25 August Current Affairs

25 August Current Affairs
25 August Current Affairs

सिंधूनं पटकावलं बॅडमिंटन अजिंक्यपद

 • भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज इतिहास रचला. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. 
 • अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ठरली. 
 • अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असे पराभूत केले. सिंधूने हा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावलं आहे. 
 • यापूर्वी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताकडून कोणत्याही पुरूष किंवा महिला खेळाडूने ही ऐतिहासिक कामगिरी केलेली नाही.
 • बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाची खेळाडू जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सिंधूचा सामना झाला. 
 • रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने ओकुहाराला अवघ्या ३७ मिनिटांत सरळ सेटमध्ये २१-७, २१-७ ने पराभूत करून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. सु
 • रुवातीलाच सिंधूने आक्रमक खेळी करत दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ती यशस्वीही झाली. 
 • सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या १६ मिनिटांत पहिला गेम २१-७ असा नावावर केला. 
 • सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग ८ गुणांची कमाई केली. त्यामुळे ओकुरावर तणाव वाढत गेला आणि नेमका त्याच परिस्थितीचा फायदा घेत सिंधूने पुढच्या अवघ्या सहा मिनिटांत ओकुहारावर ७-२ अशी आघाडी घेतली. 
 • त्यानंतर सिंधूने प्रचंड आत्मविश्वासानं खेळ करताना ओकुहाराचा सहज पराभव केला. सिंधूनं हा सामना २१-७, २१-७ असा जिंकला.
   

जम्मू काश्मीरचा झेंडा उतरवला आता फक्त तिरंगा

 • जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० (१) हटवण्यात आले आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरच्या विशेष झेंड्याचे महत्त्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे श्रीनगर येथील राज्य सचिवालयाच्या इमारतीवर लावण्यात आलेला जम्मू-काश्मीरचा झेंडा हटवण्यात आला आहे. आता या इमारतीवर फक्त तिरंगा फडकताना दिसतो आहे. 
 • श्रीनगर येथील सचिवालयावर जम्मू-काश्मीरच्या झेंड्यासह तिरंगा झेंडा फडकत होता. सरकारच्या एका इमारतीवर दोन-दोन झेंडे होते. परंतु, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आल्याने काश्मीरचा झेंडा हटवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सर्व इमारतींवर आता केवळ भारताचा तिरंगा फडकताना दिसणार आहे.
 • तसेच भारतीय संविधान जम्मू-काश्मीरला लागू करण्यात आले आहे. कलम ३७० हटवण्याआधी सचिवालयावर दोन झेंडे लावले जात होते. हा फोटो ७ तारखेचा आहे. तिरंगासोबत जम्मू-काश्मीरचा झेंडा सुद्धा इमारतीवर लावलेला दिसत आहे.
   
25 August Current Affairs
25 August Current Affairs

बहरीन २५० भारतीयांची जेलमधून सुटका होणार

 • बहरीनमधील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या २५० भारतीयांना माफी मिळणार असून त्यांची लवकरच सुटका करण्यात येणार असल्याचा निर्णय बहरीन सरकारने घेतला आहे. मानवीय आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीन दौरा केल्यानंतर तेथील सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 • पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमधून ही माहिती देण्यात आली आहे. दया आणि मानवता दाखवून बहरीन सरकारने २५० भारतीयांना माफी दिली आहे. बहरीनमधील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या या भारतीय नागरिकांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून बहरीन सरकारचे आभार मानले आहे. आणखी एक ट्विट करून पंतप्रधान म्हणाले, बहरीनच्या शाह आणि त्यांच्या संपूर्ण शाही कुटुंबाचे या निर्णयाचे स्वागत तसेच त्यांचे आभार.
   

जी ७ काश्मीरप्रश्नी ट्रम्प मोदी चर्चेची शक्यता

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-७ परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेदरम्यान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काश्मीर प्रश्नीदेखील चर्चा होऊ शकते.
 • सात विकसित श्रीमंत देशांच्या या जी-७ समुहात भारत विशेष आमंत्रित सदस्य आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ आणि व्यापार युद्धाच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर जगाची नजर या बैठकीकडे लागली आहे. जी-७ समुहात फ्रान्स, जर्मनी, युके, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जापान या राष्ट्रांचा समावेश आहे. 
 • विकसित देशांच्या या वार्षिक परिषदेत अॅमेझॉनच्या जंगलातील वणवा, ब्रेक्झिटची मुदत संपवणे, व्यापार तणाव कमी करणे आदि मुद्द्यांवर चर्चा होईल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनी परिषदेची अधिकृत सुरुवात केली. अॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगीचा मुद्दा या परिषदेच्या अजेंड्यात सर्वात प्राधान्याने घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'जलवायू आणि जैवविविधता जी-७ चं हृदय आहे. अॅमेझॉनमध्ये जळणारं जंगल आणि समुद्र आपल्याला साद घालत आहेत. त्यांना आपल्याला ठोस उत्तर द्यायचंय. या मुद्दयांवर ठोस काम करायला हवं,' असं ते म्हणाले.
   
25 August Current Affairs
25 August Current Affairs

आता प्लास्टिकमुक्त अभियान मोदींची घोषणा

 • महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबवणार
 • नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा आणि अभियानात सहभागी व्हावे
 • संपूर्ण सप्टेंबर महिना 'पोषण अभियान' म्हणून राबवणार
 • ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान ११ सप्टेंबरपासून राबवण्यात येईल
 • स्वच्छ भारत अभियानानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 'प्लास्टिकमुक्त अभियान' सुरू करण्याची घोषणा केलीय. येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची १५०वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबण्यात येणार आहे. 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली.
 • केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यानंतर मोदींनी तिसऱ्यांदा 'मन की बात' मधून देशाला संबोधित केले. २ ऑक्टोबरपासून प्लास्टिकमुक्त अभियान सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात हे प्लास्टिकमुक्त आंदोलन उभारले जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 • प्लास्टिक पिशवी मिळणार नाही, आपल्यासोबत पिशवी आणावी, असं अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी दुकानांबाहेर लिहिलंय. यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. प्रत्येक नागरिकाने यात आपलं योगदान द्यावं, असं आवाहन मोदींनी जनतेला केलंय.
   

अॅमेझॉनचे जंगल वणव्यात खाक

 • जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेले ब्राझीलमधील अॅमेझॉनचे जंगल २२ ऑगस्टपासून लागलेल्या वणव्यांमध्ये खाक झाले आहे. ४८ तासांमध्ये या जंगलात ठिकठिकाणी सुमारे २५०० आगी लागल्या. त्यात लाखो झाडे जळून गेली असून वन्यप्राणीही होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. या आगी हेतूपुरस्सर लावण्यात आल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जात असून ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावर जगभरातून टीका केली जात आहे. संतप्त नागरिकांकडून ठिकठिकाणी निदर्शने देखील केली जात आहेत. दरम्यान, जगभरातून दबाव वाढत असल्याचे पाहून बोल्सोनारो यांनी आगी विझवण्यासाठी सैन्याला पाठवले आहे.
 • अॅमझॉन जंगलाला लागलेल्या वणव्यांचे स्वरूप इतके भयानक आहे की, या आगींचा धूर सुमारे ३२०० किमी अंतरापर्यंत पसरला असून हा संपूर्ण परिसर काळ्या धुराने झाकोळून गेला आहे. अॅटलांटिक किनाऱ्यापर्यंत हा धूर पसरला आहे. या जंगलात वृक्ष आणि वन्यप्राण्यांच्या तब्बल ३० लाख प्रजाती आढळतात. त्यापैकी बहुतांश प्रजाती या वणव्यात नष्ट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी लाखो टन कार्बन उत्सर्जन शोषून घेणारे हे जंगल जागतिक तापमानवाढीचे नियंत्रण करण्यास हातभार लावते. बेसुमार वृक्षतोड आणि खाणी यामुळे या जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याकडे पर्यावरणवाद्यांनी वरचेवर लक्ष वेधले. मात्र ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांची पर्यावरणविरोधी वक्तव्ये वृक्षतोडीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. त्यावर बोल्सोनारो यांनी असे प्रत्युत्तर दिले आहे की, आपल्या सरकारची प्रतिमा डागळण्यासाठी पर्यावरणवादीच जंगलात आगी लावत आहेत.
 • अॅमेझॉनच्या जंगलात वरचेवर वणवे भडकत असतात. मात्र आता लागलेल्या वणव्यांचे स्वरूप गेल्या दशकभरातील वणव्यांच्या तुलनेत खूपच मोठे असल्याचे तज्ञांनी सांगितले. या वणव्यांचा सर्वात मोठा फटका उत्तरेकडील रोराइमा, आक्रे, रोंद्यनिया, अमेझोनास तसेच मातो ग्रोसो दो सुल या राज्यांना बसला आहे. ब्राझीलच्या अंतराळ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१९ मध्ये ब्राझीलमध्ये विक्रमी संख्येने आगी लागल्या. सन २०१८ मध्ये लागलेल्या आगींच्या तुलनेत यंदा ८५ टक्के जास्त आगी लागल्या असल्याचे उपग्रहांमार्फत मिळालेल्या माहितींवरून दिसून येत असल्याचे 'नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रीसर्च'ने म्हटले आहे.
   

ब्राझीलच्या अध्यक्षांचे पर्यावरणवाद्यांवर खापर:-

 • ब्राझीलचे उजव्या विचारसरणीचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी अॅमेझॉन आगीचे खापर कोणत्याही पुराव्यांशिवाय पर्यावरणवाद्यांवर फोडले आहे. ते म्हणाले, 'अॅमेझॉन जंगलातील आगी पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांनीच लावल्या असाव्यात, असा माझा कयास आहे.
 • कारण त्यांनी माझ्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांचा हेतू काय होता? ब्राझीलला समस्यांच्या गर्तेत लोटणे हाच त्यांचा हेतू होता का?'
25 August Current Affairs
25 August Current Affairs

रुपे कार्ड यूएईतही सादर

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी अबूधाबीमध्ये 'रुपे कार्ड' सादर करण्यात आले. त्यामुळे 'रुपे कार्ड' सादर करणारा संयुक्त अरब अमिरात (यूएई) हा पश्चिम आशियातील पहिला देश ठरला आहे. या वेळी झालेल्या कार्यक्रमात मोदींनी स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना भारतात गुंतवणूक करण्याविषयी आवाहन केले. राजनैतिक स्थिरता, विस्तारणारी अर्थव्यवस्था आणि मोठ्या प्रमाणावरील कुशल मनुष्यबळामुळे भारतातील गुंतवणूक फायदेशीर ठरणार असल्याचेही मोदी यांनी संबंधितांना पटवून दिले. 
 • 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या सेवेमुळे दोन्ही देशांमध्ये पेमेंट प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या शिवाय, दोन्ही देशांतील व्यापारालाही चालना मिळणार आहे. यूएईमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय असून, पर्यटनासाठी येणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. रुपे कार्ड सादर करणारा यूएई हा पश्चिम आशियातील पहिला देश ठरल्याने पर्यटन आणि व्यापारासाठी त्याची मोठी मदत होणार आहे,' असे मत 'यूएई'तील भारताचे राजदूत नवदीप सिंग सुरी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी गेल्याच आठवड्यात भूतानमध्ये 'रुपे कार्ड' सादर केले होते. तत्पूर्वी सिंगापूरमध्येही 'रुपे' सादर करण्यात आले आहे. भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०१८पर्यंत जवळपास ६० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 
 • परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी या संदर्भात एक ट्विटही केले आहे. 'रुपे कार्डाच्या सादरीकरणामुळे भारत आणि यूएई यांच्यातील व्यापारी संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. यूएईमधील अनेक कंपन्यांनी रुपे कार्डाच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे,' असे त्यांनी नमूद केले आहे.
 • सर्वोच्च सन्मान प्रदान 
 • अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांच्या हस्ते मोदी यांना 'ऑर्डर ऑफ झायेद' या यूएईच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. हा सन्मान स्वीकारताना मोदी यांनी क्राउन प्रिन्स यांच्याशी उच्चस्तरीय चर्चाही केली. हा कार्यक्रम प्रेसिडेन्शियल पॅलेस येथे पार पडला. 'भारत आणि यूएई यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत.
 • दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नेहमीच यूएईने भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असे उद्गार मोदी यांनी काढले. 'ऑर्डर ऑफ झायेद' हा सन्मान प्रामुख्याने राष्टप्रमुख आणि राष्ट्रपतींना देण्यात येतो. यापूर्वी २००७मध्ये हा सन्मान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, २००८मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान या नात्याने मोदी यांनी आतापर्यंत दोनदा यूएईचा दौरा केला असून, शेख महंमद बिन झायेद मागील तीन वर्षांत दोनदा भारत दौऱ्यावर आले आहेत. 

'कलम ३७०'चीही चर्चा:-

 • मोदी यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाचा भारत आणि यूएईच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवरही चर्चा:-

 • मोदी यांनी क्राउन प्रिन्स यांच्या समवेत झालेल्या बैठकीत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर पोहोचविण्याच्या उद्दिष्यटाबाबतही चर्चा केली. त्यावर क्राउन प्रिन्स यांनी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. भारतात अपारंपरिक ऊर्जा, अन्नपदार्थ, प्रक्रिया उद्योग, विमानतळे, संरक्षण सामग्रीचे उत्पादन आणि अन्य क्षेत्रात यूएईच्या उद्योजकांना आणि सरकारला गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादनही मोदी यांनी केले. क्राउन प्रिन्स यांनी भारतातील विविध क्षेत्रांमध्ये ७५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे आश्वासनही दिले. 

गांधींवरील तिकिटाचेही अनावरण:-

 • मोदी आणि क्राउन प्रिन्स यांच्या हस्ते शनिवारी महात्मा गांधी यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचेही अनावरण करण्यात आले. गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त या विशेष तिकिटाची निर्मिती करण्यात आली आहे.

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »