23 Sep Current Affairs

23 Sep Current Affairs
23 Sep Current Affairs

देशातील २०२१ ची जनगणना अॅपमधून होणार

 • देशात होणारी १६ वी जनगणना ही डिजिटल होणार असून अॅपच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. 
 • २०२१ ची जनगणना ही १६ वी जनगणना असून ती स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. १६० वर्षानंतर जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदा अॅपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे.
 • देशातील सर्व नागरिकांना बहुउद्देशीय ओळख पत्र (मल्टिपरपस आयडी कार्ड) देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. 
 • यात आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खाते यासारखी सुविधा मिळणार आहे. 
 • ही सर्व माहिती एका अॅपमधून गोळा केली जाणार आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल सेन्ससवर एकूण १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येईल. 
 • इतिहासात पहिल्यांदा अॅपमधून ही जनगणना केली जाणार असून यासाठी डुअर-टू-डुअर जाऊन लोकांच्या मोबाइलमधून ही माहिती गोळा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
 • देशातील जनगणना ही दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने मार्च महिन्यात दिली होती. सेन्सस २०२१ ची प्री टेस्ट १२ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झाली होती. ती आता या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. 
 • जनगणना करण्यासाठी एकूण ३३ लाख लोकांची मदत घेतली जाणार आहे. ही सर्व लोक घराघरांत जाऊन सर्व माहिती गोळा करतील. जनगणना एकून १६ भाषेत केली जाणार आहे. जनगणना करणे हे कंटाळवाने काम नाही. 
 • यातून सरकारच्या योजना पोहोचतात. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदनी (एनपीआर) च्या मदतीने सरकारला देशातील समस्यांची माहिती समजण्यासाठी मदत होत असते.
   

वारसावस्तूंचा केंद्रीय डेटाबेस तयार होणार

 • सागरताळाशी सापडलेली द्वारकानगरी, हंपी येथे नव्याने होत असलेले उत्खनन... या आणि अशा सर्व ऐतिहासिक वारसावास्तूंची माहिती उपग्रहाद्वारे संकलित करून येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी जतन करून ठेवली जाणार आहे. 
 • तंत्रज्ञानाच्या मदतीने वारसावस्तूंचा केंद्रीय डेटाबेस लवकरच तयार होणार असून त्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) आणि टाटा ट्रस्ट यांच्यात लवकरच सामंजस्य करार होणार आहे.
 • या करारांतर्गत पुरातत्त्व विभाग स्वतःचे डिजिटल वारसावस्तू माहिती संकलन तयार करणार आहे. या माहितीच मालकी भारताची राहणार असून ही सर्व माहिती संगणकीय क्लाऊडवर सुरक्षित साठवून ठेवली जाणार आहे. पुढील दहा वर्षे ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये परिचित तसेच अपरिचित वारसास्थळांची माहिती संकलित व छायांकित केली जाणार आहे.
 • देशाच्या पुरातत्त्व वारशाविषयी अशा प्रकारे माहिती गोळा करण्यात येणार असल्याने औतिहासिक महत्त्वाच्या वारसावस्तूंची अवैध निर्यात, आयात तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या दस्तावेजांचे अवैध मालकी हस्तांतरण याला आळा बसणार आहे. युनेस्को कन्व्हेन्शनमधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही यंत्रणा विकसित केली जाणार आहे. माहिती संकलनाची सुरुवात गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांपासून होणार आहे.

सामंजस्य करारामुळे हे होणार:-

 • अपरिचित ऐतिहासिक स्थळांचा शोध घेतला जाईल
 • अपरिचित वारसास्थळे आणि तेथील अमूल्य वस्तू यांचा शोध घेणे होणार शक्य
 • वारसावस्तूंची माहिती निश्चित प्रणालीनुसार संकलित करून साठवली जाईल
 • उपग्रह छायांकन व दूरस्थ संवेदनातंत्राचा वापर केला जाणार
 • असे करणार संकलन
 • उपग्रहाद्वारे वारसास्थळाचा शोध घेतल्यावर त्याची छायाचित्रे काढली जातील
 • या छायाचित्रांच्या साह्याने त्या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन खातरजमा केली जाईल
 • त्या स्थळाची ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक माहिती ताडून पाहीली जाईल
 • अशा स्थाळांचे दस्तावेजीकरण करण्यात येईल आणि ही माहिती सर्वांसाठी खुली केली जाईल.
   
23 Sep Current Affairs
23 Sep Current Affairs

कॉर्पोरेट टॅक्स इफेक्ट निर्देशांक आजही वधारलेला

 • शेअर बाजाराचा शुक्रवारचा मूड आज सोमवारीही कायम आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने केलेल्या कॉर्पोरेट टॅक्स कपातीच्या घोषणेनंतर वधारलेला शेअर बाजार आज सोमवारी सकाळी खुला झाला तेव्हाही निर्देशांक ११११.२१ अंकांनी वाढलेला होता. 
 • शेअर बाजाराचा निर्देशांक ३९,१२५.८३ तर निफ्टी २६८ अंकांनी वाढून ११,५४२.७० होता.
 • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी कॉर्पोरेट कर कपात जाहीर केली. सरकारचा चालू आर्थिक वर्षाचा १.४५ लाख कोटी रुपयांचा महसूल त्यामुळे बुडणार आहे. 
 • पण या निर्णयामुळे बाजारात थोडी धुगधुगी आली आहे. त्याचा परिणाम आजही दिसून येत आहे.
 • आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमच्या शेअर्सचे दर ५ ते ७ टक्क्यांनी वाढले आहेत. 
 • या कॉर्पोरेट टॅक्स कपातीकडे परदेशी गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे. 
 • सध्याच्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांहून घटवून २२ टक्के करण्यात आला आहे, तर १ ऑक्टोबर २०१९ नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर २५ टक्क्यांवरून घटवून १५ टक्के करण्यात आला आहे.
   

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

 • ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. 
 • उस्मानाबाद येथे महामंडळाच्या कार्यालायात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीपूर्वी नावाची चर्चा होऊ नये, म्हणून चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याची सूचना देण्यात आली होती. त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव पहिल्या मिनीटापासनू अग्रक्रमावर राहिले. अखेर त्यांच्या नावावर एकमताने पसंतीची मोहोर उमटवण्यात आली.

फ्रान्सिस दिब्रिटो:-

 • अनेक वर्षे विविध विषयांवर लेखन करणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना नुकताच ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. 
 •  ‘फ्रान्सिस दिब्रिटो’ असे नाव असलेले हे व्यक्तिमत्त्व अस्सल मराठमोळे आहे. ते कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. 
 • लेखक म्हणून त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून जास्त प्रमाणात आहे. ते धर्मगुरू आहेत, पण त्यांचा धर्म हा चर्चपुरता मर्यादित नाही.
 • मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. या मासिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि वेगवेगळे विषय, उपक्रम त्यांनी सातत्याने हाताळले. त्यामुळे हे मासिक फक्त ख्रिस्ती समाजापुरते मर्यादित न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने आपला स्वतंत्र ठसा उमटविला.
 • ‘हरित वसई संरक्षण समिती’ च्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. 
 • वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ याच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोहीम राबविली. पुणे येथे १९९२ मध्ये झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 
 • ‘तेजाची पाऊले’, ‘संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची- इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास’, ‘आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. 
 • समाजासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना दिब्रिटो यांनी नेहमीच कृतिशील पाठिंबा दिला आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून त्यांनी स्वत:ला समाजाशी जोडून घेऊन वेळोवेळी आपल्या ‘समाजधर्मा’ चेही पालन केले आहे.
   
23 Sep Current Affairs
23 Sep Current Affairs

उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ

 • देशातील उच्चशिक्षणासाठी पात्र वयोगटातील प्रत्यक्षात उच्चशिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो – जीईआर) यंदा एका टक्क्याने वाढले असून २६.३ टक्के विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाणही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढले आहे.
 • मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून दरवर्षी अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण केले जाते. भारत उच्चशिक्षणात कुठे आहे याचे चित्र या सर्वेक्षणातून समोर येते. 
 • उच्चशिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, शिक्षकांची संख्या, सुविधा, परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण, विद्यापीठांची संख्या, महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थ्यांचा विषयानुरूप कल अशा पातळ्यांवर हे सर्वेक्षण केले जाते. 
 • गेल्या शैक्षणिक वर्षांचा (२०१८-१९) अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उच्चशिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण साधारण १ टक्क्याने वाढले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत भारताचा जीईआर २५.३ टक्के होता. आता तो २६.३ टक्के झाला आहे. 
 • महाराष्ट्रातील प्रमाणही वाढले असून देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्राचा जीईआर ३० टक्के आहे.

परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली:-

 • आंतरराष्ट्रीय मानांकने मिळवण्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या हा एक महत्वाचा निकष असतो. २०१७-१८ च्या तुलनेत भारतात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षी वाढली आहे. 
 • २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत ४६ हजार १४४ परदेशी विद्यार्थी भारतात शिक्षण घेत होते. गेल्यावर्षी ही संख्या ४७ हजार४२७ झाली आहे.
 • देशात सर्वाधिक परदेशी विद्यार्थी (१० हजार २३) कर्नाटकमध्ये आहेत. परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात ५ हजार ३ परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 
 • देशभरातील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे नेपाळ, तर त्यानंतर अफगाणिस्तानमधून आलेले आहेत. सध्या साधारण दीड हजार विद्यार्थी अमेरिकेतील आहेत. परदेशी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे आहे.
   

दिविज शरणचे पाचवे विजेतेपद

 • भारताचा दिवीज शरण आणि स्लोव्हेकियाचा इगोर झेलेने या जोडीने सेंट पीटर्सबर्ग एटीपी टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. 
 • अंतिम सामन्यात रविवारी त्यांनी इटालियन जोडी मॅट्टियो बेरेंटीनी व सिमोन बोलेल्ली यांना ६-३, ३-६, १०-८ अशी मात दिली.
 • या विजेतेपदाने दिवीज व इगोर जोडीला २५० एटीपी गुणांची कमाई झाली आहे. ३३ वर्षीय दिवीजचे हे दुहेरीचे पाचवे विजेतेपद असून त्याने यंदा रोहन बोपन्नाच्या जोडीने पुण्यात महाराष्ट ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावून यंदाची सुरूवात यशस्वी केली होती. 
 • यंदा त्याने महाराष्ट्र ओपनशिवाय निंगबो चॅलेंजर स्पर्धासुद्धा जिंकली आहे.
 • उपांत्य फेरीत दिवीज व इगोर या जोडीने अग्रमानांकित निकोला मेक्तीक व फ्रँको स्कुगोर या क्रोएशियन जोडीला ७-५, ६-१ असा पराभवाचा धक्का दिला होता.
   
23 Sep Current Affairs
23 Sep Current Affairs

राहुलची मराठी पताका जागतिक कुस्ती स्पर्धा २०१९

 • महाराष्ट्राचा कुस्तीगीर राहुल आवारे याने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत मराठी पताका फडकवली. अमेरिकेच्या टायलर ली ग्राफविरुद्ध त्याने ११-४ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून ब्राँझपदकाची कमाई केली. 
 • हे महाराष्ट्रातील मराठमोळ्या कुस्तीगीराचे या स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले. याआधी संदीप तुलसी यादव, नरसिंग यादव या महाराष्ट्रातील खेळाडूंनी जागतिक स्तरावर पदके जिंकली होती.
 • 'या स्पर्धेत मिळालेल्या पदकामुळे आपण धन्य झालो. पहिलाच मराठमोळा खेळाडू असल्याचा आनंद काही वेगळाच आहे. या पदकामुळे ऑलिम्पिक पदक आपल्यापासून दूर नाही, याची खात्री पटली. देशासाठी, महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखविण्याचे स्वप्न पूर्ण झाले,' अशा शब्दांत राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या. भारताला या स्पर्धेत एक रौप्य आणि चार ब्राँझपदके मिळाली आहेत.
 • राहुलने ब्राँझपदकासाठी झालेल्या या झुंजीत अमेरिकेच्या टायलर ली ग्राफ याच्यावर ११-४ अशी मोठ्या फरकाने मात करून आपले वर्चस्व दाखवून दिले. दुसऱ्या लढतीत भारताच्या दीपक पुनियाने मात्र दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
 • भारताच्या बजरंग पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट यांनीही या स्पर्धेत पदके जिंकली. २०१३च्या जागतिक स्पर्धेत भारताने तीन ब्राँझपदके जिंकली होती. त्यामुळे यावर्षीच्या जागतिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी म्हणता येईल.
 • २७ वर्षीय राहुलने याआधी, २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ती त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याआधी, २००९ आणि २०११मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही ब्राँझपदके जिंकली होती.
 • याआधी, महाराष्ट्रातून संदीप तुलसी यादव, नरसिंग यादव यांनीही जागतिक कुस्तीत पदके जिंकली आहेत. पण, मराठमोळा चेहरा म्हणून राहुल आवारे हा पहिलाच कुस्तीगीर ठरला आहे. मारुती माने यांनी जागतिक कुस्तीत तीनवेळा ऑलिम्पिक पदकविजेत्या मेदवेदेवविरुद्ध चुरशीची झुंज दिली होती; पण त्यांना यश आले नव्हते. 
 • मात्र, त्यानंतर राहुल आवारेच्या रूपात प्रथमच मराठमोळा कुस्तीगीर जागतिक स्तरावर पदकविजेता ठरला. राहुलला नुकतीच उपअधीक्षक म्हणून पोलिस खात्यातील नोकरीच्या नियुक्तीचे पत्रही मिळाले आहे. त्यामुळे हा त्याच्यासाठी दुग्धशर्करा योग आहे.
 • दुखापतींमुळे आपण काही वर्षांपूर्वी मागे पडलो होतो. २०१४ला मी सज्जही होतो. पण, त्यावेळी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांसाठी चाचणी होत नसे. त्यामुळे मला माझी क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. ती मिळेल की नाही अशी भीती होती. पण, काहीतरी चांगले होईल, असा विश्वास होता. ती संधी अखेर मला मिळाली.
 • १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले ऑलिंपिक वैयक्तिक पदक जिंकून दिले ते महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी. आता जागतिक स्तरावर हरिश्चंद्र बिराजदार यांचा पठ्ठ्या असलेल्या राहुलने मराठी पताका फडकाविली आहे.
 • पहिल्या सत्रात राहुलने टायलरविरुद्ध ४-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या सत्रात राहुलने आणखी आक्रमक धोरण अवलंबत १०-२ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यावर अमेरिकेच्या खेळाडूने रेफ्रींकडे दादही मागितली; पण ती फेटाळली गेली आणि राहुलने ११-४ अशी लढत जिंकली.

दुखापतीमुळे दीपकची हुकली संधी:-

 • रविवारी भारताला दीपक पुनियाच्या रूपात अंतिम फेरीत अपेक्षा होत्या. पण, दुखापतीमुळे तो अंतिम फेरीत खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तो म्हणाला, 'डाव्या पायाला उपांत्य फेरीत झालेल्या दुखापतीमुळे त्यावर आणखी भार देणे शक्य नव्हते. ती दुखापत वाढण्याची शक्यता होती. याझदानीशी खेळण्याची एक नामी संधी होती; पण दुर्दैवाने ती हुकली.'
 • जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. याआधी, बिशंभर सिंग (१९६७), सुशील कुमार (२०१०), अमित दहिया (२०१३), बजरंग पुनिया (२०१८) यांनी ही कामगिरी करून दाखविली होती. त्यात सुशीलकुमार हा एकमेव सुवर्णविजेता आहे.

दृष्टिक्षेप:-

 • राहुल आवारेला जागतिक कुस्तीचे ब्राँझ
 • पदक जिंकणारा महाराष्ट्रातील पहिला मराठमोळा खेळाडू
 • दीपक पुनियाला दुखापतीमुळे रौप्य
 • भारताची आतापर्यंतची जागतिक स्पर्धेत ५ पदकांची सर्वोच्च कामगिरी

[Note:- कझाकस्तानची राजधानी अस्थाना चे नाव बदलून नूर सुलतान करण्यात आले, ही बातमी आपण मार्च २०१९ मध्ये कव्हर केली होती आणि यावर आयोगाने लगेचच म्हणजे MPSC क्लास थ्री च्या पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला देखील होता. आता या वर्षी जागतिक कुस्ती स्पर्धा 2019 याच राजधानीत होत असल्याने यावर प्रश्न विचारण्याची शक्यता अजून जास्त वाढते.]

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »