29 Sep Current Affairs

29 Sep Current Affairs
29 Sep Current Affairs

त्रिपुरा हायकोर्टाची मंदिरातील पशुबळींवर बंदी

 • त्रिपुरा उच्च न्यायालयाने राज्यातल्या सर्व मंदिरात पशुबळींवर बंदी घातली आहे.
 • मुख्य न्यायाधीश संजय करोल आणि न्या. अरिंदम लोध यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेवर सुनावणी देत हा आदेश दिला.
 • आदेशात म्हटलंय की, राज्याच्या आत कोणालाही मंदिराच्या प्रांगणात पशु किंवा पक्षांचा बळी देण्याची परवानगी नाही.
 • सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्रिपुरेश्वरी मंदिर आणि चतुरदास देवता मंदिर अशा दोन प्रमुख मंदिरांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या दोन मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुंचा बळी दिला जातो.

काहींनी केले स्वागत, काहींचा विरोध:-

 • हायकोर्टाच्या या आदेशाचं बहुतांश लोकांनी स्वागत केलं आहे, तर काही लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयानेदेखील मंदिरात पशुबळीवर प्रतिबंध आणला होता.

शॅक पुन्हा शक्य आहे

 • गोव्यातील शॅक व्यावसायिकांनी राष्ट्रीय हरित लवादाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. [आता इथे एक तुमच्या पटकन लक्षात यायला हवं ते म्हणजे की महाराष्ट्र आणि गोवा यासाठी एकच उच्चं न्यायालय आहे.]
 • राज्य सरकारच्या शॅक धोरणास लवादाने स्थगिती दिली आहे, ती उठविण्याची मागणी या व्यावसायिकांनी याचिकेद्वारे केली आहे.
 • गोव्याचा पर्यटन हंगाम दोन दिवसांत सुरू होईल. मात्र, लवादाच्या निर्णयामुळे यंदा शॅकला परवानगी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शॅक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

शॅक म्हणजे काय:-

 • शॅक ही समुद्रकिनाऱ्यावर तात्पुरती उभारली जाणारी अस्थायी हॉटेल असतात. तेथे खाद्य पदार्थ आणि मद्य सेवन करता येते. तसेच, सन बेडचीही (Sun Bed-ज्यासाठी गोवा प्रसिद्ध आहे) सुविधा असते.
 • गोवा सरकारने अद्यापही किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा (कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन) सादर केला नसल्यामुळे लवादाने १४ सप्टेंबरला राज्याच्या शॅक धोरणाला स्थगिती दिली होती. परिणामी, यंदा शॅक लागण्याबाबत साशंकताच आहे. परदेशी पर्यटक शॅकना पसंती देतात. त्यामुळे या व्यावसायिकांना उत्पन्नही चांगले मिळते. आता त्याच्यावरच गदा येणार आहे.
 • शॅक व्यावसायिकांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात लवादाच्या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे. लवादाने शॅक धोरणाला दिलेली स्थगिती उठविण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. गोव्यात ४ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसाह वाजता रशियाहून हंगामातील पहिले चार्टर्ड विमान येणार आहे. त्यापूर्वी शॅकबाबत निर्णय न झाल्यास व्यावसायिकांचे नुकसान होऊ शकते.
29 Sep Current Affairs
29 Sep Current Affairs

पाकिस्तानने आम्हाला सांगू नये भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रथम सचिव विदिशा मैत्रा

भारताचे प्रतिनिधित्व करणा-या अधिका-यांची ही प्रत्युत्तर आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असतात [It will help to devlope our personality as an aspirant]

 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावरून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय अधिकाऱ्यांनी घणाघाती उत्तर दिले. 'आमच्या नागरिकांना त्यांच्या वतीने बोलण्याची अन्य कोणीच गरज नाही.
 • किमान, द्वेषाचे विचार पसरवत दहशतवादाचे कारखाने उभे करणाऱ्यांची तर अजिबात गरज नाही,' अशा शब्दांमध्ये इम्रान यांना सुनावले आहे. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलेले १३० दहशतवादी पाकिस्तानात आहेत, हे तुम्ही मान्य कराल का, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
 • संयुक्त राष्ट्रांच्या ७४व्या आमसभेमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा इम्रान खान यांचे भाषण झाले. या भाषणासाठी निर्धारित वेळ १५ मिनिटे असताना, इम्रान खान ५० मिनिटे भाषण केले. या भाषणातील बहुतांश वेळ ते भारत, काश्मीर आणि आण्विक युद्धाची धमकी यांशिवाय अन्य काहीच विषय नव्हता.
 • 'यूएन'मध्ये प्रत्युत्तर देण्याचा हक्क भारताने बजावला. भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, 'राजनैतिक परिभाषेमध्ये शब्दांना खूप महत्त्व असते.
 • मात्र, रक्तपात, वांशिक सर्वोच्चता, बंदुकी उचला, अखेरपर्यंतचा लढा यांसारखे शब्द मध्ययुगीन मानसिकता दाखवून देतात आणि त्यामध्ये २१व्या शतकातील दृष्टिकोन दिसून येत नाही.
 • इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्ही विरुद्ध ते, श्रीमंत विरुद्ध गरीब, उत्तर विरुद्ध दक्षिण, विकसित विरुद्ध विकसनशील, मुस्लिम विरुद्ध अन्य असेच म्हणत होते.
 • यातून, संयुक्त राष्ट्रांमध्ये गट पाडण्याचा प्रयत्न दिसून येतो.' पाकिस्तान ही दहशतवादाची फॅक्टरी आहे, असा स्पष्ट उल्लेख मैत्रा यांनी केला.

नियाजी कनेक्शन:-

 • विदिशा मैत्रा यांनी इम्रान यांचा उल्लेख करताना, इम्रान खान नियाजी असा केला. याच वेळी पाकिस्तानने १९७१मध्ये पूर्व पाकिस्तानात आपल्याच जनतेवर अत्याचार करून नरसंहार केला होता आणि त्यामध्ये लेफ्टनंट जनरल ए. एक. के. नियाजी यांची प्रमुख भूमिका होती, असे अधोरेखित केले.
 • इम्रान खान यांचे पूर्ण नाव इम्रान खान नियाजी असून, ते नियाजी वंशाची ओळख लपवत असतात. मात्र, त्यांची ही ओळख नेमकेपणाने सांगून मैत्रा यांनी त्यांची लपवाछपवी जगासमोर आणली.

ब्रह्मोस ने सज्ज पहिली युद्धनौका समुद्रात

 • 'ब्रह्मोस' या आवाजाच्या वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने सज्ज युद्धनौका शनिवारी पहिल्यांदाच समुद्रात उतरली.
 • फ्रिगेट श्रेणीतील 'निलगिरी' नाव असलेल्या या युद्धनौकेचे माझगाव डॉकमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते जलावतरण झाले. आता तुम्ही म्हणाले असे का? तर त्यामागेही एक कारण आहे. नौदलाच्या परंपरेनुसार कुठल्याही नौकेचे जलावतरण हे स्त्रीच्या हस्ते केले जाते. यामुळेच निलगिरीच्या जलावतरणासाठीही सावित्री सिंह यांना निमंत्रित करण्यात आले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख अतिथी होते.
 • यानंतर आता या नौकेच्या समुद्री चाचण्या सुरू होतील.
 • माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने २००१ ते २०१२ दरम्यान शिवालिक श्रेणीतील तीन फ्रिगेट तयार करून त्या नौदलाच्या सुपूर्द केल्या. याच शिवालिक श्रेणीत आणखी सात युद्धनौका तयार केल्या जात आहेत.
 • निलगिरी त्यातील पहिली युद्धनौका आहे. ही नौका शिवालिक श्रेणीतील नौकांसारखीच आहे. पण यामध्ये अधिक अत्याधुनिक रडार आहेत.
 • शिवालिक श्रेणीतील नौका बराक क्षेपणास्त्राने सज्ज आहेत. तर, निलगिरी ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असेल.

'ड्राय डॉक' दुरुस्तीसाठी सज्ज:-    

 • विमानवाहू नौकेची दुरुस्ती करण्याची क्षमता असलेल्या देशातील सर्वात मोठ्या ड्राय डॉकचेही (दुरुस्ती तळ) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी उद्घाटन केले. तब्बल ५.६८ कोटी घनमीटर आकाराचा हा दुरुस्ती तळ १ हजार कोटी रुपये खर्चून समुद्रावर बांधण्यात आला आहे.
 • २८१ मीटर लांब, ४५ मीटर रुंद व १७ मीटर खोल अशा या तळात नौदलाच्या ताफ्यात आगामी काळात येणारी अन्य विमानवाहू नौकादेखील दुरुस्त करता येईल, असे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी सांगितले. पश्चिम कमांडचे नौदल प्रकल्प महासंचालक व्हाइस अॅडमिरल संदीप नैथानी हेदेखील यावेळी उपस्थित होते.

 

29 Sep Current Affairs
29 Sep Current Affairs

टी२०मध्ये विश्वविक्रम चौकारांचा पाऊस

 • ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर बेथ मुनी हिनं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात तिनं ६१ चेंडूंत ११३ धावांची स्फोटक खेळी केली. त्यात तिनं तब्बल २० खणखणीत चौकार लगावले. टी-२०मधील हा विश्वविक्रम आहे.
 • बेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियानं २० षटकांत चार गडी गमावून २१७ धावांचा डोंगर उभा केला. तिनं अवघ्या ५४ चेंडूंत शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे या शतकी खेळीत तिनं एकही षटकार लगावला नाही.
 • ऑस्ट्रेलियाचं हे तगडं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला फक्त १७६ धावाच करता आल्या. कर्णधार सी. अटापट्टूनं ११३ धावांची खेळी केली, मात्र संघाला विजय मिळू शकला नाही.
 • महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मुनीनं स्वतःचा विक्रम मोडीत काढला. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध २०१७ मध्ये १९ चौकार ठोकले होते. सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची मॅट लेनिंग दुसऱ्या स्थानी आहे. तिनं आयर्लंडविरुद्ध १८ चौकार तडकावले होते.
 • विशेष म्हणजे मुनीनं या शतकी खेळीत एकही षटकार लगावला नाही. हा सुद्धा एक विक्रमच म्हणावा लागेल. ती टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकही षटकार न मारता शतक झळकावणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. तसंच मुनीचं हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं शतक आहे. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध ७० चेंडूंमध्ये १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ११७ धावा केल्या होत्या.
 • तत्पूर्वी, श्रीलंकेला या सामन्यात ४१ धावांनी पराभूत व्हावं लागलं. २० षटकांत त्यांनी ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. कर्णधार सी. अटापट्टूनं जबरदस्त शतकी खेळी केली. तिनं ६६ चेंडूंत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं ११३ धावांची झंझावाती खेळी केली. अन्य फलंदाजांची तिला साथ मिळाली नाही.

जागतिक युवा बुद्धिबळ १ ऑक्टोबरपासून

 • येत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईत जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस पाहायला मिळणार आहे. विविध वयोगटातील सहा विजेतेपदांसाठी जगातील आघाडीचे बुद्धिबळपटू इथे एकमेकांना आव्हान देतील.
 • तब्बल ६६ देश आणि ५६ किताबविजेते खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. स्पर्धेत खेळणाऱ्या ४५० बुद्धिबळपटूंपैकी १४५ खेळाडू हे भारतातले आहेत. त्यात सहाजणांनी जागतिक विजेतेपद पटकाविलेले आहे.
 • जागतिक विक्रम नोंदविणारा भारताचा प्रज्ञानंद आर. हा खेळाडू आकर्षणाचे केंद्र असेल. सर्गिसियान शँट (अर्मेनिया) आणि इनियन पी. (भारत) हे आणखी दोन ग्रँडमास्टर या स्पर्धेत आहेत. १४, १६, १८ वर्षांखालील गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
 • भारताची आघाडीची खेळाडू व ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिकानेही या स्पर्धेचे आयोजन भारतात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अशा अनेक स्पर्धा भारतात व्हाव्यात अशा शुभेच्छाही तिने दिल्या.
 • ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने म्हटले आहे की, अशा दर्जाची स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. युवा आणि लहान मुलांना या स्पर्धेतून बरेच काही शिकता येईल.
 • नागपूरची दिव्या देशमुखही स्पर्धेत खेळणार आहे. भारतातील मुलींचे नेतृत्व ती करेल.
 • रशिया, अझरबैजान, फ्रान्स, इटली, अमेरिका हे बुद्धिबळातील प्रमुख देश या स्पर्धेत खेळताना दिसतील.
 • अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशन आणि ऑल मराठी बुद्धिबळ असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
29 Sep Current Affairs
29 Sep Current Affairs

World Athletics Championship मिश्र रिले प्रकारात भारतीय चमूला ऑलिम्पिकचं तिकीट

 • दोहा येथे सुरु असलेल्या World Athletics Championship स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिलं यश मिळवलं आहे. ४*४०० मिश्र रिले प्रकारात भारताच्या मोहम्मद अनस, व्ही.के.विस्मया, निर्मल नोह टॉम आणि जिस्ना मॅथ्यू या चमूने टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.
 • भारतीय खेळाडूंनी आपल्या हिटमध्ये तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ३:१६:१४ अशी वेळ नोंदवत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आला. यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ आहे.
 • रविवारी रात्री या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. मोहम्मदने शर्यतीची सुरुवात करत चांगला खेळ केला, मात्र दुसऱ्या टप्प्यात भारतीय खेळाडू विस्मया मागे पडली. मात्र वेळेतच स्वतःला सावरत विस्मयाने सर्व प्रतिस्पर्ध्यांनी मागे टाकत पुन्हा एकदा आघाडी घेतली.
 • तिच्या या पुनरागमनाला मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांनीच दाद दिली. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात भारतीय खेळाडूंमध्ये थोडा गोंधळ पहायला मिळाला, मात्र निर्मल टॉमने तिसरं स्थान पटकावून भारताचं ऑलिम्पिक तिकीट निश्चीत केलं.

देशातील मुलींच्या सन्मानासाठी भारत की लक्ष्मी अभियान राबवा पंतप्रधान मोदी

[यात काही मुद्दे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा]

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मोदी यांनी महिला सबलीकरणाबरोबर महिला सन्मानाकडं भारतीयांचं लक्ष वेधलं.
 • माेदी म्हणाले, “आजपासून उत्सवांचा काळ सुरू होतोय. देशभरात उत्सवाची रोषणाई राहिल. दिवाळीमध्ये सौभाग्याचं आणि समृद्धीच्या रूपाने लक्ष्मीचं आगमन होतं. आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मी म्हटलं जातं. मुलगी समृद्धी आणते. या दिवाळीत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींचा-सूनांचाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊन सन्मान करून वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करताना #bharatkilaxmi हॅशटॅग वापरा,” असं आवाहन मोदी यांनी केलं.
 • पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना सणउत्सवांच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी बेटी बचाओपासून ते प्लास्टिकमुक्तीपर्यंतच्या विषयांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले, “दिवाळीत आतीषबाजी होते. पण हा आनंद साजरा करत असताना कुठे फटाक्यांमुळे आग लागणार नाही ना? याची काळजी घ्या. आनंद असावा. कुणाला दुःख होणार नाही याची काळजी घ्या. या उत्सवाच्या काळात अनेक लोक सणांच्या आनंदापासून वंचित राहतात. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हणतात. दिवाळीत काही घरं प्रकाशाने न्हाऊन निघतील, तर दुसरीकडे काही घरं अंधारात राहतील. काही घरात मिठाई खराब होत असते, तर काही घरात मुलं मिठाईची वाट बघत बसतात. काही घरात कपड्यांनी कपाट भरतील, तर काही घरं अंग झाकायला कपडे नसतील. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हटलं जातं. जिथे आनंद जात नाही. तिथे आनंद वाटला पाहिजे. म्हणून आपल्या घरात इनकमिंग डिलिव्हरी होते. एकदा तरी अशा गरीब कुटुंबात आऊटगोईंग डिलिव्हरी करण्याचा विचार करायला हवा. सण उत्सवाच्या काळात गरीब कुटुंबात आलेलं हास्य आपला आनंद द्विगुणीत करेल,” असं आवाहन मोदी यांनी केलं.

मोदींच्या भाषणातील मुद्दे:-

 • तंबाखू सेवन आणि नशा हानीकारक आहे. त्यामुळे कर्करोग, ह्रदयविकार, होतात. अलीकडेच भारतात ई-सिगरेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात निकोटीन युक्त पदार्थ गरम करून निकोटीनच सेवन केलं जातं. ई-सिगरेटविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. निकोटीनचा वास येऊ म्हणून सुंगधित पदार्थ मिश्रण केलं जातं. यांच्या सेवनामुळे नुकसान होतं हे सगळ्यांनाच माहिती नाही. ही नशा कुटुंबांना उद्ध्वस्त करतेय. फीट इंडियाबरोबरच व्यसनापासून दूर राहावे लागेल.
 • लाल किल्ल्यावरून भाषण करताना मी देशातील १५ ठिकाणांना भेट देण्याचं आवाहन केलं होतं. आता दिवाळीची सुटी असेल तेव्हा १५ ठिकाणी पर्यटनाला जा.
 • भारतीयांमुळे आणि स्वच्छता अभियानामुळे पर्यटनाच्या जागतिक क्रमवारीत भारत ३४ व्या स्थानी आला आहे. पाचव्या वर्षांपूर्वी भारत ६५ व्या स्थानी होता.

[इथे एक मला आवर्जून नमूद कारावस वाटतं ते म्हणजे, कधीही कोणाकडूनही सकारात्मकता तुमच्या कानांवर पडत असेल तर तुमचे कान बंद करू नका आणि आपले विचार आणि व्यक्तिमत्व कसे प्रगल्भ होतील याकडे लक्ष द्या rather than to troll someone, its really not a good habbit Be Neutral!!]

 

 

 

29 Sep Current Affairs

Que Linked with Current

खालीलपैकी बिनचूक नसणारे विधान/विधाने ओळखा.
अ. इंडियन हाय कोर्ट्स ऍक्ट १८६१ नुसार, १८६२ मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे उच्चं न्यायालयाची स्थापना झाली.
ब. १८७६ मध्ये अलाहाबाद येथे चौथे उच्चं न्यायायालय स्थापन करण्यात आले.
क. सध्या देशात एकूण २४ उच्चं न्यायालये आहेत.
१ अ आणि क
२ ब आणि क
३ फक्त ब
४ अ, ब आणि क

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »