28 Sep Current Affairs

28 Sep Current Affairs
28 Sep Current Affairs

समुद्रातील सर्वात मोठ्या ड्राय डॉक चे उद्घाटन

 • मुंबईतील नौदल गोदीत नौदलाच्या विमानवाहू नौका दुरूस्त करण्यासाठी समुद्रातील सर्वात मोठा ‘ड्राय डॉक’ (दुरुस्ती तळ) उभारण्यात आला आहे.
 • हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने हा दुरूस्ती तळ उभारला असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज (शनिवार) या ड्राय डॉकचं उद्घाटन करण्यात आलं.
 • समुद्रातील पाण्यावर तब्बल 5.68 कोटी घन मीटरचे हे बांधकाम करण्यात आलं आहे.
 • सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये एकमेव युद्धनौका कार्यरत आहे. कारवारमध्ये या युद्धनौकेचा तळ असला तरी दुरूस्तीसाठी मात्र या युद्धनौकेला कोचीनच्या जहाजबांधणी कारखान्यात जावं लागतं.
 • यासाठीच मुंबईत ड्राय डॉकची उभारणी करण्यात आली आहे. पश्चिम कमांडच्या मुख्यालयात हा ड्राय डॉक उभारण्यात आला आहे.
 • 281 मीटर लांब, 45 मीटर रुंद व 17 मीटर खोल असा तळ उभारण्यात आला आहे.
 • या तळाच्या उभारणीसाठी समुद्राच्या तळाशी विशिष्ट प्रकारचे सिमेंट टाकण्यात आले असून दोन्ही बाजूंनीही सिमेंटच्या ठोकळ्यांची भिंत उभारण्यात आली आहे.
 • ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू नौकाही याठिकाणी दुरुस्त होऊ शकते.
 • तसंच या ठिकाणी दुरूस्तीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, पाणी काढण्यासाठी मोठे पंपही लावण्यात आले आहेत. तसंच जर आग लागण्याची घटना घडली तर त्यासाठी अग्नीशमन यंत्रणा तळाशी उभारण्यात आलेल्या भितींमध्ये बसवण्यात आली आहे.
 • हा तळ उभारण्यासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला आहे.

नौदलाची क्षमता दुपटीनं वाढली आयएनएस खांदेरी नौदलाच्या ताफ्यात दाखल

 • संपूर्ण भारतीय बनावटीची, अद्ययावत अशी ‘आय.एन.एस. खांदेरी’ ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.
 • संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ही पाणबुडी देशसेवेत रूजू करण्यात आली.
 • पाणबुडीच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
 • कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.
 • १९७१ च्या युद्धात नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. भारतीय नौदलाने व्यापारी मार्गावर नियंत्रण मिळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत त्यांचं कंबरडं मोडलं होतं.
 • आयएनएस खांदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, हे पाकिस्तानने आता लक्षात ठेवावं.
 • छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरून या पाणबुडीचं नाव:-
 • “छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरूनच या पाणबुडीचं नाव ठेवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचं सामर्थ्य ओळखलं होतं. त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याची क्षमता भारतीय नौदलात आहे.
 • कलवरी श्रेणीतील सहा पाणबुडय़ा बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही दुसरी पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे.
 • या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे. सध्या नौदलाकडील पाणबुडींची संख्या मर्यादित असून खांदेरीमुळे नौदलाच्या सामरिक ताकदीत वाढ होणार आहे.
 • पी १७ प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या ‘स्कॉर्पिअन’ या फ्रेंच तंत्राधारित उर्वरित चार पाणबुडी २०२३ पर्यंत नौदलात दाखल होतील.
 • ‘खांदेरी’च्या बांधणीचे काम एप्रिल २००९ मध्ये सुरू करण्यात आले, मध्यंतरी काही काळ फ्रेंच उत्पादकांच्या पुरवठा साखळीतील अडचणींमुळे बांधणीस काही काळ विलंब झाला. जून २०१७ पासून ऑगस्ट २०१९ पर्यंत तिच्या चाचण्या घेण्यात आल्या.
28 Sep Current Affairs
28 Sep Current Affairs

दहशतवादाबाबत परराष्ट्रमंत्र्यांचा सार्क परिषदेत पाकवर निशाणा

दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था (सार्क)

 • दक्षिण आशियातील फलदायी सहकार्यासाठी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करणे ही पूर्वअट आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
 • सार्कची कालसुसंगतता ही केवळ दहशतवादाच्या समस्येवरील निर्णायक कृतीवर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 • सार्क ही केवळ हुकलेल्या संधींची कहाणी नाही तर सहकार्याच्या वाटेत दहशतवादाच्या मार्गाने हेतपुरस्सर आणण्यात आलेल्या अडथळ्यांचीही कहाणी आहे.
 • दहशतवादाचा नायनाट ही केवळ फलदायी सहकार्यासाठीच नव्हे तर दक्षिण आशियाच्या अस्तित्वासाठी पूर्वअट आहे.
 • पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी जयशंकर यांच्या काश्मीरविषयक वक्तव्यावर आक्षेप घेतला. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे जयशंकर यांनी म्हटले होते.
 • सार्क नेत्यांच्या बैठकीत जयशंकर यांनी २०१४ मधील काठमांडू जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सार्क प्रादेशिक जाहीरनाम्यात असे म्हटले होते, की दहशतवाद नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कायदे करण्यात यावे.
 • सार्क देशांनी दहशतवादाविरोधात उपाययोजना केल्या, तरच या चळवळीचे महत्त्व राहील. त्यातूनच हा सहप्रवास फलदायी होईल. प्रादेशिकतावाद हा आता जगात सगळीकडेच आहे.
 • सार्क देशांनी जर व्यापार व दळणवळण सुविधा सुरळीत ठेवल्या नाहीत तर ते मागे पडतील. मोटार वाहन व रेल्वे करारात त्यांनी पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव आहे. सार्क प्रादेशिक हवाई सेवा करारावर काहीच प्रगती झालेली नाही.

सौदी अरेबियात विदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा सक्ती हटवली

 • सौदी अरेबियाने परदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा सक्ती हटवली आहे.
 • पर्यटकांना आर्कषित करण्यासाठी सौदी अरेबियाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे.
 • सौदीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबन कमी करून पर्यटनाला महत्त्व देण्यासाठी प्रिन्स सलमानने देखील व्हिजन २०३० ह्या उपक्रमाची देखील घोषणा केली आहे.
 • सौदी अरेबियाने विदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा सक्ती हटवली आहे. सौदी पर्यटन आणि राष्ट्रीय वारसा समितीचे अध्यक्ष अहमद अल-खतिब यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. विदेशी पर्यटक महिलांनी बुरखा घालण्याची गरज नाही.
 • मात्र योग्य प्रकारचे कपडे घालण्याची सूचना दिली आहे. शनिवारी, ४९ देशांच्या नागरिकांना पर्यटक व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, तर इतर जण दूतावास आणि परराष्ट्रातील दुतावासांमध्ये अर्ज करु शकतात, असे अल-खतिब यांनी रियाधमधील ब्लूमबर्ग टीव्हीला सांगितले आहे.
 • याआधी केवळ सौदीला नोकरीसाठी येणार्‍या लोकांसाठी, त्यांचे कुटुंबीय आणि मक्का-मदिनाला जाणार्‍या मुस्लिम यात्रेकरूंना व्हिसा देण्यात येत होता.
 • प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सरकारने तिथल्या कठोर नियमांपासून तेथील महिलांना सूट दिली आहे. अलीकडेच सौदी अरेबियाने महिलांना देखील परदेशात प्रवास करण्यासाठी कायदा केला आहे.
 • महिलांना त्यांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचीही परवानगी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच सौदीतील महिलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळण्याचा कायदा करण्यात आला होता.
28 Sep Current Affairs
28 Sep Current Affairs

अयोध्याप्रकरणी पुरातत्व अहवाल अभ्यासपूर्णच सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती:-

 • रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणी २००३ मधील भारतीय पुरातत्त्व विभागाचा (एएसआय) अहवाल म्हणजे सर्वसामान्य मत नव्हते. उत्खननातून जे साहित्य मिळाले त्याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची मते काय आहेत हे स्पष्ट करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. त्यांच्या वतीने हे अधिकारी काम करीत होते, असे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
 • एएसआयच्या अहवालातून जे अनुमान काढण्यात आले ते सुसंस्कृत आणि अभ्यासपूर्ण मनाने काढण्यात आले होते, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने म्हटले आहे.

कल्याणसिंह सीबीआय न्यायालयासमोर हजर:-

 • बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने समन्स बजावले होते, त्यानुसार ते शुक्रवारी न्यायालयासमोर हजर झाले. नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह अनेक नेत्यांची याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.
 • कल्याणसिंह हे राजस्थानचे राज्यपाल होते, त्यांची राज्यपालपदाची मुदत संपली असल्याचे कळविण्यात आल्यानंतर त्यांच्यावर समन्स बजावण्यात आले.

वडील आपल्या मुलीशी करु शकतात लग्न इराणच्या संसदेत विधेयक मंजूर

 • इराणच्या संसदेत एक असं विधेयक मंजूर झालं आहे ज्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या विधेयकानुसार वडील दत्तक घेतलेल्या आपल्याच मुलीसोबत लग्न करु शकतात.
 • विधेयकानुसार, दत्तक घेतलेल्या मुलीचं वय १३ पेक्षा जास्त असल्यास तिच्या वडिलांना लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. इराणमध्ये २२ सप्टेंबर रोजी हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. दरम्यान या विधेयकावरुन एकीकडे दुसरे देश आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर इराणमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.
 • इराणच्या सुरक्षा परिषदेकडून अद्याप या विधेयकावर निर्णय दिलेला नाही. लंडन स्थित ग्रुप जस्टीस ऑफ इराणच्या मानवाधिकार वकील शदी सदर यांनी सांगितलं की, “हे विधेयक म्हणजे लहान मुलांच्या लैंगिक शोषणाला कायदेशीर करण्याचा प्रकार आहे. आपण दत्तक घेतलेल्या मुलीशी लग्न करणं इराणच्या संस्कृतीचा भाग नाही. इराणमध्ये इतर देशांप्रमाणे अनेक अनैतिक गोष्टी आहेत, पण हे विधेयक इराणमधील मुलांसंबंधी गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखं आहे. जर दत्तक घेतलेल्या आपल्याच मुलीसोबत वडील शारीरिक संबंध ठेवत असेल तर हा बलात्कार आहे”.
 • सदर यांच्या म्हणण्यानुसार, इराणमधील काही अधिकारी हिजाबच्या समस्येच्या नावाखाली विधेयकातील वादग्रस्त मुद्द्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. दत्तक घेतलेल्या मुलीला वडिलांसमोर हिजाब घालावा लागतो, तर दत्तक घेतलेल्या मुलासमोर आईने हिजाब घेणं अनिवार्य आहे. पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “काही तज्ञांच्या मते हे नवं विधेयक इस्लामच्या विचारसरणीच्या विरोधात आहे आणि सुरक्षा परिषद त्याला मान्यता देणार नाही”.
 • इराणमधील लहान मुलांच्या अधिकाऱ्यांसाठी लढणाऱ्या संस्थेच्या प्रमुख शिवा डोलाताबादी यांनी या विधेयकासंबंध बोलताना यामुळे लहान मुलांसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल अशी भीती व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना त्यांच्या कुटुंबातही सुरक्षित असल्याची भावना वाटणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
 • इस्लामिक देशांमध्ये १३ वर्षांच्या वरील मुली वडिलांच्या संमतीने लग्न करु शकतात. तर मुलांसाठी ही वयाची अट १५ आहे. मुलीचं वय १३ पेक्षा कमी असल्यास तिच्या लग्नासाठी न्यायाधीशांची संमती मिळवणं जरुरी आहे. २०१० पासून इराणमध्ये १० ते १४ वर्षांत जवळपास ४२ हजार मुलांची लग्नं झाली आहेत. इराणची वेबसाईट तबनकनुसार, फक्त तेहरानमध्ये १० वर्षापेक्षा कमी वयाच्या ७५ मुलांची लग्न झाली आहेत.
28 Sep Current Affairs
28 Sep Current Affairs

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा श्रीशंकरकडून निराशा

 • लांब उडीच्या पात्रता फेरीत २२ व्या क्रमांकावर घसरण
 • जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा
 • लांबउडीपटू एम. श्रीशंकर याला पात्रता फेरीतच २२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने दोहा येथे सुरू झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची सुरुवात निराशाजनक झाली.
 • २० वर्षीय श्रीशंकरला पात्रता फेरीतील तीन प्रयत्नांमध्ये आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या जवळ पोहोचता आले नाही. त्याने ७.६२ मीटर इतकी उडी घेत २२वे स्थान प्राप्त केले. पात्रता फेरीत सहभागी झालेल्या २७ जणांमध्ये तो शेवटून दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. गेल्या महिन्यात त्याने पतियाळा येथे ८.०० मीटर इतकी कामगिरी नोंदवली होती. श्रीशंकरने ८.२० मीटर इतकी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असून हा राष्ट्रीय विक्रमसुद्धा आहे.
 • श्रीशंकरने पहिल्या प्रयत्नांत ७.५२ मीटर इतकी उडी मारल्यानंतर दुसऱ्या वेळी त्याने ७.६२ मीटर इतकी झेप घेतली. पण तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नांत त्याने मारलेली उडी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे पुरुषांच्या लांबउडी प्रकारातील भारताचे आव्हान संपुष्टात आले. अंतिम फेरीसाठी ८.१५ मीटर इतका पात्रता निकष ठरवण्यात आला होता. पण एकाच खेळाडूला हा निकष पार करता आला. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अन्य ११ जणांनी ७.८९ मीटरच्या पुढे कामगिरी नोंदवली.
 • श्रीशंकरने नोंदवलेली ७.६२ मीटर इतकी कामगिरी ही या मोसमातील त्याची दुसऱ्या क्रमांकाची निचांक कामगिरी ठरली आहे. गेल्या महिन्यात लखनौ येथील राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने ७.५३ मीटर इतकी झेप घेतली होती. या मोसमात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत ७.९० मीटर आणि ८.०० मीटर अशी कामगिरी नोंदवली होती.

[श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा]

 

दीपक पुनियाची अग्रस्थानी झेप

 • बजरंगने अव्वल स्थान गमावले; राहुल आवारे दुसऱ्या क्रमांकावर
 • जागतिक स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरणारा भारताचा कुस्तीगीर दीपक पुनिया याने ८६ किलो वजनी गटात अग्रस्थानी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाकडून जाहीर झालेल्या क्रमवारीत बजरंग पुनिया याने ६५ किलो वजनी गटातील आपले अव्वल स्थान गमावले असून महाराष्ट्राच्या राहुल आवारेने ६१ किलो गटात दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
 • नूर-सुलतान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत दीपकने आपल्या प्रतिस्पध्र्याना धूळ चारत अंतिम फेरीत मजल मारली होती. मात्र इराणच्या हसन याझदानीविरुद्धच्या अंतिम लढतीत दीपकला घोटय़ाच्या दुखापतीमुळे रिंगणात उतरता आले नाही. त्यामुळे त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. २० वर्षीय दीपकने क्रमवारीत मात्र याझदानीला चार गुणांनी मागे टाकत ८२ गुणांसह अग्रस्थान काबीज केले आहे.
 • २५ वर्षीय बजरंगला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली होती. यामुळे त्याच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो ६३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सुवर्णपदक पटकावणारा रशियाचा गदधिमुराद राशिडोव्ह याने अग्रस्थान पटकावले आहे.
 • ६१ किलो वजनी गटात राहुल आवारेने कांस्यपदकावर नाव कोरले होते. जागतिक स्पर्धेत पदक पटकावणारा तो महाराष्ट्राचा तिसरा मल्ल ठरला होता. त्यामुळेच या गटात त्याने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या रवी दहियाने ३९ गुणांसह अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवले.
 • महिलांमध्ये, ५३ किलो गटात कांस्यपदकासह टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित करणाऱ्या विनेश फोगट हिने चार क्रमांकाने झेप घेत दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
28 Sep Current Affairs
28 Sep Current Affairs

सॅफ चषक फुटबॉल स्पर्धा भारतीय युवा संघ अंतिम फेरीत

 • भारताच्या युवा फुटबॉल संघाने मालदीवचा ४-० असा धुव्वा उडवत सॅफ चषक (१८ वर्षांखालील) फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नरेंद्र गेहलोत (सातव्या मिनिटाला), मानवीर सिंग (७९व्या मिनिटाला) आणि निंठोइंगानबा मीतेई (८१व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले.
 • मालदीवच्या अहनाफ रशीध (४५व्या मिनिटाला) याने स्वयंगोल करत भारताच्या खात्यात एका गोलाची भर घातली. आता रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे.
 • भारताने आक्रमक सुरुवात करत प्रतिस्पध्र्याच्या बचावपटूंवर दडपण आणले. याचा फायदा उठवत मधल्या फळीत खेळणाऱ्या नरेंद्रने भारताचे खाते खोलले. त्यानंतर भारताने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या.
 • गिव्हसन याला गोल करण्याची अप्रतिम संधी होती. मात्र डाव्या कॉर्नरवरून मिळालेल्या क्रॉसवर त्याने हेडरद्वारे मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. मालदीवचा गोलरक्षक हसन अलीफ याने चेंडूला वर ढकलले. मध्यंतराचा खेळ संपण्यास काही सेकंद शिल्लक असताना अहनाफ याच्या स्वयंगोलमुळे भारताला २-० अशी आघाडी घेता आली.
 • प्रशिक्षक फ्लॉइड पिंटो यांनी दुसऱ्या सत्रात अमन छेत्रीच्या जागी आकाश मिश्राला आणि रवी राणा यांना मैदानात उतरवले. सामना संपायला १० मिनिटे बाकी असताना मानवीर याने भारताला ३-० अशा आघाडीवर आणले. दोन मिनिटानंतर निंठोइ याने गोल करत भारताला ४-० असा दणदणीत विजय मिळवून दिला.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »