15 Oct Current Affairs

15 Oct Current Affairs
15 Oct Current Affairs

पाकिस्तानवर लवकरच कारवाई

 • 'एफएटीएफ'कडून पाकिस्तानवर लवकरच मोठी कारवाई होणार असून, त्या देशाला 'डार्क ग्रे' यादीत टाकले जाणार 8असल्याची शक्यता आहे.
 • पाकिस्तानला सर्व देशांकडून एकटे पाडले गेले आहे. डार्क ग्रे यादी म्हणजे तीव्र इशारा. याचा अर्थ शेवटची संधी.

फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ):-

 • फायनान्शियल  टास्क फोर्स (मनी लॉन्ड्रिंग वर) (एफएटीएफ), ज्याला फ्रेंच नावाने ग्रुप डी'एक्शन फायनान्सर (जीएएफआय) देखील म्हटले जाते, ही १९८९ मध्ये जी-७ च्या पुढाकाराने मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात धोरणे विकसित करण्यासाठी स्थापन केलेली एक आंतरशासकीय संस्था आहे.
 • २००१ मध्ये दहशतवादाच्या वित्तपुरवठ्यात समाविष्ट करण्याच्या निर्णयाचा विस्तार करण्यात आला. हे सदस्य देशांच्या “पीअर रिव्ह्यूज” (“परस्पर मूल्यांकन”) च्या माध्यमातून एफएटीएफच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या प्रगतीवर लक्ष ठेवते. एफएटीएफ सचिवालय/मुख्यालय  पॅरिसमधील ओईसीडी येथे  स्थित आहे.

[तुम्हाला काय वाटते या ‘डार्क ग्रे’ यादीबद्दल?? Is it ok to give pakistan another chance for no valid reason?]

 

सोशल मीडिया आधार लिंकिंगची याचिका फेटाळली

 • सोशल मीडियावर चुकीची माहिती, खोटी माहितीचा प्रसार रोखण्यासाठी सर्व अकाउंट्सना आधार क्रमांक जोडण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळण्यात आली आहे.
 • अशी सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयांपर्यंत आणण्याची गरज नसते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 • 'प्रत्येक बाब सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणण्याची गरज नसते. हा मुद्दा मद्रास उच्च न्यायालयासमोर आहे.
 • आपण तेथे जाऊ शकता,' असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. जनहित याचिकेद्वारे सोशल मीडियावरील अकाउंट्सना आधार क्रमांक जोडण्याची मागणी केली आहे.
 • याद्वारे खोटी, समाजविघातक माहिती रोखण्यास; तसेच पेड न्यूजना आळा घातला जाऊ शकतो, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे. भाजपचे नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
15 Oct Current Affairs
15 Oct Current Affairs

पहिल्या अंध आयएएस पाटील उपजिल्हाधिकारी

 • भारतातील पहिल्या अंध महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील (वय ३०) यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. गेल्या वर्षी एर्नाकुलम येथे त्यांनी पहिल्यांदा सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वाकारून इतिहास रचला होता.
 • तिरुअनंतपुरम येथे उपजिल्हाधिकापदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, 'आपण कधीही हार पत्करायची नाही. कधीही पराभूत व्हायचे नाही. आपण ज्याची दीर्घ काळ प्रतीक्षा करतो, तो क्षण आपल्या अथक प्रयत्नांनी नक्की येतो.' शहराच्या प्रशासनाविषयी कृती आराखडा तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 • 'माझी आताच तिरुअनंतपुरम येथे बदली झाली आहे. जिल्हा समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. विविध विभाग समजून घेईन आणि कृती आराखडा तयार करीन,' असे पाटील यांनी सांगितले
 • नागरी स्पर्धा परीक्षांत (यूपीएससी) उत्तीर्ण झाल्यानंतर पाटील यांनी २०१६मध्ये रेल्वे अकाउंट सेवेत जाण्यास नकार दिला होता. त्यांनी पुन्हा ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सुधारली. त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितल्यानुसार पाटील या कॉलेजमध्ये असताना अत्यंत शिस्तशीर आणि खूप कष्ट घेणाऱ्या विद्यार्थी होत्या.
 • त्यांची कॉलेजमधील मैत्रीण एम. सरस्वती यांनी सांगितले की, 'मुंबई येथील सेंट झेवियर कॉलेजात राज्यशास्त्र विभागात अनेक चर्चांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेत. आम्हा दोघींनाही नंतर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. तेथेही त्यांनी तोच उत्साह दाखवला.'
 • प्रांजल पाटील या महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. सहा वर्षांच्या असतानाच त्यांनी दृष्टी गमावली. २०१६ मध्ये त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचा ७७३ वा क्रमांक होता. पुढील वर्षी पुन्हा ही परीक्षा देऊन त्यांनी आपले रँकिंग सुधारले आणि १२४ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्या. प्रशिक्षणाच्या काळात त्यांची नियुक्ती एर्नाकुलम येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली होती.
 • आपण कधीही हार पत्करायची नाही. कधीही पराभूत व्हायचे नाही. आपण ज्याची दीर्घ काळ प्रतीक्षा करतो, तो क्षण आपल्या अथक प्रयत्नांनी नक्की येतो. तिरुअनंतपुरम शहराच्या प्रशासनाविषयी कृती आराखडा तयार करणार आहे.

- प्रांजल पाटील, आयएएस अधिकारी

 

आपलंच हेलिकॉप्टर पाडलं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई

 • आपलंच एमआय १७ हेलिकॉप्टर चुकून पाडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलानं आपल्या सहा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातील दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे. १६ फेब्रुवारीला बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो अपयशी ठरला होता. त्याच दिवशी भारतीय हवाई दलाच्या काही अधिकाऱ्यांनी आपलंच एक हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यात सहा अधिकारी शहीद झाले होते.
 • भारतीय हवाई दलाचंच हेलिकॉप्टर पाडल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे. तर उर्वरित चार अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाईला सामोरं लागणार आहे. एक ग्रुप कॅप्टन आणि एक विंग कमांडरला कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागणार आहे.
 • पाकिस्तानी हवाई दलानं फेब्रुवारीमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न हवाई दलानं हाणून पाडला होता. त्याचवेळी श्रीनगरजवळ बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचं एमआय १७ हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यात असलेले सर्व सहा अधिकारी शहीद झाले होते.
 • सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र, श्रीनगरमध्ये तैनात आपल्याच दलातील अधिकाऱ्यांनी ते हेलिकॉप्टर पाडलं होतं, अशी माहिती समोर आली होती. २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर होती. हेलिकॉप्टर पाडण्याच्या दहा मिनिटे आधीच त्यानं उड्डाण केलं होतं.

'ती' गंभीर चूक होती:-

 • पाकिस्तानच्या हवाई दलाशी सामना करताना आपल्याच दलाचे एमआय १७ हे हेलिकॉप्टर चुकून पाडणे ही मोठी आणि गंभीर चूक होती, अशी कबुली अलीकडेच हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी दिली होती. अशी चूक भविष्यात कधीच होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशाला दिली होती.
 • आमच्याच मिसाइलनं हेलिकॉप्टर पाडलं होतं. ते स्पष्ट झालं आहे. प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं.

 

15 Oct Current Affairs
15 Oct Current Affairs

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा मराठमोळ्या सौरभ अंबुरेंना

 • भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिलं राफेल विमान दाखल झालं आहे. यामुळे भारतीय संरक्षण दलाची ताकद प्रचंड वाढली आहे. दरम्यान मूळचे लातूरचे असणारे भारतीय हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर सौरभ अंबुरे यांना राफेल उडवण्याचा मान मिळाला आहे.
 • जुलै महिन्यात झालेल्या ‘गरुड’ युद्धाभ्यासादरम्यान सौरभ अंबुरे यांनी राफेल विमानातून गगनभरारी घेतली होती.
 • भारत आणि फ्रान्समधील हवाई दलांमध्ये जुलै महिन्यात ‘गरुड’ युद्धाभ्यास पार पडला. यावेळी सौरभ अंबुरे यांनी सरावादरम्यान राफेल विमानातून उड्डाण केलं होतं.
 • फ्रान्स आणि भारतामधील सैन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात युद्धाभ्यास आजपर्यंत झालेला नाही. दोन्ही देशांमधील हवाई दलांमधील संबंध सुधारण्यासाठी तसंच सहकार्य वाढण्यासाठी हा युद्धाभ्यास सुरु होता. भारत आणि फ्रान्समधील युद्धाभ्यासादरम्यान राफेल, मिराज-२०००, सुखोई ३० सारखी लढाऊ विमाने पहायला मिळाली.
 • सरकारने २०१६ मध्येच ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. त्यातील पहिलं विमान दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताकडे सोपवण्यात आलं आहे. यावेळी राजनाथ सिंग यांनी विधीवत पूजा केली. तसंच राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये या विमानातून पहिली भरारी घेतली होती.
 • भारताने फ्रान्सबरोबर केलेल्या करारात एकूण ३६ राफेल विमाने दिली जाणार असून त्यात भारतीय हवाई दलाने सुचवलेल्या १३ सुधारणांचा समावेश आहे.
 • ही विमाने पंजाबमधील अंबाला, पश्चिम बंगालमधील हासिमरा येथील तळांवर तैनात केली जाणार आहेत. हवाई दलाचे उपप्रमुख हरजित सिंग अरोरा यांनी सांगितले की, सीमेवर रक्षणासाठी ही विमाने मोठी भूमिका पार पाडणार आहेत. त्यांची क्षमता पाकिस्तानच्या एफ १६ विमानांच्या दुपटीहून अधिक आहे.

नोबेलचे भारतीय मानकरी

 • भारतीय – अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना सोमवारी अर्थशास्त्राचे नोबेल मिळाल्याने भारतीय व भारतीय वंशाच्या नोबेल मानकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. बॅनर्जी यांच्यासमवेत त्यांच्या फ्रेंच अमेरिकी पत्नी एस्तेर डफलो व अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले.
 • रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये पहिल्यांदा साहित्याचे नोबेल मिळाले होते त्यात गीतांजलीसह त्यांच्या सर्वंकष साहित्याचा गौरव करण्यात आला होता. [माहिती नीट वाचून तुमच्या शंका दूर करा] त्यानंतर १९३० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल  चंद्रशेखर व्यंकट रमण यांना रामन परिणामासाठी मिळाले.
 • भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक हरगोबिंद खुराना यांना १९६९ मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल  मिळाले होते. त्यावेळी इतर दोन जण सह मानकरी होते. जनुकीय संकेतावलीचा अर्थ व त्याचे प्रथिन संश्लेषण असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.
 • रोम कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरू मदर तेरेसा यांना १९७९ मध्ये शांततेचे नोबेल मिळाले. त्या अल्बानियन असल्या तरी त्यांचे नागरिकत्व भारतीय होते.  मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय होते.
 • भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना १९८३ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल विल्यम फाउलर यांच्यासमवेत ताऱ्यांच्या उत्क्रांतीवरील संशोधनासाठी मिळाले होते.
 • १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल कोलकाता येथे जन्मलेले अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदानासाठी मिळाले होते.
 • जन्माने भारतीय असलेले व्यंकटरमण रामकृष्णन यांना २००९ मध्ये इतर दोघांसमवेत रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार रायबोसोमवरील संशोधनासाठी मिळाला होता.
 • २०१४ मध्ये कैलाश सत्यार्थी यांना पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई यांच्यासमवेत शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, मुलांचे शोषण व त्यांचे हक्क या क्षेत्रात त्यांनी काम केले.

नोबेलचे भारतीय मानकरी:-

 • १९१३ रवींद्रनाथ टागोर – साहित्य
 • १९३० चंद्रशेखर व्यंकट रमण- भौतिकशास्त्र
 • १९६९ हरगोविंद खुराणा- वैद्यकशास्त्र
 • १९७९ मदर तेरेसा – शांतता
 • १९८३ सुब्रमण्यम चंद्रशेखर  भौतिकशास्त्र
 • १९९८ अमर्त्य सेन – अर्थशास्त्र
 • २००९ व्यंकटरमण रामकृष्णन- रसायनशास्त्र
 • २०१४ कैलाश सत्यार्थी – शांतता
 • २०१९ अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र

 

15 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »