22 Oct Current Affairs

22 Oct Current Affairs
22 Oct Current Affairs

इन्फोसिसचे शेअर कोसळले ४४ हजार कोटींचा फटका

 • देशातील दुसरी मोठी आयटी कंपनी असणाऱ्या इन्फोसिसला मोठा झटका बसला आहे. इन्फोसिसचे शेअरमध्ये मागील सहा वर्षात पहिल्यांदा १४ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. इन्फोसिसमधील काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले.
 • इन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्का आणि संस्थापक नारायणमूर्ती यांच्यातील वादाचा फटका याआधी इन्फोसिसला बसला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपानंतर आता कंपनीला मोठा झटका बसला आहे.
 • इन्फोसिस आपल्या उत्पन्नात आणि नफ्यांचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी केला. यामध्ये कंपनीचे काही उच्चपदस्थ असल्याचाही आरोप करण्यात आला. या आरोपाचे पडसाद आज मंगळवारी सकाळी शेअर बाजारात उमटले.
 • मागील आठवड्याच्या शुक्रवारी शेअर बाजारात इन्फोसिसचे मूल्य ७६७.७५ रुपये इतके होते. त्यामध्ये आज सकाळी १४ टक्क्यांची घसरण होत शेअर मूल्य ६४५ रुपयांपर्यंत आले. याआधी १२ एप्रिल २०१३ रोजी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहण्यास मिळाली. त्यावेळी २१.३३ टक्क्यांपर्यंत शेअर घसरले होते.
 • मंगळवारी झालेल्या शेअर घसरणीमुळे इन्फोसिसला आज सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची चर्चा आहे. जानेवारी २००० ते आजपर्यंत १६ वेळेस इन्फोसिसचे शेअर दुहेरी अंकानी घसरले आहेत.

आरोपांची चौकशी होणार:-

 • कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याचे इन्फोसिसने स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप, तक्रारी लेखा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. लेखाविभाग याची चौकशी करणार असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

 

मुंबईची भक्ती पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार

 • कनिष्ठ गटात कोल्हापूरच्या यश साळोखेने ५१९ गुणांसह सुवर्णविजेती कामगिरी केली.
 • राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा
 • राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील रायफल नेमबाजी प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबई शहरच्या भक्ती खामकरची भीष्मराज बाम स्मृती सर्वाधिक लक्षवेधी खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 • ५० मीटर रायफल प्रकारात तिने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. पिस्तूल नेमबाजीत हाच पुरस्कार पुण्याच्या हर्षवर्धन यादवला मिळाला.
 • त्याने २५ मीटर पिस्तूल प्रकारात दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात नाशिकच्या सागर विधातेने ५४० गुणांसह सुवर्ण जिंकले.
 • कनिष्ठ गटात कोल्हापूरच्या यश साळोखेने ५१९ गुणांसह सुवर्णविजेती कामगिरी केली.

निकाल:-

 • ५० मीटर पिस्तूल (पुरुष) : १. सागर विधाते (नाशिक), २. सलमान खान पटेल (कोल्हापूर), ३. राजेंद्र बागूल (पुणे); ५० मीटर पिस्तूल (कनिष्ठ) : १. यश साळोखे (कोल्हापूर), २. सुयश पाटील (कोल्हापूर), ३. प्रदीप निघोते (पुणे)

 

22 Oct Current Affairs
22 Oct Current Affairs

महाराष्ट्रातील बँका आजही बंदच

 • महाराष्ट्रातील व्यापारी बँका मंगळवारीदेखील बंदच राहणार आहेत. राज्यातील बँका सलग तिसऱ्या दिवशी बंद राहणार असल्याने खातेदार, ठेवीदार, ग्राहकांचे हाल कायम आहेत.
 • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरण विरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारच्या, २२ ऑक्टोबर रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून व्यापारी बँकांच्या घसरत्या ठेवी दरांविरोधातही तीव्र मत प्रदर्शित केले जाणार आहे.
 • रविवारच्या सुटीला विधानसभेसाठीच्या मतदानाची सुटी लागू झाल्याने महाराष्ट्रात मात्र सलग तिसऱ्या दिवशी व्यापारी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
 • ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ आणि ‘बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया’ने मंगळवारच्या संपाची हाक दिली असून विविध १० ते १२ कर्मचारी, अधिकारी संघटना आंदोलनात सहभागी होत आहेत.
 • रिझव्‍‌र्ह बँक, स्टेट बँक तसेच क्षेत्रीय ग्रामीण बँका तसेच खासगी व सहकारी बँकांचे कर्मचारी, अधिकारी मंगळवारच्या संपात सहभागी होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 • विविध १० सार्वजनिक बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. १ एप्रिल २०२० पासून त्याची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने होण्याची शक्यता आहे.
 • विलिनीकरणाविरोधात संघटनांनी गेल्या महिन्यातही संपाची घोषणा केली होती. मात्र लागून येणाऱ्या सुटीच्या पाश्र्वभूमीवर संपामुळे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून तो बँक व्यवस्थापनाच्या आवाहनानंतर मागे घेण्यात आला होता.

अँड्रू मॅक्डोनाल्ड राजस्थान रॉयल्सचे नवीन प्रशिक्षक

 • ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू मॅक्डोनाल्ड यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
 • पॅडी अपटन यांच्याजागी मॅक्डोनाल्ड आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला प्रशिक्षण देणार आहेत. अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या हंगामात राजस्थानचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर राहिला होता.
 • ३८ वर्षीय मॅक्डोनाल्ड यांनी ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून मॅक्डोनाल्ड यांनी चांगली कामगिरी केली आहे.
 • २०१८-१९ साली मॅक्डोनाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिक्टोरिया संघाने ऑस्ट्रेलियातील स्थानिक वन-डे संघाचं विजेतेपद पटकावलं होतं.
 • याव्यतिरीक्त मेलबर्न रेनिगेड्स संघाला बिग बॅश लिग स्पर्धेचं पहिलं विजेतेपद मिळवून देण्यात मॅक्डोनाल्ड यांचा महत्वाचा वाटा होता.
 • २०१८ साली मॅक्डोनाल्ड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते.
 • त्यामुळे आगामी हंगामात नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
22 Oct Current Affairs
22 Oct Current Affairs

आता शत्रूवर घातक वार DRDO बनवणार हायपरसॉनिक मिसाइल

 • भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने नव्या हायपरसॉनिक मिसाइलच्या निर्मितीवर काम सुरु केले आहे.
 • या मिसाइलचा वेग ध्वनिच्या वेगापेक्षा पाचपट अधिक असेल. या मिसाइलच्या चाचणीसाठी विंड टनेल आणि टेक्नोलॉजीवर लवकरच काम सुरु होईल.
 •  एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
 • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते लवकरच या सुविधा केंद्राचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
 • आम्ही हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची प्रणाली विकसित करण्यावर अत्यंत गांभीर्याने काम करत आहोत असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हायपरसॉनिक शस्त्रास्त्र प्रणाली ही पुढच्या पिढीची वेपन सिस्टिम असून या टेक्नोलॉजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत.
 • चीन, रशिया आणि अमेरिका हे शस्त्रास्त्रांमध्ये प्रगत देश आहेत. आपली संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी या देशांच्या हायपरसॉनिक शस्त्रांच्या वेगवेगळया प्रकारच्या चाचण्या सुरु आहेत.
 • सध्या अस्तित्वात असलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइलचा सुपरफास्ट स्पीड असला तरी हायपरसॉनिक मिसाइलची टेक्नोलॉजी एक पाऊल पुढे आहे. या मिसाइलचा माग काढणे किंवा मार्ग रोखणे अशक्य आहे.
 • अत्याधुनिक बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टिम विरोधात तग धरुन राहण्यासाठी हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे.
 • आपण कल्पनाही करु शकणार नाही इतक्या वेगवान गतीने पारंपारिक आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास हायपरसॉनिक मिसाइल सक्षम असेल. भारतात संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी डीआरडीओ आपले १५०० पेटंटसही देण्यास तयार आहे.
 • यामध्ये कठीण अशा मिसाइल, नौदल टेक्नोलॉजीचा समावेश आहे.
 • नवीन स्टार्ट अप कंपन्या, मध्यम आणि छोटया कंपन्या मोफतमध्ये हे पेटंट मिळवू शकतात.
 • "भविष्यात हायपरसॉनिक शस्त्रे महत्वपूर्ण ठरणार आहेत. चीनने त्यांच्याकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान असल्याचे दाखवून दिले आहे. अमेरिका आणि रशियाकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान आधीपासून उपलब्ध आहे.
 • आता भारतानेही त्या दिशेने काम सुरु केले आहे" असे निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद भाटीया यांनी सांगितले.

भारत अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार पुढाकार DTTI याची बैठक दिल्लीत होणार

 • पुढच्या आठवड्यात नवी दिल्लीत ‘भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार पुढाकार (DTTI) याची नववी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 • वर्तमानात DTTI उपक्रमाचे नेतृत्व अमेरिकेचे एलन एम. लॉर्ड आणि भारताचे संरक्षण सचिव अपूर्व चंद्रा हे करीत आहेत.

DTTI म्हणजे काय?:-

 • अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी DTTI हा उपक्रम आखण्यात आला आहे, कारण की दोन्ही देशातल्या भिन्न नोकरशाही प्रक्रिया आणि कायदेशीर आवश्यकता अस्तित्वात असल्यामुळे ती व्याख्या संकुचित होते. त्यामुळे हा उपक्रम अश्या अडथळ्यांना दूर करण्यास तसेच अमेरिकेच्या वरिष्ठ पातळीवरचा दृष्टिकोन विस्तारित करण्यास मदत करते.
 • त्यामुळे ही प्रक्रिया संरक्षण क्षेत्रातली संधी बळकट करण्यासाठी दोन्ही देशातली वरिष्ठ नेते सातत्याने गुंतलेले आहेत याची खात्री करण्यासाठी असलेली एक लवचिक यंत्रणा आहे.

महत्त्वाचे:-

 • दोन्ही देशांमध्ये होणार्‍या द्वैपक्षीय संरक्षण व्यापाराचे एकूण मूल्य या वर्षाच्या अखेरीस 18 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.
 • ऑगस्ट 2018 मध्ये अमेरिकेनी भारताला ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड अ‍ॅथॉरिटी टियर 1’ (STA-1) याचा दर्जा बहाल केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना एका सुव्यवस्थित प्रक्रियेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर दुहेरी-वापराजोगे आणि उच्च तंत्रज्ञानाच्या वस्तू भारताकडे निर्यात करण्याची परवानगी देऊन भारतासाठी अधिकच सुलभ सुविधा प्रदान केली गेली आहे.
 • एका अंदाजानुसार, 2025 या सालापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातला द्वैपक्षीय व्यापार 238 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. संरक्षण, विमान, तेल व नैसर्गिक वायू, कोळसा, यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांमध्ये भारतात अमेरिकेच्या गुंतवणूकीमध्ये संभाव्य वाढ होण्याची शक्यता आहे. तर भारतीय उद्योगाला वाहन, औषधी, सागरी अन्न, माहिती तंत्रज्ञान आणि प्रवासी सेवा अश्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेच्या बाजारपेठेत वाव आहे.

संयुक्त राज्ये अमेरिका (USA):-

 • उत्तर अमेरिका खंडातला संयुक्त राज्ये अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा संयुक्त संस्थाने म्हणजेच USA किंवा US) हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका या नावाने ओळखला जातो. देशातली प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत.
 • अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
 • 19 नोव्हेंबर 1493 रोजी ख्रिस्तोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.

 

22 Oct Current Affairs
22 Oct Current Affairs

G20 ओकायमा आरोग्य मंत्री परिषद

 • जपानमध्ये दोन दिवसीय जी-20 ओकायमा आरोग्य मंत्री परिषद आयोजित केली आहे.
 • जी-20 आरोग्य मंत्र्यांच्या विचारविनिमयात सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजची उपलब्धता, लोकसंख्येचे वृद्धिंगत प्रतिसाद, आरोग्य जोखमींचे व्यवस्थापन आणि मायक्रोबियल प्रतिरोधक क्षमता आणि त्यापासून बचाव यासारख्या आरोग्यविषयक सुरक्षा अशा चार प्रमुख समस्यांवर लक्ष केंद्रित केले गेले.  
 • जी-20 देशांना वाढती लोकसंख्या सुलभ, परवडणारी आणि उच्च प्रतीची दीर्घकालीन व्यापक आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या भारताच्या प्रयत्नांविषयी सांगण्यात आले.
 • या प्रसंगी इटली, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स सह द्वि-पार्श्वकीय बैठकीसाठी देखील वापरण्यात आला.

महिलांसाठी यूपी आणि महाराष्ट्र सर्वात असुरक्षित

 • महिलांच्या सुरक्षेबाबतचा राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल जारी झाला आहे. त्यात महिलांसाठी उत्तर प्रदेश सर्वात असुरक्षित राज्य असल्याचं नमूद केलं आहे.
 • महिलांसाठी असुरक्षित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं असून लक्षद्वीप महिलांसाठी सर्वात सुरक्षित प्रदेश असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
 • राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार देशात महिलांवरील गुन्ह्यांमद्ये ६ टक्क्याने वाढ झाली आहे. २०१७ मध्ये संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराचे ३,५९, ८४९ गुन्हे नोंद झाले आहेत. २०१६ मध्ये हा आकडा ३,३८,९५४ एवढा होता. सरकारकडून अनेक प्रयत्न करूनही महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण घटलेलं नाही.
 • उत्तर प्रदेशात महिलांवरील सर्वाधिक अत्याचाराची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराचे ५६,०११ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. म्हणजे संपूर्ण देशातील महिलांवरील अत्याचाराच्या १५.६ टक्के गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशात नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या ३१,९७९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
 • या यादीत पश्चिम बंगालचा तिसरा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील अत्याचाराचे ३०,९९२ गुन्हे दाखल झाले आहेत. मध्यप्रदेशात २९,७८८ आणि राजस्थानात २५,९९३ गुन्हे दाखल झाले आहेत.

लक्षद्वीपमध्ये ६ गुन्हे:-

 • महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात लक्षद्वीपचा पहिला नंबर लागतो. लक्षद्वीपमध्ये महिलांवरील अत्याचाराचे केवळ ६ गुन्हे दाखल झाले आहेत. दादरा-नगर हवेली २०, दमन-दीवमध्ये २६, नागालँडमध्ये ७९ आणि पुदूचेरीमध्ये १४७ गुन्हे दाखल झाले आहेत.

बलात्कार, हत्येचं प्रमाणही महाराष्ट्रात अधिक:-

 • महिलांवरील बलात्कार, सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर त्यांच्या हत्या करण्याचे सर्वाधिक गुन्हेही उत्तर प्रदेशात नोंद झाले आहेत.
 • उत्तर प्रदेशात हे एकूण ६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आसाममध्ये २७, महाराष्ट्रात २६, मध्यप्रदेशात २१ आणि ओडिशामध्ये ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हुंडाबळीचे गुन्हे:-

 • उत्तर प्रदेश: २५२४
 • बिहार : १०८१
 • मध्यप्रदेश : ६३२
 • पश्चिम बंगाल : ४९९
 • राजस्थान : ४५७

आत्महत्या करण्यास उत्तेजन देणे:-

 • महाराष्ट्र : ९५१
 • मध्यप्रदेश : ७०७
 • आंध्र प्रदेश : ५९७
 • तेलंगना : ५०१
 • पश्चिम बंगाल : ४४३

पती किंवा नातेवाईकांनी केलेले अत्याचार:-

 • पश्चिम बंगाल: १६८००
 • उत्तर प्रदेश : १२,६५३
 • राजस्थान: ११,५०८
 • आसाम : ९७८२
 • तेलंगना : ७८३८

महिलांचं अपहरण:-

 • उत्तर प्रदेश: १४,९९३
 • महाराष्ट्र : ६२४८
 • बिहार : ६१८२
 • आसाम : ५५५४
 • मध्यप्रदेश : ५२००

जबरदस्ती लग्नासाठी अपहरण:-

 • उत्तर प्रदेश: १२,३८२
 • बिहार : ४७७७
 • आसाम : ३१३८
 • मध्यप्रदेश : १३९२
 • राजस्थान : १३४१

१८ वर्षाखालील मुलींचं जबरदस्ती लग्नासाठी अपहरण:-

 • उत्तर प्रदेश: ३५५९
 • बिहार : २२१२
 • मध्यप्रदेश : १२०३
 • पंजाब : ७९५
 • गुजरात : ७०१

महिलांची तस्करी:-

 • महाराष्ट्र: १२७
 • आसाम : १०७
 • तेलंगना : ७७
 • पश्चिम बंगाल : ७१
 • आंध्रप्रदेश/ मध्यप्रदेश : ४२

बलात्कार:-

 • मध्यप्रदेश : ५५६२
 • उत्तर प्रदेश : ४२४६
 • राजस्थान : ३३०५
 • ओडिशा : २०७०
 • केरळ : २००३

१८ वर्षाखालील मुलीवर बलात्कार:-

 • मध्यप्रदेश : ३०६६
 • उत्तर प्रदेश : १५०४
 • ओडिशा : १२८५
 • छत्तीसगड : ११२०
 • केरळ : १०६९

वेश्याव्यवसाय:-

 • तमिलनाडु : २६६
 • महाराष्ट्रः ९१
 • कर्नाटकः ६६
 • आंध्रप्रदेशः २४
 • बिहारः १६

महिलांशी संबंधित सायबर क्राइम:-

 • आसमः १६९
 • पश्चिम बंगालः ६०
 • तेलंगनाः ३९
 • कर्नाटकः ३४
 • महाराष्ट्रः ३१

बालिकांवरील अत्याचार (पॉक्सो कायदा):-

 • महाराष्ट्रः २३८५
 • उत्तर प्रदेशः १५८०
 • कर्नाटकः १३०५
 • गुजरातः १२३३
 • पश्चिम बंगालः ११८८
22 Oct Current Affairs
22 Oct Current Affairs

मराठमोळ्या श्रद्धाने जिंकली ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धा

 • लंडन येथे रंगलेल्या ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा मेघराजनं मिसेस ब्रिटएशियाचा किताब पटकावला आहे.
 • ब्रिटएशिया ही स्पर्धा प्रामुख्यानं आशियातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात येते. कामानिमित्त लंडनमध्ये स्थायिक झालेले आशियातील नागरिक या स्पर्धेत भाग घेतात.
 • यंदा मिसेस ब्रिटएशिया २०१९चा किताब श्रद्धानं आपल्या नावावर केला आहे.
 • श्रद्धा मुळची मुंबईतील गिरगाव येथील असून लग्नानंतर ती लंडनमध्ये स्थायिक झाली.
 • ब्रिटएशियानं लंडनमध्ये स्थायिक असलेल्या आशियातील तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात अनेक तरूण मंडळी या स्पर्धेत आपलं नशीब आजमवतात.

म्हणून या मतदारसंघात केवळ एकाच मतदाराने केलं मतदान

 • राज्याच्या 288 विधानसभा जागांसाठी सोमवारी मतदान पार पडलं. यात राज्याच्या विधानसभा मतदारसंघातील पहिला मतदार संघ असलेल्या नंदुरबारच्या अक्कलकुवा मतदारसंघातील मणीबेली गावातल्या केवळ एकाच मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर आली आहे.
 • एकूण लोकसंख्या 1300 असलेल्या या गावात 328 नोंदणीकृत मतदार आहेत. त्यातील 327 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला, तर केवळ एकाच मतदाराने मतदान केलं.
 • इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मतदान करणाऱ्या एकमेव व्यक्तीनेही निवडणूक अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतरच मतदान केल्याची माहिती इतर गावकऱ्यांनी दिली.
 • दुपारपर्यंत कोणीही मतदानाला न आल्याने अखेर अधिकारी गावात गेले आणि त्यांनी घराघरात जाऊन मतदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण सर्वांनी नकार दिला केवळ एकाच मतदाराची समजबत काढण्यात त्यांना यश आलं.
 • सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या या मतदार संघातील गावात आज स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही वीज, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कमतरतेमुळे सर्वांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
 • या गावात रस्ते आणि वीजेची योग्य सोय नसल्याने येथील गावकऱ्यांनी याचा निषेध करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी ठराव करून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. तसेच येथील 25 घरांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.
 • १७ सप्टेंबर रोजी सरदार सरोवर धरणात पाणी सोडण्यात आले, त्यानंतर या भागातील घरे पाण्याखाली गेली होती. हा निर्णय सर्व गावकऱ्यांना मान्यही होता. पण, सहदेव दळवी या व्यक्तीने निवडणूक अधिकाऱ्याने त्याची समजूत काढल्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यामुळे त्याची या मतदाराची नोंद झाली.
22 Oct Current Affairs
22 Oct Current Affairs

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन ला FDA चा दणका ३३ हजार पावडरचे डबे मागवले परत

 • लहान मुलांसाठी प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या कंपनीला केंद्रीय अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) दणका दिला आहे.
 • कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे अंश आढळून आले आहेत. त्यामुळे कंपनीला मार्केटमधून तब्बल ३३ हजार डबे मागवावे लागले आहेत.
 • जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये ‘अ‍ॅसबेस्टस’ नावाचा पदार्थ सापडला आहे. या पदार्थामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
 • त्यामुळे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरचे ३३ हजार डबे परत मागवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या इतर उत्पादनांची आणि विक्री करणाऱ्यांकडील मालाची तपासणी करण्यासाठी १०० हून अधिक निरीक्षकांचे पथक देखील नेमण्यात आले आहे.
 • अलिकडेच अमेरिकेच्या आरोग्य नियामक मंडळाने ‘अ‍ॅसबेस्टस’ या पदार्थाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता.
 • या अहवालात अ‍ॅसबेस्टसमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते असे म्हटले होते. या अहवालानंतर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या अमेरिकेतील उत्पादनावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती.
 • त्यानंतर आता भारतातही या कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 • परिणामी कंपनीचे शेअर्स सहा टक्क्यांनी घसरले आहेत. असाच काहीसा प्रकार त्यांच्या गेल्या वर्षी त्यांच्या बेबी शॅम्पूच्याबाबतीतही घडला होता. या बेबी शॅम्पूमध्ये ‘फॉर्मेल्डिहाइड’ नावाचा मानवी शरीरासाठी हानीकारक असलेला पदार्थ सापडला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाने ते उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते.

दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही

 • दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास यापुढे सरकारी नोकरीला मुकावं लागणार आहे. आसाममधील सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
 • आसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं जाणार नाही.
 • सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागानं या निर्णयासंबंधी माहिती दिली.
 • छोटं कुटुंब पद्धतीनुसार १ जानेवारी २०२१ नंतर ज्या कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावं लागणार असल्याचं निर्णयात म्हटलं आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही निर्णय घेण्यात आले.
 • या अंतर्गत जमीन धोरणही मंजुर करण्यात आलं. भूमिहीन लोकांना शेतजमीन आणि घरं बांधण्यासाठीदेखील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी पुढील पिढीनं विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होती.
 • वाढती लोकसंख्या हे आपल्या देशापुढील मोठं आव्हान आहे. छोटं कुटुंब असणं हीदेखील देशभक्ती असल्याचं मत पंतप्रधानांनी बोलताना व्यक्त केलं. ज्यांच कुटुंब लहान आहे ते सन्मानाचे मानकरी आहेत.
 • वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे. यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं होतं.
22 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »