21 July Current Affairs

21 July Current Affairs
21 July Current Affairs

सर्जिकल स्ट्राइक करा मोबाइलवरून हवाई दलाचा ऑनलाइन गेम

मोबाइलवर खेळल्या जाणाऱ्या 'वॉरगेम'ला तरुणाईचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय हवाई दलानेही आपल्या खास 'युद्धखेळा'ची निर्मिती केली आहे. 'इंडियन एअर फोर्स : अ कट अबाउव्ह' या नावाचा हा मोबाइल गेम ३१ जुलै रोजी दाखल होत आहे. याचा अधिकृत ट्रेलर शनिवारी हवाई दलातर्फे प्रसिद्ध करण्यात आला. मी एक योद्धा आहे, मला गर्व आहे, मी कोणालाही न घाबरणारा आहे' अशा विविध टॅगलाइनच्या माध्यमातून हा ट्रेलर तयार करण्यात आला आहे. या गेममध्ये दाखविण्यात आलेल्या वैमानिकाची प्रतिकृती ही विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्यासारखी दिसणार आहे. या गेममध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील विमानांसारख्या दिसणाऱ्या प्रतिकृती झळकतील. मोबाइल युजरना या खेळामध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' करायचे असून, शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्यांना हेरायचे आहे. 'येत्या ३१ जुलै रोजी हवाई दलातर्फे विकसित करण्यात आलेला एकल खेळाडूंसाठीचा हा गेम अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. तसेच लवकरच बहुखेळाडू व्हर्जनही बाजारात दाखल होईल', असे टि्वट करत हवाई दलाने शनिवारी या गेमचा ट्रेलर प्रसिद्ध केला. पाहता पाहता या ट्रेलरला हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले. गेमर्स समुहात याबाबत प्रचंड उत्सुकता असून बऱ्याच दिवसांपासून या गेमची वाट पाहात असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी टि्वटरखाली नोंदविल्या आहेत. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. 

गेली चाळीसहून अधिक वर्षे त्या वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र आणि विद्यार्थी सहायक समितीमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिलांसाठी कार्यरत होत्या. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुमारे २५० बालवाडी शाळांची निर्मिती झाली. ११ हजारांहून अधिक बालवाडी शिक्षकांना निर्मलाताईंच्या संस्थेने घडवले. ग्रामीण भागातील मुलांसाठी किशोर छंद वर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कायम झटत राहिल्या. 

निर्मला पुरंदरे यांच्यामागे पती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मुलगा अमृत व प्रसाद पुरंदरे, मुलगी माधुरी पुरंदरे, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. 

21 July Current Affairs
21 July Current Affairs

उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल सहा राज्यात राज्यपालांच्या नियुक्त्या

केंद्र सरकारने काही राज्यांचे राज्यपाल बदलले असून काही राज्यांमध्ये नव्याने राज्यपालांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. त्यानुसार मध्यप्रदेशच्या राज्यपाल आंनदीबेन पटेल यांनी उत्तरप्रदेशात राज्यपाल करण्यात आले आहे.

त्यांच्याकडील मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा कार्यभार बिहारचे विद्यमान राज्यापाल लालजी टंडन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बिहारच्या राज्यपालपदी फागू चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर.एन. रवि यांना नागालॅंडचे राज्यपाल करण्यात आले आहे. जनता दलाचे माजी आमदार जगदीप धनखर यांना पश्‍चिम बंगालचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्‍त्यांची अधिसूचना आज जारी केली.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात आले आहे. नव्या बदलात राम नाईक यांना स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावर उत्तर प्रदेशच्या राज्यपालांची जबाबदारी असेल. याआधी आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी, त्रिपुराचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी आणि नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. या चारही राज्यांत नव्याने नियुक्त्या करण्यात आल्यात. बिहार आणि मध्य प्रदेशमधील विद्यमान राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

डॉ तायडे यांना भीमसेन पुरस्कार

कलाश्री संगीत मंडळातर्फे यावर्षीपासून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना 'पं. भीमसेन जोशी कलागंधर्व पुरस्कारा'ने सन्मानीत करण्यात येणार आहे. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक डॉ. अविराज तायडे हे पहिल्याच पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

'११ हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे,' अशी माहिती कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक सुधाकर चव्हाण यांनी कळविली आहे.

येत्या २६ ते २८ जुलै दरम्यान रंगणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवात पंडितजींच्या कन्या शुभदा मुळगुंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे महोत्सव होणार आहे. महोत्सवात आजवर अनेक मान्यवर गायक व वादक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.

अविराज तायडे हे किरणा घराण्याचे गायक असून, त्यांना त्यांच्या मातु:श्री सुशीलाबाई यांच्याकडून संगीताचे बाळकडू मिळाले. सुरुवातीला संगीताचे औपचारिक शिक्षण त्यांनी देवरावजी भालेराव यांच्याकडून घेतले. त्यांनतर पं. रामभाऊ मते, पं. सी. आर. व्यास,पं. भीमसेन जोशी यांच्याकडून पुढील संगीत शिक्षण घेतले. सध्या ते एस. एन. डी. टी. विद्यापीठ, मुंबईचे अधिष्ठाता आहेत.

 

21 July Current Affairs
21 July Current Affairs

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी दहा कोटींची तरतूद

माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे स्मारक मिरामार येथे उभारले जाणार असल्याने त्या स्मारकासाठी दहा कोटी रुपयांची तरतुद गोव्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी जाहीर केले.
मिरामार येथे स्मारक बांधण्याचा संकल्प सरकारने अगोदर सोडला होता, पण अर्थसंकल्पीय तरतुद आताच करण्यात आली आहे. मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची समाधीही मिरामार येथेच आहे. बाजूलाच पर्रिकरांचे स्मारक उभे राहील. दोन दिवसांपूर्वीच आमदार रोहन खंवटे यांनीही हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. सरकार जर पर्रिकर यांच्या स्मारकाचे काम  लवकर सुरू करणार नसेल तर आपण लोकसहभागामधून स्मारक बांधून घेईन, असा इशारा खंवटे यांनी दिला होता. मात्र स्मारक सरकारच बांधील हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतुदही केली गेली.

दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर गोव्यातील पत्रादेवीच्या महामार्गाचे काम झाल्यानंतर पत्रदेवी ते पोळेर्पयतचा प्रवास केवळ दीड तासांत पूर्ण करता येईल. कदाचित दीड तासापेक्षाही कमी वेळ लागेल. पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्लॅस्टिकपासून बायोडिझेल निर्माण करणारा प्रकल्प पेडण्यात सुरू केला जाईल. क्रीडा व अन्य सर्व खात्यांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद केली आहे. सबका साथ, सबका विकास हे आमचे ध्येय आहे. 2०22र्पयत सर्व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचेही लक्ष्य आहे. सर्वत्र स्कील एज्युकेशनची सोय केली जाईल. पाचही सरकारी महाविद्यालये स्मार्ट क्लासच्या माध्यमातून जोडली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  जीएसटीमुळे 15 ते 16 टक्क्यांची तुट आलेली आहे पण केंद्र सरकार नुकसान भरपाई देते. आणखी पाच वर्षाचा कालावधी आम्ही वाढवून मागू, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले.

सरकारने कर्ज घेतले तरी, आम्ही अगोदरच रिझव्र्ह बँकेकडे खास निधी जमा केलेला आहे. एकूण सहाशे कोटींचा हा निधी असून जर एखाद्यावेळी कर्जाचा हप्ता थकला तर या सहाशे कोटींमधून तो कापून घेता येतो. दर महिन्याला सरकार ठराविक रक्कम या निधीत जमा करत असते, त्यामुळे कुणी कर्जाचा बाऊ करू नये व राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी अवाजवी चिंताही करू नये. आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित केले जात आहे. येत्या महिन्यापासून गृह आधार आणि लाडली लक्ष्मी योजनेच्या नव्या लाभार्थीचे अजर्ही मंजुर केले जातील. कोणतीच कल्याणकारी योजना आम्ही थांबवलेली नाही. ज्यांची खाती पूर्वी म्हापसा अर्बन बँकेत होती, त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाती स्थलांतरित केल्यानंतर त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा व्हायला हवी होती, ती झाली नाही. त्यामुळे काहीजणांना पैसे मिळाले नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. चोवीस तास गोव्याला पाणी पुरवठा व्हायचा असेल तर आणखी तीन वर्षाचा कालावधी जावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले.
खनिज खाणी लवकरच सुरू होतील पण तत्पूर्वी सरकार राज्यातील खनिज डंपांचा लिलाव पुकारील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उडान योजनेत 8 नवे मार्ग

सामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा यासाठी सुरु केलेल्या उडान योजनेअन्तर्गत 8 नवीन मार्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे अश्याप्रकारे सुरु झालेल्या मार्गान्ची एकूण संख्या आता 194 झाली आहे. 
या मार्गात
म्हैसूर-हैदराबाद 
म्हैसूर-हैदराबाद 
गोवा-म्हैसूर
म्हैसूर-गोवा 
कोचिन-म्हैसूर
म्हैसूर-कोचीन 
कोलकाता-शिलोन्ग 
शिलोन्ग-कोलकत्ता 
यान्चा समावेश आहे.
 

21 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »