18 Oct Current Affairs

18 Oct Current Affairs
18 Oct Current Affairs

अमेरिकेच्या सांगण्यावरून मेक्सिकोने ३११ भारतीयांना हाकलले

 • अमेरिकेने इशारा दिल्यानंतर मेक्सिकोने देशात राहत असलेल्या तब्बल ३११ भारतीयांची हकालपट्टी केली आहे.
 • मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप ३११ भारतीयांवर आहे.
 • हकालपट्टी करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय शुक्रवारी सकाळी बोईंग ७४७-४०० चार्टर विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. याबाबत मेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इंस्टिट्यूटकडून माहिती देण्यात आली आहे.
 • या भारतीयांना अमेरिकेत जाण्यासाठी जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च आला.
 • ऐजंट या पैशांमध्ये मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पोहचणार होता. या सर्व प्रोसेसमध्ये त्यांना यासाठी नाहक त्रास सोसावा लागला.
 • ज्या भारतीयांकडे अमेरिकेत राहण्याची परवानगी नाही त्यांची तोलूका एयरपोर्टवरून दिल्लीकडे  रवानगी केली आहे. माघारी पाठवण्यात आलेल्या भारतींयाकडे याठिकाणी राहण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नव्हती.
 • या सर्वांना इमिग्रेशन प्रशासनसमोर हजर करण्यात आले. या सर्व भारतीयांना ओक्साका, कॅलिफोर्निया, वेराक्रूज, चियापास, सोनोरा, मेक्सिको सिटी, डुरंगो आणि टॅबास्को राज्यातील आधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याची माहिती नॅशनल मायग्रेशन इंस्टीट्यूट (आयएनएम) ने बुधवारी दिली होती.
 • दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जूनमध्ये घुसखोरीला लगाम लावण्यासाठी मेक्सिकोच्या सिमेवर सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते.

ब्रिटन व युरोपीय महासंघाची नव्या ब्रेग्झिट करारावर सहमती

 • जॉन्सन यांच्याविरुद्ध ‘डीयूपी’चे उघड बंड
 • २८ सदस्यांच्या युरोपीय महासंघातून ब्रिटनने ३१ ऑक्टोबरच्या मुदतीत बाहेर पडण्यासाठी नव्या ब्रेग्झिट करारावर आपली सहमती झाली असल्याचे ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने गुरुवारी जाहीर केले.
 • पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या कराराचे उत्कृष्ट करार म्हणून स्वागत केले; तर युरोपीय महासंघाचे अध्यक्ष जीन- क्लॉड जंकर यांनी हा ‘वाजवी आणि संतुलित करार’ असल्याचे सांगतानाच, संघटनेच्या सध्या ब्रसेल्समध्ये सुरू असलेल्या परिषदेत सदस्य देशांनी त्याला मंजुरी द्यावी अशी शिफारस केली.
 • तथापि, या कराराला मंजुरी मिळण्यासाठी जॉन्सन यांना संसदेत आवश्यक बहुमत मिळते की नाही हे अद्याप कळायचे असल्याने नव्या कराराचे भवितव्य अधांतरी आहे.
 • हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाला पाठिंबा देणाऱ्या नॉर्दर्न आयरिश डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पार्टीने (डीयूपी) जॉन्सन यांच्याविरुद्ध उघड बंड केले आहे.
 • ‘आम्हाला परिस्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवणारा नवा करार मिळाला आहे’, असे ट्वीट जॉन्सन यांनी केले.
 • नतर ब्रसेल्समध्ये जंकर यांच्या सोबतीने पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी ब्रिटिश खासदारांना एकत्र येऊन आपल्या या ‘अत्युत्कृष्ट’ कराराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
18 Oct Current Affairs
18 Oct Current Affairs

मलेशियाला भारताने व्यापारातून दिला झटका

 • भारताने मलेशियाकडून पाम तेलाची आयात कमी केली आहे. भारत जगामध्ये पाम तेलाची सर्वाधिक खरेदी करणारा देश म्हणून ओळखला जातो. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यावरुन मलेशियाने पाकिस्तानची तळी उचलली होती.
 • मलेशियाच्या या भूमिकेला उत्तर म्हणून भारताने त्यांच्याकडून पाम तेलाची आयात कमी केली आहे. भारताने आक्रमण करुन जम्मू-काश्मीर ताब्यात घेतलं आहे.
 • भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करुन तोडगा काढावा असे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान माहाथीर मोहम्मद यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये केले होते.
 • मलेशियन पंतप्रधानांच्या या विधानावर मोदी सरकार नाराज आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून निर्बंध येण्याची शक्यता असल्यामुळे पाम तेलाच्या खरेदीदारांनी इंडोनेशियाकडे मोर्चा वळवला आहे.
 • भारत मलेशियाऐवजी इंडोनेशिया आणि युक्रेनकडून खाद्य तेलाची खरेदी वाढवणार आहे. एखाद्या देशाच्या न पटणाऱ्या राजकीय भूमिकेवर भारताने प्रथमच व्यापाराच्या माध्यमातून आपली नाराजी दाखवून दिली आहे.
 • सध्या जगामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुद्धा व्यापार युद्ध सुरु आहे. भारताचा सुद्धा आता त्या खेळात समावेश झाला आहे जिथे व्यापार फक्त व्यापार नसून शस्त्रासारखा त्याचा वापर होत आहे. पाम तेल हे मलेशियाचे कृषी निर्यातीचे सर्वात मोठे उत्पादन आहे.
 • भारत त्यांचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. भारताने जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मलेशियाकडून ३.९ मिलियन टन पाम तेलाची खरेदी केली. हा दोन अब्ज डॉलरचा व्यवहार होता.
 • काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर मलेशियाने टीका केली होती. त्यामुळे भारत सरकार मलेशियाकडून होणाऱ्या वस्तुंच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे.
 • ५ ऑगस्टला भारत सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते.
 • भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही.
 • संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया प्रमुख इस्लामिक देशांनीही पाकिस्तानची साथ दिली नाही. संयुक्त राष्ट्रासह सर्वांनीच पाकिस्तानला भारतासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आवाहन केले. पण पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाची भाषा सुरु होती.

सर्फराझची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी

 • विश्वचषक स्पर्धा २०१९ मधील असमाधानकारक कामगिरीनंतरही पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष मिस्बाह-उल-हक यांनी श्रीलंका मालिकेसाठी सर्फराझ अहमद याची कर्णधार म्हणून फेरनिवड केली होती.
 • पण त्यानंतर पाकिस्तानवर टी-२० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की ओढवल्यामुळे अखेर सर्फराझची हकालपट्टी करण्यात आली. सर्फराझच्या जागी अझर अलीला कसोटी कर्णधारपद तर बाबर आझमला टी २० कर्णधारपद देण्यात आले आहे.
 • विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संघाला सुमार कामगिरीचा फटका बसला. त्यामुळे साखळी फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर श्रीलंकेसोबत तब्बल १० वर्षांनी पाकिस्तानात खेळताना यजमानांनी २-० ने एकदिवसीय मालिका जिंकली, पण टी २० मालिकेत मात्र पाकिस्तानला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला.
 • कर्णधार आणि अनुभवी फलंदाज या नात्याने सर्फराझकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. पण तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अखेर हा निर्णय घेतला.
18 Oct Current Affairs
18 Oct Current Affairs

२०२३ हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत शर्यतीत

 • आगामी २०२३ पुरुष हॉकी विश्वचषकासाच्या यजमानपदासाठी भारतही आता शर्यतीत उतरला आहे.
 • जानेवारी १३ ते १९ दरम्यान हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे, यासाठी हॉकी इंडियाने आपली दावेदारी सादर केली आहे.
 • याआधी ३ वेळा भारताने हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं आहे.
 • भारताव्यतिरीक्त बेल्जियम आणि मलेशिया हे दोन देशही यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.
 • महिला हॉकी विश्वचषकासाठी आतापर्यंत ५ देशांनी आपली दावेदारी सादर केल्याचं आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने जाहीर केलंय.
 • जर्मनी, स्पेन, नेदरलँड, मलेशिया आणि न्यूझीलंड हे ५ देश हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.
 • आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेची एक समिती ६ नोव्हेंबरला आतापर्यंत आलेल्या सर्व अर्जांना विचार करण्यासाठी भेटणार आहे.
 • ८ नोव्हेंबर रोजी याविषयी अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाचं यजमानपद भारताला मिळतं का हे पहावं लागणार आहे.

टेटर फंडिंग पाकिस्तानला सुधारण्यासाठी दिली गेली फक्त ४ महिन्यांची मुदत

 • दहशतवाद्यांना मदत करणारा भारताचा शेजारी देश पाकिस्तानवरील काळ्या यादीत जाण्याची नामुष्की सध्या तरी टळली आहे. पाकिस्तानला काही महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
 • फेब्रुवारी २०२० पर्यंत पाकिस्ताने दहशतवादाविरोधात लढण्याचा संपूर्ण कृती कार्यक्रम तयार करावा असे स्पष्ट निर्देश शुक्रवारी फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला दिले आहेत.
 • दिलेल्या मुदतीत हा कृती कार्यक्रम तयार करण्यात पाकिस्तानला अपयश आले, तर पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची वित्तीय देवाणघेवाण आणि व्यापारावर सदस्यांनी नजर ठेवून असावे असेही निर्देश देण्यात आले आहेत.
 • चीन, मलेशिया आणि तुर्कीच्या समर्थनामुळे सध्या पाकिस्तान काळ्या यादीत जाण्यापासून वाचला आहे. मात्र, पाकिस्तानसाठी करड्या यादीतून आपले नाव गाळणे अतिशय कठीण बनले आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये काळ्या यादीत जाणे जवळजवळ निश्चित:-

 • या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एफएटीएफने पाकिस्तानला करड्या यादीत टाकले असले, तरी देखील पाकिस्तानने योग्य वेळेत दहशतवादाविरोधात योग्य ती पावले न उचलल्यास येणाऱ्या काही वर्षांसाठी पाकिस्तानला यादीतून बाहेर पडणे जवळजवळ अशक्य आहे.
 • याबरोबरच पाकिस्तानला फेब्रुवारी २०२० मध्ये काळ्या यादीत टाकण्याची मोठी शक्यता असल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. हा निर्णय सार्वजनिक करत एफएटीएफने विशेष असा संदेशही दिला आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानला फेब्रुवारी २०२० पासून कोणतेही सहकार्य करायचे नाही असे संकेतही देण्यात आले आहेत.

जून २०१८ मध्ये पाकिस्तानचा समावेश करड्या यादीत:-

 • एफएटीएफने जून २०१८ मध्ये पाकिस्तानचा समावेश करड्या यादीत करण्यात आला होता. या बरोबर पाकिस्तानला २७ मुद्द्यांचा कृती कार्यक्रमही दिला गेला होता. या कार्यक्रमाची अंमलबजावली एका वर्षात करण्यासाठी पाकिस्तानला बजावण्यात आले होते.
 • यात मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग रोखण्यासाठी काही उपाय सूचवण्यात आले होते. दहशवाद्यांना करावयाचा वित्त पुरवठा आणि मनी लाँड्रिंग रोखण्यासाठी आणि दहशतवादी संघटनांविरोधात ठोस पावले उचलण्यासाठी या कृती कार्यक्रमाच्या रुपाने पाकिस्तानला हा अंतिम इशारा देण्यात आली आहे.

 

18 Oct Current Affairs
18 Oct Current Affairs

नोबेल नामांकनावरून चीनचा संताप

 • हाँगकाँगमधील लोकशाहीची मागणी करणाऱ्या नागरिकांना सन २०२०च्या शांततेच्या नोबेलसाठी मिळालेल्या नामांकनामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे.
 • गेले काही महिने हाँगकाँगमध्ये सातत्याने निदर्शने सुरू आहेत आणि चीन या आंदोलनाची 'परकीय हात असलेल्या दंगली' म्हणून संभावना करत आहे. तर, हाँगकाँगमधील कार्यकर्त्यांच्या मते तेथील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर चीन सातत्याने गदा आणत आहे.
 • 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या मूलभूत हक्कांसाठी आपणे प्राण आणि सुरक्षा पणाला लावणाऱ्या हॉगकाँगमधील नागरिकांचे सन २०२० च्या शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी मी नामांकन करतो', असे नॉर्वेच्या संसदसदस्य गुरी मेल्बी यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले होते.
 • 'हाँगकाँग हा पूर्णत: चीनचा अंतर्गत प्रश्न असून कोणत्याही अन्य देशाला वा परकीय नागरिकाला यात दखल देण्याचे कारण नाही', असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे. हाँगकाँगबद्दल बोलताना संबंधितांनी योग्य आणि वस्तुनिष्ठ असावे असे सांगताना 'सावध' राहूनच व्यक्त व्हावे, असेही चीनने बजावले आहे.

वंशवादाचा आरोप गांधी पुतळ्याला ब्रिटनमध्ये विरोध

 • ब्रिटनमधील मॅंचेस्टर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मँचेस्टरमधील मुख्य चर्चसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. स्थानिक प्रशासनाकडून महात्मा गांधींचा पुतळा उभारण्याची मंजूर देण्यात आलेली आहे.
 • महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी 'गांधी मस्ट फॉल' असे अभियान सुरू केले आहे. मँचेस्टर नगरपरिषदेने महात्मा गांधींचा नऊ फुटी कास्याचा पुतळा उभारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती या विद्यार्थ्याने केली आहे.

का आहे विद्यार्थ्यांचा विरोध?:-

 • मँचेस्टर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांनी महात्मा गांधींना 'अँटी-ब्लॅक वंशवादी' असे संबोधले आहे. मँचेस्टर मुख्य चर्चसमोर २५ नोव्हेंबर या दिवशी हा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, हा निर्णय नगरपरिषदेने रद्द करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
 • आफ्रिकेत ब्रिटनच्या शासनाने केलेल्या कारवाईला महात्मा गांधींचा पाठिंबा होता, असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. महात्मा गांधी यांनी आफ्रिकी जनतेचा 'असभ्य', 'अर्धे मूलनिवासी', 'जंगली', 'घाणेरडे', 'जनावरांसारखे', असे हिणवले असल्याचे या विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले आहे.
 • मँचेस्टर मुख्य चर्चबाहेर उभारण्यात येत असलेला प्रस्तावित महात्मा गांधींचा हा पुतळा शिल्पकार राम व्ही. सुतार यांनी तयार केला आहे. विशेष म्हणजे हे वर्ष महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे वर्ष आहे. हा पुतळा उभारण्याची परवानगी नाकारावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेची एक पदाधिकारी सारा खान हिने केली आहे.
 • दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसविण्याचा मुख्य उद्देश शांती, प्रेम आणि बंधुभावाचा त्यांच्या संदेशाचा प्रसार करावा हाच आहे, असे नगरपरिषदेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

 

18 Oct Current Affairs
18 Oct Current Affairs

सरकारी बँक तुमच्या दारी पैसे काढता येणार

 • सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर आहे. त्यांना आता घरबसल्या बँकांच्या सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना आता घरबसल्या पैसे आणि काढता येणार आहेत. याचाच अर्थ सरकारी बँकेत ज्यांची खाती आहेत, त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही.
 • कोट्यवधी बँक ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळं ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. सरकारी बँकांद्वारे 'डोअरस्टेप डिलिव्हरी' सुविधा देण्यात येत असून, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 • त्यामुळं बँकेत जाण्याचा त्यांचा त्रास वाचणार आहे. रिझर्व्ह बँकेने काही वर्षांआधीच डोअरस्टेप बँकिंग सुविधा सुरू करण्याचा सल्ला बँकांना दिला होता. सार्वजनिक बँकांनी हा सल्ला गांभीर्यानं घेतला आहे. आता ही सुविधा ग्राहकांना देण्यासाठी संयुक्तरित्या एखादी यंत्रणा नियुक्त करण्याची तयारी बँकांनी सुरू केली असून, त्यामार्फत ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
 • युको बँकेनं सर्व सरकारी बँकांच्या वतीनं 'रिक्वेस्ट ऑफ प्रपोझल' (आरपीएफ) प्रसिद्ध केलं असून, कॉल सेंटर, वेबसाइट आणि मोबाइल अपची सुविधा देणाऱ्या खासगी कंपन्यांना आवाहन केलं आहे. बँकांद्वारे नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत एजंटची नेमणूक करण्यात येईल आणि ते दुसऱ्या टप्प्यात ठेवी जमा आणि पैसे काढण्याच्या सुविधेसह विविध डिव्हाइसच्या माध्यमातून सेवा ग्राहकांना देतील. सुरुवातीला डोअरस्टेप बँकिंग सुविधा केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांना देण्यात येईल.
 • त्यानंतर बँकेच्या अन्य ग्राहकांनाही सुविधा पुरवण्यात येईल. मात्र, त्यासाठी किमान शुल्क द्यावे लागणार आहे. ही डोअरस्टेप बँकिंग सुविधा सरकारच्या एनहान्स्ड अॅक्सेस अँड सर्व्हिस अॅक्सिलेंस (EASE) उपक्रमाचा भाग आहे.
 • डोअरस्टेप बँकिंग सुविधेद्वारे वित्तीय आणि गैरवित्तीय अशा सेवा पुरवण्यात येणार आहेत. वित्तीय सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेत पैसे जमा करणे आणि पैसे काढता येणार आहेत. तर गैरवित्तीय सेवांमध्ये धनादेश आणि ड्राफ्ट्स पुरवण्याचे काम केले जाईल. याशिवाय खात्याची माहिती दिली जाईल. चेकबुक, ड्राफ्ट्स, टर्म-डिपॉझिट रिसिप्ट आदी ग्राहकांना देण्यात येतील.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »