1 Oct Current Affairs

1 Oct Current Affairs
1 Oct Current Affairs

टर्की पाकिस्तानसाठी बनवणार रडारला न सापडणारी अत्याधुनिक युद्धनौका

 • टर्कीने पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी सुरु केली आहे. टर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांनी रविवारी ही घोषणा केली. पाकिस्तान टर्कीकडून ही युद्धनौका विकत घेणार आहे. एर्दोगान यांच्या हस्ते टीसीजी किनलियादा या युद्धनौकेचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी करत असल्याची घोषणा केली. आनाडोलु वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
 • युद्धनौकेची डिझाईन, बांधणी आणि देखभाल करणाऱ्या जगातील दहा देशांमध्ये टर्कीचा समावेश होतो असे एर्दोगान म्हणाले. रविवारपासून पाकिस्तानसाठी युद्धनौकची बांधणी सुरु झाली असून त्याचा पाकिस्तानला फायदा होईल. आपल्या नौदलाचा संपन्न, गौरवशाली विजयाचा वारसा पुढे नेऊ, अधिक बळकट करु असे एर्दोगान म्हणाले.
 • जुलै २०१८ मध्ये पाकिस्तानी नौदलाने MILGEM श्रेणीच्या चार युद्धनौका खरेदी करण्यासाठी टर्की बरोबर करार केला. या श्रेणीच्या युद्धनौकांचे वैशिष्टय म्हणजे त्या रडारला सापडत नाहीत असे आनाडोलुने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाचे कमांडर अॅडमिरल झफर महमूह अब्बासी आणि एर्दोगान या दोघांनी युद्धनौका बांधणीच्या कामाचे उद्घाटन केले.
 • दोन युद्धनौका टर्कीमध्ये बांधल्या जाणार आहेत तर टेक्नोलॉजी हस्तांतरणातंर्गत दोन युद्धनौकांची बांधणी पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान-टर्कीचे संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक बळकट होणार आहेत असे एर्दोगान या प्रसंगी म्हणाले. MILGEM श्रेणीतील जहाजे ९९ मीटर लांब असून २९ नॉटीकल माइल्स वेग आहे.

भारतानं आक्रमण करून काश्मीर ताब्यात घेतलं मलेशिया पंतप्रधान

 • काश्मीर मुद्द्यावरुन मलेशियाने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताविरोधी भुमिका घेतली आहे. भारताने जम्मू आणि काश्मीर आक्रमण करुन ताब्यात घेतला अशा प्रकारे अकलेचे तारे तोडणारे विधान मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी येथे शुक्रवारी केले. तसेच भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करुन या विषयावर तोडगा काढावा, असा फुकटचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
 • मोहम्मद म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या कारवाईची कारणे असू शकतात. मात्र, त्यांनी कलम ३७० हटवण्याची केलेली कारवाई चुकीची आहे. महासभेत ठरावादरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीर भारताने आक्रमण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप केला.
 • भारताने संयुक्त राष्ट्रांकडे दुर्लक्ष केल्याने इतरांनाही संयुक्त राष्ट्र आणि कायद्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष होऊ शकते, अशा शब्दांत त्यांनी काश्मीरबाबत भारताच्या भुमिकाला विरोध दर्शवला.
 • तसेच यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद म्हणाले, भारताने आक्रमणाद्वारे काश्मीर ताब्यात घेण्याऐवजी पाकिस्तानशी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवावा.
 • दरम्यान, भारताला हवा असलेला इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत भारताने मलेशियासोबत चर्चा केल्याचे वृत्त होते. मात्र, हे वृत्त मलेशियाच्या पंतप्रधानांनी फेटाळून लावले होते.
 • १७ सप्टेंबर रोजी बोलताना ते म्हणाले होते, मोदींनी रशिया दौऱ्यादरम्यान आपल्याकडे नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत विनंती केली नव्हती.
1 Oct Current Affairs
1 Oct Current Affairs

तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकं पेट्रोल महाग होईल सौदीचा इशारा

 • सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इराणविरोधात जागतिक कारवाईचा मागणी केली आहे. तसेच, कल्पनाही करू शकणार नाही इतकी कच्चा तेलाची किंमत वाढेल, असा इशाराही देखील त्यांनी दिला आहे.
 • बिन सलमान यांनी १४ सप्टेंबर रोजी सौदीतील दोन तेल उत्पादन केंद्रावर झालेल्या हल्ल्यास इराणला जबाबदार ठरवले आहे. ज्यामुळे सौदीतील तेल उत्पादनात निम्मी घट झाली व कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
 • प्रिन्स बिन सलमान यांनी म्हटले की, जर जगाने इराणविरोधात कठोर भूमिका घेतली नाही. तर, आम्ही पुढचे पाऊल उचलु ज्यामुळे जागतिक हिताला धोका निर्माण होऊ शकतो. याचा तेल पुरवठ्यावर परिणाम होईल व तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकं तेल महाग होईल. तसेच, सौदी आणि इराणमध्ये जर युद्ध झाले तर जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, म्हणूनच आपण यासंदर्भात सैन्य बळाचा वापर करण्यापेक्षा राजकीय तोडगा काढणे अधिक पसंत करत आहोत, असेही प्रिन्स सलमान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या तासभराच्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
 • अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांनी हल्ल्याच्या मागे इराणचा हात आहे, या सौदीने केलेल्या आरोपास पाठिंबा दिला आहे. शिवाय हल्ल्याची जबाबदारी स्वीकरलेल्या हुथी बंडखोरांचा विरोधही केला आहे. इराणच्या हुथी बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस या दोन ठिकाणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोनमधून हल्ले केले होते.
 • याशिवाय बिन सलमान यांनी या मुलाखतीत हे देखील अमान्य केले की, त्यांनी जवळपास वर्षभर पहले पत्रकार जमाल खशोगीची हत्या करण्याचे आदेश दिले होते. मात्र, देशाचा नेता असल्याने मी याबाबत संपूर्ण जबाबदारी स्वीकरत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
 • अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि पाश्चिमात्य देशातील सरकारांनी क्राऊन प्रिन्सच्या आदेशाने ही हत्या झाल्याचे म्हटले होते. पण सौदीच्या अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन सलमान यांची हत्येमध्ये भूमिका फेटाळली होती. खाशोगी यांच्या हत्येनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ झाला. मोहम्मद बिन सलमान यांच्या सुधारणावादी प्रतिमेला तडा गेला. खाशोगी यांच्या हत्येनंतर सौदीच्या क्राऊन प्रिन्सने अमेरिका आणि युरोपमध्ये पाऊल ठेवले नाही.

ताहिलरामानींवर कारवाईस सीबीआयला परवानगी

 • चेन्नई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावरून मेघालय उच्च न्यायालयात बदली झाल्याने नाराज होऊन राजीनामा दिलेल्या माजी न्यायमूर्ती विजया ताहिलरामानी यांच्याविरोधात कारवाई करण्यास सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला परवानगी दिली आहे. ताहिलरामानी यांच्या मालमत्ताविषयक व्यवहारांत अनियमितता आढळल्याप्रकरणी सीबीआयला ही परवानगी मिळाली आहे.
 • चेन्नई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी असताना झालेले मालमत्ताविषयक काही व्यवहार संशयास्पद आढळल्याचे एका अहवालात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमसमोर आले होते. तसेच चेन्नई उच्च न्यायालयात असताना त्यांनी घेतलेले काही प्रशासकीय निर्णयही संशयास्पद आढळले आहेत.
 • यानंतर न्यायमूर्तींच्या नियुक्त्या व बदल्या करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने त्यांची मेघालयच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली केली होती. या कॉलेजिअममध्ये न्या. शरद बोबडे, एन. व्ही. रामणा, अरुण मिश्रा व आर. एफ. नरिमन यांचा समावेश होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस संजीव काळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ताहिलरामानी प्रकरणात सूचक इशारा दिला होता.
 • 'न्यायसंस्थेच्या भल्यासाठी न्यायमूर्तींच्या बदलीची कारणे नमूद केली जात नाहीत. मात्र अगदीच आवश्यक परिस्थिती उद्भवल्यास ही कारणे जाहीर केली जातील', असे या पत्रकात म्हटले आहे.
1 Oct Current Affairs
1 Oct Current Affairs

ब्रह्मोसची यशस्वी चाचणी

 • ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची चाचणी ओडिशा येथील चंदीपूर किनाऱ्यावर सोमवारी घेण्यात आली.
 • या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटर असून, ते जमिनीवरून; तसेच समुद्रातील तळांवरून डागता येणार आहे.
 • 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्र 'डीआरडीओ' आणि रशियाच्या 'एनपीओएम' कडून संयुक्तपणे विकसित करण्यात आले आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र:-

 • ब्राह्मोस (रोमन लिपी: BrahMos ;) हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे.
 • स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व रशियाची 'एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया' संस्था, या दोहोंच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते. याचा पल्ला ३०० किलोमीटर अंतरापर्यंत आहे.

स्वरूप:-

 • ब्राह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा, आणि रशियातील मोस्कवा या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र मॅक २.५ ते २.८ चा वेग गाठते. अमेरिकेच्या हार्पून (क्षेपणास्त्र) या सबसॉनिक क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन पट वेगवान आहे. या क्षेपणास्त्राची हापरसॉनिक आवृत्ती विकसित होण्याच्या मार्गावर आहे. प्रयोगशाळेत याचा वेग मॅक ५.२६ असा नोंदला गेला आहे.
 • हे क्षेपणास्त्र बहुपयोगी असून जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरूनही डागता येण्याची क्षमता यात असल्यामुळे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, यात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे.

इतिहास:-

 • भारताला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र रशियाच्या 'पी-७०० ग्रानित' या क्षेपणास्त्रावर आधारलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र म्हणून विकसवायचे होते. मात्र रशियाने "क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंध करारास" बांधील असल्याने हे क्षेपणास्त्र पी-८०० ओनिक्स या निम्न पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर आधारून विकसवले. या क्षेपणास्त्राचे प्रणोदन रशियन क्षेपणास्त्रावर आधारित असून मार्गदर्शन ब्राह्मोस कॉर्पोरेशनेने विकसित केले आहे

महाराष्ट्राची शालेय गुणवत्ता घसरली

 • शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्राची घसरण झाली असून, वीस मोठ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तीनवरून सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सन २०१५-१६ हे आधारवर्ष मानून केलेल्या शैक्षणिक गुणवत्ता मापनात केरळचा अव्वल क्रमांक कायम असून, उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे.
 • नीती आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि जागतिक बँक यांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या या अहवालात वीस मोठ्या राज्यांचा एक गट, आठ लहान राज्यांचा दुसरा गट आणि सात केंद्रशासित प्रदेशांचा तिसरा गट अशी वर्गवारी आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी दोन श्रेण्या करण्यात आल्या.
 • पहिल्या श्रेणीत शैक्षणिक स्तर, शिक्षणाची संधी, समानता, पायाभूत सोयी-सुविधा यांच्या निष्पत्तीचा आढावा घेण्यात आला, तर दुसऱ्या श्रेणीत या निष्पत्तींना चालना देणाऱ्या प्रशासकीय अंमलबजावणीच्या प्रक्रियांचे निकष निश्चित करण्यात आले. विविध सर्वेक्षणे, राज्यांनी दिलेली माहिती आणि त्रयस्थ पाहणी यांसह ३३ निकषांच्या आधारे राज्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
1 Oct Current Affairs
1 Oct Current Affairs

चीनच्या भूमिकेवर आक्षेप

 • संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दल केलेल्या वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.
 • चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता; तसेच हा 'वाद' शांततामय मार्गाने, तसेच यूएन चार्टर, सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करारांनुसार सोडवला जावा, तसेच 'जैसे थे' स्थितीत बदल होईल, अशी कोणतीही एकतर्फी कृती केली जाऊ नये, असे म्हटले होते.
 • भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा शेजारी म्हणून चीनला हा वाद प्रभावीपणे सोडवला जाईल आणि स्थैर्य येईल, अशी आशा आहे, असेही चीनने म्हटले आहे. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, 'काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. या भागासंदर्भात अलीकडे घडलेल्या घडामोडी या संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे.' जम्मू, काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग असल्याची भारताची भूमिका चीनला चांगल्या प्रकारे माहिती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात भारताने जम्मू-काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द केले; तसेच काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. या निर्णयाला पाकिस्तानने विरोध केला आहे.

चीनचे म्हणणे काय?:-

 • 'यूएन चार्टर', सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करार याद्वारे काश्मीरच्या वादावर तोडगा काढायला हवा, असे चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. याशिवाय 'जैसे थे' स्थितीत बदल होईल, अशी एकतर्फी कृती केली जाऊ नये, असेही चीनने म्हटले आहे.

आर्थिक क्षेत्रात आजपासून काय बदल

 • आज, एक ऑक्टोबरपासून आर्थिक विषयाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत; ज्यांचा संबंध थेट तुमच्या खिश्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये स्टेट बँकेचे बदलणारे नियम, कॉर्पोरेट करातील कपात, कोणत्या वस्तूवर नेमका किती जीएसटी भरावा लागणार आदी निर्णयांचा समावेश आहे. कोणत्या निर्णयाचा फायदा होणार आणि कोणत्या निर्णयाचा तोटा होणार, याचा घेतलेला आढावा.

१. इंटरनेट बँकिंगवरील मर्यादा रद्द:-

 • स्टेट बँकेने इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग व्यवहारांवरील दरमहा मर्यादा पूर्णपणे रद्द केली आहे. दरमहा खात्यामध्ये सरासरी २५,००० रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या शाखेतून दोनवेळा मोफत रक्कम काढता येणार आहे. दरमहा खात्यामध्ये सरासरी २५,००० ते ५०,००० रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या शाखेतून १० वेळा मोफत रक्कम काढता येणार आहे. खात्यामध्ये ५०,००० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम शिलकीत ठेवणाऱ्या ग्राहकास अमर्यादवेळा रक्कम काढता येणार आहे.

२. पेट्रोलपंपांवरील कॅशबॅक बंद:-

 • देशभरातील पेट्रोलपंपांवर डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा ई-वॉलेटच्या माध्यमातून इंधनखरेदी केल्यावर मिळणारी ०.७५ टक्क्यांची सवलत बंद होणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली होती. स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या ‘एसएमएस’मधून ही बाब उघड झाली. या पार्श्वभूमीवर अन्य बँकाही स्टेट बँकेच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे.

३. पेन्शन पॉलिसीत बदल:-

 • ज्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू एक ऑक्टोबर २०१९ रोजी दहा वर्षांची सेवा पूर्ण करण्यापूर्वीच झाला असेल आणि त्याांनी सलग सात वर्षे सेवा केली असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना १ ऑक्टोबर २०१९पासून उपनियम (३) अंतर्गत वाढलेल्या दराप्रमाणे पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

४. कॉर्पोरेट करातील कपात:-

 • केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात केलेल्या कपातीचा फायदा मिळण्यास सुरुवात झाली आहे. एक ऑक्टोबरनंतर स्थापन होणाऱ्या कंपन्यांना किमान १५ टक्के कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कंपन्यांना आता उपकरासह एकूण १७.०१ टक्के करभरणा करावा लागणार आहे.

५. हॉटेलखोल्या होणार स्वस्त:-

 • जीएसटी कौन्सिलने १००० रुपये भाडे असणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवरील जीएसटी शून्यावर आणण्यात आला आहे. १००१ के ७,५०० रुपये भाडे असणाऱ्या खोल्यांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ज्या मंडळींनी एक ऑक्टोबरनंतरचे बुकिंग केले आहे, त्यांनाच जीएसटी घटविल्याचा फायदा होणार आहे.

६. जीएसटी अर्जात बदल:-

 • वार्षिक पाच कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवीन जीएसटी रिटर्न भरावा लागणार आहे. या व्यावसायिकांना ‘जीएसटीएएनएक्स-१’ हा अर्ज भरावा लागणार आहे. नवा अर्ज ‘जीएसटीआर १’ या अर्जाची जागा घेणार आहे.
1 Oct Current Affairs
1 Oct Current Affairs

पाकच्या बाबर आझमने विराटलाही मागे टाकले

 • पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यानं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतकांचा नवा विक्रम रचला आहे. आझमनं ७१ सामने खेळून ११ शतकं ठोकण्याचा पराक्रम केला आहे. या बाबतीत त्यानं भारतीय संघाचा कर्णधार व क्रिकेट विश्वातील सध्या आघाडीचा फलंदाज विराट कोहली याला मागे टाकलं आहे.
 • श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानच्या एकदिसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाबर आझमनं हा पराक्रम केला आहे. आझमनं या सामन्यात ११५ धावा फटकावल्या. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचं अकरावं शतक आहे.
 • अवघ्या ७१ डावांमध्ये त्यानं हा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीला ११ शतकांचा टप्पा गाठण्यासाठी ८२ डाव खेळावे लागले होते. आझमनं ती कामगिरी विराटपेक्षा ११ सामने कमी खेळून केली आहे.
 • श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं ७ बाद ३०५ धावा केल्या. त्यात आझमच्या ११५ धावांचा समावेश होता. अवघ्या १०५ चेंडूंत त्यानं या धावा केल्या. हा सामना पाकिस्ताननं ६७ धावांनी जिंकला. पाकिस्तान-श्रीलंकेमधील पहिला एकदिवसीय सामना रद्द झाला होता.
 • सर्वाधिक वेगवान ११ शतकं करण्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशीम आमला याच्या नावावर आहे. त्यानं ६४ डावांमध्ये ११ शतकं झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचाच क्विंटन डीकॉक हा फलंदाज आहे. त्यानं ६५ सामन्यांत ही कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर आता बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • मोहम्मद बाबर आझम हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे. अंडर १९ संघामध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर त्यानं पाकिस्तानी संघात प्रवेश मिळवला होता. सध्या तो पाकिस्तानचा आधारस्तंभ बनला आहे.
 • सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यानं आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. तो स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, केन विल्यमसन व ज्यो रूट यांच्या तोडीचा फलंदाज मानला जातो. टी-२० मध्ये या सर्व खेळाडूंपेक्षा त्याची धावांची सरासरी अधिक आहे. तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये सरासरीच्या बाबतीत तो या चौघांपैकी फक्त कोहलीच्या मागे आहे.

पाकची फजिती करणाऱ्या मलिहा लोधींची संयुक्त राष्ट्रातून हकालपट्टी

 • संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता मुनीर अक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुनीर अक्रम यांनी यापूर्वी 2002 ते 2008 दरम्यान या पदावर आपली जबाबदारी पार पाडली आहे. न्यूयॉर्क येथील मुख्यालयात ते कार्यरत असतील.
 • पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नियुक्त्या केल्या आहेत. राजदूत मुनीर अक्रम यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अन्य नियुक्त्यांचीदेखील घोषणा केली. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे महासंचालक खलील अहमद हाशमी यांची संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधीच्या रूपात नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तसंच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीन नव्या राजदुतांचीही नियुक्ती केली आहे. मोहम्मद एजाझ यांना हंगेरीचे तर सय्यद सज्जाद हैदर यांना कुवैतचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

लोधींमुळे पाकची फजिती:-

 • मलिहा लोधी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा पाकिस्तानची फजिती झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा त्यांनी परराष्ट्र मंत्री असा उल्लेख केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत ट्विट केलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी ट्विट केलेला फोटो डिलिट करत नवं ट्विट केलं आणि जुन्या ट्विटबद्दल माफीही मागितली होती.
 • यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीदरम्यान एका जखमी मुलीचा फोटो दाखवत हा काश्मीरमधील क्रुरतेचा पुरावा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर फोटोमध्ये असलेली मुलगी ही इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाली असल्याची माहिती समोर आली होती. तो फोटो 2014 मध्ये फोटोग्राफर हेदी लेव्हीन यांनी काढला होता. त्यानंतरही नेटकऱ्यांनी लोधी यांना चांगलंच झापलं होतं.
1 Oct Current Affairs
1 Oct Current Affairs

स्टेट बँकेनं मेलबर्नमध्ये उघडली शाखा

 • भारतीय स्टेट बँकेनं(एसबीआय) मेलबर्नमध्ये आपली शाखा उघडली आहे.
 • ऑस्ट्रेलियामध्ये शाखा उघडणारी एसबीआय भारतातील पहिलीच बँक ठरली आहे.
 • सोमवारी एका भव्य कार्यक्रमात व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्नमध्ये शाखेचा उद्धघाटन सोहळा पार पडला.
 • व्हिक्टोरियामध्ये याआधी सिप्ला, सायरेन्ट, एचसीएल, इन्फोसिस, रॅमको, टीसीएस, महिंद्रा आणि झोमॅटो या भारतीय कंपनी कार्यरत आहेत.
 • व्हिक्टोरिया आणि भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध सुधारण्यास आमचं हे पाऊल भविष्यात मदत करेल, पुढील दहा वर्षांमध्ये याचा फायदा दिसून येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले.
 • एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश कुमार खारा म्हणाले की, मेलबर्नच्या गतिमान आणि व्यवसायास अनुकूल असलेल्या ठिकाणी शाखा उघडल्याचा आम्हाला अभिमान आहे. पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही देशांचे संबंध आणखी घट्ट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
 • एसबीआय बँकेच्या उद्धाटन कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियामधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना व्हिक्टोरीया संसदेचे कोषाध्यक्ष स्टिव डिमोपॉलोस म्हणाले, ” व्हिक्टोरियामध्ये आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्वागत करतो. आमच्या राज्यात स्थापन होणारी पहिली भारतीय बँक आहे.
 • भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक बँकेने येथे केलेली ही गुंतवणूक आपल्या भरभराटीत भर टाकेल. एसबीआयमुळे आपल्या आर्थिक क्षेत्राला फायदा तर होईलच शिवाय रोजगारही उपलब्ध होतील.”

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »