30-31 Oct Current Affairs

30-31 Oct Current Affairs
30-31 Oct Current Affairs

दिल्लीत महिलांसाठी मोफत बससेवा सुरू

 • ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही लाभ देण्याचा विचार
 • दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाची योजना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना लागू करण्याचा विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूचित केले.
 • दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने त्यांचे कल्याणकारी योजना लागू करण्याचे प्रयत्न आहेत. महिलांसाठीची मोफत बस योजना मंगळवारी भाऊबिजेच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली.
 • महिलांना मोफत प्रवासाची योजना महिलांच्या सक्षमीकरणास फायद्याची असून त्यातून समाजातील लिंगभेद दूर होण्यास मदत होईल असे सांगून केजरीवाल म्हणाले की, भावाकडून बहिणींना ही भाऊबीजेची भेट समजा.
 • एके अ‍ॅपवर केजरीवाल यांनी या योजनेबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
 • प्रवासाचा खर्च न झेपल्याने ज्या मुली व महिलांना शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले, त्यांना आता त्यांच्या शिक्षणाचा बळी द्यावा लागणार नाही.
 • त्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत बस प्रवास करता येणार आहे. ज्या महिला नोकरी निमित्ताने बाहेर पडतात, त्यांनाही लाभ मिळेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गुलाबी रंगाची तिकिटे:-

 • नवीन योजनेअंतर्गत महिलांना दहा रुपये दर्शनी किमतीची मोफत तिकिटे जारी करण्यात आली.
 • ती गुलाबी रंगाची असून त्याच्या पैशांची प्रतिपूर्ती सरकार वाहतूकदार संस्थेला करणार आहे.
 • यापुढील काळात महिलांना मोफत बस प्रवासाची ही योजना विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना लागू करण्याचा विचार आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
 • सर्व पावले एकाच वेळी टाकता येणार नाहीत, पण आम्ही ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा बस प्रवासही मोफत करू. महिलांपासून सुरुवात केली आहे आता त्याचे परिणाम बघू त्यावर पुढील निर्णय अवलंबून आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी बी पाटील यांचे निधन

 • ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक तसेच राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले दादासाहेब बळवंत तथा डी. बी. पाटील यांचे मंगळवारी हृदयविकाराने कोल्हापुरात निधन झाले, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कृतिशील व्यक्तीमत्व हरपले अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
 • कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रात पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. कोल्हापूरमधील बहुजन समाजाची शिक्षण संस्था असलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे ते अध्यक्ष होते.
 • त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्था आज उत्तम पद्धतीने काम करीत आहेत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचेही त्यांनी अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळले.
 • शिक्षण क्षेत्रातील चांगल्या गोष्टींना त्यांनी कायमच बळ दिले. कोल्हापूर जिल्हा शैक्षणीक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आदी संस्थांमध्ये त्यांनी व्यापक स्वरूपात शैक्षणिक उपक्रम राबविले.
 • डी. बी. पाटील यांचा मुलगा अमेरिकेत असतो. त्याच्याशी चर्चा करून उद्या बुधवारी अंत्यसंस्कारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
30-31 Oct Current Affairs
30-31 Oct Current Affairs

अलिबाबा प्रमाणे वर्चस्वाची अंबानींची तयारी 1 लाख कोटींची योजना तयार

 • जिओच्या माध्यमातून मोठ्या संख्येत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचल्यानंतर ई-कॉमर्स सारखी सेवा सुरू करण्याची तयारी
 • रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत असून, चीनमधील ऑनलाइन रिटेल क्षेत्र (किरकोळ विक्री क्षेत्र) गाजवणाऱ्या अलिबाबा समूहाप्रमाणे ई-कॉमर्स कंपनी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.
 • यासाठी अंबानींनी 'डिजिटल सर्विस होल्डिंग कंपनी' उभारण्याची 24 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1.6 लाख कोटी रुपयांची योजना देखील तयार केल्याचं वृत्त आहे.
 • रिलायन्स कंपनी टेक व इंटरनेट क्षेत्रात गुंतवणूक आणि अधिग्रहण वाढवण्यावर भर देतेय कारण, जिओच्या माध्यमातून मोठ्या संख्येत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचल्यानंतर ई-कॉमर्स सारखी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.
 • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मंडळाने 15 बिलियन डॉलर्स पूर्णपणे मालकीच्या सहाय्यक कंपनीत गुंतवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
 • ई-कॉमर्स कंपनीद्वारे रिलायन्स भारतात इंटरनेट शॉपिंगमध्येही वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑनलाइन किरकोळ बाजारपेठेत रिलायन्सने प्रवेश केल्यास देशातील 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ई-कॉमर्स बिझनेस मार्केटवर परिणाम होईल , असे तज्ज्ञांचे मत आहे.
 • ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास 56 बिलियन डॉलर म्हणजेच 3.85 हजार कोटी रुपये आहे. मात्र, रिलायन्स ऑईल अॅण्ड केमिकल व्यवसायातील 20 टक्के भागीदारी सौदी अरेबियाच्या तेल कंपनीला विकल्यामुळे आता मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती जवळपास 75 बिलियन डॉलर इतकी आहे.
 • अशात येत्या काही वर्षांमध्ये ई-कॉमर्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याची अंबानींची योजना आहे. RIL ने सुरुवातीला डिजीटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी 1,08,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची परवानगी घेतल्याची माहिती आहे.

विमानावरील इक ओंकार चिन्हाद्वारे एअर इंडियाकडून गुरु नानक यांना अनोखे अभिवादन

 • गुरु नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त एअर इंडियाने आपल्या एका विमानावर 'इक ओंकार' हे चिन्ह तयार करुन घेतले आहे.
 • शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त एअर इंडियाकडून त्यांना अनोख्या स्वरुपात अभिवादन करण्यात आले आहे. युकेसाठी उड्डाण करणाऱ्या आपल्या एका विमानावर शीख धर्मियांचे प्रतिक असलेले 'इक ओंकार' हे पवित्र चिन्ह तयार करण्यात आले आहे.
 • गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त जगभरातील शिखांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांचे समाधीस्थळ असलेला पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडॉरही दर्शनासाठी खुला झाल्याने त्यांचा आनंद दुप्पट झाला आहे. तसेच एअर इंडियानेही गुरु नानक यांच्या सन्मानार्थ आपल्या बोईंग ७८७ या विमानावर 'इक ओंकार' चिन्ह मुद्रीत केले आहे. 'इक ओंकार' हे शीख धर्माच्या विचारधारेचे मूळतत्व मानले जाते.
 • एअर इंडियाचे हे विशेष विमान गुरुवारी, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी पहाटे ३ वाजता अमृतसरहून युनायटेड किंग्डममधील स्टॅंस्टेडसाठी उड्डाण करणार आहे. मुंबई-अमृतसर-स्टँस्टेड या मार्गावरुन हे विमान आठवड्यातून तीन वेळा अर्थात सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उड्डाण करणार आहे. या विमानातील आणखी एक विशेष बाब म्हणजे यामध्ये शीख प्रवाशांसाठी खास पंजाबी जेवण मिळणार आहे.
 • दरम्यान, बिहारची राजधानी पाटणा येथे पटना साहिब गुरुद्वारा देखील प्रसिद्ध आहे. शीखांचे शेवटचे गुरु आणि महान योद्धे गुरु गोविंद सिंह यांचे हे जन्मस्थळ आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरपासून एअर इंडियाकडून अमृतसर आणि पाटण्यादरम्यान थेट उड्डाणाची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुरुपर्वच्या निमित्ताने पटना साहिबमध्ये देखील जय्यत तयारी सुरु आहे.
30-31 Oct Current Affairs
30-31 Oct Current Affairs

कृत्रिम पान CO2 आणि पाण्यापासून इंधन म्हणून स्वच्छ वायू तयार करण्यास सक्षम

 • ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातल्या संशोधकांनी सुधारित कृत्रिम पान (आर्टिफिशियल लीफ) विकसित करण्यात यश मिळविले आहे.
 • संशोधकांच्या मतानुसार नैसर्गिक पानापेक्षा हे कृत्रिम पान दहापटीने जास्त परिणामकारक असून हवेतून मुक्तपणे CO2 शोषणारे आहे.
 • तसेच CO2 वायूला ऑक्‍सिजन आणि कार्बन मोनोऑक्‍साईड मध्येही बदलण्यास मदत करणारे आहे.
 • हे कृत्रिम पान हवेतला कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू शोषून ऑक्‍सिजन वायू सोडण्यात सक्षम ठरले असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
 • कृत्रिम पान कार्बन डायऑक्‍साईडचे कार्बन मोनोऑक्‍साईड आणि ऑक्‍सिजनमध्ये रूपांतर करते आणि कार्बन मोनोऑक्‍साईडपासून पेट्रोलला पर्याय ठरणारे वायू स्वरूपातले इंधन (syngas) विकसित करता येऊ शकते.
 • अमेरिकेच्या इलिनॉईस विद्यापीठातल्या संशोधकांनी देखील याबाबत यशस्वीपणे संशोधन केलेले आहे.

देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाने ५० वर्षांचा टप्पा गाठला

 • कालानुरूप बदल केल्याने ‘टॅप्स’ सक्षम, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव
 • बदलत्या परिस्थितीनुसार आपण बदलत राहिलो तर काळासोबत राहतो, असे म्हटले जाते. तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्पही असाच काळाबरोबर बदलत राहिल्याने पन्नाशीतही तरुण आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील बदल आणि सुरक्षिततेविषयक प्रगती केल्याने देशातील या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाने आज ५० वर्षांचा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पाला अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळाले आहेत.
 • या अणुऊर्जा प्रकल्पातील चिरतरुण अणुभट्टय़ा म्हणजे जुन्या पिढीतील सर्वाधिक काळ कार्यरत असलेले ऊर्जास्रोत आहेत. त्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. परदेशी तंत्रज्ञानाचे साहाय्य मिळणे बंद झाल्यानंतर देशातील शास्त्रज्ञ या प्रकल्पात येणाऱ्या अडचणींना सामोरे गेले. समृद्ध युरेनियमच्या उपलब्धतेच्या र्निबधांवरही तोडगा काढण्यात आला असून कालानुरूप या अणुभट्टय़ांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे २०११ मध्ये त्सुनामीनंतर फुकुशिमा (जपान) येथील अणुऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेनंतर अरबी समुद्रालगत असलेल्या तारापूर प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा आणि नवी सुरक्षा प्रणाली उभारण्यात आली.
 • देशात सध्या ६७८० मेगावॉट अणुऊर्जेची निर्मिती होत असून सध्या तारापूरच्या दोन्ही प्रकल्पांतून ३२० मेगावॉट वीज उत्पादन होत आहे. ही वीज गुजरात आणि महाराष्ट्राला दोन रुपये सहा पसे इतक्या माफक दराने दिली जाते. प्रकल्पातील अणु इंधन पुनर्भरण प्रक्रिया किमान वेळेत पूर्ण करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. उत्पादन सातत्य, कौशल्य आणि सुरक्षाविषयक कामगिरीची दखल घेऊन या प्रकल्पाला अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्य़ाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली.
 • तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ आणि २ला आज, २८ ऑक्टोबर २०१९ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. दिवाळीची सुट्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे प्रकल्पाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. याविषयी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अणुभट्टय़ांच्या तारुण्याचे रहस्य:-

 • कालानुरूप या अणुभट्टय़ांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नवी सुरक्षा प्रणालीही उभारण्यात आली. अणुभट्टय़ांमध्ये असलेल्या ‘सॅम्पल कुपन’चे नियमित परीक्षण करून या ‘न्यूक्लियर रिअ‍ॅक्टर’च्या आयुष्यमानाचे परीक्षण केले जाते. या अणुभट्टय़ाचे आयुष्य ६० इफेक्ट फुल पॉवर इअर्स इतके आहे. दोन्ही अणुभट्टय़ा दीर्घकाळ वीज उत्पादन करत राहतील, असा अभिप्राय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियामक संस्थांनी दिला आहे.

अणुऊर्जानिर्मितीचा प्रवास:-

 • मे १९६४ मध्ये अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीने तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी सुरू केली.
 • २८ ऑक्टोबर १९६९ या दिवशी प्रकल्पातून व्यावसायिक तत्त्वावर अणुऊर्जेची निर्मिती सुरू झाली.
 • बॉयलिंग वॉटर रिअ‍ॅक्टर (बीडब्ल्यूआर) पद्धतीच्या दोन अणुभट्टय़ा २१० मेगावॉट वीज उत्पादन सुरू झाले.
 • १९८४ मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अणुभट्टय़ांची उत्पादन क्षमता १६० मेगावॉटपर्यंत घटविली. सध्या या अणुभट्टय़ांतून पूर्ण क्षमतेने ऊर्जानिर्मिती सुरू

 

30-31 Oct Current Affairs
30-31 Oct Current Affairs

हरयाणा खट्टर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री चौटालांनीही घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

 • मनोहर लाल खट्टर यांनी सलग दुसऱ्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाची व गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत जननायक जनता पार्टीचे (जजपा) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 • हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली. रविवारी देशभर दिवाळीचा उत्सव साजरा होत शपथविधी सोहळा दुपारी सव्वादोनच्या सुमारास पार पडला.
 • शपथग्रहण सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली.
 • अन्य काही कॅबिनेट मंत्री देखील आज शपथ घेतील अशी शक्यता यापूर्वी वर्तवण्यात येत होती. शपथविधीसाठी जजपा नेते दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला हे देखील उपस्थित होते.
 • शपथविधी सोहळ्यापूर्वीच चौटाला यांना दोन आठवड्यांची फर्लो मंजूर झाल्याने त्यांची तिहार कारागृहातून सूटका झाली व ते शपथविधीला उपस्थित राहिले.
 • शपथग्रहण कार्यक्रमाला काँग्रेस नेता भूपिंदर सिंह हुड्डा, अकाली दलाचे नेता प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर बादल हे देखील पोहोचले होते. भाजपाला दुष्यंत यांच्या जेजेपीचा पाठिंबा मिळण्यामागे प्रकाश सिंग बादल यांची प्रमुख भूमिका असल्याचं मानलं जात आहे.
 • दरम्यान, शपथ सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे देखील उपस्थित होते.

उस्मानाबादी शेळीला लवकरच जीआय मानांकन

नोंदणीची प्रक्रिया सुरू; मान्यतेनंतर शेतकऱ्यांना फायदा

 • वैशिष्टय़पूर्ण प्रजाती असलेल्या उस्मानाबादी शेळीला भौगोलिक उपदर्शन (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेतर्फे या संदर्भातील प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत जीआयसाठीची नोंदणी करण्यात येणार आहे.
 • जीआय मानांकन हे संबंधित परिसरातील विशिष्ट शेती उत्पादन किंवा वस्तूला दिले जाते. त्या वस्तूच्या किंवा उत्पादनाच्या बौद्धिक संपदा, गुणवत्ता, दर्जा अशा वेगवेगळ्या निकषांनुसार जीआय मानांकन दिले जाते.
 • आतापर्यंत देशभरातील कृषी क्षेत्राशी संबंधित जवळपास १०० उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. या संदर्भातील तांत्रिक कामकाज जीआय-स्वामित्व हक्क नोंदणी तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सहकार्याने करत आहेत.
 • ‘उस्मानाबादी शेळीच्या वेगळेपणाचे निजाम काळापासून अनेक उल्लेख आहेत. त्यामुळे उस्मानाबादी शेळीला जीआय मानांकन मिळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेऊन प्रक्रिया सुरू केली. त्यांच्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी ही प्रक्रिया मार्गी लावली. जीआय मानांकन शेतकऱ्यांच्या बचत गटाच्या नावावर केले जाणार आहे. त्यासाठी बचत गटाची नोंदणी करण्यात येत आहे.,’ असे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी सांगितले.

गरज का?:-

 • उस्मानाबादी शेळी एका वेळी तीन ते चार पिल्लांना जन्म देते, तिचे मांस चवदार असते. राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र प्रजाती म्हणूनही या शेळीची नोंद आहे. आता उस्मानाबादी शेळीला जीआय मानांकन मिळणे आवश्यक आहे.
 • गेल्या वर्षी रत्नागिरी आणि देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाले होते. आता उस्मानाबादी शेळीला जीआय मानांकन मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शेळीला जीआय मानांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
 • उस्मानाबादी शेळीला गरिबांची गाय म्हणतात. जीआय मानांकनासाठीचे प्रथमदर्शनी अहवाल तयार करण्यात आले आहेत. अन्य तांत्रिक प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करून जीआय मानांकन मिळण्यासाठी अर्ज करण्यात येईल. जीआय मानांकन मिळणे शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरेल.  – प्रा. गणेश हिंगमिरे,जीआय-स्वामित्व हक्क तज्ज्ञ

 

30-31 Oct Current Affairs
30-31 Oct Current Affairs

दोन वर्षांच्या मोहिमेनंतर यूएस एअरफोर्सचे अंतराळ विमान पृथ्वीवर परत आले

 • दोन वर्षांच्या मोहिमेनंतर यूएस एअरफोर्सचे अंतराळ विमान 780 दिवसांच्या कक्षामध्ये पृथ्वीवर परत आले आहे.
 • एक्स-37 बी रविवारी पहाटे फ्लोरिडामधील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस Administrationडमिनिस्ट्रेशनच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये दाखल झाला.
 • ह विमान 2017 मध्ये स्पेसएक्स रॉकेटवर बसविण्यात आले होते.
 • मिशनने पुन्हा वापरण्यायोग्य चाचणी वाहनासाठी नवीन सहनशक्तीची नोंद केली.
 • अशा वाहनाने हे पाचवे स्पेसफ्लाइट होते.  पुढच्या वर्षी केप कॅनेव्हरलच्या दुसर्‍या प्रक्षेपणासह 6 नंबरची योजना आखली आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »