1 Sep Current Affairs

1 Sep Current Affairs
1 Sep Current Affairs

हाँगकाँगमध्ये धुमश्चक्री आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा

 • पोलिसांच्या मनाई आदेशानंतरही येथे हजारो लोकशाही समर्थक शनिवारी दुपारी रस्त्यावर उतरले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा तसेच पाण्याचा मारा केला. या पोलिसांवर मुखवटे धारण केलेल्या आंदोलकांनी पेट्रोलबॉम्ब तसेच दगड फेकले. काही आंदोलकांनी जाळपोळ देखील केली. त्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. 
 • आंदोलकांच्या रॅलीला मनाई करणारा आदेश पोलिसांनी शुक्रवारीच जारी केला होता. तसेच महत्त्वाच्या आंदोलकांना ताब्यातही घेतले होते. मात्र चीनकडून दिल्या जाणाऱ्या वाढत्या धमक्यांचा विरोध करण्यासाठी हजारो आंदोलक शनिवारी हाँगकाँगच्या मुख्य रस्त्यावर उतरले.

Tear Tas चा फॉर्मुला - 2-Chlorobenzalmalononitrile  C10H5ClN2

अफगाणिस्तानवर तालिबानचा हल्ला

 • अफगाणिस्तानमधील महत्त्वांच्या शहरांपैकी एक असलेल्या कुंडूजवर तालिबानने केलेल्या हल्ल्यात किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४१ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. 
 • तालिबान अमेरिकेशी सुमारे १८ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबविण्याबाबत एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे ही घटना घडली आहे. 
 • अफगाणिस्तानच्या सैन्याने तालिबानींना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, धुमश्चक्री अद्याप सुरू आहे. सुरक्षा दलातील काही सैनिकदेखील या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे; परंतु त्यांचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. 
 • अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये २६ तालिबानी ठार झाले आहेत. काबुलमध्येही तालिबानी आणि सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली. सर्व परदेशी फौजांनी अफगाणिस्तान सोडावे, अशी मागणी तालिबानी दहशतवाद्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा हल्ला केल्याने वाटाघाटींमध्ये तालिबान्यांचे बळ आणखी वाढले आहे. 
 • दरम्यान, हा हल्ला शांततेसाठी सुरू असलेल्या चर्चेविरोधात असल्याचे अध्यक्षीय प्रवक्ता सेदिक सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
1 Sep Current Affairs
1 Sep Current Affairs

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

 • उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यता आली आहे. 
 • सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपला, त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली.

भगत सिंह कोश्यारी:-

 • भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. त्यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. 
 • त्यांनी १९७७ मध्ये आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. 
 • २००१ ते २००७ या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. २००२ ते २००७ पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. 
 • २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते. 
 • १९७५ मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते. 

अन्य राज्यांतही नवे राज्यपाल:- 
महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना नवे राज्यपाल मिळाले आहेत. 

 • केरळला आरिफ मोहम्मद खान यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आरिफ खान खूप काळ राजकारणापासून दूर होते.
 • आरिफ मोहम्मद खान यांच्यासह कलराज मिश्र - राजस्थान, बंडारू दत्तात्रेय - हिमाचल प्रदेश, तमिलीसाई सुंदरराजन - तेलंगणा असे नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत.

स्विस बँकेतील पैशाची माहिती मिळणार

 • भारत आणि स्वित्झर्लंडदरम्यान माहितीची विनाअडथळा देवाणघेवाण पद्धती आज रविवारपासून लागू होणार असल्यामुळे भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशासंबंधीची माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी)ने दिली आहे. 
 • 'काळा पैसा'विरोधात केंद्र सरकारच्या लढ्यातील ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. 'सीबीडीटी'ने प्राप्तिकर विभागासाठी या संदर्भात एक धोरण आखले असून, या संदर्भात स्विस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे.
   
1 Sep Current Affairs
1 Sep Current Affairs

एअर इंडियाच्या मालकीतून केंद्र सरकार बाहेर

 • आर्थिक संकटात सापडलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील 'एअर इंडिया'च्या मालकीतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 • 'विमान कंपनी चालविणे हा सरकारचा व्यवसाय असू नये. सरकारने 'एअर इंडिया'मधून पूर्णपणे बाहेर पडणे योग्य आहे,' असे वक्तव्य नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले आहे. 
 • एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. 'एअर इंडिया'मध्ये गुंतवणूक करण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे वक्तव्यही पुरी यांनी केले. गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील पर्याय यंत्रणा समितीची (अल्टरनेटिव्ह मॅकॅनिझम पॅनेल) लवकरच या विषयी बैठक होणार आहे. 

'एअर इंडिया'ची स्थिती काय:-

 • तोट्यात सापडलेल्या एअर इंडियाला उभारी देण्यासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये सरकारने एअर इंडिया; तसेच तिच्या पाच सहकारी कंपन्यांची गुंतवणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 
 • या योजनेंतर्गत कंपनीच्या मालकीच्या जमीन आणि मालमत्तेची विक्री करून निधी उभारणीचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कंपनीच्या कामगिरीमध्ये काहीशी सुधारणा झाली. 
 • सरकारने कंपनीची ७६ टक्के मालकी विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खरेदीदार पुढे न आल्याने हे पाऊल अयशस्वी ठरले. 
 • कंपनीने कर्मचाऱ्यांची बढती आणि नव्या कर्मचाऱ्यांची भरती जुलैमध्ये बंद करण्यात आली. 
 • कंपनीवर सुमारे ५५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. 
 • एअर इंडियावर असलेल्या ५५ हजार कोटी रुपयांच्या कर्जापैकी २९ हजार कोटी रुपयांचे कर्ज 'एअर इंडिया अॅसेट्स होल्डिंग'कडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे 'एअर इंडिया'ला द्यावे लागणारे वार्षिक व्याज २,४०० कोटी रुपयांवरून १,७०० कोटी रुपयांपर्यंत घसरले. 

आर्थिक तोटा:-

 • ३१ मार्च २०१९ पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षात एअर इंडियाला सात हजार कोटींपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला आहे. 
 • चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांमध्ये कंपनीची कामगिरी काहीशी सुधारली. प्रवासी उत्पन्नामध्ये २० टक्के वाढ झाली. 
 • सरकारकडून या वर्षात काही आर्थिक साह्य न मिळाल्याने कंपनीचा एकूण तोटा ७० हजार कोटी रुपयांवर पोहोचला. 
 • तेल कंपन्यांनी रोखला पुरवठा:-
 • कंपनी इंधनाची रक्कम वेळेत अदा करू न शकल्याने तेल कंपन्यांनी इंधनाचा पुरवठा बंद केला. 'एअर इंडिया'ने गेल्या सात महिन्यांपासून इंधनाचे पैसे थकविले आहेत. 
 • एकूण थकबाकी सुमारे ४५०० कोटी रुपयांची आहे. 'एअर इंडिया'ला इंधनाचे पैसे चुकते करण्यासाठी ९० दिवसांची मुदत मिळते. मात्र, २०० दिवसांपासून रक्कम थकविण्यात आली आहे. 
 • त्यामुळे तेल कंपन्यांनी कडक कारवाई करून सहा तळांवरील इंधनपुरवठा थांबविला. या तळांमध्ये रांची, मोहाली, पाटणा, विशाखापट्टणम, कोची आणि पुणे यांचा समावेश आहे. 

पुढे काय होणार?:-

 • 'एअर इंडिया'मधून सरकारने १०० टक्के निर्गुंतवणूक करण्याची नीती आयोगाची शिफारस 
 • 'एअर इंडिया' विकत घेण्यासाठी अनेक खरेदीदार इच्छुक असल्याचे सरकारचे म्हणणे. 
 • लवकरच गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची बैठक. 
 • संपूर्णपणे विक्री करताना 'इसोप' (कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे समभाग) सरकार स्वत:कडे ठेवू शकते. 
 • 'खरेदीचा इरादा' जाहीर करण्यासाठी सरकार ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्याची शक्यता.
   

देशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू

 • देशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार आहे. याअंतर्गत आता कुठल्याही नियमभंगासाठी पाचपट तर काही बाबतीत दहापट दंड आकारला जाणार आहे. 
 • कमीत कमी एक हजार ते अगदी २५ हजार रुपयांपर्यंत दंड या नव्या कायद्यांतर्गत बसू शकतो.
 • लायसन्स न बाळगल्यास पाच हजार रुपये दंड आहे, जो आतापर्यंत केवळ ५०० रुपये होता.
 • नशेत गाडी चालवण्यास आतापर्यंत दोन हजार रुपये दंड आकारला जात होता, तो आता थेट १० हजार रुपये करण्यात आला आहे. 
 • केवळ दंडच नव्हे तर नियमभंग केल्यास तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकते. 

काही नियमभंग आणि नवी दंड आकारणी:-

 • हेल्मेट न घातल्यास - आतापर्यंत १०० रुपये दंड होता - आता १,००० रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द 
 • विना परवाना वाहन चालवल्यास - आधी ५०० रु - आता ५ हजार रुपये दंड. 
 • दुचाकी अतिरिक्त भार - आधी १०० रु.-  आता २ हजार रुपये दंड. 
 • सीट बेल्ट न लावल्यास - आधी १०० रुपये - आता १००० रुपये दंड. 
 • वाहन चालवताना फोनवर बोलल्यास - आधी १००० रुपये - आता ५ हजार रु. दंड
   
1 Sep Current Affairs
1 Sep Current Affairs

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा स्वीकारला पदभार

 • लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेणार आहेत. 
 • लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीत सुद्धा दिसतील. 

मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे:-

 • नरवणे मराठमोळे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे.  चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. 
 • महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले.
 • जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. 
 • आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. 
 • नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले.
 • या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
   

लवकरच उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीसाठी जलव्यवस्थापन

 • शतकऱ्यांना आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करणे शक्य होणार आहे. 
 • ठिबक सिंचन सुविधा पुरवणारी आघाडीची कंपनी रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईत पत्रकार परिषदेत ‘मन्ना’ या उपग्रहआधारित सॉफ्टवेअर सुविधेची घोषणा केली.
 • सिंचन व जलव्यवस्थापनातील हा पहिलाच खासगी पुढाकाराचा तंत्रज्ञानाधारित उपक्रम आहे.
 • जलव्यवस्थापन आणि जलसंधारण यांचा एकत्रित मेळ घालून किफायतशीर शेती करणे हा शेतकऱ्यांसाठी एक कळीचा मुद्दा बनलेला आहे.
 • ‘मन्ना’ प्रणालीने अगदी अमेरिका, मेक्सिको, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलसारख्या शेतीच्या क्षेत्रात पुढारलेल्या देशांमध्ये यशस्वीपणे त्या त्या ठिकाणसाठी आवश्यक असलेली आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता ही सुविधा भारतामध्ये दाखल होणार आहे.
1 Sep Current Affairs
1 Sep Current Affairs

शालिजा धामी भारताची पहिली महिला फ्लाइट कमांडर

 • भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर शालिजा धामी ही भारताची पहिली महिला फ्लाइट कमांडर बनली आहे. 
 • गाझियाबादमधील हिंडन एअरबेस येथे त्यांनी चेतक हेलिकॉप्टर युनिटच्या फ्लाइट कमांडरचा पदभार स्वीकारला. 
 • फ्लाइट कमांडर हे कमांड युनिटमधील दुसरे मोठे पद आहे, याचा अर्थ असा की कमांडिंग ऑफिसर नंतर धामी युनिटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अधिकारी आहेत.
 • 1994 मध्ये प्रथमच महिलांना भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आले. 
 • कायमस्वरुपी कमिशनसाठी निवडले जाण्यासाठी, महिला अधिका्याला भारतीय हवाई दलात किमान 13 वर्षांचा अनुभव असावा लागतो. लघु सेवा आयोगांतर्गत हवाई दलात महिला नियुक्त केल्या जातात.
 • महिलांसाठी कायमस्वरुपी आयोगाच्या अंमलबजावणीमुळे महिला उमेदवार दीर्घकाळ सेनेत काम करू शकतील. त्यांना या आयोगाच्या अंतर्गत इतरही अनेक सुविधा मिळतील.  
 • कायमस्वरुपी कमिशनमुळे महिला वीस वर्षे काम करू शकतील आणि त्यातही वाढ होऊ शकते.

शालिजा धामी:-

 • विंग कमांडर एस. धामी ही भारतीय वायुदलाची पहिली महिला अधिकारी आहे ज्यांना दीर्घ कालावधीसाठी स्थायी कमिशन देण्यात आले.
 • त्यांना 2300 तास उड्डाण करण्याचा अनुभव आहे.
 • एस. धामी यांनी 15 वर्षांच्या कारकीर्दीत 'चेतक' आणि 'चित्ता' हेलिकॉप्टर्स उडविली आहेत.
 • विंग कमांडर एस. धामी ही चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टरसाठी भारतीय वायुसेनेची प्रथम महिला फ्लाइंग इंस्ट्रक्टर देखील आहे.
   

नवी दिल्ली येथे 12 व्या भारत सुरक्षा परिषदचे आयोजन

 • नवी दिल्ली येथे 12 वीं भारत सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती.
 • ही परिषद असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) द्वारा आयोजित केली गेली आणि केंद्रीय संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अधिकृतपणे या परिषदेला मदत केली आहे.
 • या परिषदेचा विषय (थीम) “नवीन राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाकडे” (Towards New National Cyber Security Strategy) असा होता.
 • या परिषदेदरम्यान, संवेदनशील राष्ट्रीय पायाभूत सुविधांचे संरक्षण, भविष्यातील सायबर धोका: घटना, आव्हाने आणि प्रतिसाद यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विविध कायद्याची अंमलबजावणी करणा-या एजन्सीजमधील वरिष्ठ अधिकारी या परिषदेस हजर होते.
 • आपल्या भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी जाहीर केले की सायबर धमक्यांचा सामना करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. 
 • केंद्रीय गृह मंत्रालयाने समन्वयाने आणि प्रभावी पद्धतीने देशात सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर’ (आय 4 सी) ’योजना सुरू केली आहे. 
 • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत डिजिटल इंडियाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून शासनाने सायबर स्वच्छता केंद्र देखील सुरू केले आहे.
   
1 Sep Current Affairs
1 Sep Current Affairs

हपीनेस इंडेक्समध्ये भारत नवव्या स्थानी इप्सोस सर्वेक्षण

 • इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालाच्या ठळक बाबी:-

 • हपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 28 जागतिक बाजारपेठांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे.
 • यादीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (86%) हे अग्रस्थानी असून जगातले सर्वात आनंदी देश ठरले आहेत.
 • तयापाठोपाठ, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त राज्ये अमेरिका, सौदी अरब आणि जर्मनी या देशांचा क्रम लागतो आहे. नवव्या क्रमांकावर भारत 77 टक्क्यांसह आहे.
 • अर्जेटिना 34 टक्क्यांसह यादीत शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच 27 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी स्पेन आणि रशिया या देशांची नोंद आहे.
 • विशेष म्हणजे, 2019 साली आनंदीपणाची पातळी कमी झाली. भारतासाठी या पातळीत सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. सन 2018 मधील 83 टक्क्यांवरून 2019 साली ही पातळी 77 टक्क्यांवर आली आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »