27 Sep Current Affairs

27 Sep Current Affairs
27 Sep Current Affairs

लष्करप्रमुख उद्या CCS चा पदभार स्वीकारणार

 • भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत हे उद्या 'चीफ ऑफ स्टाफ कमेटी'च्या (CCS) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
 • या पदाची जबाबदारी स्वीकारण्याची ही अखेरची वेळ असणार आहे. कारण, केंद्र सरकारने नुकतीच चीफ ऑफ संरक्षण स्टाफ (सीडीएस) पदाची स्थापणा करणार असल्याची घोषणा केली होती.
 • बीपीन रावत हे उद्या हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारतील.
 • हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांची मे २०१९ रोजी चीफ ऑफ स्टाफ कमेटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
 • नौदलप्रमुख सुनील लांबा हे निवृत्त झाल्यानंतर धनोआ यांनी त्यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
 • चीफ ऑफ स्टाफ कमेटीच्या सदस्यांत लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांचा समावेश असतो. वरिष्ठ अध्यक्षांची या पदावर नियुक्ती करण्यात येते.
 • तिन्ही सैन्य दलात समन्वय करण्याचे काम तसेच देशावर बाहेरील संकटाचा सामना करण्यासाठी रणनिती तयार करण्याची जबाबदारी चीफ ऑफ स्टाफ कमेटीच्या अध्यक्षांवर असते.

ग्रेटा थनबर्ग हिला पर्यायी नोबेल

 • पर्यावरणरक्षणासाठी तरुण पिढीचा आवाज बनलेली स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला 'पर्यायी नोबेल पुरस्कार' म्हणून ओळखला जाणारा 'राइट लाइव्हलीहूड अॅवॉर्ड' घोषित झाला आहे.
 • हवामान बदलाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांत प्रभावी भाषण करताना जागतिक नेत्यांना थेट जाब विचारल्यानंतर अवघ्या १६ वर्षांची ग्रेटा प्रसिद्धीझोतात आली होती.
 • ग्रेटा हिने हवामान बदलाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेताना, याप्रश्नी तात्काळ पावले उचलण्याची मागणी करण्यासाठी लोकांना प्रेरित केले, या योगदानासाठी तिला हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे 'राइट लाइव्हलीहूड फाउंडेशन'ने म्हटले आहे.
 • ग्रेटा हिने आपल्या भावनिक भाषणात, जागतिक नेत्यांनी हवामान बदलाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पिढीची पूर्णपणे फसगत केल्याची भूमिका परखडपणे मांडली होती. तिच्या या भाषणाचा व्हिडीओ जगभरात इंटरनेटवर व्हायरल झाला होता.

ग्रेटा हिच्यासह अन्य तीन जणांनाही हा पुरस्कार:-

 • ग्रेटा हिच्यासह अन्य तीन जणांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.
 • ग्रेटा हिच्यासह चीनमध्ये महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या आघाडीच्या वकील गुओ जियानमेई, पश्चिम सहारा येथील स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या अमिनातू हैदर आणि ब्राझील-व्हेनेझुएला सीमेवरील अॅमेझॉनच्या सदाहरित वनांचे आणि स्थानिक यानोमामी समुदायाच्या हक्कांचे संरक्षण यासाठी कार्यरत असलेल्या दावी कोपेनावा आणि हातुमारा यानोमामी असोसिएशन यांनाही 'राइट लाइव्हलीहूड' पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • 'राइट लाइव्हलीहूड' पुरस्कार:-
 • 'राइट लाइव्हलीहूड' पुरस्कार देण्यास १९८० मध्ये सुरुवात करण्यात आली.
 • नोबेल फाउंडेशनने पर्यावरण आणि विकसनशील देशांमधील कार्य या विभागांसाठी दोन नवीन पुरस्कार सुरू करण्यास नकार दिल्यानंतर 'पर्यायी नोबेल' म्हणून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
 • पुरस्कार विजेत्यांना आपल्या कार्यासाठी प्रत्येकी एक दशलक्ष स्वीडिश क्रोना (८३ हजार पौंड) एवढ्या रकमेचा पुरस्कार मिळणार आहे.
27 Sep Current Affairs
27 Sep Current Affairs

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांचे निधन

 • दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूंच्या नरसंहारात फ्रान्सच्या भूमिकेची कबुली देणारे फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
 • सन २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याचा विरोध करणारे पहिले नेते म्हणूनही त्यांची ओळख होती.
 • शिराक यांचे जावई फ्रेडरिक सलात-बारौक्स यांनी शिराक यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचा परिवार त्यांच्या जवळ होता, असे फ्रेडरिक यांनी सांगितले. मात्र शिराक यांच्या निधनाचे कारण त्यांनी सांगितले नाही. सन २००७ मध्ये राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर शिराक यांना अनेक आजारांनी ग्रासले होते.

जॅक शिराक:-

 • सन १९९५ ते २००७ या कालावधीत शिराक फ्रान्सचे अध्यक्ष होते.
 • १२ वर्षांच्या या कार्यकाळात ते सर्वोत्तम वैश्विक मुत्सद्दी म्हणून नावारूपाला आले. मात्र आर्थिक सुधारणा करण्यात तसेच पोलिस आणि अल्पसंख्याक समाजातील तरुणांमधील तणाव कमी करण्यात शिराक यांना यश आले नाही.
 • परिणामी २००५ मध्ये फ्रान्समध्ये दंगली उसळल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी सुमारे दोन दशके शिराक हे पॅरिसचे महापौर देखील होते.
 • कारकिर्दीच्या सुरुवातीला दृढनिश्चयी आणि महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे शिराक यांना 'ले बुलडोझर' या टोपणनावाने ओळखले जात होते.
 • महापौर असताना पक्षासाठी चुकीच्या मार्गाने निधी गोळा केल्याचा, निधीचा दुरुपयोग केल्याचा तसेच लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
 • २००७ मध्ये राष्ट्राध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतर शिराक यांच्यावर रितसर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर २०११ मध्ये जनतेच्या पैशाचा दुरुपयोग, विश्वासघात केल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

पुलवामा ख्राइस्टचर्च चा निषेध

 • ‘पुलवामा’, ‘ख्राइस्टचर्च’चा निषेपुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर झालेला दहशतवादी हल्ला; तसेच न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चमध्ये झालेला दहशतवादी हल्ला यांचा भारत आणि न्यूझीलंड यांनी संयुक्त निवेदनाद्वारे निषेध केला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांची येथे भेट होऊन, त्यात द्विपक्षीय विषयांवर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक, आर्थिक, संरक्षण, सुरक्षा आणि दोन्ही देशांतील नागरिकांत परस्परसंवाद वाढविणे यावर दोन्ही देशांनी अधिक दृढपणे काम करण्याचे निश्चित केले.
 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी सर्व राष्ट्रप्रमुख सध्या येथे आहेत. त्या वेळी आर्डन आणि मोदी यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी दहशतवादासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
 • आंतरराष्ट्रीय दहशतवादावरही दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. पुलवामामध्ये झालेला हल्ला आणि ख्राइस्टचर्चमध्ये माथेफिरूने केलेला दहशतवादी हल्ला यांचा दोन्ही नेत्यांनी निषेध केला, असेही निवेदनात म्हटले आहे.
 • दहशतवाद्यांना इंटरनेटचा गैरवापर करण्यास रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्याच्या न्यूझीलंड आणि फ्रान्सच्या निर्णयाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. न्यूझीलंडमधील भारतीय वंशाचे नागरिक आणि भारतीय विद्यार्थी हे दोन्ही देशांना सांधणारा दुवा आहेत, असे प्रशंसोद्गार आर्डन यांनी काढले.
 • न्यूझीलंडच्या 'इंडिया-२०२२ इन्व्हेस्टिंग इन द रिलेशनशिप' या नव्या सामरिक धोरणाबाबतही आर्डन यांनी मोदींना माहिती दिली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने 'रिलेव्हन्स ऑफ गांधी इन द कटेम्पररी टाइम्स' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल मोदींनी आर्डन यांचे आभार मानले.
27 Sep Current Affairs
27 Sep Current Affairs

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चौकशी

 • डेमॉक्रॅटिक पक्षाने आपल्याविरोधात सुरू केलेल्या महाभियोगाच्या चौकशीला आधार नसून ही चौकशी म्हणजे विनोदच असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिली. मात्र आधी या कारवाईविरोधात जोरकसपणे भूमिका मांडणाऱ्या ट्रम्प यांचा सूर बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काहीसा मवाळ झाल्याचे दिसले.
 • दुसरीकडे ट्रम्प यांनी 'माफियांच्या पद्धतीने' युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव आणल्याच्या आरोपावर डेमॉक्रॅटिक सदस्य ठाम राहिले.
 • आपले विरोधक जो बायडेन यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर वारंवार दबाव आणल्याचा आरोप ट्रम्प यांनी फेटाळला आहे.
 • 'व्हाइट हाऊस'ने प्रसिद्ध केलेल्या संभाषणाच्या सारांशामध्ये ट्रम्प हे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बुधवारी समोर आल्याने डेमोक्रॅटिक सदस्यांच्या आरोपांना बळ मिळाले होते.
 • दरम्यान, महाभियोगाच्या चौकशीत गुरुवारी राष्ट्रीय गुप्तवार्ता विभागाचे कार्यकारी प्रमुख जोसेफ मॅकगीर हे अमेरिकेच्या कॅपिटॉल हिलसमोर जबाब देणार आहेत. यामध्ये काही स्फोटक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

[Note : भारतातील महाभियोग प्रक्रिया करून ठेवा]

 

पॅसिफिक बेटांना १५ कोटी डॉलरचे कर्ज

 • भारत आणि पॅसिफिक महासागरांतील विकसनशील देशांची बुधवारी परिषद झाली. या छोट्या देशांमध्ये सौरऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा आणि हवामानविषयक प्रकल्पांसाठी १५ कोटी डॉलरपर्यंत कर्ज देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.
 • या शिवाय, या देशांमध्ये त्यांच्या प्राधान्यानुसार उच्चपरिणाम विकास प्रकल्पांसाठी १.२ कोटी डॉलरची मदत देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेवेळी ही परिषद झाली असून, आमसभेच्या काळात प्रथमच या देशांची परिषद झाली.
 • या परिषदेला फिजी, किरीबाती, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नौरू, पलाऊ, पपुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा या बेटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 • 'सब का साथ, सब का विकास या तत्त्वावर ही मदत करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
 • 'पॅसिफिक महासागरातील या देशांची मूल्ये आणि आकांक्षा समान आहेत. याशिवाय, असमानता कमी करण्यासाठी आणि सबलीकरणासाठी योगदान देण्यासाठी विकासाची धोरणे आखण्याची गरज आहे.
 • या देशांची लक्ष्ये गाठण्यासाठी विकासशील आणि तांत्रिक सहाय देण्याची गरज आहे.
 • उर्जेच्या पर्यायी स्रोतांविषयीच्या अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी भारत तयार आहे, असे सांगतानाच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये या विभागातील अनेक देश सहभागी झाल्याबद्दल पंतप्राधानानी समाधान व्यक्त केले.
27 Sep Current Affairs
27 Sep Current Affairs

इंटरनेट वापरात भारत दुसरा

 • इंटरनेटचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या ४५.१० कोटींवर पोहोचली आहे. नेटकऱ्यांच्या या सूचीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर असून भारताने दुसरे स्थान मिळवले आहे.
 • इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ही आकडेवारी मार्च २०१९ अखेरची आहे.
 • भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या एक तृतीयांश असून यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत, असे निरीक्षण या अहवालात नोंदवले आहे.
 • दरमहा इंटरनेटवर सक्रिय असणाऱ्यांची भारतातील संख्या ४५.१० कोटी असून यातील ३८.५० कोटी यूजरचे वय हे १२ वर्षांपेक्षा अधिक आहे.
 • गंभीर बाब म्हणजे पाच ते १२ वर्षे या वयोगटातील ३.८५ कोटी मुलांकडून इंटरनेटचा वापर केला जातो. घरात उपलब्ध असणाऱ्या गॅजेट्सच्या साह्याने ही मुले इंटरनेट हाताळतात.

एलपीजी आयातदारांमध्ये भारत दुसरा इंधन कंपन्या 'गॅस'वर

 • दिवाळीनिमित्त घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) मागणीतील संभाव्य वाढ लक्षात घेऊन सरकारी इंधन कंपन्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी या काळात सिलिंडरच्या मागणीत वाढ होतेच, मात्र यंदा सौदी अरेबियाने काहीसा आखडता हात घेतल्याने सरकारी इंधन कंपन्यांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
 • पावसाळ्यामध्ये गॅस सिलिंडरच्या मागणीत घट होते. मात्र त्यानंतर सणासुदीचे दिवस येत असल्याने त्या काळात विशेषत: दिवाळीमध्ये एलपीजीच्या मागणीत कमालीची वाढ होते. ही वाढ अपेक्षित असल्याने सरकारी इंधन कंपन्यांकडून दरवर्षी त्याबाबत पुरेशी खबरदारी घेतली जाते. ऐन दिवाळीतही घरगुती सिलिंडरची मागणी वेळेवर पूर्ण केली जाते.
 • यंदाचे वर्ष मात्र त्यास अपवाद ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सौदी अरेबियाकडून होणाऱ्या इंधनपुरवठ्यात घट झाल्याने इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी कंपन्यांना धावपळ करावी लागत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होणारी इंधनाची दोन जहाजे सौदीने लांबवणीवर टाकली असल्याची माहिती इंडियन ऑइलचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी दिली.
 • सिंग म्हणाले की, 'पुढील महिन्यात दिवाळी असल्याने त्या काळात सिलिंडरच्या मागणीत वाढ होणार हे साहजिक आहे. मात्र सौदीतील बदलत्या परिस्थितीमुळे त्यांच्याकडून होणारा इंधन पुरवठा काहीसा घटला आहे. पुढील महिन्यातील आपल्या दोन मोठ्या ऑर्डरची त्यांच्याकडून होणारी आपूर्ती अद्याप अनिश्चित आहे. सौदीने निर्यात घटवली असली तरी आम्ही जास्तीत जास्त म्हणजे नेहमीपेक्षा अधिक इंधन मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. ऑक्टोबर व नोव्हेंबर हे महिने आपल्यासाठी विशेष असतात. या कालावधीत इंधन तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जाईल.'
 • सणासुदीतील मागणी पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त एलपीजी आयात करण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही, असे बीपीसीएलचे संचालक आर. रामचंद्रन यांनी सांगितले.

एलपीजी आयातदारांमध्ये भारत दुसरा:-

 • एलपीजी आयात करणाऱ्या देशांच्या सूचीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण देशांतर्गत गरजेपैकी निम्मी गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यापैकी बहुतांश एलपीजी हा मध्यपूर्वेतील देशांतून म्हणजे सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि कुवेत या देशांतून विकत घेतला जातो. पेट्रोल व डिझेलच्या एकूण गरजेपैकी ८३ टक्के गरज ही आयातीतून पूर्ण होते.

सौदीला फटका कशामुळे?:-

 • अरामको या सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या इंधन उत्पादक प्रकल्पावर दोन आठवड्यांपूर्वी ड्रोन हल्ला झाल्यानंतर या कंपनीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. या हल्ल्यानंतर अरामकोचे दैनंदिन इंधन उत्पादन ५७ लाख बॅरलने घटले आहे. या प्रकल्पाच्या एकूण दैनंदिन क्षमतेच्या प्रमाणात ही घट तब्बल ६० टक्के आहे. जागतिक बाजारात सौदीकडून होणाऱ्या इंधन पुरवठ्याचे प्रमाण पाच टक्के असल्याने अरामकोमध्ये निर्माण झालेली घट ही केवळ मध्यपूर्वेतील इंधन बाजारांसाठी नव्हे तर, एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी परिणामकारक ठरली आहे.

अबुधाबीने दिला हात:-

 • अरामकोकडून होणारा इंधनपुरवठा घटल्यानंतर अबुधाबी येथील अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीने भारताला हात दिला. एलपीजीची दोन अतिरिक्त जहाजे भारताला निर्यात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. येत्या दोन आठवड्यांत ही जहाजे भारतात दाखल होतील, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटद्वारे दिली.
27 Sep Current Affairs
27 Sep Current Affairs

जलतरण भारताला नऊ सुवर्णपदके

 • भारताच्या ४ बाय १०० मीडले रिले पुरुषांच्या संघाने दहाव्या एशियन एज ग्रुप जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
 • या स्पर्धेतील भारताचे हे नववे सुवर्णपदक ठरले.
 • भारतीय संघात श्रीहरी नटराज, साजन प्रकाश, लिकिथ एस. पी. आणि वीरधवल खाडे यांचा समावेश होता. भारताच्या या चौकडीने ३ मिनिटे ४६.४९ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. थायलंडच्या संघाने (३ मि. ४८.८९ से.) रौप्य आणि हाँगकाँगच्या संघाने (३ मि. ५३.९९ से.) ब्राँझपदक मिळवले.
 • या शर्यतीत भारताच्या जलतरणपटूंना थायलंड आणि हाँगकाँगकडून मोठे आव्हान मिळाले. श्रीहरी नटराज (५६.५५ से.) याने बॅकस्ट्रोकमध्ये हाँगकाँगच्या लाउ शिउ युएला (५७.७२ से.) मागे टाकले. यानंतर साजन प्रकाशने बटरफ्लायमध्ये ५४.५० सेकंद वेळ नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली.
 • ब्रेस्टस्ट्रोकमध्ये लिकित एस.पीने १ मिनिट ०२.४७ सेकंद वेळ नोंदवून भारताची आघाडी वाढविली. यानंतर ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये खाडेने ५३.०० सेकंद वेळ नोंदवले. थायलंडच्या चरित थाँगचुम्सने ५२.२९ सेकंद वेळ नोंदवली. मात्र, यामुळे भारताच्या सुवर्णयशावर काही परिणाम झाला नाही.

Korea Open कश्यपची उपांत्य फेरीत धडक

 • भारताचा बॅटमिंटनपटू परूपल्ली कश्यप याने कोरिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
 • डेन्मार्कच्या जान ओ जॉर्गन्ससन याचा त्याने दोन सरळ गेममध्ये पराभव केला.
 • ३३ वर्षीय कश्यपने जॉर्गन्ससनला केवळ ३७ मिनिटांच्या खेळात पराभूत केलं. त्याने सामना २४-२२, २१-८ अशा सरळ गेममध्ये जिंकला.
 • पहिला गेम अत्यंत चुरशीचा झाला. पण त्या गेममध्ये कश्यप सरस ठरला. त्याने केवळ २ गुणांच्या फरकाने गेम जिंकला.
 • दुसरा गेमदेखील अटीतटीचा होणार अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण दुसरा गेम पूर्णपणे एकतर्फी झाला. दुसरा गेम २१-८ असा जिंकत प्रतिस्पर्धाचा धुव्वा उडवला.
27 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »