16 August Current Affairs

16 August Current Affairs
16 August Current Affairs

UNSC मध्ये आज काश्मीरप्रश्नी चर्चा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत(UNSC) आज सायंकाळी काश्मीर प्रश्नावर 'बंद दाराआड' चर्चा होणार आहे. सुरक्षा परिषदेच्या पाच सदस्यांपैकी एक असणाऱ्या चीनने पाकिस्तानच्या मागणीनंतर या चर्चेसाठी पुढाकार घेतला. चर्चेदरम्यान सदस्य देशांची औपचारिक बैठक बोलावण्याच्या मागणीवर चीन जोर देणार आहे. पण चीनला रशियाच्या विरोधाचा सामना करावा लागेल.
पाकिस्तान या बैठकीला ऐतिहासिक यश मानतोय, पण वास्तवात ही UNSC ची पूर्ण बैठक नाही. चर्चा पूर्णपणे अनौपचारिक आहे. या बैठकीची कुठलीही नोंददेखील ठेवण्यात येणार नाही. 
का होतेय बैठक? :-
पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावर युएएससीकडे तातडीच्या बैठकीची मागणी केली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांच्यामार्फत युएनएससीचे अध्यक्ष जोना रॉनेका यांना पत्र लिहून या बैठकीची मागणी केली.


कधी आहे बैठक? :- 
न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सकाळी १० वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी ७.३० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत सुरक्षा परिषदेचे ५ स्थायी आणि १० अस्थायी म्हणजेच सर्व १५ सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
पाकिस्तानचं म्हणणं:-

किस्तान या बैठकीकडे एक ऐतिहासिक यश म्हणून पाहात आहे. काश्मीर मुद्द्यावर ४० वर्षांनंतर UNSC चर्चेस तयार झाल्याचं पाकचं म्हणणं आहे.


भारताची भूमिका:-

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हीच भारताची भूमिका आहे. भारताने चीनलादेखील तसं स्पष्ट केलं आहे.

 


 

मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडा EC

मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडावं अशी मागणी निवडणूक आयोगानं केली आहे. आयोगानं विधी व न्याय मंत्रालयाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.
लोकप्रतिनिधी कायदा १९५० मध्ये सुधारणा करण्याची शिफारसही आयोगाने केली आहे. निवडणूक ओळखपत्र मतदारांच्या आधार कार्डाशी जोडल्यास बोगस मतदानासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल, असं आयोगाचं म्हणणं आहे. 
'एक व्यक्ती एक मत' योग्य प्रकारे राबवायचं असेल तर निवडणूक ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक असणं बंधनकारक करावं अशी निवडणून आयोगाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आधी आयोगाने आधार आणि निवडणूक ओळखपत्र लिंक असणं वैकल्पिक असल्याचं म्हटलं होतं. मात्र माजी निवडणूक आयुक्त ए. के. जोटी यांनी २०१६ मध्ये आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निवडणूक पॅनेलनं त्यांची भूमिका बदलली. आतापर्यंत ३२ कोटी आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्राशी लिंक झाले आहेत. 
फेब्रुवारी २०१५ मध्ये पोल पॅनलने आधार कार्ड- निवडणूक ओळखपत्र लिंक करण्याविषयी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. हा राष्ट्रीय मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाचा भाग होता. मात्र ऑगस्ट २०१५ मध्ये एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचा हा प्रयत्न थांबवला. सार्वजनिक विकास योजनांचे लाभ आणि अन्य धान्य पुरवठा किंवा गॅस सबसिडी वगळता अन्य कोणत्याही कारणांसाठी आधार कार्डाचा वापर करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. नंतर जुलै २०१७ मध्ये, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी मतदारांचे आधार तपशील मिळण्याची मागणी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एका अर्जाद्वारे केली. 

16 August Current Affairs
16 August Current Affairs

चार भारतीय कर्मचारी अखेर मुक्त जिब्राल्टर

दीड महिन्यापासून जिब्राल्टरने ताब्यात घेतलेल्या तेलवाहू जहाजावरील चार कर्मचाऱ्यांना अखेर गुरुवारी मुक्त झाले. या कर्मचाऱ्यांची पोलिस चौकशी पूर्ण झाल्याने त्यांची सुटका केल्याने जिब्राल्टरने म्हटले असून, यामध्ये जहाजाचा कॅप्टन, मुख्याधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 
इराणहून कच्चे तेल घेऊन सीरियाला निघालेले पनामा देशाचे ध्वज असलेले 'ग्रेस-वन' हे तेलवाहू जहाज जिब्राल्टरने ४ जुलै रोजी ताब्यात घेतले. युरोपीयन युनियनने सीरियावर आर्थिक निर्बंध टाकले असल्याने जिब्राल्टरने त्या देशाकडे जाणारे हे जहाज ताब्यात घेतले. या जहाजावर सर्वाधिक भारतीयांसह रशियन, लॅटविअन तसेच फिलिपिनी कर्मचारीही होते. यातील काही कर्मचारी अद्याप जिब्राल्टरच्या ताब्यात असून, चार भारतीयांना मात्र पोलिस चौकशी पूर्ण झाल्याचे कारण देत मुक्त करण्यात आले आहे. 
जिब्राल्टरने अमेरिकेच्या दबावावरूनच हे जहाज ताब्यात घेतल्याचा आरोप इराणने केला होता. अमेरिकेसोबत उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 'धोकादायक खेळात उडी घेऊ नका' असा इशाराही इराणने ब्रिटनला दिला होता. अमेरिकेने तर या इराणचा ताबा आपल्याकडे द्यावा, अशीही मागणी केली होती.
 

अमेरिकी प्रतिनिधींना इस्रायलचा मज्जाव

पॅलेस्टाइनी नागरिकांच्या पाठिंब्याने सुरू झालेल्या इस्रायलविरोधी बहिष्कार आंदोलनाची पाठराखण करणाऱ्या अमेरिकी काँग्रेसमधील दोन महिला सदस्यांना इस्रायलने त्यांच्या देशात येण्यापासून मज्जाव केला आहे. या दोन महिला सदस्यांना आपल्या देशात येण्यास मुभा दिली तर तो इस्रायलचा दुबळेपणा ठरेल, असे मतप्रदर्शन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर इस्रायलने हे पाऊल उचलले आहे.
अमेरिकी काँग्रेसमधील रशिदा तैब व इहान ओमर या दोन महिला प्रतिनिधी इस्रायल दौऱ्यावर येणार होत्या. जागतिक पातळीवर इस्रायलवर बहिष्कार घातला जावा, यासाठी पॅलेस्टिनींनी मोहीम हाती घेतली असून, या दोघींचा त्यास पाठिंबा आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायल जी वागणूक देत आहे त्याच्या या दोघीही टीकाकार आहेत. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे त्याबाबतची भूमिका सातत्याने मांडली आहे. त्यातील तैब यांचे कुटुंब पश्चिम पट्टीतून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहे.
'रशिदा व इहान या दोघी इस्रायल, तसेच ज्यूंचा द्वेष करीत असून, त्याबाबत त्यांचे मतपरिवर्तन करणे अशक्य आहे. हे पाहता इस्रायलने त्यांना आपल्या देशात येऊ दिले तर तो त्या देशाचा मोठाच दुबळेपणा ठरेल', असे ट्विट ट्रम्प यांनी गुरुवारी केले. त्यानंतर काही वेळातच इस्रायलने, आम्ही या दोघींना आमच्या देशात येण्याची परवानगी देणार नाही, अशी अमेरिकाधार्जिणी भूमिका जाहीर केली.

इस्रायलवर बंदी घालण्याची भूमिका असलेल्यांना देशात येण्याची परवानगी नाकारण्याबाबतचा कायदा इस्रायलने मध्यंतरी केला आहे. त्यास अनुसरूनच रशिदा व इहान यांना मज्जाव करण्यात आला आहे.
 

16 August Current Affairs
16 August Current Affairs

मी निवृत्त झालेलो नाही ख्रिस गेलची घोषणा

भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने अर्धशतकी खेळी केली. तो बाद झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडूंनी त्याला घेराव घालून त्याचे अभिनंदन केले. एवढेच नव्हे तर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही त्याला मिठी मारली. ख्रिस गेलचा हा अखेरचा सामना असल्याची चर्चा तेव्हा होती. पण या सामन्यानंतर गेलने आपण अद्याप निवृत्त झालेलोच नाही, असे जाहीर करून सगळ्यांनाच वेड्यात काढले. 
जमैकाच्या गेलने ४१ चेंडूंत ७२ धावांची तडाखेबंद खेळी केली. १२व्या षटकात तो बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. त्यानेही बॅटवर हेल्मेट ठेवून सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेला प्रेक्षकवर्गही त्याचे अभिनंदन करत होता, त्याच्यासाठी घोषणा देत होता. त्याची जणू ही अखेरची लढत असल्याप्रमाणेच सगळे काही चालले होते. पण या सामन्यानंतर त्याने आपण निवृत्ती घेतली नसल्याचे जाहीर केले.  क्रिकेट वेस्ट इंडिजच्या एका छोट्या व्हीडिओद्वारे गेलने हे स्पष्ट केले की, मी निवृत्तीची कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यावर वनडे क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार का, या प्रश्नावर तो म्हणाला की, पुढची काही घोषणा येईपर्यंत तरी मी खेळतच राहणार आहे.
गेलने वर्ल्डकपपूर्वी असे जाहीर केले होते की, वर्ल्डकप ही आपली अखेरची स्पर्धा असणार आहे. पण या स्पर्धेच्या अखेरीस त्याने निवृत्त होणार नसल्याचे जाहीर केले. भारताविरुद्ध वनडे आणि कसोटीत खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. मात्र कसोटीसाठी त्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे वनडे क्रिकेट मालिका ही अखेरची मालिका असल्याचे वाटत होते. तिसऱ्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला की, माझ्या माहितीप्रमाणे तो निवृत्त झालेला नाही. मात्र त्याने जी तडाखेबंद खेळी केली, तशा खेळीचीच अपेक्षा लोकांना असते. 


 

माजी क्रिकेटपटू व्ही बी चंद्रशेखर कालवश

भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचे आज येथे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. व्ही. बी. चंद्रशेखर क्रिकेट वर्तुळात व्हीबी या नावाने ओळखले जायचे. आक्रमक फलंदाजीसाठी ते परिचित होते. भारतीय संघाकडून ते सात एकदिवसीय सामने खेळले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये व्हीबी यांचा मोठा दबदबा होता. १९८८ मध्ये इराणी चषकात त्यांनी ५६ चेंडूत १०० धावांची विक्रमी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तामिळनाडूकडून खेळताना शेष भारत संघाविरुद्ध त्यांनी ही स्फोटक खेळी केली होती. भारतातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले होते. व्हीबी यांचा हा विक्रम २०१६ पर्यंत अबाधित होता. २०१६ मध्ये ऋषभ पंतने ४८ चेंडूत शतक झळकावून हा विक्रम मोडला. तामिळनाडूकडून कृष्णमाचारी श्रीकांत यांच्यासोबत व्हीबी सलामीला यायचे. १९८७-८८ च्या मोसमात तामिळनाडूने रणजी चषक जिंकला होता तर १९८८ मध्ये इराणी चषक जिंकला होता. या दोन्ही विजेतेपदांमध्ये व्हीबी यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. १९८८ मध्ये इराणी चषकातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच व्हीबी यांना टीम इंडियात स्थान मिळालं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सीलेक्टर, प्रशिक्षक आणि समालोचक अशा विविध माध्यमांतून त्यांनी क्रिकेटसोबतचं नातं जपलं. श्रीकांत यांनी व्हीबी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. व्हीबीच्या जाण्याने मी एक चांगला मित्र गमावला आहे, असे ते म्हणाले. चेपॉक मैदानावरील त्याच्या स्फोटक खेळीचेही श्रीकांत यांनी स्मरण केले. संजीव शर्मा आणि नरेंद्र हिरवाणी सारख्या गोलंदाजांची व्हीबीने धुलाई केली होती आणि मी त्याचा साक्षीदार होतो, असेही श्रीकांत म्हणाले.

16 August Current Affairs
16 August Current Affairs

एटीएम वापराचे स्वातंत्र्य

एटीएमच्या मासिक वापरासंबंधी निर्धारित करण्यात आलेल्या व्यवहारमर्यादेविषयी ग्राहकांनी केलेल्या तक्रारींची रिझर्व्ह बँकेने अखेर दखल घेतली आहे. आपले खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून अथवा अन्य बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्याचेच व्यवहार मासिक विनाशुल्क व्यवहारांमध्ये नोंदवले जातील, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. यामुळे एटीएमचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
सद्यस्थितीत कोणत्याही बँक खात्याचे एटीएम कार्ड हे अन्य बँकेच्या एटीएममध्ये वापरण्याची मुभा आहे. अन्य बँकांच्या एटीएमच्या माध्यमातूनही पैसे काढणे, पिन बदलणे, चेक बुकची मागणी करणे आदी सर्व सुविधा ग्राहकास मिळू शकतात. ग्राहकाचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे एटीएम सर्वत्र उपलब्ध असणे अशक्य असल्याने अन्य बँकांच्या एटीएमचा ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र आरबीआयने काही वर्षांपासून अन्य बँकांच्या एटीएमच्या मुक्त वापरावर निर्बंध आणले आहेत. आरबीआयच्या नियमानुसार अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी दरमहा पाच विनाशुल्क व्यवहार करण्याची मुभा बँकांना देण्यात आली आहे. या विनाशुल्क व्यवहारांचे प्रमाण शहरांच्या दर्जानुसार बदलते. ग्राहकाने ही मर्यादा ओलांडल्यास प्रत्येक व्यवहारामागे किमान ३० रुपये शुल्क आकारले जाते.
ग्राहकांची तक्रार काय?:- या सुविधेस ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. मात्र अन्य बँकांची एटीएम वापरताना खात्यातील जमा रकमेची चौकशी करणे, चेकबुकची मागणी करणे, पिन बदलणे आदी व्यवहारही ग्राहकांकडून एटीएममार्फत केले जातात.


हे व्यवहार रोख रक्कम काढण्याशी संबंधित नसूनही अनेक बँकांकडून या व्यवहारांची गणना विनाशुल्क व्यवहारांत केली जाते. यामुळे अन्य बँकांच्या एटीएममधून विनाशुल्क रोख रक्कम काढण्याच्या सुविधेचा पुरेपूर वापर करता येत नाही. असंख्य ग्राहकांनी या विरोधात आरबीआयकडे तक्रारी केल्या होत्या. 
आरबीआयची स्पष्टोक्ती:-
अन्य बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्याव्यतिक्त होणारे व्यवहारही बँकांकडून विनाशुल्क मासिक व्यवहारात नोंदवले जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. केवळ हेच व्यवहार नाही तर तांत्रिक समस्येमुळे रद्द झालेले व्यवहार अथवा एटीएम मशिनमध्ये पुरेशी रोकड नसल्याने होऊ न शकलेले व्यवहारही विनाशुल्क व्यवहारात गणले जात आहेत. मात्र केवळ रोख रक्कम काढण्याचे व्यवहारच विनाशुल्क व्यवहारांमध्ये विचारात घ्यावेत, अशी सूचना एका परिपत्रकाद्वारे आम्ही सर्व (अनुसूचित, व्यावसायिक, सहकारी, ग्रामीण) बँकांना केली असून रोकडेतर व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ नयेत, असे निर्देशही दिले आहेत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 
कार्डांच्या प्रमाणात एटीएम अपुरी:- 
केंद्र सरकारने ऑगस्ट २०१४मध्ये महत्त्वाकांक्षी जनधन योजना सुरू केल्यानंतर बँक व्यवहारांची व्याप्ती वाढली. याचाच परिणाम म्हणून डेबिट कार्डांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पाच वर्षांपूर्वी देशभरातील डेबिट कार्डांची संख्या ४२ कोटी होती. मात्र फेब्रुवारी २०१९अखेरीस हा आकडा ९४ कोटींपर्यंत पोहोचला. दुसरीकडे, देशभरातील एटीएमच्या संख्येत मात्र या प्रमाणात वाढ करण्यात बँकांना अपयश आले आहे. पाच वर्षांपूर्वी एटीएमची एकूण संख्या १ लाख ७० हजार होती. यात २० टक्क्यांनीच वाढ झाली असून ती २.०२ लाखांवर पोहोचली आहे. 
 

भारताला इंधन पुरवण्यात सौदीची पुन्हा आघाडी

सौदी अरेबियाला पुन्हा एकदा भारताचा सर्वात मोठा इंधन पुरवठादार देश हा मान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सौदी अरेबियाच्या सौदी अरामको या आघाडीच्या इंधन उत्पादक कंपनीस आपल्या कंपनीच्या इंधन व रसायन उद्योगातील २० टक्के भांडवल विकण्याचा निर्णय नुकताच घोषित केला. या निर्णयामुळे सौदी अरेबियाकडून भारताला होणाऱ्या इंधन पुरवठ्यात कमालीची वाढ होईल. 
भारताच्या इंधनमागणीची पूर्तता ही प्रामुख्याने सौदी अरेबियाकडूनच केली जात होती. मात्र गेल्या दोन आर्थिक वर्षांत सौदी अरेबियाला इराकने मागे सारले होते. गेल्या आर्थिक वर्षात इराकने भारताला ४६.६१ दशलक्ष टन कच्चे इंधन निर्यात केले. तर, सौदी अरेबियाने त्याहून कमी म्हणजे ४०.३३ दशलक्ष टन कच्च्या इंधनाचा पुरवठा केला. 
करारानंतर काय? :-
रिलायन्स इंडस्ट्रीजशी झालेल्या करारानुसार सौदी अरामकोकडून भारताला दररोज पाच लाख बॅरल कच्चे इंधन पुरवले जाईल. पूर्ण वर्षभराचा विचार केल्यास हा आकडा २५ दशलक्ष टन असेल व त्यात उर्वरित इंधनपुरवठा मिळवल्यास सौदी अरेबिया इराकला मागे टाकू शकेल. या हिस्साविक्रीतून रिलायन्सला ७५ अब्ज अमेरिकी डॉलर मिळणार आहेत.
 

16 August Current Affairs
16 August Current Affairs

घसरत्या अर्थव्यवस्थेचा आढावा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांमध्ये आलेली मरगळ, अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल, रोजगार गमावण्याची भीती आदी मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. 
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केल्यानंतर मोदी या बैठकीत सहभागी झाले. देशाचा विकासदर गेल्या आर्थिक वर्षामध्ये ६.८ टक्क्यांपर्यंत घसरला असून २०१४-१५नंतरचा हा नीचांकी स्तर आहे. विदेशी थेट गुंतवणुकीचा ओघही आटला असून आंतरराष्ट्रीय व्यापार व रुपयाच्या अवमूल्यनाची समस्याही सरकारपुढे आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या सर्व आघाड्यांवर काय उपाययोजना करता येतील, यावर या बैठकीत विचारमंथन झाल्याचे समजते. अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी सरकारकडून प्रत्येक क्षेत्रासाठी ठोस उपाय सुचवले जातील व प्रसंगी विशेष पॅकेजही दिली जातील, अशी शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
दरकपातही निष्प्रभ:-
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यामुळे गृहकर्जे स्वस्त झाली असली तरी बांधकाम व्यवसायाला अद्याप दिलासा मिळालेला नाही. पोलाद, सीमेंटवरील भरमसाट जीएसटी तसेच, घरांवरील जीएसटीमुळे हे व्यावसायिक त्रस्त आहेत. मागणी घटल्याने सर्वच शहरांत असंख्य सदनिका रिकाम्या पडल्या आहेत. वाहन उद्योग क्षेत्रातील मंदी तर अभूतपूर्व असून या वाहनविक्रीमध्ये सलग नऊ महिन्यांत घसरण झाली आहे. या क्षेत्रातील बेरोजगारी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. 

एफएमसीजीही गोत्यात:- दैनंदिन वापराच्या वस्तूंची बाजारपेठ (एफएमसीजी) नेहमीच तेजीत असते. मात्र जूनअखेरच्या तिमाहीत या वस्तूंच्या मागणीतही मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.
 

नो फर्स्ट यूज अण्वस्त्राच्या वापराबाबत सांगू शकत नाही राजनाथ यांचा इशारा

भारताने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली असून त्यांच्या या वक्तव्यांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे. 'नो फर्स्ट यूज' हे भारताचं अण्वस्त्रांबाबतचं धोरण आहे. परंतु, भविष्यात काय होईल, हे परिस्थितीवरच अवलंबून असेल, असा अप्रत्यक्ष इशाराच राजनाथ सिंह यांनी पाकला दिला आहे. आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजनाथ सिंह हे पोखरणला आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला. जबाबदार अण्वस्त्रधारी देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. प्रत्येक भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. वाजपेयींमुळेच आम्हाला हा सन्मान मिळाला असून सर्व भारतीय वाजपेयींचे नेहमीच ऋणी राहतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.
वाजपेयींनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट यूज’ हे तत्वही निश्चित केले. भारत या तत्वाचे कसोशीने पालन करीत आहे मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असं राजनाथ यांनी ट्विट करून स्पष्ट केलं आहे.
 

16 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »