29 August Current Affairs

29 August Current Affairs
29 August Current Affairs

फिट इंडिया चळवळीचा दिल्लीत शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंट अभियानाची सुरुवात होत आहे. या अभियानात देशभरातील उद्योग, चित्रपट आणि क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. पाहुयात, क्षणोक्षणीचे अपडेट्स... 
आज तुम्ही प्रतिज्ञा घ्या... स्वत: फिट राहाल आणि इतरांनाही फिट राहण्यासाठी प्रेरित कराल: नरेंद्र मोदी 
•    'फिट इंडिया' चळवळ प्रत्येक शाळेत जायचा हवी 
•    फिटनेससाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांवर टिप्पणी करताना पंतप्रधानांनी, 'आजकाल आम्ही चालतो कमी, मोजतो अधिक'
•    तंत्रज्ञानामुळे शारीरिक श्रम कमी झाले
•    'फिट इंडिया' चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने पाऊल टाकले आहे
•    चांगल्या आरोग्यामुळे कार्ये सिद्धीस जातात
•    निरोगी राहणे ही मोठी भाग्याची गोष्ट असून, व्यायामामुळे निरोगी राहता येते 
•    खेळाचे थेट नाते फिटनेसशी आहे. फिटनेस हा केवळ एक शब्द नसून ती आरोग्यपूर्ण जीवनाची अटही आहे
•    खेळाडूंना मिळालेला पुरस्कार हा नव्या भारताचा आत्मविश्वास आहे. या मुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते
•    फिटनेस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे
- मोदी
 

पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 • भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने गझनवी बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कराचीजवळ सोनमियानी प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थन न मिळाल्याने पाकिस्तानने यापूर्वीच बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची धमकी दिली होती. 
 • आम्ही पण दिवाळीत अशीच रॉकेट उडवतो रात्रीच्या अंधारात. सद्य पाकिस्तान सैर भैर आहे. अशाप्रकारे जितक्या क्लृप्त्या वापरतील तेवढे ते जगात एकटे पडतील. भारताने कोणतीही  कराची हवाईमार्ग बंद करून दिले होते संकेत 
 • पाकिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने बुधवारी कराची विमानतळावरील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे ३ मार्ग बंद केले होते.
 • पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने 'नोटीस टू एअरमेन' (NOTAM) जारी करत बंदरांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. यानंतरच पाकिस्तान क्षेपणास्त्राची चाचणी करू शकतो अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. 

भारतीय विमानांसाठी पाकने बंद केले हवाई क्षेत्र:-

 • भारतीय विमान वाहतुकीसाठी पाकिस्तानातील हवाई क्षेत्राच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यावर पाकिस्तान विचार करत असल्याचे पाक सरकारने जाहीर केले होते. 

वैमानिकांसाठीही दिले होते निर्देश:-

 • भारतीय विमानांना हवाईबंदी घालताना पाकिस्तानने कराची ओलांडण्यासाठी वैमानिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी पाकिस्तानने केली होती. चार दिवसांच्या ही बंदी १ सप्टेंबरपर्यंत असेल असे प्राधिकरणाने 'नोटीस टू एअरमेन'मध्ये म्हटले होते.
29 August Current Affairs
29 August Current Affairs

सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये युद्ध पाक मंत्र्याला ज्वर

 • भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारे ३७०वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या नेत्यांमधील अस्वस्थता कायम असून, दोन्ही देशांमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मोठे युद्ध होईल, असा जावईशोध पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांना लावला आहे. दरम्यान, पाकिस्तानने कराचीकडे येणारे तीन हवाई मार्ग चार दिवसांसाठी बंद केले आहेत. 
 • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये काश्मीर मुद्द्यावरून भारताला आडकाठी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर, जी-७ परिषदेवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हा द्विपक्षीय संबंध असल्याचे मान्य केले होते. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये अस्वस्थता असून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आण्विक युद्धाची भाषा वापरली होती. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये रशिद यांनी पुन्हा युद्ध होणार असल्याचे भाकित केले आहे.
 • 'काश्मीरमधील संघर्षाचा निर्णायक क्षण आला असून, दोन्ही देशांमधील हे शेवटचे युद्ध असेल. जीना यांनी भारतातील मुस्लिमविरोधी भावना खूप आधीच ओळखले होते. भारताबरोबर चर्चा होण्याची शक्यता वाटते, ते मूर्ख आहेत,' असे पतंगही रशीद यांनी रावळपिंडी येथे पत्रकारांशी बोलताना उडवले. 

कराचीचे तीन हवाई मार्ग बंद:- 

 • पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतुकीचे तीन मार्ग पाकिस्तानने चार दिवसांसाठी बंद केले आहेत. हे मार्ग २८ ते ३१ ऑगस्ट या काळासाठी बंद असतील, असे पाकिस्तान सरकारने जाहीर केले.
 • भारतासाठी सर्व हवाई मार्ग बंद करणे व अफगाणिस्तानला जाणारा भूमार्गही करण्यावर मंगळवारीच पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आला.
 • भारताने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हवाई हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानने भारतासाठी सर्व हवाईमार्ग पाच महिने बंद केले होते. 

आमसभेतही काश्मीरचा मुद्दा:-

 • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये काश्मीरचा मुद्दा उकरून काढणार, हे स्पष्ट झाले आहे.
 • आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर इम्रान खान काश्मीरचा मुद्दा जोरकसपणे मांडतील, असे सुतोवाच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले.
 • भारताने शिमला करार एकतर्फीपणे मोडला असून, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा भंग केल्याचा कांगावाही त्यांनी केला आहे.
 • दरम्यान, भारतासाठी हवाईक्षेत्र बंद करण्याविषयी अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

इंडियन ऑइल गुंतवणार २०० अब्ज रुपये

 • देशांतर्गत ऊर्जेची गरज भागवण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे २०२३-२४ पर्यंत दोनशे अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी बुधवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली. 
 • इंडियन ऑइलचे देशभरात ११ शुद्धीकरण प्रकल्प असून त्यातून देशाच्या दैनंदिन गरजेपैकी (५० लाख बॅरल इंधन) ३३ टक्के इंधनपुरवठा केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात इंडियन ऑइलची उलाढाल सहा लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून कंपनीने १६,८९४ कोटी रुपये नफ्याची नोंद केली. या कंपनीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत १,९३,४२२ कोटी रुपयांची भर पडली आहे.
   
29 August Current Affairs
29 August Current Affairs

विदेशी गुंतवणुकीला चालना

 • संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीला अधिकाधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्याचाच भाग म्हणून बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सिंगल ब्रॅण्ड रिटेल, डिजिटल मीडिया आणि उत्पादन क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला.
 • या निर्णयामुळे थेट विदेशी गुंतवणूक अधिक सुलभ होईल. परदेशी गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. उत्पादन क्षेत्रातील ‘हब’ बनण्यासाठी वेगाने पुढे जाता येईल, अशी माहिती केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 • सिंगल ब्रॅण्ड रिटेल क्षेत्रात देशी उत्पादकांकडून ३० टक्के उत्पादन वा कच्चा माल घेण्याची अट अधिक व्यापक करण्यात आली आहे. तसेच, सिंगल ब्रॅण्ड  रिटेल कंपन्यांना त्यांच्या उत्पादानाची ऑनलाइन विक्री करता येईल. दुकान उभे करून त्याद्वारेच उत्पादनविक्री करण्याची अट शिथिल केली गेली आहे. देशी उत्पादनाला चालना देण्यासाठी कंत्राटी स्वरूपाच्या उत्पादनासाठी तसेच, कोळसा उत्पादन आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात  १०० टक्के परस्पर थेट विदेशी गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली आहे. डिजिटल मीडियामध्ये २६ टक्के थेट विदेशी गुंतवणूक करणे आता शक्य होणार आहे.
 • देशाच्या उत्पादन क्षेत्रातील विकासाची गती मंदावली असून बाजारातील मागणी कमी झाल्याने रोजगारावरही परिणाम होऊ लागला आहे. आर्थिक विकासाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सरकारी तसेच खासगी गुंतवणूक करावी लागणार आहे. दोन दिवसांपूर्वीच रिझव्‍‌र्ह बँकेने १.७६ लाख कोटी रुपयांचा राखीव निधी केंद्र सरकारला दिला आहे. त्याद्वारे सार्वजनिक गुंतवणूक वाढवली जाईल.
 • खासगी क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी गुंतवणुकीबाबत अधिक खुले धोरण राबवले जात आहे.

साखर निर्यातीसाठी अनुदान:-

 • देशात साखरेचा अतिरिक्त साठा असून या वर्षी (२०१९-२०) ६० लाख टन साखर निर्यात केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ६,२६८ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याला प्रतिकिलो साखरनिर्यातीमागे १०.३० रुपये मिळतील.
 • हे अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये:-

 • देशात पुढील दोन वर्षांमध्ये म्हणजे २०२१-२२ पर्यंत ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्याद्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तब्बल १५,७०० अतिरिक्त जागा निर्माण होतील.
 • आर्थिक दुर्बल सवर्णासाठी दहा टक्के आरक्षणाचा निर्णय लागू झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा वाढवण्याची मागणी होत होती. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २४,३७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

बीड जिल्ह्यात १३ हजार महिलांची गर्भालाये काढली

 • बीड जिल्ह्य़ातील सुमारे १३ हजार ऊसतोड मजूर महिलांची गर्भाशये काढल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या तपासात उघडकीस आली आहे. महिलांमधील आरोग्याबद्दलचे अज्ञान, लहान वयात होणारी लग्ने, गरिबी यातून हे प्रकार घडल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती व चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. महिलांच्या आरोग्यास हानीकारक असणाऱ्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ नयेत, यासाठी या महिलांना कामाच्या ठिकाणी मूलभूत व प्राथमिक सुविधा पुरविण्याच्या शिफारशी समितीने केल्या आहेत, असे गोऱ्हे यांनी सांगितले.
 • समितीने प्रत्यक्ष बीड जिल्ह्य़ात जाऊन तेथील आरोग्य अधिकारी, कामगार अधिकारी, साखर आयुक्त विभागातील अधिकारी, तसेच ऊसतोड महिलांच्या भेटी घेऊन सविस्तर माहिती घेतली. त्यासंबंधीचा अहवाल बुधवारी त्यांनी आरोग्यमंत्र्यांना सादर केला. या वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
 • डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, बीड जिल्ह्य़ातील सुमारे ८० हजार महिलांचे सर्वेक्षण केले असून, त्यापैकी १३ हजार महिलांची गर्भाशये काढून टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. आरोग्याबद्दलच्या अज्ञानातून या महिला अंतिम उपाय म्हणून अशा शस्त्रक्रिया करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारातून केवळ आरोग्याचाच नव्हे तर एक दुर्लक्षित, परंतु गंभीर सामाजिक प्रश्न पुढे आल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निदर्शनास आणले.
 • मुलींची पंधरा-सोळाव्या वर्षी लग्ने होतात, लगेच मुले होतात, पुढे मुले नकोत म्हणून गर्भाशयेच काढून टाकतात, असे त्यांनी सांगितले.
 • साधारणत: गर्भाशये काढून टाकणाऱ्या महिला तीस वर्षे वयोगटातील आहेत. ऊसतोड मजूर म्हणून काम करणाऱ्या माहिलांना वर्षांला एक लाख ते दीड लाखापर्यंत मजुरी मिळते, त्यातील खासगी रुग्णालयात गर्भाशये काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च करतात. अशा महिलांना पुढे शारीरिक त्रास होतो, त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे त्या म्हणाल्या.
 • या महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

कार्यवाहीच्या सूचना:-

 • बीड जिल्ह्य़ातील पुरुष व महिला मजूर ऊसतोडणीच्या कामासाठी वेगवेगळ्या भागांत मोठय़ा संख्येने स्थलांतर करतात.
 • त्यामुळे ऊसतोडणीसाठी जाण्यापूर्वी आणि परत आल्यानंतर महिलांची वैद्यकीय तपासणी करावी, त्यासाठी महिलांना आरोग्य कार्ड देणे, ऊसतोडणीच्या ठिकाणी साखर कारखान्यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, खासगी रुग्णालयांनी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती देणे, इत्यादी महत्त्वपूर्ण शिफारशी समितीने केल्या आहेत.
 • त्यावर आरोग्य विभागासह संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
29 August Current Affairs
29 August Current Affairs

राज्यातील १७.१ टक्के अपंग विद्यार्थी शाळाबाह्य़

 • युनेस्कोच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क असताना राज्यातील ५ ते १९ वयोगटातील १७.१ टक्के अपंग विद्यार्थी आतापर्यंत एकदाही शाळेत गेले नसल्याची माहिती समोर आली आहे.
 • युनेस्कोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. ‘युनेस्कोआणि सेंटर फॉर एज्युकेशन इनोव्हेशन अँड अ‍ॅक्शन रीसर्च’ यांनी या संदर्भात पाहणी करून ‘स्टेट ऑफ द एज्युकेशन २०१९ : चिल्ड्रन विथ डिसअ‍ॅबिलिटीज’ हा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध केला.
 • या अहवालासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्तरावर २७ टक्के अपंग विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात आसाममधील (३६.४ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अहवालानुसार राज्यात ६ लाख ८४ हजार ३२८ अपंग विद्यार्थी आहेत. त्यात ३ लाख ८६ हजार ६४ मुलगे आणि २ लाख ९८ हजार २६४ मुली आहेत.
 • यातील १७.१ टक्के विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नाहीत. त्यापैकी १६.६ टक्के मुलगे आणि १७.८ टक्के मुली आहेत. आधी कधीतरी शाळेत गेलेल्या मुलांचे प्रमाण १२.६ टक्के आहे. त्यात १२.३ टक्के मुलगे आणि १२.९ टक्के मुली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी:-

 •  एकीकडे १७.१ टक्के अपंग विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नाहीत, तर दुसरीकडे अपंग विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी आहे.
 • पहिल्या स्थानी गोवा (७३.४ टक्के), दुसऱ्या स्थानी केरळ (७३.२ टक्के) आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. ही तीन राज्ये वगळता जवळपास सर्व राज्यांमध्ये शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २० टक्क्य़ांहून जास्त आहे. 

सद्यस्थिती वेगळी असण्याची शक्यता:-

 • हवालात २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत शालाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध, समग्र शिक्षा अभियान अशा उपक्रमांतून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 
 • त्यामुळे यू-डायससारख्या प्रणालीतील नोंदीनुसार सद्यस्थिती वेगळी आहे. आता बहुतेक अपंग विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले असल्याचा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

मिस्ट्री गोलंदाजानं घेतली निवृत्ती

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वर्ल्ड कपनंतर अनेक खेळाडूंनी निवृत्ती घेतली. याआधी श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगा यानं निवृत्ती जाहीर केली होती.
 • आता श्रीलंकेच्या आणखी एक गोलंदाजानं निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिस्ट्री गोलंदाज या नावाने ओळखले जाते.
 • या खेळाडूचे नाव आहे अजंथा मेंडिस. मेंडिस सध्या 34 वर्षांचा असून तब्बल 4 वर्ष त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळता आलेला नाही. मेंडिस 2015मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.
 • त्यामुळं 2015नंतर मेंडिस प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होता. दरम्यान काही मीडिया रिपोर्टनुसार संघात जागा मिळत नसल्यामुळं मेंडिसनं निवृत्ती घेतली असल्याचे म्हटले आहे.
 • श्रीलंका संघासाठी मेंडियनं 19 कसोटी सामना, 87 एकदिवसीय सामने आणि 39 टी-20 सामने खेळले आहेत. मेंडिसनं आपल्या सात वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 70 विकेट घेतल्या आहे.
 • तर, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 218 विकेट घेतल्या आहेत. आपल्या पदार्पणातच मेंडिसनं फलंदाजांची झोप उडवली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच मेंडिसनं 8 विकेट घेतल्या होत्या.
 • तर, पहिल्या एकदिवसीय सामन्यात 3 तर, टी-20 सामन्यात 4 विकेट घेतल्या होत्या.
29 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »