15 July Current Affairs

15 July Current Affairs
15 July Current Affairs

विम्बल्डन उत्कंठावर्धक लढत जोकोविच विजेता

आठवेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकाविणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीतला अव्वल सर्बियाचा नोव्हाक जोकोविच  यांच्यातील अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत अखेर जोकोविचने फेडररला नमवले. 
७-६,१-६,७-६,४-६,१३-१२ अशा सेटमध्ये जोकोविचने जेतेपद खेचून आणले. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता.
जागतिक किर्तीचे बलाढ्य स्पर्धक जेव्हा आमने-सामने भिडतात, तेव्हा खेळ किती रोमांचक होऊ शकतो याची झलक रविवारी टेनिसप्रेमींनी पाहिली. कधी जोकोविचचं पारडं जड तर दुसऱ्याच क्षणी फेडररच्या बाजुने खेळ झुकायचा. तब्बल साडेचार तास ही अंतिम फेरी रंगली. पहिल्या दोन्ही सेटमध्ये दोघांनी बरोबरी केल्याने पाचव्या सेटसाठी दोघांनी कडवी झुंज दिली. पाचव्या सेटमध्ये १२-१२ असा स्कोअर झाल्यानंतर टायब्रेक झाले.
जोकोविच आणि फेडरर यांच्यातला हा ४८ वा सामना होता. जोकोविच फेडररविरुद्ध मागील सहापैकी पाच सामने जिंकला होता आणि हा सामनाही अटीतटीत लढून त्याने आपली वर्चस्व सिद्ध केले.
रॉजर फेडरर (२० ग्रँडस्लॅम)
ऑस्ट्रेलियन ओपन - ६ 
फ्रेंच ओपन - १ 
विम्बल्डन - ८ 
अमेरिकन ओपन - ५
नोव्हाक जोकोविच (१५ ग्रँडस्लॅम)
ऑस्ट्रेलियन ओपन - ७
फ्रेंच ओपन - १ 
विम्बल्डन - ४ 
अमेरिकन ओपन - ३
 

इंग्लंड विश्वविजेता सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय

सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे. इतर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.
इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. बेन स्टोक्सने नाबाद ८४ धावा केल्या. तर सुपर ओव्हरमध्येही स्टोक्सने दमदार फलंदाजी केली. जोफ्रा आर्चरने सुपर ओव्हरमध्ये केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला विजय साजरा करता आला. बेन स्टोक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत इंग्लंडचा डाव २४१ धावांवर संपुष्टात आणला होता. सामना टाय झाल्याने वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळविण्यात आली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. विशेष म्हणजे प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार अखेर इंग्लंडला सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या मुद्द्यावर विजयी घोषित करण्यात आलं.
 

15 July Current Affairs
15 July Current Affairs

तिन्ही वर्ल्डकप जिंकणारा इंग्लंड ठरला पहिला देश

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेला २०१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दीर्घकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल. सामना टाय होईल आणि निकाल सुपरओव्हरमध्ये लागेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
सुपरओव्हरमध्ये देखील सामना टाय झाला पण सर्वाधिक चौकारांच्या बळावर इंग्लंडने विजय मिळवत पहिल्या विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली.
या विजयासह इंग्लंड क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बीचे विजेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. क्रीडा क्षेत्रात महत्वाच्या स्पर्धांमध्ये इंग्लंडला पहिले यश १९६६ साली मिळाले. त्यावेळी इंग्लंडने पश्चिम जर्मनीचा पराभव करुन पहिल्यांदा फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकला होता.
२००३ साली इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा २०-१७ असा पराभव करुन पहिल्यांदा रग्बी वर्ल्डकप जिंकला. १९६६ सालच्या फुटबॉल वर्ल्डकपनंतर इंग्लंडने जिंकलेले ते दुसरे विश्वविजेतेपद होते.
क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने २४ तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या बळावर इंग्लंडने पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवले.
 

आयपीएलमध्ये लवकरच आणखी दोन संघ खेळणार

जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीग आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. येत्या 2021 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएलमध्ये 8 संघ खेळताxत. अहमदाबाद, पुणे आणि रांची किंवा जमशेदपूर यामधील दोन संघ 2021 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.
अहमदाबादसाठी अदानी ग्रुप, पुणेसाठी आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि रांची किंवा जमशेदपूरसाठी टाटा ग्रुप रेसमध्ये आहे. याआधी 2011 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळले होते. मात्र काही विवादांनंतर दोन संघ बाद करण्यात आले आणि ही संख्या पुन्हा आठवर आली होती.
दोन नवीन संघ आयपीएलमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठीची योजन तयार झाली असून याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. चर्चा सुरळीत पार पडली तर 2021 मध्ये आयपीएलमध्ये दहा संघ खेळताना दिसतील. याबाबत आयपीएल संघ मालक आणि अधिकारी यांच्यात लंडनमध्ये एक बैठक पार पडली. जर नवीन दोन संघ दाखल झाले तर आयपीएलला याचा फायदाच होईल, यावर सगळ्यांचं एक मत झालं आहे.
अदानी ग्रुपने 2010 मध्ये अहमदाबादची फ्रॅन्चाईजी घेण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. 2011 मध्ये सहारा ग्रुपने पुणे वॉरिअर्स संघ विकत घेतला होता. मात्र 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सला आयपीएलमधून हटवण्यात आलं आहे.
पुणे वॉरिअर्सने आयपीएलच्या 2011, 2012, 2013 या सीजमध्ये भाग घेतला होता. 2011 मध्ये कोच्ची टस्कर संघही आयपीएलमध्ये सामील करण्यात आला होता. कोच्ची टस्करला त्याच वर्षी आयपीएलमधून हटवण्यात आलं होतं.
 

15 July Current Affairs
15 July Current Affairs

लवकरच विजेवर धावणारी वातानुकूलित एसटी

सुकर आणि पर्यावरणस्नेही प्रवास होण्यासाठी एसटी महामंडळ विजेवर धावणाऱ्या १५० वातानुकूलित बस ताफ्यात दाखल करणार आहे. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येत असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जुलै अखेर निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.
केंद्र सरकारने विजेवर धावणाऱ्या बसना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. या बसमुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच इंधनखर्चही कमी होणार आहे. त्यामुळे एसटीने या विजेवर चालणारी बस सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीला प्रत्येक बसच्या इंधनासाठी प्रति किलोमीटरमागे १ रुपये २० पैसे खर्च येतो. तर विजेवरील बससाठी हाच खर्च प्रतिकिमीसाठी ६४ पैसे होईल. सध्या मुंबई, ठाणे तसेच नागपूर शहरात अशा बस स्थानिक पालिकांकडून चालवण्यात येतात.
एसटी महामंडळानेही भाडेतत्त्वावर विजेवर चालणाऱ्या १५० वातानुकूलित बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले की, विजेवर धावणाऱ्या बससाठी निविदा काढली असून जुलैअखेपर्यंत ती सादर करण्याची मुदत आहे. ज्या कंपन्या बस पुरवठा करतील त्यांच्याकडूनच या बससाठी लागणारी चार्जिगची सुविधा पुरवली जाणार आहे. २५० किलोमीटपर्यंतच्या अंतरापर्यंत धावू शकतील अशा बस घेण्यात येतील. या सर्व बस आसन प्रकारातील असतील.
 

२३ वर्षांत पहिल्यांदाच खासदारांनी करून दाखवला ‘हा’ पराक्रम

11 जुलै रोजी सुरू झालेले लोकसभेचे कामकाज तब्बल 13 तास चालल्याची माहिती समोर आली आहे. सकळी 11 वाजता सुरू झालेले संसदेचे कामकाज रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी संपले.
गेल्या 20 वर्षांमध्ये संसदेचे सर्वाधिक कामकाज 11 जुलै रोजी झाल्याचे पहायला मिळाले. या दरम्यान, प्रश्नोत्तर आणि शून्य पहराव्यतिरिक्त अर्थसंकल्पातील रेल्वेशी निगडीत अनुदानाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्वाधिक वेळ देण्यात आला होता.
दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सांगण्यावरून एकाच दिवसात अर्थसंकल्पातील रेल्वेच्या विषयांवर चर्चा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच जास्तीत जास्त खासदारांना यावेळी आपले म्हणणे मांडण्याचे, तसेच पहिल्यांदा संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदारांनाही संधी देण्यात यावी, असे ठरवण्यात आले होते. दरम्यान, अनेकांना यावेळी बोलण्याची संधी दिल्याची माहिती सू्त्रांकडून देण्यात आली.
सभापतींच्या या सुचनेचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित सभापतींनी कामकाजाची पद्धतच बदलली. माझी पत्नी रूग्णालयात दाखल असतानाही मी आज संसदेत आहे. सर्व खासदारांचे त्यांच्या नव्या पद्धतीला समर्थन असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे खासदार जगदम्बिका पाल यांनी दिली.
 

15 July Current Affairs
15 July Current Affairs

भारताचा घातक अस्त्र ‘नाग’ दिवसात नाही आता अंधारातही उडवणार शत्रूचा रणगाडा

नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल.  रविवारी 7 जुलै रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्रांची 524 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्यावर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे.

चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे रद्द

भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 'इस्रो'या संदर्भातली घोषणा केलेली आहे.
सोमवारी मध्यरात्री (आज) २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आलेला आहे.
चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.
लॉन्चिंग नंतर ५२ दिवसांनी 'चांद्रयान-२' चंद्रावर पोहोचणार होतं. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.
चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे.
चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.

15 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »