20 Sep Current Affairs

20 Sep Current Affairs
20 Sep Current Affairs

दक्षिण अफगाणिस्तानातील स्फोटात २० जणांचा मृत्यू

 • एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात गुरुवारी दक्षिण अफगाणिस्तानातील रुग्णालय उद्ध्वस्त झाले. त्यात सुमारे २० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९० जण जखमी झाल्याची माहिती गुरुवारी सूत्रांकडून सांगण्यात आली. 
 • या स्फोटाची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे.
 • अमेरिकेशी शांततेसाठी सुरू असलेल्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर तालिबानने येथे रोजच हल्ले करणे सुरू आहे. झाबुल प्रांतातील या रुग्णालयाला गुरुवारी तालिबान्यांनी लक्ष्य केले. जखमींना शाल, ब्लँकेट्समध्ये गुंडाळून जवळच्याच कंदाहारमधील रुग्णालयात नेण्यात आले. 
 • स्फोट झाल्याक्षणी मृत आणि जखमींच्या संख्येत तफावत होती. प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ता गुल इस्लाम सेयाल यांनी या स्फोटात १२ जण मृत्युमुखी पडल्याविषयी सांगितले; तर प्रमुख अता जन हकबयान यांनी २० जण मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली. रुग्णालयाच्या जवळपासची गुप्तचर संस्थांची कार्यालये हल्ल्याचे लक्ष्य होती, असे तालिबानी प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले.
 • मृतांमध्ये महिला आणि बालकांची संख्या मोठी होती. 
 • अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या वतीने इमारतीच्या ढिगाखालून आपल्या पालकांना शोधणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलाचे छायाचित्र या वेळी पोस्ट करण्यात आले. अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या रॅलीदरम्यान मंगळवारी केलेल्या हल्ल्यात यापूर्वीच ४८ जण मारले गेले आहेत. त्या हल्ल्याची जबाबदारीही तालिबानने स्वीकारली आहे.
   

हाऊडी मोदी कार्यक्रमात ट्रम्प यांच्याकडून घोषणा

 • टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये २२ सप्टेंबरला होणाऱ्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही विशेष घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास अमेरिकेतील ५० हजारांहून अधिक नागरिक हजेरी लावणार आहेत. या विशेष कार्यक्रमात काही घोषणा करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. 
 • उभय नेत्यांच्या या भेटीबाबत अमेरिकेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 • व्हाइट हाऊसने सोमवारी ट्रम्प यांच्या उपस्थितीची अधिकृतपणे घोषणा केली. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता सूत्रांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये पुढील वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.
 • त्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांसमोर येण्याची संधी ट्रम्प सोडणार नाहीत, अशी अटकळ बांधली जात होती. दरम्यान, या दोन्ही मोठ्या नेत्यांनी एकत्रित व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. 
 • तसे गेल्या तीन महिन्यांत हे दोघे तिसऱ्यांदा भेटणार आहेत. जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर २६ ऑगस्टला फ्रान्समध्ये आणि त्यापू्र्वी जी-२० परिषदेत जपानमध्ये ते भेटले होते. विशेष म्हणजे ह्युस्टनमधील कार्यक्रमानंतर दोन्ही नेते पुन्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनिमित्त पुढच्या आठवड्यात भेटणार आहेत.
 • दरम्यान, दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाच्या स्वरूपावर अखेरचा हात फिरवत आहेत. अमेरिकेने जूनमध्ये भारताचा लाभार्थी देश म्हणून असलेला दर्जा काढून घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अमेरिकेच्या २८ उत्पादनांवर शुल्क लावले. 
 • त्यावरून उभय देशांत व्यापाराच्या दृष्टीने तणाव होता. मोदींच्या कार्यक्रमाला ट्रम्प उपस्थित राहिले, तर दोन्ही देशांतील संबंध दृढ होण्याचे आणि काश्मीरसह विविध मुद्द्यांवर अमेरिकेचा भारताला पाठिंबा असल्याचे आपोआप सूचित होईल, अशा उद्देशाने उभय देशांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

मोदींचा उद्यापासून दौरा:-

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबरपासून सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील व संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक महासभेला संबोधित करतील, अशी माहिती गुरुवारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. ह्युस्टन येथे शनिवारी पंतप्रधान मोदी यांचे आगमन होईल. 
 • दुसऱ्या दिवशी 'हाऊडी मोदी' या महारॅलीत भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांशी संवाद साधतील. यावेळी ट्रम्पदेखील त्यांच्यासोबत असतील. २४ तारखेला ते महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावतील, तर २७ सप्टेंबरला ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करतील.
   
20 Sep Current Affairs
20 Sep Current Affairs

जमिनींना विशेष क्रमांक

 • देशभरातील जमिनींना लवकरच विशेष क्रमांक दिला जाणार आहे. जमीनमालकीमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी व या संबंधीची बनावट मालकी संपुष्टात यावी, या हेतूने केंद्र सरकारकडून ही उपाययोजना केली जाणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने या दिशेने काम करण्यास सुरुवात केल्याची माहिती एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने दिली. विशेष म्हणजे, हे विशेष क्रमांक आधार क्रमांकालाही जोडण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते.
 • देशभरात प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये दोन तृतीयांश प्रकरणे ही जमीनजुमल्याच्या वादाशी संबंधित आहेत. मालकी हक्कांचा दावा करणाऱ्या प्रकरणांचाही यात समावेश आहे. देशात सर्वत्रच बनावट कागदपत्रांच्या साह्याने जमीनविक्री व्यवहारात अनेकांची फसवणूक झाल्याचेही उघड झाले आहे. 
 • यावर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून सर्व जमिनींना हा विशेष क्रमांक देण्याची योजना आखण्यात आली आहे. यानुसार या विशेष क्रमांकांतर्गत संबंधित जमिनीचा पूर्ण तपशील मिळू शकेल. यामध्ये ही जमीन कोणाच्या मालकीची, कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, तहसील व तालुक्यात आहे, तिचा गट स्तर, मार्गाचे नाव काय आहे या सविस्तर माहितीचा समावेश असेल.

‘आधार’शीही जोडणार:-

 • हा विशेष क्रमांक जमीन मालकाच्या आधार क्रमांक व महसूल न्यायसंस्थेशीही जोडण्याचा सरकारचा विचार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे मालमत्ता व्यवहार, करविषयक प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. याशिवाय सरकारी प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्याची प्रक्रियाही सोपी होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हा विशेष क्रमांक आधार क्रमांकानुसारच एकात्मिक कार्य करेल. म्हणजेच, जमिनीची खरेदी-विक्री, करसंकलन, जमिनीची मालकी आदी सर्व संबंधित कामे व माहिती या क्रमांकाच्या आधारे मिळवता येईल.

प्रलंबित खटले:-

 • देशभरातील प्रलंबित न्यायालयीन खटल्यांपैकी दोन तृतीयांश प्रकरणे ही जमीनजुमल्याशी संबंधित असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
 • एखाद्या जमिनीची योग्य मालकी प्रस्थापित करणे, मालकीहक्क मिळवणे यात २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीही वाया जातो. जमिनींना विशेष क्रमांक मिळाल्यानंतर यात मोठी सुधारणा घडण्याची चिन्हे आहेत.

विशेष क्रमांक काय साधणार?:-

 • देशातील प्रत्येक जमिनीस मिळणार विशेष क्रमांक
 • हा क्रमांक जीआयएस टॅग्ड असणार
 • जमिनीचा भौगोलिक ठावठिकाणा समजण्यास मदत
 • विशेष क्रमांकामध्ये संबंधित जमिनीचा पूर्वेतिहास म्हणजे आधीच्या मालकांचा तपशील, आधीचे व्यवहार, जमिनीचे क्षेत्रफळ आदी माहिती उपलब्ध
 • जमीनमालकीमध्ये पारदर्शकता
 • मालकीसंबंधी पारदर्शकतेमुळे गुंतवणूकदारांना विश्वास
 • जमिनींसंबंधीचे न्यायालयीन खटले घटणार
   

तिसऱ्या अपत्यावेळी प्रसूती रजा नाहीच

 • सरकारी रुग्णालयात नर्स असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला तिसऱ्या अपत्यावेळी प्रसूती रजेचा लाभ न देण्याचे आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिले आहेत.
 • मुख्य न्यायाधीश रमेश रंगनाथन आणि न्या. आलोक कुमार वर्मा यांनी यांच्या खंडपीठाने एक सदस्यीय खंडपीठाचा निकाल रद्द ठरवत याप्रकरणी नवा आदेश दिला आहे.
 • परिचारिका उर्मिला मसिह यांनी बाळंतपणाच्या रजेबाबत असलेल्या नियमांना आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. 
 • त्यावर जुलै २०१८ मध्ये न्या. राजीव शर्मा यांनी निकाल दिला होता. या निकालाला सरकारी पक्षाने पुन्हा आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देताना तिसऱ्या अपत्यावेळी प्रसूती रजेचा लाभ देण्यास नकार दिला आहे.
   
20 Sep Current Affairs
20 Sep Current Affairs

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केंद्र सरकारचा निर्णय

 • मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आज महत्वाची घोषणा केली. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर २२ टक्के करण्यात आले आहेत.
 • उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून, कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना २२ टक्के कर द्यावा लागेल आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागेल.

'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन:-

 • केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' या घोषणेला बळ देण्यासाठी सरकारनं प्राप्तिकर कायद्यात तरतूद केली आहे. 
 • चालू आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १ ऑक्टोबरनंतर उत्पादन प्रक्रियेत गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांकडे १५ टक्के दरापासून प्राप्तिकर भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर २०१९ किंवा त्यानंतरच्या भरतीय कंपन्यांना १५ टक्के कर भरावा लागेल. ३१ मार्च २०२३पूर्वी उत्पादन घेण्यास सुरुवात केली तर १५ टक्के कर भरावा लागेल. सर्व प्रकारचे अधिभार आणि सेस मिळून एकूण १७.१० टक्के प्रभावी दर आकारला जाणार आहे.

कॉर्पोरेट टॅक्स घटताच शेअर बाजार १८०० अंकांनी वधारला!:-

 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी आली. बीएसईचा प्रमुख निर्देशांक १६०० अंकांनी उसळून ३७,७६७.१३ वर पोहोचला. गेले काही दिवस शेअर बाजारात आलेली मरगळ अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे दूर झाली. गुंतवणूकदारांनी या उसळीनंतर शुक्रवारी सकाळी शेअर बाजारातून चक्क २.११ लाख कोटी रुपये कमावले.
 • वाढलेल्या निर्देशांकामध्ये बँकिंग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. सेन्सेक्स सर्व ३० शेअर्सच्या उसळीनंतर १६०० अंकांनी वधारला. निफ्टी ११,००० वर पोहोचला. निफ्टीच्या ५० पैकी ४९ शेअर्समध्ये तेजी आहे. २० मे नंतर बाजारात आलेली ही सर्वात मोठी तेजी आहे. यापूर्वी लोकसभेच्या एक्झिट पोलच्या वेळी शेअर बाजार उसळला होता.

कोट्यवधींची कमाई:-

 • शेअर बाजारातील उसळीनंतर BSE च्या यादीतील कंपन्यांचं भांडवल २,११,०८६.४२ कोटी ते १,४०,७९,८३९.४८ कोटींपर्यंत गेलं. सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्सपैकी NTPC वगळता सर्व कंपन्या ग्रीन यादीत गेल्या.

मिराबाईचा राष्ट्रीय विक्रम ब्राँझपदक मात्र हुकले

 • माजी जगज्जेती मिराबाई चानू हिने गुरुवारी जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या ४९ किलो वजनी गटात आपला राष्ट्रीय विक्रम मोडून काढला खरा; पण ही कामगिरी तिला पदक मिळवून देण्यासाठी पुरेशी पडली नाही. 
 • २५ वर्षांच्या मिराबाईला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीनपैकी दोन प्रयत्नांत मिराबाईने आपल्या कामगिरीतील सर्वोत्तम वजन उचलले. स्नॅचमध्ये मिराबाईने ८७ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये ११४ किलो वजन उचलले. असे एकूण २०१ किलो वजन मिराबाईने उचलले. 

मिराबाईचा याआधीचा राष्ट्रीय विक्रम:-

 • मिराबाईचा याआधीचा राष्ट्रीय विक्रम आहे तो १९९ (८८ किलो+१११ किलो) किलोचा आहे. ही कामगिरी तिने यंदा एप्रिलमध्ये पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली होती.
 • चीनच्या जियांग हुइहुआने नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तिने २१२ किलो वजन (९४+११८) उचलले. याआधीचा विश्वविक्रम चीनच्या होऊ झिहुईचा (२१०) आहे.
   
20 Sep Current Affairs
20 Sep Current Affairs

आर के एस भदौरिया वायुदलाचे नवे एअर मार्शल

 • एअर मार्शल आर. के. एस.  भदौरिया हे पुढील हवाईदल प्रमुख असतील. सध्या ते वायुदालचे व्हाइस चिफ आहेत. संरक्षण मंत्रालयाने आज ही घोषणा केली. 
 • फ्रान्सबरोबर झालेल्या राफेल या लढाई विमानांच्या खरेदी व्यवहारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सध्याचे इंडियन एअर  फोर्सचे प्रमुख बी. एल. धनोआ हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
 • संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विटरवरून ही माहिती दिली.  भदौरिया हे  १९८० साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. त्यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाणाचा अनुभव आहे. 
 • त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमान, जॅग्वार स्क्वाड्रनच्या नेतृत्वासह  २६ वेगवेगळ्या  प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. एअर फोर्स प्रमुख पदावर पोहचण्याआधी त्यांनी अन्य महत्त्वाच्या  पदांवर वेगवेगळ्या  जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »