28 August Current Affairs

28 August Current Affairs
28 August Current Affairs

चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले चांद्रयान २

 • चांद्रयान - २ मोहिमेचा आणखी एक अवघड टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पार केला आहे. चांद्रयान - २ आज सकाळी चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले आहे.
 • 'नियोजित वेळेनुसार, आज सकाळी ९.०४ मिनिटांनी चंद्राच्या तिसऱ्या कक्षात पोहोचले,' असं ट्विट इस्रोने केलं आहे.
 • चांद्रयानाचा आतापर्यंतचा प्रवास ठरल्यानुसार होत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणखी ११ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
   

छत्तीसगडमधील आरक्षण पोहोचले ८२% वर

 • छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या बरोबरच राज्यातील आरक्षण ८२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
 • छत्तीसगड राज्यात अनुसूचित जमातीला ३२ टक्के,
 • अनुसूचित जातींसाठी १३ टक्के आणि इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास समाजांना आरक्षण देणारे विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर छत्तीगडमध्ये या वर्गाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. 

देशातील सर्वाधिक आरक्षण:-

 • छत्तीसगड राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर छत्तीसगड हे राज्य देशात सर्वात जास्त आरक्षण देणारे राज्य ठरले आहे.
 • या राज्यातील एकूण आरक्षण ८२ टक्क्यांवर पोहोचले असून सुप्रीम कोर्टाच्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा ते २२ टक्क्यांनी अधिक आहे. 

सुधारणा करणार:-

 • आरक्षणासंदर्भात लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी एका आयोगाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
 • मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसेवा अधिनियम, १९९४ मध्ये सुधारणा करण्यासाठी छत्तीसगड लोकसेवा अधिनियम सुधारणा अध्यादेश, २०१९ च्या प्रस्तावाला समर्थन देण्यात आले. 

छत्तीसगड राज्याविषयी माहिती:-

 • छत्तीसगढ हे नाव १५ व्या शतकात परिसरातील ३६ गडांवरून पडले असावे असा अंदाज आहे. यापैकी रायपूर आणि रतनपूर क्षेत्रात प्रत्येकी १८ गड आहेत.
 • या काळाच्या आधी या भागास दंडकारण्य-दक्षिणकोशल या नावाने ओळखले जात होते.
 • छत्तीसगढ राज्य आकारमानाच्या दृष्टीने भारतातील ९ व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.
 • याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ७०० कि. मी. असून उत्तर-दक्षिण रुंदी सुमारे ४३५ कि. मी. आहे.

सीमा:-

 • छत्तीसगढ राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश व झारखंड, वायव्येला मध्य प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, दक्षिणेला आंध्र प्रदेश व पूर्वेला ओडीशा ही राज्य आहेत.

जिल्हे:-

 • छत्तीसगढ राज्यात १६ जिल्हे आहेत. 

राज्यात ३ राष्ट्रीय उद्याने आणि १० अभयारण्ये आहेत.
 

28 August Current Affairs
28 August Current Affairs

हाँगकाँगवरून चीनची नाराजी

 • 'जी-७' देशांच्या परिषदेमध्ये हाँगकाँगच्या स्वायत्ततेचे केलेले समर्थन चीनला चांगलेच झोंबले आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनावर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या 'जी-७' देशांच्या परिषदेमध्ये हाँगकाँगमधील निदर्शनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. १९८४ च्या ब्रिटन-चीन करारानुसार हाँगकाँगला स्वायत्त दर्जा देण्यावर परिषदेत एकमत झाले.
 • 'या मुद्द्यावरून कोणताही हिंसाचार किंवा रक्तपात होता कामा नये,' अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. 'जी-७' सदस्य देशांच्या या निवेदनावर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेन शुआंग म्हणाले, 'विविध देशांच्या सरकारांनी या प्रकरणात हस्तक्षेप करणे योग्य नाही. आम्ही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो. हाँगकाँगचा मुद्दा हा चीनचा अंतर्गत मुद्दा असून, तो परराष्ट्र धोरणाशी निगडित नसल्याचे चीनने वारंवार सांगितले आहे
 • कोणताही इतर देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरची संघटना किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.' वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाच्या विरोधात हाँगकाँगमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.
 • या विधेयकानुसार हाँगकाँगमधील नागरिकांचे खटला चालवण्यासाठी चीनकडे प्रत्यार्पण केले जाईल. हा कायदा झाला, तर विरोधक आणि टीकाकारांच्या विरोधात चीन त्याचा वापर करेल, असा आंदोलकांचे म्हणणे आहे.
 • या विधेयकाच्या विरोधात आंदोलनांची मालिका सुरू आहे. आंदोलकांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या, तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.
 • दरम्यान, याप्रकरणी आंदोलकांनी चर्चा करण्याची तयारी दर्शविली असली तरी मागण्या मागे घेतल्या जाणार नाहीत असेही ठणकावले आहे. 

निर्बंध उठवण्याची मागणी तेहरान:

 • 'अमेरिका-इराण द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी इराणवर लादण्यात आलेले निर्बंध पहिल्यांदा उठवण्यात यावेत,' अशी मागणी इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी अमेरिकेकडे केली आहे.
 • इराणशी खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले होते. त्यावर रौहानी यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, 'दोन्ही देशांमधील संबंध सुधारायचे असतील तर निर्बंध उठवणे हा पहिला टप्पा असला पाहिजे. 
 • बेकायदा आणि चुकीच्या निर्बंधांमुळे इराणला मोठा फटका बसला आहे. याबाबत काही सकारात्मक बदलाचा निर्णय अमेरिकेच्याच हातात आहे.' 
   

ब्राझीलने मदत नाकारली

 • अॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगीप्रकरणी 'जी-७' देशांनी दिलेली मदत ब्राझीलने नाकारली आहे. 'आम्ही या मदतीचे स्वागत करतो. मात्र, ही मदत युरोपातील वनांसाठी वापरा,' असे ब्राझीलच्या अध्यक्षांचे सचिव ओनॅक्स लोरेंझोनी यांनी म्हटले आहे.
 • या मुद्द्यावरून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनाही ब्राझीलने फटकारले आहे. लोरेंझोनी म्हणाले, 'जागतिक वारसास्थळ असलेल्या प्राचीन चर्चची आग आटोक्यात आणण्यात मॅक्रॉन अपयशी ठरले.
 • ते आता आमच्या देशातील आग आटोक्यात आणण्यासाठी पैसे देत आहेत. मॅक्रॉन यांनी यामध्ये लक्ष देऊ नये.'
28 August Current Affairs
28 August Current Affairs

१० हजारांहून अधिक रकमेसाठी ATM मागणार OTP

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर आता एटीएमचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे. कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ओटीपी बंधनकारक केला आहे. म्हणजेच एटीएममधून तुम्हाला दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर पासवर्डसोबत ओटीपी क्रमांकही द्यावा लागेल.
 • आता अन्य बँकादेखील कॅनरा बँकेप्रमाणेच हा ओटीपीचा नियम करण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या निर्देशांचे सर्व बँकांना पालन करायचे आहे. आरबीआयने हे स्पष्ट सांगितले आहे की एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखायला हवी. एटीएम फसवणुकीचे प्रकार रात्री ११ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक होतात. 
 • २०१८-१९ मध्ये दिल्लीत १७९ एटीएम फसवणुकीचे गुन्ही दाखल झाले. महाराष्ट्रात या दरम्यान २३३ गुन्हे दाखल झाले. अलीकडेच कार्डच्या क्लोनिंगचे प्रकारही समोर आहे. २०१८-१९ मध्ये देशभरात एटीएम फसवणुकीचे ९८० प्रकार घडले आहेत. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ९११ होती.
   

आरबीआयकडील साचलेला पैसा मुख्य प्रवाहात

 • लाभांश व अतिरिक्त निधीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
 • रिझर्व्ह बँकेचा अतिरिक्त निधी किती प्रमाणात सरकारकडे वर्ग करता येईल यासाठी सरकारने नेमलेल्या बिमल जालन समितीने या विषयी केलेल्या शिफारसी रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्या असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • यामुळे आरबीआयकडे असलेला अतिरिक्त निधी अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. आरबीआयचा अतिरिक्त निधी (सरप्लस) म्हणजे काय, या बँकेचा ताळेबंद कसा असतो त्याचा मागोवा. 

सरकारला किती निधी मिळणार?:-

 • केंद्र सरकारला आरबीआयकडून एकूण १.७६ लाख कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातील १.२३ लाख कोटी रुपयांची रक्कम ही सरप्लसची असून उर्वरित ५२,६३७ कोटी रुपयांची रक्कम ही बँकेने केलेल्या अतिरिक्त तरतुदींमधून दिली जाईल. 

ताळेबंदाचे स्वरूप:-

 • आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये आरबीआयचा ताळेबंद ३६.२ लाख कोटी रुपयांचा होता. अर्थात, रिझर्व्ह बँकेची खतावणी (लेजर) ही अन्य संस्था व कंपन्यांपेक्षा वेगळी असते.
 • आरबीआयच्या संपत्तीमधील २६ टक्के हिस्सा हा विविध राखीव निधींच्या स्वरूपात ठेवला जातो. केंद्र व विदेशी सरकारच्या सिक्युरिटीज आणि सोन्यामध्ये या रकमेची गुंतवणूक केली जाते.
 • आरबीआयकडे सद्यस्थितीत किमान ५६६ टन सोने आहे. हे सोने व विदेशी चलन साठा एकत्र केल्यास त्याचे प्रमाण बँकेच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत ७७ टक्के आहे. 

राखीव निधी:-

 • आरबीआयचे राखीव निधी हे अनेक प्रकारचे असतात. चलन व सोने पुनर्मूल्यांकन खाते (सीजीआरए) हा एक प्रकारचा राखीव निधी असून २०१७-१८मध्ये या खात्यात ६.९ लाख कोटी रुपयांची शिल्लक होती.
 • आरबीआयकडे किती प्रमाणात विदेशी चलन व सोने आहे याची माहिती या खात्यातून मिळते. याशिवाय आकस्मिक निधीची (सीएफ- काँटिन्जन्सी फंड) तरतूद करावी लागते. पतधोरण व डॉलर-रुपया विनिमय दरातील बदलांमुळे अकस्मात उद्भवणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला जातो.
 • २०१७-१८मध्ये हा निधी २.३२ लाख कोटी रुपये होता. सीजीआरए आणि सीएफची बेरीज केली तर तो आकडा आरबीआयच्या एकूण संपत्तीच्या २६ टक्क्यांएवढी भरते. 

अतिरिक्त निधी म्हणजे काय?:-

 • सर्व आर्थिक तरतुदी, सर्व देणी, सर्व खर्च केल्यानंतर आरबीआयकडे जी रक्कम उरते तिला अतिरिक्त निधी असे म्हणतात.
 • आरबीआय कायद्याच्या कलम ४७नुसार हा अतिरिक्त निधी सरकारला द्यावाच लागतो. सरकारी सिक्युरिटिजमध्ये ठेवलेल्या हजारो कोटी रुपयांवर आरबीआयला मोठ्या प्रमाणावर व्याज मिळते. 

यंदा काय झाले?:-

 • सोने आणि विदेशी मुद्रा बाजारात गेल्या वर्षी आरबीआयने मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले. डॉलरविक्री व चलन बाजारातून केलेल्या रोखेखरेदीमुळे आरबीआयला चांगले उत्पन्न झाले. त्यामुळे आरबीआयकडे यंदा विक्रमी अतिरिक्त निधी होता.
 • बिमल जालन समितीच्या शिफारसी व संबंधित कायद्यानुसार यातील १.७६ लाख कोटी रुपयांचा निधी आता सरकारला मिळणार आहे. 
28 August Current Affairs
28 August Current Affairs

बुमराहची कसोटी रँकिंगमध्ये थेट ७ व्या क्रमांकावर झेप

 • अँटिगा येथे पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करत टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप टेनमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळवलं आहे.
 • बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शेवटच्या डावात पाच बळी मिळवत कसोटी क्रमवारीत थेट १६व्या स्थानावरून ७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत डावात पाच विकेट मिळविण्याचा विक्रम करणाराही तो पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे. 
 • वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे बुमराहच्या खात्यात ७७४ गुण जमा झाले आहेत.
 • त्यामुळे त्याने थेट १६व्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेनेही कसोटी क्रमवारीत ११व्या स्थानावरून १०व्या स्थानावर झेप घेतली आहे. 
 • कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०८ गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा ८५१ गुणांसह दुसऱ्या आणि जेम्स अँडरसन ८१४ गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे.
 • विशेष म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानेही पुन्हा एकदा टॉप ५मध्ये स्थान मिळवलं आहे. तर फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली पहिल्या तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या आणि केन विल्यमसन तिसऱ्या स्थानी आहे. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »