19 Oct Current Affairs

19 Oct Current Affairs
19 Oct Current Affairs

काही सेंकद आधी भूकंपाची सूचना देणारे अ‍ॅप

 • अमेरिकेतील कॅलिफोर्नियात भूकंपाचा इशारा देणारी सूचना यंत्रणा अ‍ॅपच्या स्वरूपात विकसित करण्यात आली असून त्यामुळे भूकंपाच्या आधी सूचना मिळू शकेल, त्यातून थोडय़ा प्रमाणात प्राणहानी टाळणे शक्य होणार आहे.
 • लोमा प्रिटा येथील भूकंपाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले असून माणसाला भूकंपाची जी जाणीव होते त्याच्या काहीकाळ आधी त्याचा इशारा यातून मिळणार आहे.
 • गव्हर्नर गॅव्हीन न्यूसम यांनी सांगितले, की भूकंपाच्या वेळी थोडा काळ आधी माहिती मिळणेही फायद्याचे ठरू शकते, या भागात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियातील प्रत्येक व्यक्तीने हे उपयोजन डाऊ नलोड करावे. त्यातून त्यांच्या कुटुंबाला जीव वाचवण्याची संधी मिळू शकेल.
 • सेलफोनवरील या अ‍ॅपचे नाव ‘मायशेक’ असे आहे. त्यातून काही सेकंद आधी भूकंपाचा इशारा मिळतो. जमिनीत जेव्हा भूकंपलहरी उमटू लागतात तेव्हा लगेच हा संदेश हा मिळतो.  त्यामुळे प्राण वाचू शकतात.
 • यातील इशारा सूचना ही ‘शेकअलर्ट’ या सम्ॉफ्टवेअरच्या मदतीने जारी केली जाते.  हे सॉफ्टवेअर  अमेरिकी भूगर्भशास्त्र संस्थेचे आहे, त्यात कॅलिफोर्नियातील भूकंपांशी निगडित भूगर्भ हालचालींचे विश्लेषण केले जाते. लहरी सुरू होताच त्यांची तीव्रता मापली जाते व त्याचा इशारा दिला जातो.

जम्मू काश्मीर विधान परिषद विसर्जित करण्याचे आदेश

 • जम्मू व काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तेथली 62 वर्षे जुनी विधान परिषद विसर्जित करण्याचे आदेश जम्मू व काश्मीर प्रशासनाने दिले आहेत. हे आदेश राज्य सरकारचे सचिव फारुक अहमद लोन यांनी दिले.
 • ‘जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा-2019’ मधल्या कलम 57 अन्वये जम्मू-काश्मीर विधान परिषद विसर्जित करण्यात आली. त्यामुळे विधान परिषदेतील सर्व कर्मचारी 22 ऑक्टोबरपासून सामान्य विभाग प्रशासनाकडून येणार्‍या सूचनांचे पालन करणार आहेत.

सूचनांचे स्वरूप:-

 • विधान परिषदेतल्या 116 कर्मचार्‍यांनी सामान्य प्रशासन विभागाकडून येणार्‍या सूचनांचे पालन करावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
 • विधान परिषदेने वेळोवेळी खरेदी केलेली वाहने राज्याच्या वाहन विभागाच्या संचालकांकडे हस्तांतरित करा, तसेच विधान परिषदेची इमारत, त्यातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे संपत्ती विभागाच्या संचालकांकडे हस्तांतरित करा, असे या आदेशात म्हटले आहे.

पार्श्वभूमी:-

 • दिनांक 1 सप्टेंबर 2019 या दिवशी लडाख आणि जम्मू-काश्मीर हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहेत.
 • केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 निष्प्रभ करून, जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्य आणि नोकर्‍यांसाठी दिला गेलेला विशेष दर्जा काढला होता.
 • संसदेत कायदा मंजूर झाल्यानंतर 1957 साली 36 सदस्यसंख्या असलेली विधान परिषद स्थापन करण्यात आली होती. 87 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधान परिषद कार्य करीत होते.

 

19 Oct Current Affairs
19 Oct Current Affairs

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला 21 पदके

 • संयुक्त अरब अमिरातमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई कनिष्ठांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ मुष्टियोद्यानी 21 पदकांची लयलूट केली.
 • भारताच्या मुलांच्या संघाने 8 तर मुलींच्या संघाने 13 पदके मिळविली. या कामगिरीमुळे या स्पर्धेत सांघिक मानांकनात भारताने पहिले स्थान पटकाविले.
 • या स्पर्धेत भारताच्या मुलींनी चार सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कास्यपदके मिळविली. मुलांच्या विभागात भारताने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कास्यपदके घेतली.
 • भारताची प्रिती दाहियाने उझबेकच्या मोकहिराचा 3-2 अशा गुणांनी पराभव करून 60 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. 46 किलो वजन गटात भारताच्या कल्पनाने थायलंडच्या थिपसेच्याचा 3-2 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक घेतले.  
 • 80 किलो वजन गटात भारताच्या तनीशबिर कौर संधूने सुवर्णपदक मिळविताना अंतिम लढतेत चीन तैपेईच्या यु चा 5-0 असा एकतर्फी फडशा पाडला.  
 • 80 किलो वरील वजन गटात भारताच्या अलफीया पठाणने कझाकस्थानच्या डायनावर 5 – 0 अशा गुणांनी मात करत सुवर्णपदक घेतले.
 • 52 किलो वजन गटात तनू, 54 किलो गटात नेहा, 63 किलो गटात खुशी, 70 किलो गटात शर्वरी कल्याणकर आणि 75 किलो गटात खुशी यानी प्रत्येकी एक रौप्यपदक मिळविले.
 • 50 किलो गटात रिंकू, 57 किलो गटात आंबेश्वरीदेवी आणि 66 किलो गटात माही लामा यानी प्रत्येकी एक कास्यपदक मिळविले.
 • मुलांच्या विभागात सुरेश विश्वनाथने 46 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविताना फिलीपिन्सच्या ईलजेचा 3-2 असा पराभव केला. 48 किलो गटात सी. विश्वामित्राने सुवर्णपदक मिळविताना जपानच्या ओझाकीवर 5-0 अशी मात केली.
 • 63 किलो गटात योगेश काग्रा, 66 किलो गटात जयदिप रावत,  70 किलो गटात राहुल यानी रौप्यपदके घेतली.
 • 50 किलो गटात विजयसिंग, 52 किलो गटात व्हिक्टरसिंग आणि 60 किला गटात व्हेनशाज यानी प्रत्येकी एक कास्यपदक मिळविले.

भारतीय प्रतिनिधी मंडळ हे IMF आणि WORLD BANK च्या वार्षिक परिषदांमध्ये सहभागी होणार

 • अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधी मंडळ हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक परिषदांमध्ये सहभागी होणार
 • केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधी मंडळ, जी-20 देशांचे अर्थमंत्री, केंद्रीय बँकांचे गव्हर्नर आणि ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री काल वॉशिंग्टन इथल्या बैठकीत सहभागी झाले होते. अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधी मंडळ हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकांमध्येही सहभागी होणार आहेत.
 • जी-20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांनी बैठकीमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसमोरची आव्हाने आणि ती रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर प्रामुख्याने भर दिला. दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याबाबत जी-20 देशांवर जागतिक धोरणाचा समन्वय साधण्याची जबाबदारी आहे, असे निर्मला सितारामन म्हणाल्या. जागतिक मंदीला सामोरे जातांना सामुहिक कृतीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 • उदयन्मुख अर्थव्यवस्थांसमोर आर्थिक विकास साध्य करणे आणि सर्वसमावेशक विकासाचे आव्हान आहे असे सांगून त्यांनी जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी रचनात्मक सुधारणांच्या महत्वावर भर दिला.
 • यावेळी त्यांनी अलिकडेच कॉर्पोरेट करात केलेल्या कपातीचे उदाहरण दिले. भारताने कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांवरुन 22 टक्क्यांपर्यंत कमी केला. यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, असे त्या म्हणाल्या. जी-20 देशांनी एकत्रित कृती करुन आव्हानांना सामोरे जाणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
 • ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत नवीन विकास बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संसाधनांचा विकास तसेच अधिकृत आर्थिक संचालक कार्यक्रमाबाबत सर्व सहमती निर्माण करण्याबाबत चर्चा झाली.
19 Oct Current Affairs
19 Oct Current Affairs

प्रथम बुद्धिष्ट सर्किट ट्रेन कार्यरत

 • 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या काळात भारत आणि नेपाळ या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ प्रवास करणार आहे. भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेली ही पहिली बौद्ध सर्किट ट्रेन आहे.
 • ही रेलगाडी नवी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून निघाली व तिथेच गाडीचा प्रवास संपणार. प्रवासादरम्यान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंध असलेल्या भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधल्या महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली जाणार आहे.

प्रवासाबद्दल:-

 • लुंबिनी (बुद्धांचे जन्मस्थान), बोधगया (आत्मज्ञान प्राप्तीचे ठिकाण), सारनाथ (बुद्धांचे पहिले प्रवचन) आणि कुशीनगर (बुद्धांच्या निर्वाणाची जागा) यासारख्या महत्त्वाच्या बौद्ध स्थळांचा या प्रवासात समावेश करण्यात आला आहे.
 • गाडीमध्ये अधिक सुरक्षिततेसाठी वैयक्तिक डिजिटल लॉकर, पायाची मालिश करणारे, शॉवर, क्यूबिकल्स, स्वतंत्र सोफा बैठक, CCTV कॅमेरे, स्मोक डिटेक्शन अलार्म सिस्टम अश्या सोयी-सुविधा आहेत.
 • गाडीत हायजेनिक किचन कार आणि डायनिंग कारची सुविधा आहे, ज्यामुळे प्रवासी ताजे गरम जेवणांची मागणी करू शकतात.
 • प्रवासाचे व्यवस्थापन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) करीत आहे.

स्वदेश दर्शन योजनेविषयी:-

 • भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘प्रसाद’ (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि ‘स्वदेश दर्शन योजना’ सन 2014-15 मध्ये सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा (circuit) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी आतापर्यंत 15 पर्यटन परिक्रमांची (circuit) ओळख पटविण्यात आलेली आहे.
 • ते आहेत - बुद्धीष्ट परिक्रमा, ईशान्य परिक्रमा, तीर्थंकार परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरण परिक्रमा, वन्यजीवन परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, सूफी परिक्रमा, आध्यात्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.

मनप्रीत राणी हॉकी संघाचे कर्णधार

 • मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल ऑलिंपिक पात्रता हॉकी लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व करतील.
 • भारतीय पुरुष संघ रशियाविरुद्ध, तर महिला संघ अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे.
 • या लढती 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्‍वरला होतील.
 • ऑलिंपिक पात्रता लढत असल्यामुळे संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. इंग्लंड दौऱ्यावरील महिला संघ कायम ठेवण्यात आला आहे. "आम्ही समतोल संघ निवडला आहे आणि त्यावेळी विविध पर्याय खुले राहतील हा विचारही केला आहे. आता सर्व लक्ष रशियाविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वतयारीवर केंद्रीत केले आहे,' असे पुरुष संघाचे मार्गदर्शक ग्रॅहम रिड यांनी सांगितले.
 • आमचा संघ समतोल आहे. त्यात अनुभव तसेच तरुण खेळाडूंचा चांगला संगम आहे. ऑलिंपिक पात्रता लढत लक्षात घेऊनच संघ निवड केली आहे. सरावातील कामगिरीही निवडीच्यावेळी लक्षात घेतली, असे महिला संघाचे मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी सांगितले.

भारतीय संघ:-

 • पुरुष : पी आर श्रीजेश, कृष्णन बहादूर पाठक, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंग, रुपिंदर पाल सिंग, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग (कर्णधार), नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, ललित कुमार उपाध्याय, एस व्ही सुनील (उपकर्णधार), मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, सिमरनजीत सिंग.
 • महिला : सविता (उपकर्णधार), रजनी एतिमार्पू, दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना खोखर, सलीमा टेटे, राणी रामपाल (कर्णधार) शीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलीमा मिंझ, नमिता टोप्पो, वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर, शर्मिला देवी.

 

19 Oct Current Affairs
19 Oct Current Affairs

कबड्डीपटू सुरेश तेंडुलकर यांचे निधन

 • लोकप्रिय कबड्डीपटू व मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक जाणिवा जपणारे, करारी व प्रामाणिक उपशिक्षणाधिकारी म्हणून लौकिक  असलेले सुरेश रा. तेंडुलकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ते गेली पाच वर्षे डिमेन्शिया व अल्झायमरने आजारी होते.
 • समोर हट्टेकट्टे खेळाडू आणि स्वतःची लहानखुरी चण असतानाही कमालीची चपळता, काटक शरीर आणि चाहत्यांची नजरबांधणी करणारी खेळातली नजाकत या जोरावर ५० वर्षांपूर्वीचे अनेक कबड्डी सामने सुरेश तेंडुलकर यांनी गाजवले. त्यांच्या कबड्डी खेळाचा स्वतःचा मोठा चाहतावर्ग होता.
 • मुंबई विद्यापीठ तसेच क्रांतिनगर, गिरगांव येथील जयस्वदेश क्रीडा मंडळाच्या त्यांच्या संघाने एकेकाळी मोठाच दबदबा निर्माण केला होता. लांजा येथील महाविद्यालयात ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या शारीरिक शिक्षण विभागात आले व त्यांची कारकीर्द तिथे घडली.
 • महानगरपालिकेच्या शारीरिक शिक्षण विभागासाठी व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक प्रयोग केले व पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अपार मेहनत घेतली. सामाजिक क्षेत्रातही सुरेश तेंडुलकर कार्यरत होते. लांजा येथील जानकीबाई तेंडुलकर आश्रमासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.
 • अनेकांच्या मदतीला निरपेक्षपणे धावून जाणारे, गरीब आणि होतकरू तरुणांमधून उत्तम खेळाडू घडवणारे मास्तर म्हणून गिरगांव क्रांतिनगर तसेच लालबाग-परळ भागात ते परिचित होते.

क्रीडा कारकीर्द : कबड्डी संघ:-

 • जयस्वदेश क्रीडा मंडळ, क्रांतिनगर, गिरगांव, मुंबई, १९५३ पासून. मुंबई विद्यापीठ संघातून आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये ४ वर्षे सातत्याने निवड, प्रशिक्षक म्हणून १९७८-७९ ढाक्का, बांगलादेश येथे कबड्डी खेळाचे प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी रवाना, १९८०-८१ - मडगांव, गोवा येथे कबड्डी खेळाचे प्रशिक्षण, १९८२ मध्ये दिल्ली येथील एशियाड सामन्यासाठी कबड्डी प्रदर्शनीय सामन्यासाठी महिलांच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड.
 • १९८४-८५ला सिंगापूरच्या कबड्डी संघाला प्रशिक्षण देण्यासाठी रवाना. १९९०मध्ये बीजिंग येथे झालेल्या कबड्डी सामन्यासाठी निरीक्षक म्हणून शंकरराव तथा बुवा साळवी यांच्यासोबत उपस्थिती. बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे कबड्डीचा प्रचार व प्रसार यांतील प्रदर्शनीय सामन्यांमध्ये प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून सहभाग.

 

NITI आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019 मध्ये कर्नाटक अव्वल

 • राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने या वर्षीचा ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’ प्रसिद्ध केला आहे.

यादी कोणाकडून प्रकाशित केली जाते?:-

 • ही यादी NITI आयोगाकडून प्रकाशित केली जाते. ही यादी तयार करण्यात इंस्टीट्यूट फॉर कॉम्पटेटिवनेस या संस्थेनी नॉलेज पार्टनर म्हणून काम केले.

सात स्तंभावर आधारित अहवाल:-

 • मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण, नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्यूजन अश्या सात स्तंभावर हा अभ्यास केला गेला आहे.
 • कर्नाटक हे नवकल्पनात्मक शोधाच्या क्षेत्रात भारतातले अव्वल राज्य ठरले.
 • पायाभूत सुविधा, ज्ञानी कामगार, नॉलेज आऊटपुट आणि व्यवसायासाठी वातावरण या क्षेत्रात राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

शीर्ष 10 मध्ये समाविष्ट होणारी राज्ये:-
1.    कर्नाटक
2.    तामिळनाडू

3.    महाराष्ट्र
4.    तेलंगणा
5.    हरियाणा
6.    केरळ
7.    उत्तरप्रदेश
8.    पश्चिम बंगाल
9.    गुजरात
10.  आंध्रप्रदेश
ईशान्य व डोंगराळ राज्यांमध्ये अव्वल ठरलेले:–

 • सिक्किम राज्य. (त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, जम्मू व काश्मीर ही अव्वल पाच राज्ये)

केंदशासित प्रदेश / शहर राज्ये / छोट्या राज्यांमध्ये अव्वल ठरलेले:-

 • दिल्ली त्यापाठोपाठ चंदिगड, गोवा, पुडूचेरी, अंदमान व निकोबार बेटे
 • दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही उपलब्धतेला उपयोगी बाबींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वात कार्यक्षम राज्ये ठरली.

महाराष्ट्र राज्य:-

 • मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य जरी तिसर्‍या क्रमांकावर असले तरीही राज्याने नवकल्पक शोधकार्यांसाठी मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट सक्षम वातावरण बनविल्याचे आढळून आले आहे.

नीती आयोग (नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्स्फॉर्मिग इंडिया):-

 • स्वतंत्र भारताच्या 65 वर्षांच्या इतिहासात 12 पंचवार्षिक योजना देणाऱ्या नियोजन आयोगाची जागा आता ‘नीती आयोग’ (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स-फॉर्मिंग इंडिया – NITI) घेतली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१५ रोजी दिवशी नियोजन आयोगाचे नामकरण केले.
 • समकालिन आर्थिक जगाशी तिची सांगड घालण्याची गरज त्यांनी त्यावेळी प्रतिपादली होती.
 • सरकारने याबाबत ‘मायगव्ह डॉट एनआयसी डॉट इन’ या संकेतस्थळावर नियोजन आयोगाला पर्याय ठरू शकेल, अशी संस्था कशी असावी याबाबतच्या सूचना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मागवल्या होत्या.
 • नियोजन आयोगाचे बारसे करताना राज्य व केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधीत्व देण्यात आले. त्यानुसार सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच नायब राज्यपाल आयोगाचे सदस्य असतात.
 • उपाध्यक्ष हा आयोगाचा कार्यकारी प्रमुख. सरकारमधील व बिगरसरकारी तज्ज्ञांची आयोगावर वेळोवेळी सदस्य म्हणून नेमणूक केली जाते.
 • आंतरराज्य परिषद, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी), युनिक आयडेंटिटी ऍथोरिटी ऑफ इंडिया व कार्यक्रम मूल्यमापन शाखा असे या आयोगाचे चार प्रमुख विभाग असतात. प्रत्येक विभागाच्या प्रमुखपदी सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांची नेमणूक केली जाते.
 • नव्या पंचवार्षिक योजना तयार करणे तसेच आधीच्या योजनांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करणे हे काम पूर्वीच्या नियोजन आयोगाप्रमाणे नवा नीती आयोगही करतो.
 • मात्र, केंद्रीय निधीचे राज्यांना प्रत्यक्ष वितरण करण्याचे काम नवा आयोग करणार नसून ते काम वित्त मंत्रालयाकडे असते.

मुख्य ध्येय:-

 • गरीबी दूर करणे, पर्यावरण व जैविक साधनांचे जतन, लिंगभेद दूर करणे, जाती व आर्थिक विषमता दूर करण्याबरोबरच 50 दशलक्ष लघुउद्योजकांना रोजगार निर्मितीसाठी मदत करण्याचे आयोगाचे मुख्य ध्येय.

नीती आयोगाची रचना:-

 • अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चीफ एक्झिक्य‌टिव्ह चीफ एक्झिक्य‌टिव्हच्या अंतर्गत पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य आणि पदसिद्ध सदस्य

सहयोगी चौकट:-

 • प्रशासकीय समिती (सर्व मुख्यमंत्र्यांच्या समिती), प्रादेशिक समिती (सर्व मुख्यमंत्र्यांच्या समिती, गरजेनुसार), विशेष निमंत्रक (विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ)

नीती आयोगाची उद्दिष्टे:-

 • राज्यांची सक्रिय भागीदारी आणि राष्ट्रीय विकासाला प्राधान्य.
 • पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसाठी राष्ट्रीय अजेंडा तयार करणे.
 • मजबूत राज्य आणि मजबूत राष्ट्र या धोरणानुसार राज्यांना मदत करणे.
 • ग्रामपातळीवर योजना तयार करण्याची यंत्रणा विकसित करणे.
 • सरकारच्या आर्थिक धोरणात राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताला प्राधान्य देणे.
 • आर्थिक प्रगतीची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोचविणे.
 • समान विचारसरणीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिंकटॅंकसमवेत शैक्षणिक आणि धोरणात्मक संशोधनात भागीदारी करणे.
19 Oct Current Affairs
19 Oct Current Affairs

मायक्रोसॉफ्ट सीईओचा वार्षिक पगार ३०० कोटी

 • जग प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीने सीईओ सत्या नाडेला यांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे. नाडेला यांच्या पगारात तब्बल ६६ टक्के वाढ करण्यात आली आहे.
 • या भरमसाठी पगार वाढीमुळे सत्या नाडेला यांना आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ४.२९ कोटी डॉलर म्हणजेच ३०० कोटी रुपये वार्षिक पगार मिळाला आहे.
 • या पगारात सर्वात जास्त भागीदारी कंपनीच्या शेअर्समधून मिळाली आहे. बुधवारी मायक्रोसॉफ्टच्या वार्षिक प्रॉक्सी स्टेटमेंटमधून ही माहिती समोर आली आहे.

20 वी पशुधन गणना अहवाल

 • देशातल्या पशू संख्येची आकडेवारी स्पष्ट करणारी 20 वी ‘पशुधन गणना’ याचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे.
 • अहवालात असे दिसून आले आहे की, देशात दुभत्या जनावरांची संख्या वाढत असून देशी आणि क्रॉस-ब्रीड मादा गुराढोरांची संख्या वाढत आहे.

ताज्या आकडेवारीनुसार:-

 • सन 2019 मध्ये एकूणच पशुधनाची संख्या 535.78 दशलक्ष एवढी होती.
 • मुख्यत: मेंढ्या व बकरींच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
 • गेल्या वर्षांत घट झाल्यानंतर एकूण जनावरांची संख्या किरकोळ वाढलेली आहे.
 • देशी जनावरांच्या संख्या सन 2012 पासून स्थिर आहे.
 • सन 2019 मध्ये गुराढोरांची संख्या 192.49 दशलक्ष होती (2012च्या गणनेच्या तुलनेत 0.8 टक्क्यांची वाढ). ही वाढ मुख्यत: क्रॉस-ब्रीड गुरांच्या वाढीमुळे झाली आहे ज्यामुळे दुधाचे प्रमाण जास्त आहे.
 • मादा क्रॉस-ब्रीड गुराढोरांची संख्या 46.95 दशलक्षांवर गेली. देशी मादा गुराढोरांची संख्या 98.17 दशलक्ष झाली आहे. म्हशींची संख्या 109.85 दशलक्ष एवढी झाली.
 • दुभत्या जनावरांच्या संख्येत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 • सन 2018-19 मध्ये भारतात एकूण 188 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. त्यात क्रॉस-ब्रीड प्राण्यांचे जवळपास 28 टक्के योगदान होते, असा अंदाज आहे.
 • घरामागच्या अंगणात होणार्‍या कुक्कुटपालनात वाढ दिसून आली आहे. सन 2019 मध्ये कोंबड्यांची संख्या 851.18 दशलक्ष इतकी होती (2012च्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ).

 

19 Oct Current Affairs
19 Oct Current Affairs

गंगानदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेस प्रारंभ

 • उत्तरप्रदेश वनविभागाच्या सहकार्याने ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया’ (WWF-India) या संस्थेच्या वतीने गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेचा कार्यक्रम राबविण्यास बिजनौरमध्ये प्रारंभ केला गेला आहे.
 • ही गणना हस्तिनापूर वन्यजीवन अभयारण्य आणि नरोरा रामसार स्थळाच्या दरम्यान गंगा नदीच्या वरच्या पात्रात सुमारे 250 किलोमीटर लांबीच्या पात्रात केली जाणार आहे.

अन्य ठळक बाबी:-

 • गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांची सध्या एकूण संख्या 2500 ते 3000 याच्यादरम्यान आहे, त्यातले 80 टक्क्यांहून अधिक गंगा व त्याच्या उपनद्यात वास्तव्यास आहेत.
 • या कार्यक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) याच्यावतीने 12 ऑक्टोबर 2019 रोजी 2030 सालापर्यंत डॉल्फिनची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने योजना तयार करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 • ऑक्टोबर 2009 मध्ये भारत सरकारने गंगा नदीतल्या डॉल्फिनला 'राष्ट्रीय जलचर प्राणी' घोषित केले होते.

डॉल्फिन मासा:-

 • हा एक सस्तन प्राणी आहे. डॉल्फिनाचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या सीटॅसिया गणात करण्यात येतो. या गणात व्हेल, शिंशुक (पॉरपॉईज) यांचाही समावेश करतात.
 • सीटॅसिया गणात असलेल्या डेल्फिनिडी कुलामध्ये डॉल्फिनाच्या 17 प्रजाती आणि 40 जाती आहेत.
 • भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सागरात आढळणाऱ्या डॉल्फिनाचे शास्त्रीय नाव ‘टर्सिओप्स ट्रंकेटस’ आहे. स्थानिक मराठी भाषेत याला बुलुंग व मामा असेही म्हणतात.
 • समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात ते आढळतात. मायोसीन कालखंडात (सुमारे 1 कोटी वर्षांपूर्वी) ते उत्क्रांत झाले असावेत, असे मानतात.
 • डॉल्फिन पाण्यात तसेच पाण्याबाहेर राहू शकतो. त्यांची श्रवणेंद्रिये तीक्ष्ण असतात. मनुष्याला ज्या कंप्रतेचा ध्वनी ऐकू येतो त्याहून दहापट कंप्रतेचा ध्वनी त्याला ऐकू येतो.
 • गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, बियास व सतलज या नद्यांमध्ये गोड्या पाण्यातले डॉल्फिन सापडतात. प्लॅटिनिस्टा गँजेटिका आणि प्लॅटिनिस्टा गँजेटिका मायनर या त्यांच्या गोड्या पाण्यातल्या जाती आहेत.
 • शरीरशास्त्रीय दृष्ट्या गंगा नदीतले डॉल्फिन अंध आहेत कारण त्यांच्या डोळ्यात नेत्रभिंग नसते. त्यांना प्रकाशाची दिशा आणि तीव्रतेचे ज्ञान होत असते. हालचाल व शिकारीसाठी ते फक्त प्रतिध्वनी स्थान निर्धारण तंत्राचा वापर करतात. नद्यांवर बांध आणि धरणे यांमुळे ते विखुरले गेले आहेत. डॉल्फिनाच्या संरक्षणासाठी भारत सरकारने चंबळ जल अभयारण्य स्थापन केले आहे.

 

मधुकर कामथ यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्सच्या अध्यक्षपदी निवड

 • डीडीबी मुद्रा गटाचे अध्यक्ष आणि इंटरब्रँड इंडियाचे मार्गदर्शक मधुकर कामथ यांची 2019-20 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्किल्स (एबीसी) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
 • कामथ हे अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत.
 • एबीसी स्थापना 1948 मध्ये झाली आहे. एबीसी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे.
 • मधुकर कामथ हे एक्सएलआरआय, जमशेदपूर आणि चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयाचे प्रतिष्ठित विद्यार्थी आहेत.
 • त्याला जाहिरात उद्योगातील चार दशकांहून अधिक काळचा अनुभव आहे आणि त्यांनी आताच्या मुद्राने डीडीबी मुद्रा ग्रुपमध्ये पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत.
 • एएएआय लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड श्री मधुकर कामथ यांना 6 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथे दिला.
19 Oct Current Affairs
19 Oct Current Affairs

बहरैन आंतरराष्ट्रीय मालिकेत प्रियांशु राजावतने पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले

 • भारतीय शटलर प्रियांशु राजावतने काल रात्री ईसा नगरमधील बहरीन आंतरराष्ट्रीय मालिका बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले.
 • सतरा वर्षांच्या राजावतने शिखरावर कॅनडाकडून अव्वल मानांकित जेसन अँथनी हो-शु यांचा पराभव केला.
 • अव्वल मानांकित भारतीय मिश्र दुहेरीत जुही देवानन आणि व्यंकट गौरव प्रसाद देखील अव्वल स्थानी आहेत.
 • त्याने थायलंडच्या पन्नावत थर्पणितुन आणि कन्यातान सुडोचॉमचा 34 मिनिटांत 21-18 21-16 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
 • महिला एकेरीत इरा शर्मा दुसर्‍या स्थानावर राहिली.
 • द्वितीय मानांकित भारतीय पुरुष दुहेरीची जोडी रोहन कपूर आणि सौरभ शर्मा उपविजेतेपदावर आली.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »