16 July Current Affairs

16 July Current Affairs
16 July Current Affairs

अंशुला कांत जागतिक बँकेच्या नव्याव्यवस्थापकीय संचालक व मुख्य आर्थिक अधिकारी

भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (MD) व मुख्य आर्थिक अधिकारीपदी (CFO) नियुक्ती करण्यात आली आहे.
जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. वित्त, बँकिंग आदी क्षेत्रांमधला 35 वर्षांचा अनुभव अंशुला कांत यांच्या गाठीशी आहे.
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून आर्थिक घडी सांभाळणे ही कांत यांची मुख्य जबाबदारी असणार आहे. आर्थिक ताळेबंदाचा अहवाल देणे, जागतिक बँकेच्या CEO बरोबर काम करणे, या त्यांच्या अन्य जबाबदाऱ्या असणार आहेत.
जागतिक बँक:-
जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था सुदृढ करण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. जून 1946 पासून बँकेनी काम करायला सुरुवात केली. त्याचे मुख्यालय अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी या शहरात आहे. या बँकेच्या अध्यक्षपदावर सुरुवातीपासूनच अमेरिकेचा नागरिक निवडला जातो. जवळजवळ 70 देशांमध्ये या बँकेची कार्यालये आहेत.
विकसनशील देशांना अर्थपुरवठा करणे हे या बँकेचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे. तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी किंवा धोरण विकसित करण्यासाठी तंत्रात्मक सहाय्य ही बँक पुरवते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटनेच्या सहाय्याने आर्थिक घडी सुरळीत ठेवण्याचे काम ही बँक करते.

पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन

भारताच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालवणारे आणि लेखक, कला समीक्षक, संग्रहालय तज्ज्ञ अशी बहुआयामी ओळख असणारे पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे इतिहासाचा जाणकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सदाशिवराव गोरक्षकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वासिंद येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) साहाय्यक अभिरक्षक म्हणून १९६४ मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. संग्रहालयशास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत.
‘राजभवन्स इन महाराष्ट्र’, ‘अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’, ‘द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया’, ‘कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया’, ‘कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या पुस्तकांच्या शीर्षकातून त्यांच्या लेखनाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात येते. महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली अजून एक लेखनकृती म्हणजे ‘डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र’. यात त्यांनी उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे इतिहासाच्या प्रदीर्घ कालौघातील महाराष्ट्राचा दीर्घ प्रवास अधोरेखित केला. तसेच त्यांनी पश्चिम भारतातील गुप्ताकालीन शिल्पकलेवरही लेखन केले. त्यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाची दखल सरकार दरबारी वेळीच घेतली गेली आणि त्यांना २००३मध्ये 'पद्मश्री' हा नागरी सन्मान देउन गौरवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांना 'चतुरंग'च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
 

16 July Current Affairs
16 July Current Affairs

पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांनाही द्यावे लागेल अंशदान

जे शेतकरी पेन्शन योजनेसाठी बँकेत अर्ज करतील, त्यांनाच केंद्र सरकार वृद्धावस्था पेन्शन योजनेचा लाभ देणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या योजनेबाबत सांगितले की, ही योजना ऐच्छिक असून शेतकऱ्यांनाही त्यासाठी अंशदान द्यावे लागणार आहे.
मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळात पेन्शन योजनेबाबत असे मानले जात आहे की, ज्या शेतकºयांचे वय ६० वर्षे आहे त्यांच्या खात्यात सरकार महिन्याला तीन हजार रुपये टाकणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकºयांना अर्ज करावा लागेल.
यासाठी बँकेत खाते सुरू करावे लागेल. तसेच, त्या खात्यात ठराविक रक्कम जमा करावी लागेल. केंद्र सरकारही शेतकºयांच्या रकमेएवढी रक्कम पेन्शन योजनेत जमा करेल. ज्या शेतकºयांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
काय आहे नेमकी योजना:- केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, ही योजना छोट्या शेतकºयांना सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. कारण, वृद्धावस्थेत या शेतकºयांकडे कोणतीही बचत असत नाही. त्यामुळे आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागते.
योजनेनुसार शेतकºयाचे वय ६० वर्षे झाल्यानंतर दर महिन्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही ऐच्छिक आणि अंशदान आधारित आहे. यात नोंदणीकृत शेतकरी आणि केंद्र सरकारचा हिस्सा समान असेल.
 

2025 साली जपानला मागे टाकत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थाबनणार : IHS मार्किट

चालू वर्षात भारत ब्रिटनला मागे टाकत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. तसेच 2025 सालापर्यंत जापान या देशालाही मागे टाकत भारत तिसर्या स्थानावर पोहचणार, असा पुर्वानुमान ‘IHS मार्किट’ या संस्थेनी आपल्या अहवालात नमूद केला आहे. सध्या भारत सहाव्या स्थानावर असून ब्रिटन जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
भारताची अर्थव्यवस्था 2025 सालापर्यंत 5.9 लक्ष कोटी डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. तसेच, भारतीय ग्राहक बाजारपेठेचा आकार सन 2019 मधील 1.9 लक्ष कोटी डॉलर वरून 2025 सालापर्यंत 3.6 लक्ष कोटी डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.तसेच भारत आशिया-प्रशांत क्षेत्रातला एक आघाडीचा देश बनेल. आशियाई क्षेत्रातला व्यापार आणि गुंतवणुकीच्या प्रवाहातही भारताचे अमूल्य योगदान असेल. सध्या भारत जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभीकरणासंबंधीच्या निर्देशांकामध्ये 190 देशांमध्ये 77 व्या क्रमांकावर आहे.याशिवाय, सन 2015 ते सन 2050 या काळात भारताची एकूण लोकसंख्या सुमारे 350 दशलक्ष व्यक्तींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे वीजपुरवठा, स्वच्छता, परवडणारी घरे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारख्या पर्याप्त भौतिक पायाभूत सुविधांची पूर्तता करणे हे सरकारसाठी महत्त्वाची आर्थिक आव्हाने ठरतील.
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मिळालेल्या विजयानंतर जारी करण्यात आलेल्या अहवालात सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी त्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात 2025 सालापर्यंतचा मार्गक्रम स्पष्ट केला आहे. त्यात भारताची अर्थव्यवस्था 2019 साली बनलेल्या 3 लक्ष कोटी डॉलर वरून 2025 सालापर्यंत 5 लक्ष कोटी डॉलरपर्यंत घेवून जाण्याचे मुख्य लक्ष्य ठेवलेले आहे. त्यामुळे उच्च-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये भारताचे स्थान उंचावण्यास मदत होईल.
आर्थिक सर्वेक्षणात कायदा व्यवस्थेमध्ये सुधारणांचे महत्त्व दर्शविलेले आहे. भारत कायद्यांची अंमलबजावणी या बाबतीत 2019 सालाच्या जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभीकरणासंबंधीच्या निर्देशांकामध्ये 163 व्या क्रमांकावर आहे. तसेच एक महत्त्वाचा बदल ठळक करण्यात आला आहे ज्यानुसार प्रतिबंधित करणार्या कामगार नियमांना रद्द करण्यासाठी कामगार कायद्यात बदल करण्यावर भर दिला जाईल.
 

16 July Current Affairs
16 July Current Affairs

कलराज मिश्रा हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना गुजरातच्या राज्यपाल पदी नियुक्त केले आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्रा यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दोन्ही राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश राष्ट्रपतींनी दिले आहेत. दोघांनीही आपल्या राज्यांमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर नियुक्ती प्रभावी होईल. कलराज मिश्रा यांना मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली होती. ते उत्तर प्रदेशमधील देवरिया लोकसभा मतदार संघातुन विजयी झाले होते. यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. याशिवाय ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार व लखनऊ मधुन भाजपाचे आमदार देखील राहिलेले आहेत.

जगावर पुन्हा वैश्विक मंदीचे ढग

भारतासह आशिया आणि युरोपातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत घट होताना दिसते आहे. त्यामुळे एकरा वर्षांपूर्वी आलेल्या जागतीक मंदीप्रमाणे पुन्हा मंदीचे ढग जगावर जमा झाले आहेत. याचे कारण म्हणजे, ६० टक्क्यांहून अधिक जागतीक जीडीपी हा केवळ आशियातील देशांमधून येतो.
वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातील सर्व देशांमध्ये यावेळी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा विकासदर खूपच खाली गेला आहे. त्यातच भारत आणि चीन या देशांचे सध्या अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरु आहे. यामुळे उद्य़ोंगावर मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत सिंगापूरचा विकास दर केवळ ३.४ टक्के होता, जो २०१२ नंतर सर्वाधिक खालच्या पातळीवर पोहोचला. तर दुसरीकडे चीनच्या आयातीतही गेल्यावर्षीच्या तुलनेत १.३ टक्के घट झाली आहे.
निर्यातीच्या आकडेवारीतही ७.३ टक्क्यांची घट झाली आहे. तर दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेत देखील या वर्षाच्या पहिल्या तिमाहित मोठी घट झाली होती. त्यानंतर याता चीन सोमवारी आपल्या जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध करणार आहे. त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होईल.
दरम्यान, मागणी नसल्याने जगातील अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनही ठप्प झाले आहे. या कंपन्यांकडे जुना स्टॉकच इतका शिल्लक आहे की, त्याला बाजारातील मागणीनुसार बाहेर काढण्यातही अधिक वेळ लागत आहे. त्याचबरोबर चीन आणि भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात वाईट परिस्थिती असल्याचे चित्र आहे. भारतात सलग तिसऱ्या महिन्यांत गाड्यांच्या विक्रीत घट होताना दिसत आहे असेच चित्र चीनमध्येही आहे. जूनच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये वाहनांच्या विक्रीत ९.६ टक्के घसरण झाली आहे. चीनमध्ये गेल्या १२ महिन्यांत गाड्यांच्या वक्रीत सातत्याने घट नोंद केली जात आहे.
 

16 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »