23 Oct Current Affairs

23 Oct Current Affairs
23 Oct Current Affairs

स्टॅच्यू ऑफ युनिटी ला २६ लाख पर्यटकांनी दिली भेट ७१ कोटींचा महसूल

 • गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.
 • गेल्या अकरा महिन्यात २६ लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली.
 • यामुळे आतापर्यंत तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. येत्या काही दिवसांत येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 • नर्मदा धरणापासून जवळ असेलला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे. हा पुतळा जगात सर्वात उंच आहे.
 • गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे गुजरातमधील छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.
 • हा पुतळा पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येत आहेत. गेल्या ११ महिन्यांत २६ लाखांहून अधिक पर्यटकांची येथे भेट दिली. त्यामुळं राज्याला तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
 • राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत.
 • त्यामुळं येत्या काळात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सरदार वल्लभभाई पटेल यांची ३१ ऑक्टोबरला जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक योजनांचे उद्घाटन होणार आहे.
 • रिव्हर राफ्टिंग, इको-टुरिझम, जंगल सफाई आदींसह अनेक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळं पर्यटकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
 • उत्सवी काळ सुरू झाला आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीपर्यंत या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांचा आकडा ३० लाखांहून अधिक होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टनं (एसव्हीपीआरईटी)' आतापर्यंत तिकीट विक्रीच्या माध्यमातून ७१.६६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
 • २६ लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झालेली आहे. या दिवाळी उत्सवादरम्यान तिकीट विक्रीचा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (वन आणि पर्यावरण विभाग) आणि सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव गुप्ता यांनी व्यक्त केली.
 • दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ ऑक्टोबरला स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणार आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं अनावरण गेल्या वर्षी झालं होतं. पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी येथील विकास योजना आणि पर्यटकांना आकर्षिक करणारी ठिकाणे खुली करण्यात येतील, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

सरकारी बँकांच्या खासगीकरणाची सूचना

 • अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावणारे अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नोबेलच्या घोषणेनंतर प्रथमच भारतात आलेल्या बॅनर्जी यांनी सरकारी बँकांमध्ये सरकारचे भागभांडवल ५० टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचा सल्ला दिला.
 • या सल्ल्याद्वारे बॅनर्जी यांनी सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचीच सूचना केल्याचे मानले जात आहे.
 • बँकिंग क्षेत्रापुढे निर्माण झालेल्या संकटाचा आढावा घेताना बॅनर्जी यांनी सरकारी बँकांमध्ये सरकारचे भागभांडवल ५० टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सरकारी बँकांमधील केंद्रीय दक्षता आयोगाची ढवळाढवळ थांबेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 • सरकारी बँकांमध्ये ५१ टक्के भांडवल असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीविरुद्ध चौकशी करता येते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी भागभांडवल ५० टक्क्यांच्या खाली आल्यास केंद्रीय दक्षता आयोगाची भूमिका संपुष्टात येईल, असे बॅनर्जी म्हणाले.
23 Oct Current Affairs
23 Oct Current Affairs

ब्रह्मोस ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य

 • 'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य!भारतीय हवाईदलाकडून जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून या क्षेपणास्त्राने ३०० किलोमीटरवरील लक्ष्याला भेदले आहे. ब्रह्मोस हे आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र असून अंदमान निकोबारमधील ट्राक बेटांवर ही चाचणी घेण्यात आली. याबाबत भारतीय हवाईदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.
 • भारतीय हवाईदलाने २१ आणि २२ ऑक्टोबर असे दोन दिवस लागोपाठ दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. दोन्ही क्षेपणास्त्रांनी ३०० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. रूटीन ऑपरेशनल ट्रेनिंगचा भाग म्हणून या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले.
 • ब्रह्मोस हे मध्यम श्रेणीतील सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असून पाणबुडी, जहाज, विमान वा जमिनीवरूनही हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. दोन क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीमुळे ३०० किलोमीटरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची भारताची क्षमता आणखी वाढली आहे.

हवाईदलाने काय म्हटलं?:-

 • ब्रह्मोसच्या चाचणीसाठी ३०० किलोमीटरवरील लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. दोन्हीवेळा क्षेपणास्त्र डागल्यानंतर क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्याचा वेध घेतला. या चाचणीमुळे जमिनीवरून जमिनीवरचं लक्ष्य भेदण्याची भारतीय हवाईदलाची क्षमता आणखी वाढली आहे, असे हवाईदलाने ट्विटमध्ये नमूद केले आहे.
 • दरम्यान, याआधी ३० सप्टेंबर रोजी अशाचप्रकारे ओडिशा येथील चंदीपूर किनाऱ्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटर होता व ते जमिनीवरून तसेच समुद्रातील तळांवरून डागता येणारे क्षेपणास्त्र होते. 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र 'डीआरडीओ' आणि रशियाच्या 'एनपीओएम'कडून संयुक्तपणे विकसित करण्यात आले होते.

सौरव गांगुलीने स्वीकारला बीसीसीआय च्या अध्यक्षपदाचा पदभार

 • टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज (बुधवार) अधिकृतपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या बरोबरच सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली मंडळाचे कामकाज पाहणाऱ्या प्रशासकांच्या समितीचा (CoA) कार्यकाल देखील संपुष्टात आलेला आहे. या पुढे मंडळाशी संबंधित सर्व कामकाज बीसीसीआयचे निवडून आलेले प्रतिनिधीच पाहणार आहेत.
 • सुप्रीम कोर्टाने निश्चित केलेल्या जबाबदारीबाबत आपण अतिशय समाधानी असल्याची प्रतिक्रिया बुधवारी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी आलेले सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी या सभेत उपस्थित राहण्यापूर्वी म्हटले आहे.
 • बीसीसीआयच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याबरोबर कामाला सुरुवात करावी असे निर्देश या पूर्वी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने प्रशासकांच्या समितीला दिले होते. भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) विनोद पाय यांच्या नेतृत्वात ही प्रशासकीय समिती गेल्या ३३ महिन्यांपासून मंडळाचे कामकाज पाहत होती.
 • सन २०१३ मध्ये आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपांनंतर सुप्रीम कोर्टाला बीसीसीआयच्या कामकाजाची दखल घ्यावी लागली होती. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचार संपावा, यासह अनेक सुधारणा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने २२ जानेवारी २०१५ या दिवशी न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वात एका समितीचे गठन केले होते. समितीने त्याच वर्षी १४ जुलै या दिवशी आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या उद्देशाने प्रशासकीय समितीचे गठन केले होते.

गांगुलीला मिळणार १० महिन्यांचा कार्यकाळ:-

 • गांगुलीला अवघ्या १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. गांगुलीला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनची धुराही त्यानं यशस्वीरित्या सांभाळली आहे.
 • सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासाकीय समितीमुळं क्रिकेटची घडी विस्कटल्याचा अनेकांचा आरोप आहे. ही घडी पुन्हा बसविण्यासाठी गांगुलीसारखा प्रशासक हवा, असं अनेकांचं मत होतं. त्यातूनच त्याचं नाव पुढं आल्याचं सूत्रांकडून समजतं.

 

23 Oct Current Affairs
23 Oct Current Affairs

ICC रँकिंगमध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत टॉप १० मध्ये स्थान रोहित शर्मा

 • दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीला येऊन दमदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मानं आयसीसी रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
 • आयसीसी रँकिंगमध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत टॉप १० मध्ये स्थान मिळवण्याचा मान त्यानं मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
 • याआधी कर्णधार विराट कोहली आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या गौतम गंभीरनं ही किमया साधली होती.
 • रांचीमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात २१२ धावांची खेळी करून १२ स्थानांनी झेप घेत रोहित शर्मा आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये दहाव्या स्थानी पोहोचला आहे. अजिंक्य रहाणे यानं आयसीसी रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
 • कसोटी फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत कोहली आणि चेतेश्वर पुजारानंतर तो तिसरा भारतीय ठरला आहे. मयांक अग्रवाल हा १८व्या स्थानी आहे. प्लेअर ऑफ द सीरीजचा मानकरी ठरलेला रोहित शर्मा या मालिकेआधी कसोटी क्रमवारीत ४४ व्या स्थानी होता.
 • रोहित फेब्रुवारी २०१८मध्ये आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या आणि नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या टी-२० जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी होता. विराट कोहली हा तिन्ही प्रकरांत पहिल्या स्थानी होता. तर गंभीरनं त्याच्या कारकिर्दीत कसोटी आणि टी-२०मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं.
 • एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत तो आठव्या स्थानी होता. दरम्यान, दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे आयसीसी कसोटी क्रमवारीत अनुक्रमे १४व्या आणि २१व्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जॉर्ज लिंडे हा १०४व्या स्थानी आहे.

रोहितनं कसोटीत पहिलं द्विशतक झळकावलं:-

 • भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा यानं रांचीमध्ये कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं. त्यानं २५५ चेंडूंमध्ये २१२ धावा कुटल्या. यात सहा षटकार आणि २८ चौकारांचा समावेश होता.
 • तिसऱ्यांदा त्यानं दीडशतकी खेळी केली. याआधी १७७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्यानं ही खेळी केली होती. रोहित शर्माने २५५ चेंडूंत २१२ धावा केल्या होत्या. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
 • रांचीत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यानं हे पहिलं द्विशतक पूर्ण केलं. तिसऱ्यांदा त्यानं १५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी १७७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

 

नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर हाँगकाँगने अखेर वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक केले रद्द

 • हाँगकाँग सरकारने अखेर वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक रद्द केल्याचे वृत्त आहे. स्थानिक माध्यमांतील वृत्तांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. या कायद्याविरोधात अनेक महिन्यांपासून येथील नागरिकांकडून आंदोलने सुरु होती. मोठ्या प्रमाणावर याला विरोध झाल्यानेच सरकारला अखेर हे विधेयक मागे घ्यावे लागले.

या प्रस्तावित कायद्यानुसार:-

 • जर कोणी व्यक्ती इतर देशात गुन्हा करुन हाँगकाँगमध्ये आला तर त्याला चौकशीसाठी चीनला पाठवण्यात येणार होते. हाँगकाँग सरकारच्या या सध्याच्या कायद्यात बदल करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला होता.
 • हा प्रस्ताव मांडण्याला एक घटना कारणीभूत ठरली होती. ज्यामध्ये हाँगकाँगमधील एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीची तैवानमध्ये हत्या केली होती त्यांनतर तो पुन्हा हाँगकाँगमध्ये परतला होता.
 • हाँगकाँग हे चीनच्या अधिपत्याखालील एक स्वायत्त बेट आहे. चीन याला आपल्या सार्वभौम देशाचा एक भाग मानतो. दरम्यान, हाँगकाँगचा तैवानसोबत कोणताही प्रत्यार्पण करार झालेला नाही. त्यामुळे हत्येचा खटला चालवण्यासाठी संबंधित व्यक्तीला तैवानला पाठवणे कठीण होते.
 • त्यामुळे जर हे विधेयक मंजुर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले असते तर चीनला त्या देशांसोबत गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाची परवानगी मिळाली असती, ज्या देशांसोबत हाँगकाँगने करार केलेले नाहीत. यामुळे संबंधित गुन्हेगाराला तैवान आणि मकाऊ या देशांकडे प्रत्यार्पित करता आले असते.
 • दरम्यान, हाँगकाँगच्या लोकांनी या कायद्याला जोरदार विरोध केला. सरकारने हा कायदा निलंबित केला तरी देखील लोकांची आंदोलने थांबली नाहीत. त्यांचे म्हणणे होते की, हा कायदा पूर्णपणे संपवला जावा.
 • कारण, या लोकांचे म्हणणे आहे की जर कायदा कधी मंजुर झाला तर हाँगकाँगच्या नागरिकांना चीनचा कायदा लागू होईल. ज्यामुळे चीन मनमानी पद्धतीने हाँगकाँगच्या नागरिकांना अटक करेन आणि त्यांना त्रास देईल.
 • इथल्या जनतेला आता हाँगकाँगच्या सरकारवर आजिबात विश्वास राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून इथल्या लोकांमध्ये सरकारविरोधात अविश्वासात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कारण, इथले सरकार चीनची राजधानी बीजिंगच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

 

23 Oct Current Affairs
23 Oct Current Affairs

बँकांचे भांडवली दुर्भिक्ष ३.५ लाख कोटींवर जाणार फिच

 • बँकेतर वित्तीय कंपन्यांमधील संकट वित्तीय व्यवस्थेला आव्हान देण्याच्या पातळीवर गेल्यास, देशातील बँकांच्या भांडवलाच्या दुर्भिक्षाची स्थिती आणखीच गंभीर बनत जाईल. भांडवली पर्याप्ततेसाठी बँकांना ३.५ लाख कोटी रुपयांची तूट जाणवेल, असा जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच’चा कयास आहे.
 • रोकड तरलतेच्या अभावी एका मागोमाग एक बँकेतर वित्तीय कंपन्या अपयशी ठरण्याचा संभाव्य परिणाम हा संपूर्ण वित्तीय क्षेत्राला कवेत घेणारा ठरेल, असे निरीक्षण ‘फिच’ने राबविलेल्या ताण चाचणीअंती नमूद केले आहे.
 • बँकेतर वित्तीय कंपन्यांना बँकांना दिलेली ३० टक्के अर्थसाहाय्य हे येत्या काळात अनुत्पादित (एनपीए) अर्थात बुडीत खाती जाईल, अशी भीतीही फिचने व्यक्त केली आहे.
 • स्थावर मालमत्ता विकासक हे विशेषत: पतपुरवठय़ासाठी बँकेतर वित्तीय कंपन्यांवर अवलंबून होते. त्यातील जवळपास ३० टक्के पतपुरवठय़ाची परतफेड रखडण्याची शक्यता दिसून येते.
 • त्याचा ताण बँकांनाही सोसावा लागेल आणि अलिकडच्या काळात बँकांच्या कामगिरीत दिसून आलेल्या सुधारणेवर पुन्हा पाणी फेरले जाईल, असा इशारा फिचने दिला आहे.
 • बँकांचा ग्रॉस एनपीए २०१८-१९ मधील ९.३ टक्के पातळीवरून, २०२०-२१ मध्ये ११.६ टक्के पातळीवर जाऊ शकेल. अर्थातच या स्थितीत अधिकाधिक भांडवल मिळवून बँकांना या स्थितीचा मुकाबला करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असे तिचे निरीक्षण आहे.
 • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ३० ऑगस्टला पत्रकार परिषदेत बोलताना, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता सुधारत असल्याचे नमूद केले.
 • या बँकांमधील ढोबळ अनुत्पादित मालमत्ता (ग्रॉस एनपीए) मार्च २०१९ अखेर ७.९ लाख कोटी रुपयांवर घसरली असल्याचेही त्या म्हणाल्या. डिसेंबर २०१८ अखेर बँकांच्या ग्रॉस एनपीएचे प्रमाण ८.६५ लाख कोटी रुपये होते.

BSNL MTNLचे विलिनिकरण होणार मंत्रीमंडळाचा निर्णय

 • MTNL आणि BSNL या सरकारी टेलिकॉम कंपन्यांच्या विलिनिकरणाचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
 • अडचणीत असलेल्या या दोन्ही कंपन्या बंद होणार नाहीत, असे स्पष्टीकरणही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
 • प्रसाद म्हणाले, MTNL किंवा BSNL या सरकारी कंपन्या बंद होणार नाहीत किंवा त्यांच्यातील गुंतवणूकही कमी केली जाणार नाही. तसेच इतर कोणत्याही तिसऱ्या कंपनीला यामध्ये सामावून घेतले जाणार नाही.
 • दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत MTNL आणि BSNL या कंपन्यांच्या पुनरुज्जीवन योजनेला तसेच त्यांच्या विलिनिकरणाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे यापुढे MTNL ही BSNLची सहाय्यक कंपनी म्हणून काम करेल.
 • मात्र, या दोन्ही कंपन्यांच्या विलिनिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.  तसेच सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपन्यांना 4G स्पेक्ट्रमचे वाटप करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली असून या दोन्ही कंपन्यांमधील मनुष्यबळ कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीचे आकर्षक पॅकेजही जाहीर करण्यात आल्याचीही घोषणा त्यांनी केली.
23 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »