26 August Current Affairs

26 August Current Affairs
26 August Current Affairs

भारतीय वंशाचे पाकिस्तानी नेते बीएम कुट्टी यांचं निधन

 • मूळ भारतीय वंशाचे पाकिस्तानी नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते बी. एम. कुट्टी यांचं दीर्घ आजाराने रविवारी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. कुट्टी त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षी म्हणजेच ७० वर्षांपूर्वी पाकिस्तानात स्थायिक झाले होते. 
 • त्यांचा जन्म केरळच्या मलप्पुरम नगर येथे झाला होता. भारत आणि पाकिस्तानच्या शांतता प्रक्रियेला चालना देण्यासाठी काम करणाऱ्या 'पाकिस्तान पीस कोअॅलिशन'चे ते महासचिव होते. त्यांनी बलुचिस्तानच्या राज्यपालांचे राजकीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
 • कुट्टी यांच्या पत्नी बिरजीस सिद्धीकी यांचे २०१० मध्ये निधन झाले होते. त्यांना चार मुलं आहेत. 
 • 'Sixty years in self-exile: No Regrets; A Political Autobiography' हे कुट्टी यांचं आत्मचरित्र २०११ मध्ये प्रकाशित झालं. यात त्यांनी आपल्या केरळ ते कराचीपर्यंतच्या प्रवासाबद्दलचे अनुभव लिहीले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन यांनी कुट्टी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'कुट्टी एक प्रसिद्ध पत्रकार आणि उत्तम नेते होते. त्यांनी शांततेसाठी आणि धर्मांधतेविरोधात लढा दिला.'
   

नासा ने शोधला अंतराळातील गुन्हा

 • अवकाश मोहिमेमध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील मुक्कामात महिला अंतराळवीराने विभक्त समलिंगी जोडीदाराचे बँक अकाउंट अवैधपणे हाताळून तिच्या वित्तीय नोंदींची तपासल्याचे प्रकरण समोर आले आहे. 'नासा' या प्रकरणाची चौकशी करीत असून, अवकाशातून झालेला हा पहिलाच गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. 
 • अॅनी मॅकक्लेन असे या महिला अंतराळवीराचे नाव असून, तिच्याविरोधात तिची विभक्त झालेली जोडीदार समर वॉर्डन यांनी तक्रार केली आहे. मॅकक्लेन सहा महिन्यांच्या अवकाश मोहिमेवर होती आणि जूनमध्येच ती पृथ्वीवर परतली आहे. 
 • या प्रकरणात वॉर्डनने काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या फेडरल वाणिज्य आयोग आणि 'नासा' या दोन्ही ठिकाणी तक्रार दाखल केली असून, परवानगीशिवाय बँक खात्याची माहिती तपासली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. 'नासा'च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तर, वाणिज्य आयोगाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असे वॉर्डनने सांगितले. 
 • 'मॅकक्लेनने यामध्ये काहीही चुकीचे केलेले नाही. दोघांमधील वित्तीय माहिती तपासण्यासाठीच तिने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून बँक खात्याची माहिती तपासली,' असे मॅकक्लेनच्या वकिलाने म्हटले आहे. या दोघी मिळून एक मूल वाढवत आहेत आणि त्याच्या पालनपोषणासाठी पुरेसा पैसा आहे की नाही, हेच तपासण्याचा मॅकक्लेनचा प्रयत्न होता, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 • मॅकक्लेननेही ट्विटरवरून हे आरोप फेटाळले आहेत. 'या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. आमच्यातील नाते संपले असून, त्यातील वेदनादायी प्रवासातून आम्ही जात आहोत आणि या सर्व गोष्टी आता माध्यमांत आल्या आहेत,' असे ट्विट करताना तिने महासंचालकांकडून होणाऱ्या चौकशीवर विश्वास व्यक्त केला आहे. 
 • मॅकक्लेन अवकाशात असताना, मार्चमध्ये दोन महिला अंतराळवीरांचा स्पेसवॉक करण्याचे नियोजन होते. फक्त महिला अंतराळवीरांचा सहभाग असणारा स्पेसवॉक म्हणून त्याची इतिहासामध्ये नोंद होऊ शकत होती. 
 • मात्र, 'नासा'ने ऐनवेळी हा स्पेसवॉक रद्द केला. योग्य स्पेससूट नसल्यामुळे ही मोहीम रद्द केल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, लिंगभेदाचा आरोप झाल्यामुळे, 'नासा'वर टीकाही झाली होती. 

लष्करातील सेवेनंतर अवकाश मोहिमेत:-

 • अॅनी मॅकक्लेन 'नासा'मध्ये कार्यरत होण्यापूर्वी अमेरिकेच्या लष्करामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होती. इराकमधील मोहिमांमध्ये तिने ८०० तास उड्डाण केले आहे.
 • लष्करातील नोकरी सोडत २०१३मध्ये तिने 'नासा'मध्ये काम करण्यास सुरुवात केली. लष्करातील गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाचा उपयोग करतच तिने बँक अकाउंटची माहिती मिळवली असा आरोप करण्यात येत आहे.
 • तर, आतापर्यंतच्या मोहिमेमध्ये मॅकक्लेनने चांगली कामगिरी केली असल्याचे 'नासा'कडून म्हटले आहे. 

न्यायक्षेत्राचा प्रश्न?:-
या प्रकरणाचा 'नासा'कडून तपास करण्यात येत असून, गुन्हा नोंदवत आणखी तपास करण्याची वेळ आली, तर तो अवकाशातील पहिला गुन्हा असेल. कोणत्या न्यायक्षेत्रामध्ये त्याचा तपास करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, अंतराळवीर ज्या देशाचा असेल, त्या देशातील न्यायक्षेत्रामध्ये त्याच्यावर चौकशी होऊ शकते, असे काही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
 

26 August Current Affairs
26 August Current Affairs

सेन्सेक्स ८०० अंकाने वधारला निफ्टी ११ हजारांवर

 • देशात आलेल्या आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील आठवड्यात काही घोषणा केल्या होत्या. या घोषणांचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. बीएसईचा सेन्सेक्स आज ८०० अंकाने वधारला. तर एनएसईचे प्रमुख इंडेक्स निफ्टी ११ हजारांवर पोहोचला आहे. दुपारी २ वाजून २५ मिनिटावर निफ्टी ११ हजार ०५६ वर तर सेन्सेक्स ८२९ अंक वधारून ३७ हजार ५३० अंकावर पोहोचला.
 • आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे शेअर बाजारात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ६६२ अंकाच्या वाढीसह ३७ हजार ३६३ वर उघडला. 
 • तर नॅशनल एक्सचेंजचा निफ्टी १७० अंकाच्या वाढीसह ११ हजारांवर उघडला. परंतु, काही वेळानंतर यात थोडी फार घसरण पाहायला मिळाली. सकाळी ९.४५ वाजता सेन्सेक्स १५९ अंकांच्या वाढीसह ३६ हजार ८६० वर व्यापार करीत होता. तर निफ्टी १० हजार ८६० अंकावर व्यापार करीत होता.
 • अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केलेल्या घोषणेनंतर पब्लिक सेक्टर बँका, ऑटो आणि गृहकर्ज स्टॉक्समध्ये वाढ होईल, असा ब्रोकरेजचा अंदाज होता. अर्थमंत्र्यांने बँकांसाठी तात्काळ ७० हजार कोटी आणि होम लोन कंपन्यांसाठी २० हजार कोटींचे अतिरिक्त भांडवल देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन टक्के वाढ होईल असा अंदाज बांधण्यात आला होता.
   

देशात मंदी नाहीच स्टेट बँक अध्यक्षांचे मत

 • सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी देशात मंदीचे वातावरण असल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांच्या मते देशातील काही क्षेत्रांतील मागणीत घट नोंदविण्यात आली आहे. 
 • ‘सध्या देशातील वाहन उद्योग संकटात आला आहे, याचा सर्वत्र मंदी आहे असा अर्थ घेणे चुकीचे आहे. सध्या बहुतांश बँकांकडे योग्य प्रमाणात रोख रक्कम असून, ही रक्कम अर्थव्यवस्थेत खेळती राहणे महत्त्वाचे आहे,’ असेही कुमार यांनी नमूद केले. 
 • ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर विपरित परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम भारतावरही होतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी ३२ उपाययोजनांची घोषणा केली. 
 • या उपाययोजना सद्यस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरतील. या उपाययोजनांमुळे देशातील बँकिंग आणि कररचनेत आगामी काळात उद्भवणाऱ्या अडचणी दूर करणे शक्य होणार आहे,’ असेही कुमार यांनी स्पष्ट केले. स्टेट बँकेकडे सध्या पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध आहे. मात्र, ही रक्कम बाजारपेठेत खेळती ठेवण्याची आवश्यकता आहे. सध्या ग्राहक वाहनांची विशेषत: कारची खदरेदी करण्यापेक्षा ओला, उबरमधून फिरणे पसंत करीत आहेत. हा एक जागतिक कल असून, त्याला भारतही अपवाद राहिला नसल्याचेही रजनीश कुमार यांनी स्पष्ट केले. 

दुसऱ्या तिमाहीत ‘अच्छे दिन’:-

 • देशातील आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आगामी काळात खर्च वाढविण्यात येणार असून, सणासुदीमुळे विविध क्षेत्रांतील मागणी वाढण्याचीही शक्यता आहे.
 • त्यामुळे चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. सरकारने पतपुरवठा वाढविण्यासाठी सर्व प्रलंबित देयके देण्याची घोषणा केली असून, बाजारपेठेवर त्याचाही परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे, असा विश्वास रजनीश कुमार यांनी व्यक्त केला. 

क्रयशक्तीमध्ये घट नाही:- 

 • अर्थव्यवस्थेला मरगळ आल्याने संभाव्य मंदीबाबत चिंता व्यक्त होत असताना देशातील ग्राहकांच्या क्रयशक्तीमध्ये अद्याप घट झाली नसल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे. आमच्या बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांची संख्या सतत वाढत असून त्यांची क्रयशक्तीही घटलेली नाही. 
 • भविष्यात या व्यवसायात आणखी वाढ करण्याचे उद्दिष्ट आम्ही आखले आहे, असे या बँकेचे पेमेंट प्रॉडक्ट्स विभागाचे प्रमुख पराग राव यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. वाहनविक्रीमध्ये घट झाली आहे.
 • मात्र याचा अर्थ उर्वरित क्षेत्रातील मागणी कमी झाली आहे, असे नाही. अर्थव्यवस्था अतिशय बळकट असते तेव्हाही काही क्षेत्रांची कामगिरी अपेक्षेएवढी चांगली होत नाही, असे ते म्हणाले. 
 • आमच्या बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांपैकी केवळ २५ टक्के ग्राहक नवे असून उर्वरित ग्राहक बँकेशी वर्षोनुवर्षे जोडलेले आहेत. या ग्राहकांकडून क्रेडिट कार्डांची देयके थकवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.
   
26 August Current Affairs
26 August Current Affairs

महाराष्ट्र बँकेचीही व्याजदरकपात

 • रिझर्व्ह बँकेने केलेल्या आवाहनानंतर 'बँक ऑफ महाराष्ट्र'नेही आपल्या कर्जांचे व्याजदर रेपो दराशी सुसंगत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या बँकेची कर्जे स्वस्त होतील. एक सप्टेंबरपासून नवे दर लागू होतील. येत्या सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांसाठी हे दर आकर्षक ठरतील, असे महाराष्ट्र बँकेने म्हटले आहे.
 • सुरुवातीस हे सुधारित व्याजदर केवळ नव्या ग्राहकांसाठी लागू असतील व त्यानंतरच्या काळात जुन्या ग्राहकांनाही त्याचा लाभ दिला जाईल, असे या बँकेच्या पत्रकात म्हटले आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जांच्या व्याजदरात लक्षणीय कपात होणे अपेक्षित आहे.
   

अ‍ॅमेझॉन वणव्याची झळ

 • ब्राझीलमधील सर्वात मोठय़ा साओ पावलो शहराचे आकाश काही दिवसांपूर्वी भर दुपारी काळ्या ढगांनी आच्छादले. अवकाळी आलेल्या त्या काळ्या ढगांनी काहींना छायाचित्रणासाठी उद्युक्त केले. काहींना जगबुडी जवळ आल्याची भीती वाटून गेली. काहींना तो दैवी चमत्कार भासला. फारच थोडय़ांना त्यावेळी हे ठाऊक होते, की तेथून हजारो किलोमीटर दूर असलेल्या अ‍ॅमेझॉन वर्षांवनातील अवाढव्य जंगलवणव्यांनी उठलेल्या धुरातून ते काळे ढग निर्माण झाले होते. 
 • जगातील सर्वात मोठे वर्षांवन असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वन आणि प्राणिसृष्टीला गेले काही आठवडे धुमसत असलेल्या जंगलवणव्याची झळ पोहोचू लागली आहे. पण ही झळ निव्वळ अ‍ॅमेझॉनच्या जीवसृष्टीपुरती मर्यादित राहणार नाही, असा विश्लेषकांचा होरा आहे. मोठय़ा जंगलांच्या वेशीवर वा काही वेळा जंगलातही वणवे पेटणे हे नवीन नाही. 
 • शेतीशी आणि जंगलांशी संबंधित टाकाऊ घटकांची विल्हेवाट असा कचरा पेटवूनच लावली जाते. विषुववृत्तीय जंगलांमध्ये अशा आगी प्रत्यक्ष जंगलांसाठी हानिकारक ठरत नाहीत. अ‍ॅमेझॉनसारखे वर्षांवन बारमाही हिरवे असते आणि सहसा कोरडे पडत नाही. त्यामुळे कॅलिफोर्नियातील कोरडय़ा जंगलांप्रमाणे या जंगलाच्या आजूबाजूला आगी लावण्याची फार बंधने नाहीत. 
 • पण अ‍ॅमेझॉनचे अवाढव्य जंगल ब्राझीलसह नऊ देशांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक देशामध्ये यासंबंधीचे कायदे भिन्न असतात. ते असले तरी अंमलबजावणी यंत्रणांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता भिन्न असते. तरीही जवळपास ६० टक्के अ‍ॅमेझॉन जंगल ब्राझीलमध्ये येत असल्यामुळे त्याच्या संवर्धनाची आणि सध्याच्या संकटातून मार्ग काढण्याची सर्वाधिक जबाबदारी ब्राझीलवर येते. या देशाचे नेतृत्व त्या दृष्टीने सज्ज आणि परिपक्व आहे का, या प्रश्नाचे उत्तर तूर्त ‘नाही’ असे द्यावे लागते. या अकार्यक्षम नेतृत्वामुळे अ‍ॅमेझॉन वणव्याचा मुद्दा अधिकच ज्वलंत बनलेला आहे.
 • अ‍ॅमेझॉन जंगल परिसरातील जंगलतोड नवीन नाही. गेली अनेक वर्षे विकासाच्या रेटय़ाखाली कमी-अधिक प्रमाणात ती होतच असते. साधारण गेल्या शतकात सत्तरच्या दशकात या जंगलतोडीला सुरुवात झाली. नव्वदच्या दशकात आणि नवीन सहस्रकात यात वाढच होत गेली. 
 • २००४ मध्ये एकटय़ा ब्राझीलमध्ये २८ हजार चौ.किमी.वरील जंगल साफ केले गेले. नंतरच्या काळात म्हणजे २०१४ पर्यंत यात काहीशी घट झाली. त्यानंतर पुन्हा हे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढू लागले आहे. या वर्षी एकटय़ा जुलै महिन्यात जवळपास १४०० चौ.किमी.वरील वर्षांवन नष्ट झाले आहे. 
 • यातून मार्ग निघेल अशी आशा जागतिक समुदायाला वाटत नाही, कारण ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी अ‍ॅमेझॉन संवर्धनापेक्षा विकासाला प्राधान्य दिलेले आहे. यंदा जानेवारीत सत्तेवर आल्यापासून बोल्सोनारो यांनी हवामान बदलांविषयीच्या सर्व चर्चाची यथेच्छ खिल्ली उडवलेली आहे. अ‍ॅमेझॉनचे अवाढव्य जंगल आणि जागतिक हवामान बदल यांच्या परस्परसंबंधांविषयी त्यांना देणेघेणे नाही. 
 • कारण हवामान बदलाप्रमाणेच अ‍ॅमेझॉन संवर्धनावरही त्यांचा विश्वास नाही! शेती, खाणकाम व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अ‍ॅमेझॉन वर्षांवनाचे लचके तोडायची त्यांची तयारी आहे. नव्हे, ते त्यांचे निवडणुकीतील एक आश्वासनच होते. त्यांच्या या भूमिकेमुळे ब्राझीलमधील एक मोठा वर्ग आनंदलेला असला, तरी यातून उद्भवणाऱ्या भीषण परिणामांची एक तर या वर्गाला कल्पना नाही किंवा देणेघेणे नाही. 
 • शेतीसाठी जमिनी मिळवण्यासाठी अवैध आगी लावणे हे तेथे नवीन नाही. बोल्सोनारो यांनी अशा शेतकऱ्यांचा छडा लावण्याऐवजी, ‘इबामा’ या ब्राझीलच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या २७ पैकी २१ सदस्यांची हकालपट्टी करण्याचा अद्भुत निर्णय घेतला. यातून ते नेमके कशाला प्राधान्य देतात, हेही पुरेसे स्पष्ट होते. 
 • अ‍ॅमेझॉनच्या मुद्दय़ावर फ्रान्ससह अनेक पाश्चिमात्य देशांनी चिंता व्यक्त केली असून  फ्रान्सचे अध्यक्ष इमानुएल माक्राँ यांनी सध्या त्यांच्या देशात सुरू असलेल्या जी-७ परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रस्ताव मांडला. ही कृती म्हणजे बोल्सोनारो यांना ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ वाटते. अ‍ॅमेझॉनमधील विस्तीर्ण परिसरात पसरत चाललेल्या आगी विझवण्यासाठी त्यांनी आता लष्कर धाडले आहे. पण हे पुरेसे नाही. 
 • अ‍ॅमेझॉनचे वर्षांवन हजारो प्राणी, कीटक, वनस्पती प्रजातींचे आणि काही डझन लुप्त होत जाणाऱ्या आदिवासी जमातींचे आश्रयस्थान आहेच. शिवाय पृथ्वीवर मोसमी पावसाचे चक्र सुरू ठेवण्यातही या वनाचे योगदान अमूल्य असते. यासाठीच जर्मनी व नॉर्वेसारखे देश, संयुक्त राष्ट्रांतील काही संघटना अ‍ॅमेझॉनच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे झटत आहेत. त्या प्रयत्नांना बोल्सोनारो यांच्या पर्यावरणमारक धोरणांमुळे झळ बसू लागली आहे.
   
26 August Current Affairs
26 August Current Affairs

सोने ४० हजारांवर चांदीच्या दरातही तेजी

 • शांतर्गत वायदे बाजारातील तेजीमुळे सोन्याचा दरात आज विक्रमी वाढ झाली. मुंबई, जयपूर, अहमदाबाद या शहरांमध्ये प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ४० हजारांवर पोहोचला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली. 
 • मुंबईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४० हजार ०४० रुपयांवर गेला. गेल्या आठवड्यात हाच दर ३८ हजार ७७० रुपये होता. राजधानी दिल्लीत २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ३८,७२० रुपयांवरून ३९ हजार ८९० रुपयांवर पोहोचला आहे. 
 • जयपूरमध्ये २४ कॅरेट व २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर अनुक्रमे ४० हजार ०२० रुपये आणि ३९ हजार ९०० रुपये नोंदवला गेला. सोन्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदाबाद शहरातही २४ कॅरेट व २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर अनुक्रमे ४० हजार आणि ३९ हजार ८७० रुपये झाला आहे. 
 • सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, चांदीचा दर प्रति किलोग्रॅमसाठी ४६ हजारांवर गेला आहे. मुंबईमध्ये चांदीचा दर ४५ हजार ०१५ रुपयांवरून ४६ हजार ३८० रुपये झाला. तर जयपूरमध्ये प्रति किलोग्रॅमसाठी ४६ हजार ४०० रुपये चांदीचा दर नोंदवला गेला. तर, अहमदाबादमध्ये चांदीचा दर ४६ हजार ४०० रुपयांवर गेला आहे.
   

कोमालिका बारीला जगज्जेतेपद

 • कोमालिका बारी हिने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या जपानच्या सोनोडा वाका हिला एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत पराभूत करत रिकव्‍‌र्ह कॅडेट गटात जगज्जेतेपदाला गवसणी घातली. भारताने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.
 • जमशेदपूर येथे जन्मलेल्या आणि टाटा तिरंदाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या कोमालिकाने सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ७-३ अशा फरकाने तिने अंतिम फेरीवर वर्चस्व गाजवले. रिकव्‍‌र्ह कॅडेट (१८ वर्षांखालील) गटात १७ वर्षीय कोमालिका ही भारताची दुसरी जगज्जेती ठरली आहे. यापूर्वी दीपिका कुमारीने २००९ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.
 • भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघाने बंदी घातल्यामुळे यापुढे भारतीय तिरंदाजांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. मात्र या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.
 • जागतिक स्पर्धेत विजेती ठरल्याने मी अत्यंत आनंदी आहे. माझ्या प्रशिक्षकांमुळेच हे शक्य झाले. दीर्घ श्वास घेत असल्याने मला अचूक वेध घेता येत नव्हता. पण मी स्वत:ला संयम आणि शांत राहण्याचे बजावले. आत्मविश्वास उंचावल्यानंतर मी सुवर्णपदकावर कब्जा केला.    – कोमालिका बारी
   
26 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »