17 August Current Affairs

17 August Current Affairs
17 August Current Affairs

खेलरत्न अर्जुन ध्यानचंद पुरस्कारासाठी या खेळाडूंची शिफारस

भारताच्या क्रीडा पुरस्कार समितीने विविध क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे. १६ आणि १७ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीय खेळाडूंच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिटिक्सपटू दीपा मलिक या दोघांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

याबरोबरच द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी या विविध पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 

राजीव खेलरत्न पुरस्कार:-

 • बजरंग पुनिया - बॅटमिंटन 
 • दीपा मलिक - पॅरा अॅथलेटिक्स 

द्रोणाचार्य पुरस्कार (प्रशिक्षक):-

 • विमल कुमार - बॅटमिंटन 
 • संदीप गुप्ता - टेबल टेनिस 
 • मोहिंदर सिंघ धिल्लों - अॅथलेटिक्स 

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार:-

 • मर्जबन पटेल - हॉकी 
 • रामबीर सिंह खोखर - कबड्डी 
 • संजय भारद्वाज - क्रिकेट

 
अर्जुन पुरस्कार (खेळाडू):-

 • ताजिंदरपाल सिंग टूर - अॅथलेटिक्स 
 • मोहम्मद अनास याहिया - अॅथेलेटिक्स 
 • एस. भास्करन - शरीरसौष्टव 
 • सोनिया लाटकर - बॉक्सिंग 
 • रवींद्र जडेजा - क्रिकेट 
 • चिंगलेनसाना सिंह कंगुजम - हॉकी 
 • अजय ठाकूर - कबड्डी 
 • गौरव सिंग गिल - मोटर स्पोर्ट्स 
 • प्रमोद भगत - पॅरा स्पोर्ट्स (बॅटमिंटन) 
 • अंजुम मौदगिल - शूटिंग 
 • हरमित राजूल देसाई - टेबल टेनिस 
 • पूजा ढांडा - घोडेस्वार 
 • गुरप्रित सिंह संधू - फुटबॉल 
 • पूनम यादव - क्रिकेट 
 • स्वप्ना बर्मन - अॅथलेटिक्स 
 • सुंदर सिंह गुर्जर - पॅरा स्पोर्ट्स (अॅथलेटिक्स) 
 • बी. साई प्रणित - बॅटमिंटन 
 • सिमरन सिंह शेरगिल- पोलो 

ध्यानचंद पुरस्कार:-

 • मॅन्युअल फ्रेडरिक्स - हॉकी 
 • अरुप बासक - टेबल टेनिस 
 • मनोज कुमार - कुस्तीपटू 
 • नितिन किर्तेन - टेनिस     
 • सी. लालरेसंगा - तिरंदाज 

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार:- 

 • गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेश 
 • गो स्पोर्ट्स 
 • रायलसीमा डेव्हलपमेंट ट्रस्ट 

मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी:-

 • पंजाब विद्यापीठ, चंदीगड - विजेते विद्यापीठ 
 • गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर - द्वितीय क्रमांक 
 • पंजाब विद्यापीठी, पतियाला - तृतिय क्रमांक
   

UAPA दुरुस्ती विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान

एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचे अधिकार देणाऱ्या बेकायदा कारवाया प्रतिबंध अर्थात 'यूएपीए' दुरुस्ती विधेयकाला सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं आहे. हे विधेयक असंवैधानिक असल्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.
'यूएपीए' दुरुस्ती विधेयक २४ जुलै रोजी लोकसभेत, तर २ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर झाले होते. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १४७ मते, तर विरोधात ४२ मते पडली होती. १५ ऑगस्टपासून हा कायदा लागू झाला आहे. एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असून, संबंधित व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार एनआयएच्या महासंचालकांना देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाला ८ ऑगस्टला मंजुरी दिली होती. या यूएपीए विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. हे विधेयक असैवंधानिक ठरवण्यात यावे. तसे आदेश कोर्टाने द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे.

17 August Current Affairs
17 August Current Affairs

PM मोदींचं भूतानमध्ये अभूतपूर्व स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल झाले असून तिथे पंतप्रधानांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हजारो मुलं आणि महिला हातात भारताचा तिरंगा ध्वज आणि भूतानचा झेंडा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारेच होते.
भूतानसोबतचं मैत्रीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा दोन दिवसीय भूतान दौरा आजपासून सुरू झाला. मोदींचा हा दुसरा भूतान दौरा आहे तर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच भूतानमध्ये गेले आहेत. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांना 'गार्ड ऑफ हॉनर' देण्यात आला. तिथून पुढे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असताना स्वागतासाठी हजारो नागरिक रंगबिरंगी वेशात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हाती तिरंगा घेऊन उभे होते. जणू एखाद्या उत्सवासारखेच हे वातावरण होतं. याचा खास व्हिडिओ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 
दरम्यान, पंतप्रधान मोदी या भेटीत भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक तसेच देशातील अन्य प्रमुख नेत्यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांमध्ये किमान १० द्विपक्षीय करार होतील, अशी अपेक्षा आहे.
 

पाकिस्तानी सैन्याशी लढताना जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. यात एक भारतीय जवान शहीद झाला. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आज, शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पाकिस्तानी सैन्यानं राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत जवान लान्स नायक संदीप थापा (वय ३५) शहीद झाले. थापा हे देहरादूनचे असून, १५ वर्षांपासून ते लष्करी सेवेत होते. 
'पाकिस्तानकडून आज सकाळी साधारण साडेसहा वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ही चकमक अद्याप सुरू आहे,' अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.
 

17 August Current Affairs
17 August Current Affairs

पाकच्या पंजाब प्रांतात रस्त्यांना कश्मीरचे नाव

पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने ३६ रस्ते आणि ५ मोठ्या उद्यांनांना काश्मीरचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर काश्मिरी नागरिकांना पाठींबा दर्शवण्यासाठी ही नावे देण्यात आली आहेत, असा दावा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी शुक्रवारी केला. 
भारताने ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले, तसेच राज्याचे विभाजन करून काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. भारताच्या या निर्णयाला पाकिस्तानने विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांताने आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील एक रस्ता, तसेच ५ मोठी उद्याने यांना 'काश्मीर रोड आणि काश्मीर पार्क' अशी नावे देण्याचा निर्णय घेतला आहे, असे बुझदार यांनी सांगितले. 
भारताच्या स्वातंत्र्यदिनी गुरुवारी पाकिस्तानने काळा दिवस पाळला होता. बुधवारी पाकिस्तानने त्यांचा स्वातंत्र्यदिन काश्मीर समर्थन दिवस म्हणून पाळला होता. भारताच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पाकिस्तानने चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धाव घेतली आहे. मात्र, जम्मू-काश्मीरबद्दलचा निर्णय हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितले आहे. 
भारतीय अधिकाऱ्यांना बोलावले 
इस्लामाबाद : नियंत्रण रेषेवरील कथित शस्त्रसंधी उल्लंघनाचा निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने भारताचे उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना पाचारण केले, तसेच लिपा आणि बत्ताल सेक्टरमधील गोळीबाराचा निषेध केला. या गोळीबारात एक सुरक्षारक्षक आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
 

अॅमेझॉनचं जगातलं सर्वात मोठं संकुल हैदराबादेत

जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनचा जगातला सर्वात मोठा कॅम्पस भारतात उभारला जात आहे. हैदराबाद येथे कंपनीने यासाठी दहा एकर जागा विकसित केली आहे.
हैदराबादमधील नानक्रमगुडा येथे हा आयटी हब तयार होत आहे. येथील नवी इमारत १५ मजली आहे. तिचा एकूण विस्तार ३० लाख चौ. फूट जागेत पसरलेला आहे. यातील १० लाख चौ. फूट जागा तर केवळ पार्किंगसाठी देण्यात आली आहे. 
ही इमारत जुलैच्या मध्यापासूनच कार्यान्वित झाली आहे, मात्र तिचं औपचारिक उद्घाटन अद्याप झालेलं नाही. या इमारतीची सध्याची क्षमता ७ हजार माणसांची आहे ती सप्टेंबर अखेरपर्यंत ९ हजार माणसांइतकी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या संकुलाचं उद्घाटन होणार आहे.
 

17 August Current Affairs
17 August Current Affairs

चीनच्या औद्योगिक उत्पादनाचा नीचांक

चीनमध्ये गुंतवणूक आणि किरकोळ विक्रीमध्ये घट होण्याबरोबरच जुलैअखेरीस चीनच्या औद्योगिक उत्पादनाचा दर सतरा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. आकड्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास जुलैमध्ये चीनच्या औद्योगिक उत्पादनाचा दर ४.८० टक्क्यांवर आला आहे. चीनच्या औद्योगिक दराचा हा २००२नंतरचा नीचांकी स्तर आहे. जूनमध्ये हाच दर ६.३० टक्क्यांवर होता. 

'ब्लूमबर्ग'च्या एका सर्वेक्षणानुसार जुलैमध्ये चीनच्या औद्योगिक उत्पादनाचा दर सहा टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. चीनमध्ये अनेक वस्तूंच्या मागणीत घट आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ विक्री जून महिन्यात्या ९.८० टक्क्यांवरून घसरून जुलैमध्ये ७.६० टक्क्यांवर आली आहे. या दरम्यान दीर्घकालीन गुंतवणुकीच्या वाढीचा दरही कमी होऊन ५.७० टक्क्यांवर पोहोचला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर दुसऱ्या तिमाहीमध्ये ६.२० टक्क्यांवर आला होता. ही गेल्या तीन दशकांतील सर्वांत कमी दर ठरला आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »