2 Oct Current Affairs

2 Oct Current Affairs
2 Oct Current Affairs

टपाल तिकिटाद्वारे मोनॅको सरकारची गांधीवंदना

 • 'फ्रेंच रीव्हीएरा'मधील मोनॅको देशाने विशेष टपाल तिकिटाद्वारे महात्मा गांधी यांना त्यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन केले. या टपाल तिकिटाची किंमत २.१ युरो आहे.
 • एकूण ४० हजार टपाल तिकिटे बुधवारपासून 'ऑफिस देस टिंबर्स', 'द मुसी देस टिंबर्स एट देस मोनाइज' म्हणजेच रियासतीमधील पोस्ट कार्यालये आणि फिलान्टेलिक काऊंटर्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाली.
 • अन्य टपाल तिकिटांबरोबर हे टपाल तिकीटही 'फिलान्टेलिक प्रोग्रॅम २०१९'च्या दुसऱ्या भागात समाविष्ट केले जाणार आहे. त्या माध्यमातून आमचे ग्राहक आणि देणगीदार यांना हे टपाल तिकीट दिले जाईल, असे मोनाको सरकारतर्फे सांगण्यात आले.
 • यापूर्वी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण अबुधाबी येथे केले होते. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.

मोनॅको:-

 • मोनॅको हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी).
 • मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.
 • केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे 38,695 (2017) आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत.

चीनचं शक्तीप्रदर्शन भारताची मोठी मिलिटरी ड्रील

 • चीनने आपल्या सैन्याचं शक्ती प्रदर्शन केलं, दुसरीकडे भारतही मोठ्या युद्धाभ्यासाच्या तयारीला लागला आहे. भारताने माउंटन वॉरफेअरच्या दिशेने आपल्या नव्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स (IBG)ची चाचणी करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये तयारी केली आहे. मंगळवारी चीनने कम्युनिस्ट शासनाची ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एक भव्य सैन्य परेड आयोजित केली होती. यात क्षेपणास्त्र, सुपरसॉनिक ड्रोन आणि जगातील सर्वात लांब पल्ल्याचं बॅलास्टिक मिसाईल चीनने या प्रदर्शनादरम्यान सादर केले.
 • चीनलगतच्या सीमेवर महिनाभर 'हिम विजय' अभियान चालवलं जात आहे. यात नव्या १७ व्या ब्रह्मास्त्र कॉर्प्सचं रुपांतर एका उत्कृष्ट तुकडीत करण्यात येणार आहे. एकून तीन आयबीजी बनवल्या जाणार आहेत. प्रत्येकात ५ हजार जवान, अनेक रणगाडे, एअर डिफेन्स युनिट, सिग्नल आणि अन्य उपकरणे सामील आहेत. या आयएएफ सी-१७ ग्लोबमास्टर-३, सी-१३० जे सुपर हर्क्युलस आणि एएन-३२ एअरक्राफ्टसह अभ्यास करण्यात येणार आहे. यात जवानांना एअर लिफ्ट करून हेलिकॉप्टर्स आणि अन्य उपकरणांनाही समाविष्ट केले जाणार आहे.
 • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जेव्हा या महिन्याच्या अखेरीस भारत दौरा करणार आहेत. तेव्हा हे 'हिम विजय' अभियान जोरात सुरू असेल. यापूर्वी पाकिस्तानला नजरेसमोर ठेवून बनवलेल्या आयबीजीने एप्रिल-मे मध्ये पश्चिमेला चंडीमंदिरात अभ्यास केला. १७ व्या कॉर्प्समध्ये जड वस्तू वाहून नेणारे एम-७७७ अल्ट्रा लाइट होवित्झर तोफांनादेखील चीनच्या आसपासच्या फॉरवर्ड आणि उंचीवरील जागेवर नेऊन ठेवू शकेल. वायू सेनेने सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या ८,०४८ कोटी रुपयांच्या डीलनुसार १५ सीएच-४७ एफ चिनुक हेलिकॉप्टर्स आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. लष्कर नोव्हेंबर २०१६ मध्ये अमेरिकेसोबत पाच हजार कोटी रुपयांचा करार झाल्यानंतर १४५ एम-७७७ हॉवित्झर आपल्या ताफ्यात समाविष्ट करत आहे.

चीनचे लष्करी शक्तिप्रदर्शन:-

 • दरम्यान, चीनने मंगळवारी अणू आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसह सर्वात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन लष्कराच्या संचलनात केलं. यात DF-41 या क्षेपणास्त्राचा देखील समावेश आहे. या क्षेपणास्त्राचा समावेश जगातल्या सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांमध्ये होतो. याची मारा करण्याची क्षमता खूप जास्त आहे. जाणकारांचं म्हणणं आहे ही हे क्षेपणास्त्र साधारणपणे ३० मिनिटांतच चीनहून अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतं.
 • या क्षेपणास्त्राला जगातलं सर्वात लांब पल्ल्याचं सक्षम क्षेपणास्त्र समजलं जात आहेत. याची मारक क्षमता १५ हजार कि.मी. पर्यंत आहे. विशेषज्ञांच्या मते हा मिसाइलवर एकाच वेळी १० वॉरहेड्स फिस केले जाऊ शकतात. हे वॉरहेड्स वेगवेगळे टार्गेट उद्धवस्त करू शकतात.
2 Oct Current Affairs
2 Oct Current Affairs

तीन देश सुरू करणार दूरचित्रवाहिनी

 • मुस्लिमांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच पाश्चिमात्य देशांमध्ये इस्लामविषयी असलेला तिरस्कार घालवण्यासाठी पाकिस्तान, मलेशिया व टर्की या देशांनी एकत्र येऊन बीबीसीच्या तोडीची इंग्रजी दूरचित्रवाहिनी सुरू करण्याचे ठरवले आहेत.

मलेशिया:-

 • मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत.
 • थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.

टर्की/तुर्की:-

 • तुर्कस्तान किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोप व आशिया) विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.
 • तुर्कस्तानच्या वायव्येस बल्गेरिया, पश्चिमेस ग्रीस, ईशान्येस जॉर्जिया, आर्मेनिया व अझरबैजान तर पूर्वेस इराण आणि आग्नेयेस इराक व सीरिया हे देश आहेत. तुर्कस्तानच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस एजियन समुद्र व उत्तरेस काळा समुद्र आहे. मार्मराचा समुद्र तुर्कस्तानच्या आशियाई व युरोपीय भागांच्या मध्ये आहे.

पॅलेस्टाइनमध्ये महात्मा गांधीवर पोस्टाचे तिकीट

 • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत पॅलेस्टाइन देशाने काल (मंगळवार) महात्मा गांधी यांचा वारसा आणि मूल्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले. पॅलेस्टाइन अथॉरिटीच्या (पीए) दूरसंचार आणि माहिती विभागाचे मंत्री इसहाक सेदेर यांनी पॅलेस्टाइनच्या मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधी सुनील कुमार यांच्या उपस्थितीत हे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले.
 • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ हे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करण्यात आले असून महात्मा गांधीचा वारसा आणि आणि त्यांच्या मूल्यांनी मानवतेला एक मार्ग दाखवण्याचे काम केले आहे आणि पुढेही करत राहतील, अशी प्रतिक्रिया इसहाक सेदेर यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सन्मान करण्याचे हे पाऊल भारत आणि पॅलेस्टाइनदरम्यानचे मजबूत ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध दर्शवत आहे, असे सुनील कुमार यांनी म्हटले आहे.
 • रामल्ला येथे भारतीय मिशनने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या एक वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात पॅलेस्टाइन नागरिकांनी उत्साहात भाग घेतला. जेरिको येथे जूनमध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी हे फिलिस्टाइनी समाजासाठी प्रेरणेचे स्त्रोत आहेत. त्यांचा संदेश समस्त जगातील लोकांना प्रेरित करतो असे शहराचे गव्हर्नर जेहाद अबु-असल यांनी म्हटले आहे.

भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन:-

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांदी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. याबरोबरच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. दरम्यान राज्याराज्यामध्ये गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे आज देशभरात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवून महात्मा गांधींना अभिवादन करण्यात आले.
 • दरम्यान, राज्यातही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्हा ग्रामिण कॉंग्रेस सेवादलातर्फे पदयात्रेचं आयोजन करत महात्मा गांधी यांच्या स्मृतींना आणि कार्याला अभिवादन करण्यात आले.
2 Oct Current Affairs
2 Oct Current Affairs

RBI रेपो दरात पुन्हा कपात करण्याची शक्यता

 • अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. विकास दर ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमेटी (MPC) ची बैठक करण्यात येत आहे. ४ ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यावर्षी आतापर्यंत झालेल्या चार बैठकीत लागोपाठ रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता पाचव्यांदाही ही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 • जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी २५ बेसिस प्वाइंट्सची कपात करण्याची शक्यता आहे. गेल्या बैठकीत ३५ प्वाइंट्सची कपात करण्यात आली होती. यावर्षी आतापर्यंत चार वेळा झालेल्या बैठकीत रेपो रेटच्या १/१० टक्के कपात करण्यात आली आहे. सध्याचा रेपो रेट हा ५/४० टक्के आहे. जर शुक्रवारी २५ बेसिस प्वाइंट्स रेटची कपात करण्याचा निर्णय झाला तर नवीन रेपो रेट हा ५/१५ टक्क्यांवर पोहोचला जाईल.
 • आर्थिक जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१९-२० च्या अखेरपर्यंत रेपो रेट कपात होऊन ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे उर्वरित १५ बेसिस प्वाइंट्सची कपात डिसेंबरपर्यंत शक्य आहे.
 • भारताने जगात सर्वात जास्त विकास करणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मुकूट गमावला आहे. जूनमध्ये झालेल्या तिमहित देशाचा विकास दर ५ टक्क्यांवर पोहोचला होता. हा विकास दर गेल्या ६ वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे.
 • रिझर्व्ह बँकेने भारताचा विकास दर ७ टक्के कमी होऊन तो ६/९ टक्के केला आहे. आर्थिक गती वाढवण्यासाठी एका बाजुला बँक रेट कमी होत आहे. यामुळे लोकांच्या हातात पैसा वाचेल. व ते खर्च करतील. त्यामुळे मागणी वाढेल. तर दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी उद्योगपतींसाठी विविध योजनांची घोषण केली.
 • काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केला होता. सुपर रिच लोकांसाठी टॅक्स कमी करून विदेश नागरिकांना मोठा दिलासा दिला होता.

आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
 • महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल असं म्हटलं होतं.
 • सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
 • सध्या एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकमध्ये कोणत्या वस्तू येतात याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्रालय लवकरच एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकची व्याख्या स्पष्ट करणार आहे.
 • सध्या 24 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसंच राज्यांच्या काही सूचना असल्यास त्यादेखील देता येणार आहेत. सध्या प्लास्टिकच्या हँडलवाल्या आणि बिना हँडलवाल्या बॅग, प्लास्टिकची कटलरी, कप, चमचे, ताटं याव्यतिरिक्त थर्माकॉलची ताटं, खोटी फुलं, बॅनर, झेंडे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदिंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
 • दरम्यान, प्रत्येक कार्यालयांमध्ये कचरा वेगवेगळ्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. याव्यतिरिक्त टिव्ही, रेडिओद्वारे एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी राज्यांनी जनजागृती करावी, असंही सांगण्यात आलं आहे. तसंच पर्यावरण स्थळं, धार्मिळ स्थळं, समुद्र किनारे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
2 Oct Current Affairs
2 Oct Current Affairs

लंडनच्या कोर्टाकडून पाकला झटका निजामाचा ३०६ कोटींचा खजिना भारताला मिळणार

 • ब्रिटनच्या एका कोर्टाने भारताच्या बाजूने एक मोठा निर्णय देत पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. ७० वर्षे जुन्या प्रकरणात ३५ मिलिअन पौंड अर्थात ३०६.२५ कोटी रुपयांच्या हैदराबादच्या निजामाच्या खजिन्यासंदर्भात कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे.
 • या कोर्टाने पाकिस्तानच्या दाव्यांना नाकारत याला परिस्थितीचा दुरुपयोग केल्याचे म्हटले आहे. कोर्टाने म्हटले की, हैदराबादच्या निजामाचे वंशज आणि भारताचा या खजिन्यावर अधिकार आहे. पाकिस्तानसरकार विरुद्ध निजामाचे शेवटचे वंशज मीर उस्मान अली खान, भारत सरकार आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यावतीने लंडनच्या कोर्टात हा खटला सुरु होता.
 • हैदराबादच्या शेवटचा निजामाने सन १९४८ मध्ये लंडनच्या नेटवेस्ट बँकेमध्ये १० लाख पौंड त्यावेळचे तब्बल ८ कोटी ८७ लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम आजच्या काळात ३०६.२५ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी निजामाच्या वंशजांचे म्हणणे आहे की, १९४८ मध्ये हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मीर वनाज जंग यानी निजामाच्या परवानगीशिवाय लंडमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांच्या बँक खात्यामध्ये १० लाख पौंड जमा केले होते. यावरुन पाकिस्तानकडून आजवर या रकमेवर आपला अधिकार सांगण्यात येत होता.
 • भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर पाकिस्तान अस्तित्वात आला होता. मात्र, त्यावेळी हैदराबादच्या निजामाला पाकिस्तानसोबत जायचे होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कडक भुमिकेमुळे निजाम दुसरा पर्यायही शोधत होता. त्यामुळे या तणावाच्या परिस्थितीत निजामाने आपला सर्व खजिना पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या खात्यात जमा केला होता.

उजळणी : निजामाचा इतिहास करून ठेवा (विशेषतः - निजाम संस्थान विलीनीकरण)

 

भारताच्या कांदा निर्यात बंदीमुळे आशियाई देशांच्या डोळ्यात पाणी

 • देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आशियाई देशांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मान्सून लांबल्याने कांद्याचे पीक घेता न आल्यामुळे कांद्याचा पुरवठा रोडावला आहे. त्यामुळे भारतात कांद्याच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत.
 • भारतातून अन्य देशात मोठया प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. पाकिस्तानी चिकन करी, बांगलादेशी बिर्यानी किंवा भारतीय सांभार असो, हे पदार्थ बनवण्यासाठी कांद्याचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. आशियाई ग्राहक भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्यावर मोठया प्रमाणावर अवलंबून आहेत.
 • भारतात १०० किलो कांद्याचा दर ४५०० रुपयापर्यंत पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला. गेल्या सहा वर्षातील हा सर्वोच्च दर आहेत. बांगलादेश सारख्या देशांनी आता दर नियंत्रणात ठेवण्यासाठी म्यानमार, इजिप्त, टर्की आणि चीन या देशांकडे मोर्चा वळवला आहे.
2 Oct Current Affairs
2 Oct Current Affairs

भारताचा प्रशिक्षक निवडणाऱ्या कपिल देव यांचा राजीनामा

 • भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य आणि भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या (आयसीए) संचालकपदाचा राजीनामा दिला. त्या पाठोपाठ आता क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डी. के. जैन यांनी या सदस्यांना नोटीस पाठवली होती.
 • भारताचा प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीवर होती. माजी कर्णधार कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीत अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश होता. त्यानुसार या समितीने रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड केली होती.
 • पण भारताला १९८३च्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देणारे कर्णधार कपिलदेव हे समालोचक, एका फ्लडलाइट्स कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य त्याचबरोबर क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांनाही परस्परहितसंबंधाच्या तक्रारीवरून नोटीस पाठवली असून १० ऑक्टोबपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे या तक्रारीला प्रत्युत्तर देण्याच्या सूचना ‘सीएसी’च्या सदस्यांना करण्यात आल्या आहेत. त्या दरम्यान कपिल देव यांनी राजीनामा दिला आहे.
 • या आधी रंगास्वामी यांनी रविवारी सकाळी आपले राजीनामापत्र प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवले.
 • मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांविरोधात तक्रार केली होती. बीसीसीआयच्या आचारसंहितेनुसार, कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी सारखेच पद भूषवता येणार नाही. पण सीएसीचे सदस्य अनेक भूमिका भूषवत आहेत, असा दावा गुप्ता यांनी तक्रारीत केला होता.

जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा लॅसित्सकेनची सोनेरी हॅट्ट्रिक

 • रशियाच्या मारिआ लॅसित्सकेनने मंगळवारी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक मिळवून कारकीर्दीतील सलग तिसऱ्या जागतिक सुवर्णपदकावर नाव कोरले.
 • २६ वर्षीय लॅसित्सकेनने २.४ मीटर इतक्या उंचीवर उडी मारून युक्रेनच्या यालोस्लाव्हा महुचिकला मागे टाकले. अमेरिकेच्या व्हास्ती कनिंगहॅमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. लॅसित्सकेनने २०१५ आणि २०१७मध्येसुद्धा उंच उडीमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
 • रशियातर्फे फक्त ३० खेळाडूंचा चमू सर्व प्रकारच्या स्पर्धासाठी दोहा येथे पाठवण्यात आला आहे. २०१६मध्ये रशियाला उत्तेजक प्रतिबंधक घोटाळ्यामुळे ऑलिम्पिकमधून हद्दपार करण्यात आल्याने लॅसित्सकेनची ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी हुकली. परंतु आता तिने २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे.

आज मला प्रत्येक उडी मारण्यासाठी संघर्ष करावा लागला. कारकीर्दीतील तिसरे जागतिक सुवर्णपदक मिळवल्यामुळे मी फार आनंदी आहे. माझ्या देशतील चाहत्यांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या व त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवल्यामुळे स्वत:चा अभिमान वाटत आहे.
-    मारिआ लॅसित्सकेन

 • १ सलग तिसऱ्यांदा उंच उडीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी लॅसित्सकेन पहिली खेळाडू ठरली आहे.
 • १० लॅसित्सकेनने आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये एकूण १० पदके मिळवली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आठ सुवर्णपदकांचा समावेश असून दोन रौप्यपदके आहेत.

अंतिम फेरी गाठण्यात अविनाश अपयशी:-

 • जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेमधील पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात मंगळवारी भारताच्या अविनाश साबळेने वैयक्तिक राष्ट्रीय विक्रम मोडला; परंतु तो अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला.
 • २४ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २५.२३ सेकंद अशी वेळ नोंदवली. पहिल्या फेरीत तिसऱ्या टप्प्यातील शर्यतीत तो सातवा आला, तर ४४ धावपटूंमध्ये त्याला ४४व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मार्चमध्ये फेडरेशन चषक स्पध्रेत त्याने ८:२८.९४ सेकंद वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
2 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »