26 July Current Affairs

26 July Current Affairs
26 July Current Affairs

ऐतिहासिक निर्णय आंध्र प्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण

प्रत्येक राज्यात निर्माण होणाऱ्या रोजगारामधील मोठा तेथील भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे, असे नेहमीच बोलले जाते. मात्र त्या दिशेने अद्याप कुठल्याही सरकारने पाऊल उचलले नव्हते. दरम्यान, नुकतेच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या जगनमोहन रेड्डी यांनी ऐतिहासिक निर्णय घेताना राज्यात भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारची घोषणा करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. 

जगनमोहन सरकारने लागू केलेले खासगी क्षेत्रातील आरक्षण हे खासगी उद्योग, कंपन्या, कारखाने, संयुक्त उपक्रम तसेच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातून विकसित होणारे उपक्रम यांना बंधनकारक असणार आहे. या ठिकाणी संबंधित उद्योजकांना आपल्याकडील नोकऱ्यांमध्ये 75 स्थानिकांना सामावून घ्यावे लागणार आहे.  तसेच या खासगी उद्योगांना आणि कारखान्यांना सरकारकडून कुठल्याही प्रकारीच मदत मिळत नसली तरी त्यांना हे आरक्षण द्यावे लागे. 

तिहेरी तलाकबंदी विधेयक लोकसभेत मंजूर

मोदी सरकारसाठी महत्त्वाचे असणारे तिहेरी तलाकबंदी विधेयक गुरुवारी १७ व्या लोकसभेत ३०३ विरुद्ध ८२ मतांनी मंजूर झाले.

तिहेरी तलाकबंदी विधेयकाचा कोणत्याही धर्माशी वा कुठल्या राजकारणाशीही संबंध नाही. महिलांच्या न्यायाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदा ठरल्यानंतरही २४ जुलैपर्यंत देशात ३४५ तिहेरी तलाक झालेले आहेत. या घटस्पोटित महिलांना रस्त्यावर सोडायचे का? मी मोदी सरकारमधील मंत्री आहे, राजीव गांधी सरकारमधील नव्हे, असा युक्तिवाद केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी चर्चेला उत्तर देताना केला. स्त्री-पुरुष समानेतेसाठी हे विधेयक गरजेचे असल्याचेही प्रसाद म्हणाले.

तिहेरी तलाक दिल्यास पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून त्यामुळे मुस्लीम महिलांचे नुकसान होणार असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. या विधेयकाला एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (सं)ने विरोध केला. राजीव रंजन सिंह यांनी, या विधेयकामुळे विशिष्ट समाजामध्ये अविश्वास निर्माण होण्याची भीती असल्याचा दावा केला. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

भारत धर्मनिरपेक्ष देश असून इथे स्त्री-पुरुष समान आहेत. मग, विशिष्ट समाजातील महिलांनाच का सोडून द्यायचे. त्यांना न्याय का मिळू नये?, असे सवाल करत भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी या विधेयकाचे समर्थन केले.

या विधेयकाचा धर्माशी काहीही संबंध नाही. विवाहित महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुस्लीम महिलांनी न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, अनेकांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीची माहिती नाही. तिहेरी तलाकबंदी विधेयकामुळे मुस्लीम महिलांना न्याय मिळणार असल्याचे भाजपच्या किरण खेर म्हणाल्या. मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाक दिला तर त्यांचे अभिनंदन करायचे का, असा सवाल भाजपच्या पूनम महाजन यांनी केला.

झुंडबळी कायदा कधी?

झुंडबळी रोखण्यासाठी कायदा करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. पण, भाजप हा कायदा करण्याची तत्परता दाखवत नाही. मुस्लीम महिलांना नोकऱ्या, कौशल्यप्राप्ती यासाठी केंद्र सरकार काय करत आहे, असा प्रश्न काँग्रेसचे बिहारचे खासदार महमद जावेद यांनी केला.

‘हिंदू-ख्रिश्चन पतीला तुरुंगवास का नाही?’

एनआय, यूएपीए आणि आता तिहेरी तलाक ही विधेयके देशातील मुस्लिमांना लक्ष्य बनवणारी आहेत, असा आरोप सीपीएमचे ए. एम. आरिफ यांनी केला. ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, समलैंगिकता, विवाहबाह्य़ संबंधांमध्ये फौजदारी गुन्हे ठरत नाहीत, पण आता तिहेरी तलाक भाजप फौजदारी गुन्हा ठरवत आहे. मुस्लीम धर्मात नऊ प्रकारे तलाक आहेत. शिवाय, तिहेरी तलाकमुळे निकाह संपुष्टात येत नाही. शिवाय, पुरावे जमा करण्याची जबाबदारी महिलेवरच टाकण्यात आली आहे. ती कसे पुरावे जमा करेल? पतीला तुरुंगात टाकले तर तो पत्नीला रोजच्या खर्चाचे पैसे कसे देऊ शकेल? तीन वर्षे तुरुंगात असलेल्या पतीशी पत्नी लग्न का टिकवायचे? तिला लग्नातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. मुस्लीम लग्न हे कंत्राटच असते. त्याला सात जन्मांची खूणगाठ मानू नका. मुस्लीम पतीला तुरुंगवासाची शिक्षा होणार असेल तर ती हिंदू आणि ख्रिश्चन धर्मातही लागू झाली पाहिजे.

26 July Current Affairs
26 July Current Affairs

एटीएम घोटाळय़ात महाराष्ट्र अव्वल देशभरात 980 घटना

एटीएम घोटाळ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात याचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. 2018-19 मध्ये देशभरात एटीएम घोटाळ्याच्या 980 घटना घडल्या. त्यात 21.4 कोटी रुपयांची लूट झाली. यामध्ये महाराष्ट्रात 233 गुन्हे घडले आणि 4.8 कोटी रुपयांचा चुना लागला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली. एटीएम फोडणे, चोरून नेणे, बनावट एटीएम कार्ड वापरणे, स्किमरवरून डाटाचोरी आदी प्रकारे हे गुन्हे घडत आहेत. 2017-18 मध्ये एटीएम घोटाळ्याच्या देशात 911 घटना घडल्या होत्या. त्यात 65.3 कोटी रुपये लुटले गेले. 2017-18 लाही महाराष्ट्रात सर्वाधिक 242 गुन्हे घडले. त्यामध्ये 5.2 कोटी रुपये लुटले गेले होते.

सर्वाधिक घोटाळे राज्य गुन्हे – लूट
महाराष्ट्र – 233 4.8 कोटी
दिल्ली – 179 2.9 कोटी
तामीळनाडू – 147 3.6 कोटी
कर्नाटक – 65 1.3 कोटी
हरयाणा – 58 1.1 कोटी

केशव दत्त आणि प्रसून बॅनर्जी यांना मोहन बागान रत्न सन्मान

दोन वेळा ऑलंपिक सुवर्णपदक विजेता केशव दत्त आणि माजी फुटबॉलपटू प्रसून बॅनर्जी यांची ‘मोहन बागान रत्न’ या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.

शिवाय अशोक चटर्जी यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार. दिनांक 29 जुलै 2019 रोजी होणार्‍या मोहन बागान क्लबच्या वार्षिक समारंभात या पुरस्कारांचे वाटप केले जाणार. यावर्षी प्रथमच फूटबॉल खेळाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली गेली.

94 वर्षांचे हॉकीपटू केशव दत्त यांनी 1948 साली लंडन ऑलंपिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या खेळात भारताने स्वातंत्र्यानंतर पहिले सुवर्णपदक जिंकले होते. दत्त यांनी द्वितीय सुवर्ण 1952 हेलसिंकी खेळांमध्ये जिंकले.

मोहन बागान दिन दरवर्षी 29 जुलैला पाळला जातो. दिनांक 29 जुलै 1911 रोजी मोहन बागान फुटबॉल क्लब हा ब्रिटिश क्लबला हरविणारा पहिला क्लब बनला आणि ईस्ट यार्कशर रेजीमेंट याला पराभूत करून IFA शील्ड ट्राफी जिंकली.

26 July Current Affairs
26 July Current Affairs

टाटा मोटर्सला ३६८० कोटींचा तोटा

भारतासह चीनमधूनही वाहनांना कमी मागणीचा फटका

बाजारपेठेत नसलेल्या मागणीचा टाटा मोटर्सच्या ताळेबंदाला मोठा फटका बसला आहे. टाटा समूहातील वाहन निर्मात्या कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत आजवरचे सर्वाधिक ३,६७९.६६ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे.

भारताबरोबरच कंपनीची चीनमधून होणारी वाहनमागणीही यंदा रोडावली आहे. कमी मागणीमुळे टाटा मोटर्सनेही गेल्या तिमाहीत काही दिवस उत्पादन बंद ठेवले होते. नॅनोसारख्या कारची विक्री व उत्पादनही गेल्या काही महिन्यांपासून ठप्पच आहे.

वर्षभरापूर्वीच्या याच तिमाहीदरम्यान टाटा मोटर्सला १,८६२.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मंदीसदृश वाहन उद्योग क्षेत्रात वाढता विपणन खर्च व घसघशीत सूट-सवलतींचाही फटका टाटा मोटर्सला यंदा बसला आहे.

प्रवासी तसेच व्यापारी वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या टाटा मोटर्सने एप्रिल ते जून २०१९ दरम्यान एकूण ६१,४६६.९९ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ६६,७०१.०५ कोटी रुपयांच्या तुलनेत तो कमी झाला आहे.

कंपनीची ब्रिटिश नाममुद्रा असलेल्या जग्वार लॅण्ड रोव्हरने गेल्या तिमाहीत ३९.५० कोटी पौंड तोटा नोंदविला आहे. उपकंपनीची जागतिक वाहन विक्री चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ११.६० टक्क्यांनी कमी झाली आहे.

कंपनीला भारताबरोबरच चीनमधूनही कमी मागणी राहिल्याने वाहन विक्री कमी झाल्याचे टाटा मोटर्सचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी पी. बी. बालाजी यांनी वित्तीय निष्कर्ष जाहीर करताना स्पष्ट केले. त्याचबरोबर अन्य काही कारणेही असल्याचे नमूद करण्यात आले.

खरेदीदारांकडून कमी मागणी, रोकड चणचण तसेच चढा करभार आणि विम्याचे शुल्क याचाही विपरीत परिणाम वाहन उद्योगावर झाल्याचे टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक गुंटर बटशेक यांनी म्हटले आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »