2 September Current Affairs

2 September Current Affairs
2 September Current Affairs

कुलभूषण यांना आज दूतावासाची मदत

 • कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज, सोमवारी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटू देण्यात येणार असल्याचे पाकिस्तानने रविवारी सांगितले. 
 • परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी ही माहिती दिली. व्हिएन्ना करारानुसार आणि पाकिस्तानी कायद्यानुसार कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटू दिले जाणार आहे. 
 • याआधीही पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र ही भेट थेट नव्हती. यात अडथळे होते. त्यामुळे भारताने अशा स्वरूपाची भेट नाकारली.
 • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही अटींशिवाय दूतावासाची मदत (कॉन्स्युलर अॅक्सेस) मिळवून द्यावी, असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. 
 • जाधव यांना दूतावासाची मदत देण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट होईल त्याठिकाणी पाकचा एक अधिकारी उपस्थित राहील, भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि भारतीय अधिकारी आणि जाधव यांच्यात होणारी चर्चा रेकॉर्ड केली जाईल, अशा अटी ठेवल्या होत्या. भारताने त्या मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता. 
 • पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना कथित हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे.
 • भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर या शिक्षेला स्थगिती मि‌ळाली होती. 
 • 'जाधव यांच्या खटल्याचा आणि शिक्षेचा आढावा घेऊन या प्रकरणी फेरविचार करावा आणि त्यांना विनाविलंब भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी,' असे आदेश न्यायालयाने पाकिस्तानला १७ जुलै रोजी दिले होते.
   

वॉशिंग्टन न्यायाधीशपदी भारतीय वंशाची महिला

 • भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित शिरीन मॅथ्यू यांची अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या दक्षिण जिल्ह्याच्या अमेरिकन जिल्हा न्यायालयात न्यायाधीशपदासाठी नियुक्त केले आहे. 
 • मॅथ्यू या पहिल्या आशियन पॅसिफिक अमेरिकन महिला ठरल्या आहेत. तसेच, त्या अमेरिकेतील एका मोठ्या कायदा फर्म 'जोन्स डे'याच्याशी संलग्न आहे. यापूर्वी त्या कॅलिफोर्नियात एका सहायक संघीय वकील होत्या. 
 • सॅन डिएगोमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या दक्षिणी जिल्हा संघीय न्यायालयात त्यांचे नामांकन बुधवारी व्हाइट हाऊसद्वारे घोषित करण्यात आले. 
 • आता त्यांच्या नियुक्तीला सिनेटद्वारे अनुमोदन करण्यात आले आहे. 
 • अमेरिकेतील संघीय न्यायालयात ट्रम्प यांच्या द्वारे घोषित करण्यात आलेल्या नामांकनात मॅथ्यू या सहाव्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित नागरिक ठरल्या आहेत. 
 • दक्षिण आशिया बार आसोसिएशन (साबा) चे अध्यक्ष अनिश यांनी याला ऐतिहासिक नामांकन म्हटले आहे. (प्रत्येक लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आयोग लॉन्ग फॉर्म वर ब-याचदा प्रश्न विचारात असतो.)

यानिमित्ताने दक्षिण आशिया बार आसोसिएशन (साबा) बद्दल माहिती काढा.

2 September Current Affairs
2 September Current Affairs

कुंडुजवर विजय

 • तालिबानच्या ताब्यात असलेले कुंडुजवर अफगाणिस्तानच्या सैन्याने ताबा मिळवला आहे. 
 • कालच तालिबानी दहशतवाद्यांनी या शहरावर हल्ला केला होता. 
 • मात्र त्यांना हुसकावून पुन्हा वर्चस्व स्थापन करण्यात सैन्याला यश आले.
   

केंद्र सरकारला झटका जीएसटी कलेक्शन घटलं

 • जीडीपी दरातील घसरणीनंतर केंद्रातील सरकारला आणखी एक झटका बसला आहे. ऑगस्ट महिन्यातील जीएसटीचं कलेक्शन १ लाख कोटी रुपयांपेक्षा खाली आलं आहे.
 • महसूल विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये फक्त ९८ हजार २०३ कोटी रुपये जीएसटी कलेक्शन करण्यात केंद्राला यश आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 
 • ऑगस्टमध्ये जीएसटीतून केंद्राला केवळ ९८ हजार २०३ कोटी रुपये वसूल करता आले आहेत. त्यात आयातीतून २४ हजार कोटी रुपये मिळाल्याचं महसूल विभागाने स्पष्ट केलं आहे. या ९८ हजार कोटी रुपयांमध्ये केंद्र आणि राज्यांचाही हिस्सा आहे. 
 • या ९८ हजार कोटीत केंद्राची १७,७३३ कोटींपेक्षा अधिक रक्कम आहे. तर राज्यांचे २४,२३९ कोटी रुपये आहे. तर ४८,९५८ कोटी रुपये आयजीएसटीतून मिळाले आहेत. 
 • जुलैपासून ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत एकूण ७५.८० लाख लोकांनी जीएसटीआर ३बी अंतर्गत रिटर्न भरले आहे. त्यातून केंद्राला सुमारे ४० हजार कोटींचा महसूल मिळाला असल्याचं महसूल विभागाने म्हटलं आहे. 
 • दरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जीएसटीचं ९३ हजार ९६० कोटींचं कलेक्शन झालं होतं. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटीचं कलेक्शन ४.५१ टक्क्याने वाढलं असलं तरी अपेक्षित आकडेवारीपेक्षा हा आकडा अत्यंत कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 
 • जुलै २०१९मध्ये जीएसटीतून १,०२,०८३ कोटींचं कलेक्शन झालं होतं. जूनमध्ये हा आकडा ९९, ९३९ कोटी इतकी होती. त्यामुळे जून आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये हा आकडा कमी झाल्याचं महसूल विभागानं म्हटलं आहे.
   
2 September Current Affairs
2 September Current Affairs

नेमबाजी यशस्विनीचा सुवर्णवेध भारताला तिसरे सुवर्ण

 • भारताच्या यशस्विनी सिंग देसवालने वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकासह ऑलिम्पिक कोटाही निश्चित केला. या वर्ल्डकपमधील भारताचे हे तिसरे सुवर्ण ठरले. 
 • माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या ओलेना कोस्टोविचचे कडवे आव्हान २२ वर्षीय यशस्विनीसमोर होते. मात्र, ज्युनियर गटातील माजी जगज्जेत्या यशस्विनीने २३६.७ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. 
 • युक्रेनच्या 'नंबर वन' ओलेनाला २३४.८ गुणांसह रौप्यपदकावर, तर सर्बियाच्या जस्मिना मिलोवोनोविचला २१५.७ गुणांसह ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत ५८२ गुणांसह यशस्विनी अव्वल स्थानावर होती. 
 • साहजिकच अंतिम फेरीत दाखल होताना यशस्विनीचा आत्मविश्वास दुणावला होता. पहिल्या दहा शॉटअखेर यशस्विनी ९८.१ गुणांसह आघाडीवर होती, त्यापाठोपाठ ९७.७ गुणांसह जस्मिना होती. ३४ वर्षीय ओलेना ९५.६ गुणांसह सातव्या क्रमांकावर होती. 
 • त्यानंतर अनुभव पणाला लावत ओलेना चौदा शॉटअखेर तिसऱ्या क्रमांकावर आली. यशस्विनी १३७.९ गुणांसह अव्वल, तर जस्मिना १३७.१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. असाच क्रम विसाव्या शॉटअखेर कायम होता. 
 • त्यानंतर ओलेनाने मोक्याच्या क्षणी ओलेनाने १०.९ गुणांची नोंद केली. त्या जोरावर ती दुसऱ्या क्रमांकावर पोचली. अखेरच्या शॉटअखेर यशस्विनीचे २२७.१, तर ओलेनाचे २२५.३ गुण होते. 
 • अखेरच्या शॉटवर ओलेनाने ९.५ गुण नोंदविले, तर यशस्विनीने ९.६ गुण नोंदवीत संस्मरणीय सुवर्णयश मिळविले.
 • जस्मिनाला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. तसेच, तिने टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्चित केला. 

दृष्टीक्षेप:-

 • ब्राझीलमधील वर्ल्डकपमधील भारताचे हे तिसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी, अभिषेक वर्माने पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात, तर इलावेनिल वालारिवनने महिलांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्ण पटकावले होते. 
 • नेमबाजीत भारताची ऑलिम्पिकमधील नववी जागा निश्चित झाली. यापूर्वी, संजीव राजपूत, अंजुम मुदगिल, अपूर्वी चंडेला, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, दिव्यांश पन्वर, राही सरनोबत, मनू भाकेर यांनी ऑलिम्पिक कोटा निश्चित केला आहे. 
   

टी २० मलिंगाने रचला सर्वाधिक विकेट्सचा इतिहास

 • लसिथ मलिंगा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज
 • मलिंगाने रविवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना रचला हा इतिहास
 • पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम लसिथ मलिंगाने मोडला
 • मलिंगाचे ७४ सामन्यांमध्ये ९९ विकेट्स

 

 • श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे. 
 • ३६ वर्षीय मलिंगाने रविवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना हा इतिहास रचला. 
 • मात्र हा सामना न्यूझीलंडने पाच गडी राखून जिंकला.
 • मलिंगाने सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला आहे. 
 • आफ्रिदीने आपल्या टी-२० करिअरमध्ये ९९ सामन्यांमध्ये एकूण ९८ विकेट्स घेतले. आता टी-२० चा कर्णधार मलिंगाचे ७४ सामन्यांमध्ये ९९ विकेट्स झाले आहेत. 
 • न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात लसिथ मलिंगाने २३ धावा देऊन २ गडी बाद केले.
 • कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मलिंगाने या टी-२० सामन्यात पहिल्या षटकातच कोलिन मुनरोची विकेट काढत आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर त्याने ग्रँडहोमला बाद करत आपल्या ७४ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यान नवा विक्रम केला. 
 • बांगलादेशचा शाकिब अल हसन ७२ सामन्यात ८८ विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानी आहे. 
 • भारतीय गोलंदाजांपैकी टी-२० त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आर. अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने आतापर्यंत ४६ सामन्यात ५२ गडी बाद केले आहेत. 
   
2 September Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »