26-27 Oct Current Affairs

26-27 Oct Current Affairs
26-27 Oct Current Affairs

खासगी शाळेतील शिक्षक महिलांना प्रसूती रजा

 • केरळमधील खासगी शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या हजारो कर्मचारी आणि महिला शिक्षकांना प्रसूतीपूर्व काळ आणि बाळाच्या संगोपनासाठी भर पगारी रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.
 • केरळ सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांना याचा लाभ होणार असून खासगी शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या महिलांना भर पगारी रजा देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
 • केद्र सरकारने राज्यातील शिक्षण संस्थेतील कर्मचारी महिलांच्या या कायद्याला मंजुरी दिली आहे.
 • केरळ राज्य मंत्रिमंडळात २९ ऑगस्ट रोजी एका बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय पारित करण्यात आला होता.
 • या कायद्याला मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकारने अधिसूचना जारी करण्यासाठी केंद्र सरकारकडे हे विधेयक पाठवले होते
 • केंद्र सरकारने केरळ सरकारच्या या विधेयकाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे सरकारी शाळातील महिलासोबत खासगी शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
 • या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्चमाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भर पगारी रजा मिळणार आहे.
 • तसेच २६ आठवड्यापर्यंत पगारासोबत बाळाच्या संगोपनासाठी मिळणार आहे.
 • केरळमध्ये खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना भर पगारी रजा मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती.

आरंभ नागरी सेवेसाठी निवड झालेल्या नव्या अधिकार्‍यांसाठी पहिला पायाभूत अभ्यासक्रम

 • भारत सरकारच्या नागरी सेवेत भरती झालेल्या नव्या पदाधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारताचा पहिला पायाभूत अभ्यासक्रम चालवला जात आहे.
 • “आरंभ” ह्या नावाने चालवला जाणारा अभ्यासक्रम गुजरातच्या केवडिया येथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सुरू झाला. अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीत नवीन भरती झालेल्या सुमारे 500 पदाधिकार्‍यांना सहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
 • भारतीय नागरी सेवा:-
 • भारतीय नागरी सेवा (Indian Civil Service) ही ब्रिटिश राजवटीत तयार झालेली भारतातली नागरी सेवा होती. त्याचे मूळ नाव इंडियन सिव्हील सर्व्हिस किंवा इम्पिरीयल सिव्हील सर्व्हिस असे होते.
 • सेवेतल्या अधिकार्‍यांची निवड करण्याच्या प्रक्रियेचे व्यवस्थापन केंद्रीय लोकसेवा आयोग हाताळते. पहिल्या लोकसेवा आयोगाची स्थापना 1926 साली झाली होती. पण त्याचे स्वरूप फक्त ‘सल्लागार’ असे होते. त्यानंतर सन 1935च्या कायद्याने फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटना स्वीकारताना कमिशनला स्वायत्त दर्जा देत केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) हे नाव देण्यात आले. भारतीय संविधानाच्या कलम 315 अन्वये UPSC आकारास आली.

भारतीय नागरी सेवेचे दोन भाग:-
1) अखिल भारतीय सेवा

 • भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
 • भारतीय पोलिस सेवा (IPS)
 • भारतीय वन सेवा (IFOS)
 • IASची स्थापना 1947 साली झाली. या सेवेसाठी निवड झालेल्यांचे प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमीत होते.

2) केंद्रीय सेवा:-

 • यात गट ‘अ’ व गट ‘ब’ यात विभागलेल्या सुमारे 17 सेवा येतात.
 • उदा. राजस्व सेवा, पोस्टल सेवा, माहिती सेवा, व्यापार सेवा इत्यादी.

 

26-27 Oct Current Affairs
26-27 Oct Current Affairs

2020 साली स्मार्ट शहरे अभियानाची द्वितीय फेरी घेण्याची योजना

 • भारत सरकारच्या केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालयाच्या ‘स्मार्ट शहरे’ अभियान आणि अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या प्रमुख शहरी विकास योजनांची द्वितीय फेरी सन 2020 मध्ये चालविण्याची योजना तयार केली जात आहे.

स्मार्ट शहरे:-

 • स्मार्ट शहरे अभियान हा भारत सरकारचा नागरी पुनर्नविनीकरण आणि सुधारणा कार्यक्रम आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालय राज्य सरकारांच्या मदतीने हे अभियान राबवावीत आहे. जून 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियानाला प्रारंभ केला.
 • ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या पहिल्या फेरीत 100 शहरांचा समावेश केला गेला. त्यासंदर्भात 50 टक्के काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाण्याचे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्यातल्या बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद या शहरांची पहिल्या फेरीत निवड झाली.
 • एकूण 9,96,30,069 लोकसंख्या असलेल्या शंभर स्मार्ट शहरांमध्ये एकूण 2,05,018 कोटी रुपये खर्च झालेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्यात आले.
 • निश्चित पाणी आणि वीजपुरवठा, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम नागरी वाहतूक, माहिती तंत्रज्ञान विषयक संपर्क व्यवस्था, ई-प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग त्याप्रमाणे नागरिकांची सुरक्षितता ही स्मार्ट शहरांची काही वैशिष्ट्ये आहेत.
 • शहरांच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटीज कौन्सिल फॉर इंडिया’ ही संस्था तयार केली गेली. ही संस्था अमेरिकेच्या स्मार्ट सिटीज कौन्सिलची सदस्य आहे, जी 140 देशात काम करते.

अमृत योजना:-

 • केंद्र सरकारतर्फे लोकांच्या शहरी जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शास्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार करण्यासाठी अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा दिनांक 25 जून 2015 रोजी करण्यात आली.
 • ‘अमृत’ योजना ही एक पंचवार्षिक योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत अनेक पाणी व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प जून 2020 पर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.
 • त्यानंतर अमृत योजनेचा द्वितीय टप्पा (अमृत 2) चालवला जाणार आहे, ज्यात किमान 1,00,000 लोकसंख्या असलेल्या 500 शहरांचा समावेश करण्यात येणार आहे आणि तेथे शहरी लोकसंख्येच्या 65 टक्के नागरिक आहेत.

 

विजय हजारे चषक 2019 कर्नाटकने जिंकला

 • अभिमन्यू मिथुनच्या शेवटच्या षटकातल्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान कर्नाटकने विजय हजारे चषक स्पर्धा जिंकली.
 • अंतिम सामना ठिकाण : बेंगळूरू
 • तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात कर्नाटकने 23 षटकात 1 बाद 146 धावा केल्या असताना पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबला.
 • या लढतीत डकवर्थ लुईसऐवजी जयवर्धन (व्हीजेडी) मेथडने कर्नाटकला 60 धावांनी विजयी घोषित केले गेले.

स्पर्धेविषयी:-

 • विजय हजारे चषक या स्पर्धेला ‘रणजी एकदिवसीय करंडक’ म्हणून देखील ओळखले जाते.
 • ही क्रिडास्पर्धा मर्यादित षटकांसह सन 2002-03 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळली जात आहे.
 • या स्पर्धेचे नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेट विजय हजारे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
 • यामध्ये 27 संघ खेळतात.
26-27 Oct Current Affairs
26-27 Oct Current Affairs

भारत नेपाळ भूतान या देशांच्या सीमेवर वन्यजीवन संरक्षण उद्यान तयार करण्याची योजना

 • सीमेवरील वन्यजीवन संरक्षण 'शांती उद्यान' तयार करण्यासाठी भारत, नेपाळ आणि भूतान या देशांनी एक योजना तयार केली आहे आणि त्याच्या संदर्भात एका सामंजस्य कराराचा मसुदा तयार केला आहे.
 • भारताच्या पुढाकाराने इतर दोन्ही देशांनी प्रस्तावित उद्यानात तीन देशांच्या लगतच्या परिसरातल्या समृद्ध जैवविविधतेचा समावेश असणार आहे.
 • या परिसरात असलेल्या वन्यप्राण्यांना स्थलांतरणासाठी अधिक क्षेत्र उपलब्ध व्हावे आणि त्यात कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण व्हावी नाही यासाठी हा कायदा वन्यजीवांच्या संरक्षणार्थ अधिक फायदेशीर ठरणार आहे.
 • भारत आणि भूतान या देशांच्यामध्ये यापूर्वीच एक वन संरक्षित क्षेत्र असून त्यामध्ये आसाम राज्यामध्ये असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे आणि नवीन त्रिपक्षीय प्रकल्पामुळे हा मानस राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार ठरणार आहे.

नेपाळ:-

 • नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळ हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीनची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. काठमांडू नेपाळची राजधानी आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
 • 28 मे 2008 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात राजे ज्ञानेंद्र यांच्या विरोधात मतदान करून संघीय लोकतांत्रिक नेपाळची स्थापना केली.
 • देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून माउंट एव्हरेस्ट सह जगातल्या सर्वोच्च 14 पर्वतशिखरांमधले आठ नेपाळमध्ये आहेत. ही सर्व शिखरे 8 हजार मीटरपेक्षा उंच आहेत.

भूतान:-

 • भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरचा एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी आहे. भूतानी ङुलत्रुम हे राष्ट्रीय चलन आहे.

(भूतानबद्द्ल सर्व माहिती व्हिजन डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे)

 

हवामानातले बदल विषयक BASIC मंत्रिस्तरीय बैठक 2019 बिजींगमध्ये संपन्न

 • 26 ऑक्टोबर 2019 रोजी चीनची राजधानी बिजींग येथे 29 वी ‘हवामानातले बदल विषयक BASIC मंत्रिस्तरीय बैठक’ या कार्यक्रमाचा समारोप झाला. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी सभेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

BASIC गट:-

 • 28 नोव्हेंबर 2009 रोजी झालेल्या करारामधून BASIC समूह जन्माला आला, जो ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या चार मोठ्या नव्या औद्योगिक देशांचा एक गट आहे. कोपेनहेगन हवामान परिषदेदरम्यान चारही देशांनी एकत्रितपणे बदलत्या हवामानाच्या विरोधात कार्य करण्यास वचनबद्धता दर्शवली आणि हा गट अस्तित्वात आला

बैठकीत चर्चा झालेले मुद्दे:-

 • अमेरिका पुढच्या वर्षी पॅरिस हवामान करारामधून माघार घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर BASIC देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी कराराच्या ‘व्यापक’ अंमलबजावणीची मागणी केली.
 • हवामानविषयक कृती योजनेच्या अंमलबजावणीत होणारे नुकसान कमी करण्यासाठी विकसनशील देशांना 100 अब्ज डॉलर एवढा वित्तपुरवठा करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यास विकसित देशांना आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ 10 ते 20 अब्ज डॉलर एवढीच रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
 • BASIC देशांनी त्यांच्या राष्ट्रीय परिस्थितीच्या आधारे महत्वाकांक्षी हवामान कृती राबवित आहेत आणि त्यात मोठी प्रगती साधली आहे. 2018 साली चीनने राष्ट्रीय GDPच्या एका युनिट कार्बन डाय-ऑक्साईड वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण 2005 सालाच्या तुलनेत 45.8 टक्क्यांनी कमी केले आहे तर भारताने याबाबतीत सन 2005 ते सन 2014 या कालावधीत उत्सर्जनाचे प्रमाण 21 टक्क्यांनी कमी केले आणि ब्राझीलने हे प्रमाण 58 टक्क्यांनी कमी केले. दक्षिण आफ्रिकेनी नवा कार्बन कर लागू केला.

 

26-27 Oct Current Affairs
26-27 Oct Current Affairs

उत्तरप्रदेश राज्य सरकारची मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना

 • दिनांक 25 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नव्या ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ची घोषणा केली.

ठळक मुद्दे:-

 • राज्यातल्या मुलींना सक्षम बनविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
 • ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला त्या प्रत्येकाला 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार.
 • रक्कम DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
 • योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केली जाणार आहे. मुलीचे लसीकरण, इयत्ता 1, 5, 9 व पदवी मधील त्यांचा प्रवेश असे विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर रक्कम दिली जाणार.
 • योजनेसाठी डिजिटल व्यासपीठ देखील तयार करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेश राज्य:-

 • उत्तरप्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. लोकसंख्येनुसार उत्तरप्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते.
 • लखनऊ ही राज्याची राजधानी तर कानपूर हे राज्यातले सर्वात मोठे शहर आहे.
 • राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली.

 

कुपोषणाच्या विरोधात UNWFP च्या फीड अवर फ्यूचर मोहीमेचा प्रारंभ

 • जागतिक अन्न दिनानिमित्त 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारतात उपासमार व कुपोषण या गंभीर बाबींविषयी जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) 'फीड अवर फ्यूचर' नावाच्या सिनेमा जाहिरात मोहीमेचा प्रारंभ केला आहे.

ठळक बाबी:-

 • या मोहिमेच्या प्रारंभामध्ये टीव्ही होस्ट मिनी माथुर यांच्याकडून संचालित सिनेमा आणि सामाजिक परिवर्तनाबद्दल चर्चासत्र आयोजित केले जाणार.
 • शून्य उपासमारीचे जग तयार करण्याच्या उद्देशाने UFO मूव्हीज संस्थेच्या पाठिंब्याने हे अभियान चालवले जाणार आहे.
 • WFPचे ‘शेयर द मील’ हे जागतिक उपासमारी विरोधातले जगातले पहिले मोबाइल अॅप जाहीर करण्यात आले आहे.
 • अ‍ॅप वापरकर्त्यांना लहान देणग्या देता येणार आणि त्यातल्या प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम करते.

पार्श्वभूमी:-

 • 2018 साली फेसबुक, ग्लोबल सिनेमा अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (SAWA) आणि WFP यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
 • सर जॉन हेगर्टी ह्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी चित्रपटाची शक्ती वापरण्याची संकल्पना मांडली होती.
 • जाहिरातीच्या माध्यमातून डिजिटल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देणग्या देण्यासाठी देणगीदारांना प्रवृत्त करणे हा त्या संकल्पनेचा हेतू होता.

UNWFP बाबत:-

 • संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) ही अन्न-पुरवठा संदर्भात सहाय्य करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक शाखा असून ती जगातली सर्वात मोठी मानवतावादी संघटना आहे जी उपासमारी व अन्न सुरक्षा अश्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देते. संस्थेची स्थापना 19 डिसेंबर 1961 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
 • संस्था दरवर्षी 83 देशांमधल्या सरासरी 91.4 दशलक्ष लोकांना अन्न पुरवठा करून मदत करते. ही संस्था अशा लोकांना मदत करते जे स्वत: आणि त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाहीत. ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाची (UNDG) सदस्य आणि त्याच्या कार्यकारी समितीचा एक भाग आहे.

 

26-27 Oct Current Affairs
26-27 Oct Current Affairs

जगातली सर्वात मोठी शाळा 55547 विद्यार्थ्यांसह लखनऊ मधले सिटी मॉन्टेसरी स्कूल

 • लखनऊ (उत्तरप्रदेश) मधले सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) ही शाळा 'जगातली सर्वात मोठी शाळा' ठरली आहे.
 • 2019-20 या वर्षी 55,547 विद्यार्थी असलेल्या या शाळेची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
 • जगदीश गांधी सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) याचे संस्थापक आहेत.
 • १९५९ मध्ये त्यांनी ह्या शाळेची स्थापना केली.

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स:-

 • 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते.
 • हे पुस्तक 'सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराईट पुस्तक' म्हणून स्वतःच एक रेकॉर्डधारी पुस्तक आहे.
 • 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' या पुस्तकामधील विश्वविक्रमांची माहिती तशीही सर्वच प्रसारमाध्यमांतर्फे तसेच संग्रहालयांतूनही दिली जाते.

इतिहास:-

 • इंग्लंडमधील गिनेस ब्रुअरीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सर ह्यूग कॅम्पवेल बीव्हर यांना ते शिकार करीत असलेल्या सुवर्ण प्लोव्हर आणि लाल ग्राऊस या पक्ष्यांपैकी अधिक चपळ कोण असा विचार मनात आला. मित्रमंडळीत चर्चा करूनही त्यांना या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळाले नाही. घरी येऊन्बीव्हर यांनी अनेक पुस्तके धुंडाळली, पण तरीही त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
 • अखेर १९५४ सालीबीव्हर यांना ही माहिती एका पुस्तकात सापडली.पण ही माहिती अधिकृत असेल याबद्दल बीव्हर यांना शंका होती. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कंपनीचे कर्मचारी ख्रिस्तोफर यांना बोलून दाखवली.
 • ख्रिस्तोफर यांनी बीव्हर यांची गाठ नॉरिस आणि रॉस मॅक्विटर या तरुणांशी घालून दिली. हे दोघे तरुण, लंडनमध्ये एक सत्यशोधक मंडळ चालवत होते. या तिघांच्या प्रयत्‍नांतून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची निर्मिती झाली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५५मध्ये प्रसिद्ध झाली.
 • गिनेस बुकमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची तावून सुलाखून खात्री करून घेतली जाते; त्यामुळे गिनेस बुक हा माहितीचा विश्वसनीय स्रोत समजला जातो.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »