारांत बुधवारी उत्साह दिसून आला. भारतीय बाजारांतही त्याचे पडसाद उमटले. सत्राच्या सुरुवातीपासूनच समभागखरेदीचा ओघ होता. यामुळे निर्देशांकाने एका क्षणी ५१५ अंकांची वृद्धी साधली होती.

मात्र सेन्सेक्सला यात सातत्य राखता न आल्याने दिवसअखेरीस ३५३ अंकांच्या वृद्धीवर समाधान मानावे लागले. 
आरोग्यसुविधासंबंधी समभाग वगळता धातू, टेलिकॉम, कॅपिलटल गुड्स, इंधन व वायू, वित्त, बँकिंग आदी सर्व प्रमुख सेक्टरमधील समभागांना बुधवारी चांगली मागणी होती व त्यांच्या मूल्यात वाढ झाली.
हे वधारले:-
वेदांता, टाटा स्टील, येस बँक, टेक महिंद्र, हीरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, स्टेट बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आदी कंपन्यांचे समभाग ४.८३ टक्क्यांपर्यंत वधारले. 
हे घसरले:-
सन फार्मा, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, एशियन पेण्ट्स, एचसीएल टेक, एनटीपीसी आदींचे समभाग ४.५८ टक्क्यांपर्यंत घसरले.

भारत हा तर विकसित देश डोनाल्ड ट्रम्प

भारत व चीन हे आता विकसित देश झाले आहेत, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. अर्थात, भारताविषयीचे हे उद्गार त्यांनी कौतुकापोटी काढले नाहीत तर, जागतिक व्यापार संघटनेकडून (डब्ल्यूटीओ) भारताला मिळणाऱ्या विशेष सवलती व लाभांबाबत नापसंती व्यक्त करताना त्यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली. 

भारत व चीन हे आता विकसनशील देश नसून जागतिक व्यापार संघटनेकडून विकसनशील देशांना दिले जाणारे लाभ मी त्यांना यापुढे मिळू देणार नाही, अमेरिका व भारतादरम्यानचे व्यापारसंबंध चांगले असले तरी ट्रम्प यांनी भारताच्या धोरणांवर वरचेवर टीका केली आहे. अमेरिकी वस्तूंवर भारतात अतिरिक्त शुल्क आकारले जाते अशी तक्रारही त्यांनी केली आहे. 
विकसनशील देशांची नेमकी व्याख्या काय व एखाद्या देशाला कोणत्या निकषांच्या आधारे हा दर्जा दिला जातो, अशी विचारणा ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेस जुलैमध्ये केली होती. हा मुद्दा त्यांनी नव्याने ऐरणीवर आणला असून भारत, चीन व तुर्कीसारख्या देशांना विकसनशील देशांच्या सूचीतून वगळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारत व चीन आशियातील मोठ्या आर्थिक शक्ती असूनही त्यांनी विकसनशील देशांना मिळणारे लाभ अनेक वर्षे उपभोगले आहेत. आपल्यासारख्या देशांना त्याचा तोटा होत आहे.
नेमके लाभ काय:-
आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त मुदत, आयात शुल्कात सवलत, निर्यातीस प्राधान्य व अनुदान आदी असंख्य लाभ विकसनशील देशांना जागतिक व्यापार संघटनेकडून मिळतात.
 

15 August Current Affairs
15 August Current Affairs

एसबीआय आणणार क्रेडिट कार्ड आयपीओ

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या क्रेडिट कार्डचा आयपीओ (इनिशिअल पब्लिक ऑफर) लवकरच शेअर बाजारात दाखल करणार आहे. एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट्स सर्व्हिसेस प्रा. लि. हा स्टेट बँकेचा संयुक्त व्यवसाय आहे. आयपीओच्या माध्यमातून यातील भांडवली हिस्सा कमी करण्याचा निर्णय या बँकेने घेतला आहे. या प्रस्तावास रिझर्व्ह बँक व सेबीच्या मंजुरीची आवश्यकता आहे.

कोहलीचं ४३वं शतक विराट विक्रमांना गवसणी

टीम इंडियानं बुधवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजवर सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयासह एकदिवसीय मालिकाही २-०ने खिशात घातली. विराटनं या सामन्यात नाबाद ११४ धावांची तुफानी शतकी खेळी केली.

एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचं ४३ वं शतक आहे. या शतकासह त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली.
पावसाच्या व्यत्ययानंतर वेस्ट इंडीजनं प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत ७ विकेट गमावून २४० धावा केल्या. डकवर्थ लुइस नियमानुसार टीम इंडियाला २५५ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. हे लक्ष्य टीम इंडियानं ४ विकेट गमावून ३२.३ षटकांतच पार केलं. विराट कोहलीनं ९९ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ११४ धावा काढल्या. तर श्रेयस अय्यरनं ४१ चेंडूंत ६५ धावा केल्या. विराटनं या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

विश्वविक्रमी विराट; १० वर्षांत २० हजार धावा!

  • क्रिकेटविश्वात 'रनमशीन' अशी आपली ओळख निर्माण करणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक यशोशिखर गाठलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० वर्षांत २० हजार धावा करण्याचा विश्वविक्रम विराटने आता आपल्या नावावर केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
  • विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या व अंतिम वनडेत खणखणीत शतक झळकावलं. वनडेतील हे त्याचं ४३ वं शतक ठरलं. या शतकाच्या जोरावर भारताने शानदार विजय साकारला व तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. या शतकी खेळीबरोबरच ३० वर्षीय विराटने १० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत २० हजार धावांचा टप्पा ओलांडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 
  • १० वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा करणारा विराट हा आता एकमेव फलंदाज आहे. विराटनंतर सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहेत.
  • पाँटिंगने १० वर्षांत १८ हजार ९६२ धावांचा टप्पा गाठला होता तर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
  • त्याने १० वर्षांत १६ हजार ७७७ धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा शैलीदार फलंदाज महेला जयवर्धनेच्या नावावर १० वर्षांत १६ हजार ३०४ धावांची नोंद आहे. कुमार संगकाराने १० वर्षांत १५ हजार ९९९, सचिन तेंडुलकरने १५ हजार ९६२, राहुल द्रविडने १५ हजार ८५३ तर हाशिम आमलाने १५ हजार १८५ धावा केल्या.
     
15 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »