19 July Current Affairs

19 July Current Affairs
19 July Current Affairs

बलात्काराच्या आरोपीला सौदीत जाऊन घातल्या बेडया महिला IPS अधिकाऱ्याची कामगिरी

कोल्लमच्या पोलीस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील कुमार भाद्रान (३८) सौदी अरेबियाला पळून गेला होता. रविवारी मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीम त्याला आणण्यासाठी सौदीला रवाना झाली. सौदीमधून गुन्हेगाराला आणण्याच्या प्रक्रियेत कितीही अडथळे आले तरी सुनील कुमारला घेऊनच भारतात परतण्याचा निर्धार मेरीन जोसेफ यांनी केला होता. तो त्यांनी पूर्ण केला आहे.

मूळचा कोल्लमचा असलेले सुनील कुमार सौदी अरेबियात टाइल कामगार म्हणून नोकरी करायचा. सुट्टीमध्ये सुनील कुमार केरळमध्ये आला होता. त्यावेळी त्याने मित्राच्या पुतणीचे तीन महिने लैंगिक शोषण केले. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या पीडित मुलीने अखेर तिच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले.

पोलिसांनी सुनील विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली पण तो सौदी अरेबियाला पळून गेला होता. जून २०१७ मध्ये मुलीने आपले आयुष्य संपवले. त्याआधी मुलीच्या काकांनी ज्यांनी सुनील कुमारची कुटुंबाबरोबर ओळख करुन दिली होती. त्यांनी सुद्धा आत्महत्या केली. मेरीन जोसेफ यांनी जून २०१९ मध्ये कोल्लमच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेत असताना महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हा माझ्यासमोर हे प्रकरण आले तेव्हा दोन वर्षांपासून आरोपी फरार होता. लोकांच्या मनात या घटनेबद्दल संताप आहे. आरोपीच्या अटकेसाठी केरळ पोलिसांचा आंतरराष्ट्रीय तपास विभाग सौदी पोलिसांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे.

आम्ही या प्रयत्नांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला असे मेरीन जोसेफ यांनी सांगितले. २०१७ सालीच सुनील कुमार विरोधात इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. पण त्यात फारशी प्रगती झालेली नव्हती. इंटरपोलने नोटीस जारी केल्यानंतर पाठपुरावा आणि समोरच्या देशाकडून सहकार्य आवश्यक असते. २०१० साली पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सौदीचे राजे अब्दुल्ला यांच्यामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा करार झाला. केरळमध्ये गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेले अनेकजण सौदीला पळून गेले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी परदेशात आरोपीला अटक करायची असेल तर ज्युनिअर अधिकाऱ्यांना निवडतात पण मेरीन यांनी स्वत: जाण्याचा निर्णय घेतला.

ज्येष्ठ उद्योजक राम मेनन यांचे निधन

ज्येष्ठ उद्योजक आणि मेनन ग्रुपचे संस्थापक राम कृष्ण मेनन (वय ९०) यांचे बुधवारी (ता. १७) सकाळी वृद्धापकाळाने निधान झाले. प्रकृती खालावल्याने आठवड्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत …कसबा बावडा येथील स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी, कदमवाडी येथील लक्ष्मीनारायण नगरातील त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. श्रीमंत शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती, सतीश घाटगे, बाबाभाई वसा, प्रताप पुराणिक, अतुल आरवाडे, आदी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी राधामणी, मुले सचिन व नितीन, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १९) सकाळी आहे.

केरळमधील पण्णंगड या गावात २५ फेब्रुवारी १९३० मध्ये राम मेनन यांचा जन्म झाला. श्रीनारायणपूरम हे त्यांचे मूळ गाव. वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण घेतल्यानंतर मोठे बंधू चंद्रन मेनन यांच्यासोबत ते १९५१ मध्ये कोल्हापुरात आले. एका फाउंड्रीत कामगार म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. नावीन्याचा ध्यास असल्याने त्यांनी फाउंड्रीत अवघड उत्पादने तयार करण्यास प्राधान्य दिले. मोठे बंधू चंद्रन मेनन यांच्यासोबत त्यांनी १९५४ मध्ये मेनन अँड मेनन ग्रुपची सुरुवात केली. सिलिंडर हेड व ब्लॉक्स, पिस्टन, रिंग, बेअरिंगचे उत्पादन सुरू केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली मेनन अँड मेनन ग्रुपचा विस्तार आणि निर्यात वाढली. या ग्रुपची वार्षिक उलाढाल सध्या ७०० कोटींवर आहे, तर अडीच हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

कोल्हापूरच्या उद्योगविश्वाला मोठी स्वप्ने दाखवून ती सत्यात उतरवण्याचा मार्ग दाखवणारे राम मेनन यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, स्मॅक, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, राष्ट्रीय अंध कल्याण संघ यांसह केआयटी कॉलेज, दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले. कोल्हापूर महापालिकेने त्यांना 'करवीर भूषण' पुरस्कार देऊन गौरविले आहे. शिवाय 'इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फाउंड्रीमेन', इचलकरंजी येथील 'फाय फाउंडेशन पुरस्कार' त्यांना प्रदान करण्यात आला आहे. मेनन कुटुंबीयांनी चार जुलै रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता.

19 July Current Affairs
19 July Current Affairs

आयसीसीच्या नियमात महत्वाचे बदल

आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने क्रिकेटमधील नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत नियमातील बदलाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षातील क्रिकेटमधील घटनांचा अभ्यास करून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

एक ऑगस्ट २०१९ पासून नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमाची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून होणार आहे. बदली खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करता येईल आणि षटकांची गती कमी राखल्यामुळे आता संपूर्ण संघातील खेळाडूंना दंड आकारण्यात येणार आहे.

अनेक वेळा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू फळंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार आहे. यापूर्वी बदली खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करत असे.

षटकांची गती धिमी राखल्याबद्दल यापुढे आंतरराष्ट्रीय कर्णधारांना बंदीला सामोरे जावे लागणार

राष्ट्रवादीला मोठा झटका पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरीनंतर सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सीपीआयला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत. तर दुसरीकडे टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. या तीनही पक्षांनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाने या तीन पक्षांना नोटीस पाठवली असून 20 दिवसात उत्तर मागितलं आहे.

2014 च्या निवडणुकीत खराब कामगिरीनंतरही या पक्षांना दिलासा मिळाला होता. कारण राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या निर्णयाची समीक्षा 5 ऐवजी प्रत्येक 10 वर्षांनी करणार असल्याचा नियम निवडणूक आयोगाने केला होता. त्यामुळे हा दिलासा आता जास्त काळ टिकणार नाही असं दिसून येतंय. दुसरीकडे बसपाला दिलासा मिळालाय. कारण, या पक्षाने उत्तर प्रदेशात 10 जागा जिंकल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये आमदारही निवडून आले आहेत.

सीपीआय नेत्याने लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. आमचं अस्तित्व राष्ट्रीय स्तरावर नाही याचा निर्णय आयोगाकडून घेतला जाईल. आम्हाला अपेक्षा आहे, की आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दरम्यान, हा दर्जा काढल्यानंतरही पक्षाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही या नेत्याने सांगितलं होतं.

काय आहे नियम ?

या निवडणुकीत टीएमसीला 22, सीपीआयला 3 आणि राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत. निवडणूक चिन्ह अधिनियम 1968 नुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी किमान चार राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्याची गरज असते. याशिवाय त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार असणंही अनिवार्य आहे. सध्या टीएमसी, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीआयएम, काँग्रेस आणि मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

19 July Current Affairs
19 July Current Affairs

छत्तीसगडचा कोंडागाव जिल्हा NITI आयोगाच्या विकास क्रमवारीमध्ये प्रथम स्थानी

मे 2019 साठी NITI आयोगाने आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासामधील प्रगतीच्या संदर्भात क्रमवारी प्रसिद्ध केली आणि त्यात छत्तीसगड राज्याचा कोंडागाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

त्यापाठोपाठ अनुक्रमे फतेहपूर (उत्तरप्रदेश), पाकूर (झारखंड), धुलापूर (राजस्थान) आणि चित्रकूट (उत्तरप्रदेश) यांचा क्रम लागतो आहे.

ही यादी तयार करण्यासाठी सहा विकास क्षेत्रांमधली प्रगती मोजली गेली. त्यामध्ये आरोग्य व पोषण, शिक्षण, शेती आणि जलस्त्रोत, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे.

5 जानेवारी 2018 रोजी भारत सरकारने देशाच्या विकासाच्या दृष्टीने पथदर्शी कार्यक्रम म्हणून आकांक्षित जिल्हा (Aspirational district) कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

INS सागरध्वनी जहाजाच्या सागर मैत्री अभियान 2 या कार्यक्रमाचा आरंभ

 दिनांक 18 जुलै 2019 रोजी कोची येथे दक्षिण नौदल आदेश (SNC) अंतर्गत असलेल्या साऊथ जेटी तळावर दोन महिने चालणार्‍या ‘सागर मैत्री अभियान-2’ (http://t.me/scurrentaffairs) या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. 

या कार्यक्रमात ‘INS सागरध्वनी’ या जहाजाने भाग घेतला आहे.

INS सागरध्वनी हे संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) याने तयार केलेले सागरी संशोधनाच्या कामात उपयोगी येणारे जहाज आहे.

या कार्यक्रमात ओमान, मालदीव, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि म्यानमार या देशांनी देखील भाग घेतला आहे.

19 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »