30 August Current Affairs

30 August Current Affairs
30 August Current Affairs

पोलीस आयुक्त बर्वेंना ३ महिन्यांची मुदतवाढ

 • मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच ही मुदतवाढ देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 
 • बर्वे हे उद्या म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. 
 • माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची पोलीस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली होती. 
 • मुंबईचे पोलीस आयुक्तपदी आल्यानंतर फारच कमी काळ मिळालेला असला तरी बर्वे यांनी पदाची धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळली होती. 
 • जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हे लक्षात घेत निवडणुकीच्या काळात बर्वेंसारखा पोलीस आयुक्त पदावर असणे योग्य ठरेल असा विचार करूनच त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 
 • गेल्या महिन्याभरात बर्वे यांना मुदतवाढ मिळणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. बर्वे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 
 • बर्वे यांनी यापूर्वी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. बर्वे हे कर्तव्यदक्ष, हुशार आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.
   

बिहार जीन्स टीशर्टवर कार्यालयांत बंदी

 • बिहार राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात जिन्स आणि टी-शर्ट घालण्यास मनाई करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फॉर्मल ड्रेसवरच कार्यालयात यावे असे नवे फर्मानच बिहार सरकारने काढले आहे. इतकेच नाही, तर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भडक रंगांचे कपडे घालू नयेत असेही बजावण्यात आले आहे. 
 • हा आदेश राज्य सरकारचे अवर सचिव शिव महादेव प्रसाद यांनी जारी केला आहे. राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन संस्कृतीच्या विरुद्ध असे कॅज्युअल ड्रेस परिधान करून कार्यालयात येऊ शकत नाहीत, असे या आदेशात म्हटले आहे. कॅज्युअल ड्रेस हा कार्यालयीन प्रतिष्ठेच्या विरोधी असल्याचेही सचिवांनी म्हटले आहे.

सौम्य रंगांचे, प्रतिष्ठा जपणारे कपडे घालण्याचे आदेश:-

 • अवर सचिवांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, 'सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात औपचारिक, सौम्य रंगाचे शालीन, प्रतिष्ठा असलेले, आरामदायक, सर्वसामान्यपणे समाजात परिधान करण्याजोगे असे कपडे परिधान करूनच कार्यालयात यावे. 
 • हवामान, कामाचे स्वरूप आणि प्रसंगानुसार आपण कपडे परिधान केले आहेत का, हे पाहूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात यावे. आपण जीन्स, टी-शर्टसारखे औपचारिक कपडे परिधान करून कार्यालयात येणार नाही, अशी आशा आहे.'

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आहे पूर्वीपासूनच ड्रेस कोड:-

 • प्रशासन विभागाने यापूर्वीच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित केला आहे. नोकरशहांसाठीदेखील खास कार्यक्रमांसाठी विशेष असा ड्रेस कोड ठरविण्यात आला आहे.
 • आता सचिवालयातील अन्य पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
30 August Current Affairs
30 August Current Affairs

अंबाती रायुडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे

 • सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीचा निर्णय आपण भावनेच्या भरात घेतल्याचे रायुडू याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपली सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा असल्याचेही पत्रात लिहिले आहे. 
 • रायुडू याने पत्रात चेन्नई सुपर किग्स, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नोएल डेव्हीडचे आभार मानले आहेत. रायुडू पत्रात पुढे म्हणतो की, ' यांनी माझ्या कठीण काळात मला पाठिंबा दिला. माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. याच कारणामुळे मी माझ्या निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे. हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता.' 
 • रायुडू पुढे म्हणतो, 'मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत असून सर्व प्रकारचा क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. पुढील मोसमात माझी हैदराबाद संघासोबत खेळण्याची इच्छा आहे. मी माझे सर्व कौशल्य पणाला लावून संघासाठी योगदान देईन. मी येत्या १० सप्टेंबरपासून हैदराबाद संघासाठी उपलब्ध असेन.' 
 • वर्ल्डकप स्पर्धेक शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतीमुळे माघारी आल्यानंतर देखील बीसीसीआयने रायुडूच्या नावाचा विचार केला नव्हता. रायुडूऐवजी बीसीसीआयने ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांची निवड केली होती. यामुळे रायुडू नाराज झाला होता. त्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. 
   

पाकिस्तानात शीख मुलीचं बळजबरी धर्मांतर

 • पाकिस्तानात शीख समुदायाचे पहिले गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीला अवघे काही दिवस शिल्लक असताना या समाजाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गुरुद्वाऱ्यात ग्रंथी (पुजारी) म्हणून सेवा देणाऱ्याच्या मुलीचं अपहरण करून तिचं बळजबरीने धर्मांतर आणि मुस्लिम तरुणाशी लग्न करून देण्यात आलं आहे.
 • जिथे गुरुनानक देव यांचा जन्म झाला होता, त्या ननकाना साहिब भागातच हा प्रकार घडला आहे. ननकाना साहिब पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, तम्बू साहिब या गुरुद्वाऱ्यात सेवा देणाऱ्या भगवान सिंग यांच्या मुलीचं २८ ऑगस्ट रोजी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिचं बळजबरीने धर्मांतर करून मोहम्मद एहसान या मुस्लिम मुलाशी तिचं लग्न लावून देण्यात आलं. 
 • या मुलीच्या 'निकाह'चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती एहसानसोबत कुराणचे काही पाठ एका मौलवींपाठोपाठ बोलताना दिसते. तिने आपल्या मर्जीने लग्न केल्याचं या व्हिडिओत मौलवी सांगतात. आपलं वय १९ असून आपण कोणताही दागिना आणला नसल्याचं मुलगी सागंतले. मात्र मुलीच्या भावाने मनमोहन सिंगने दाखल केलेल्या तक्रारीत तिचं वय १६ ते १७ वर्षांचं असल्याचं तो सांगतो. 
 • मनमोहनच्या तक्रारीवरून पोलिसांनी एहसानसह सहा अन्य जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. मुलीचा लहान भाऊ सविंदर सिंगने टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की, त्याच्या बहिणीचा साखरपुडा झाला आहे. 
 • २७ ऑगस्टच्या रात्री तिचं अपहरण करण्यात आलं. ती तिच्या मोठ्या बहिणीकडे गेले होते. तिच्या बहिणीचे पती फैसलाबादला एका बिझनेस ट्रीपवर गेले होते. त्यावेळी सशस्त्र टोळीने त्यांच्याावर हल्ला केला आणि या मुलाीचं अपहरण करण्यात आलं. 
 • यापूर्वीही सिंध आणि खैबर पख्तुनख्वा भागात हिंदू आणि शीख मुलींच्या अशा अनेक अपहरणाच्या आणि धर्मांतराच्या घटना घडल्या आहेत.
30 August Current Affairs
30 August Current Affairs

शस्त्रसामर्थ्यात पाकिस्तान मागेच

 • भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या नेत्यांमधील अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आर्थिक, लष्करी कोणतीही तुलना केल्यास पाकिस्तान हा भारतापेक्षा कित्येक पटीने कमकुवत असल्याचे स्पष्ट दिसते. तरीही पाकचे काही मंत्री, नेते युद्धाची भाषा करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या शस्त्रसामर्थ्याचा घेतलेला हा आढावा. 
 • ग्लोबल फायर पॉवर (जीएफपी) या संकेतस्थळाने २०१९मध्ये केलेल्या सर्वेक्षणाद्वारे शस्त्रसज्जतेमध्ये पाकिस्तान १५ व्या स्थानी आहे. या सर्वेक्षणासाठी सुमारे १३७ देशांच्या शस्रसामर्थ्याचा अभ्यास करण्यात आला होता. 

लष्कर:- 

 • एकूण मनुष्यबळ : १२,०४,००० 
 • प्रत्यक्ष कार्यरत : ६,५४,००० 
 • राखीव दल : ५,५०,००० 

हवाई दल:-

 • एकूण विमानांची संख्या : १,३४२ 
 • फायटर : ३४८ 
 • लढाऊ : ४३८ 
 • वाहक : ५१ 
 • प्रशिक्षणार्थी : ४९९ 
 • हेलिकॉप्टर : ३२२ 
 • लढाऊ हेलिकॉप्टर : ५५ 

नौदल:-

 • एकूण लढाऊ उपकरणे : १९७ 
 • एअरक्राफ्ट वाहक : ० 
 • सबमरिन : ८ 
 • विनाशक : ० 

रणगाडे:-

 • लढाऊ रणगाडे : २२०० 
 • शस्रयुक्त लढाऊ वाहने : ३,६६५ 
 • स्वयंचलित तोफखाने : ४२९ 
 • रॉकेट प्रोजेक्टर : १५० 

क्षेपणास्त्रे:-

 • हत्फ : ५० किमी मारा क्षमता 
 • नस्र : ७० किमी 
 • अब्दाली : २०० किमी 

लघु पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे:-

 • गझनवी : ३०० किमी 
 • शाहीन-१ : ७५० ते ९०० किमी 

मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे 

 • घौरी-१ : १५०० किमी 
 • घौरी-२ : १८०० किमी 
 • अबबील : २,२०० किमी 
 • शाहीन-२ : २५०० किमी 
 • शाहीन-३ : २७५० किमी 

क्रूज क्षेपणास्त्रे:-

 • बाबर १ : ७०० किमी 
 • बाबर २ : ७५० किमी 
 • हत्फ ८ : ५५० किमी 

अण्वस्त्रे :- 

 • सुमारे १४० ते १५० 

हाँगकाँगमध्ये अतिरिक्त फौजा तैनात

 • हाँगकाँगमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी काही राजकीय निदर्शने नियोजित असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने या आर्थिक केंद्रावरची पकड घट्ट करण्यासाठी अतिरिक्त फौजा हाँगकाँगमध्ये तैनात केल्या आहेत. लष्करी तुकड्यांची नियमित अदलाबदल करण्याचा भाग म्हणून या फौजा तैनात करण्यात आल्याचे चीनने म्हटले आहे.
 • हाँगकाँगच्या सीमेवर सशस्त्र दलाचे जवान ट्रकच्या ताफ्यांमधून उतरत असतानाचा व्हिडिओ सरकारी माध्यमातर्फे गुरुवारी प्रसारित करण्यात आला. हाँगकाँगमध्ये शनिवारी जनआंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. 
 • तथापि, सुरक्षेच्या कारणावरून हाँगकाँगच्या पोलिसांनी या निदर्शनांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे, आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता वाढली आहे. हाँगकाँग पोलिसांनी सिव्हिल ह्युमन राइट्स फ्रंट (सीएचआरएफ) या निदर्शनांचे संघटन करणाऱ्या संस्थेला पत्र पाठवले असून निदर्शनांमध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांकडून हिंसक आणि विध्वंसक कृती केल्या जातील, अशी चिंता व्यक्त केली आहे.
   
30 August Current Affairs
30 August Current Affairs

१०० रुपयांची नोट आता लखलखणार

 • चलनी नोटांमध्ये आपल्या जांभळ्या रंगामुळे लक्ष वेधून घेणारी १०० रुपयांची नोट आता आणखी लखलखणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १०० रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचं ठरवलं आहे. 
 • सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग केलं जाईल. नोटांचं आयुष्य वाढवण्यासाठी आरबीआय हा प्रयोग करत आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास १०० रुपयांच्या सर्व नोटांना वॉर्निश कोट लावला जाईल. 
 • वॉर्निश लावण्याचा हा प्रस्ताव आरबीआयच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आला आहे. हा अहवाल गुरुवारी जारी झाला. यासारख्या आणखी काही कल्पक योजना आरबीआय नोटांसाठी आणणार आहे. अंधांना हाताळता याव्यात यासाठी नोटा अधिक सोयीस्कर बनवण्याचाही आरबीआयचा प्रयत्न आहे. 
 • अहवालात असं म्हटलंय की इनटाग्लिओ प्रिंटींग, टॅक्टिकल मार्क, आकार, मोठे आकडे आदि विविध गोष्टींचा वापर करून अंध, अंशत: अंधांसाठी या नोटा हाताळणं अधिक सुकर करण्यात येणार आहे. 
 • मुंबईत एक बँक नोट क्वालिटी अॅश्युअरन्स प्रयोगशाळा देखील स्थापन करण्यात आली आहे. नोटांच्या गुणवत्तेकडे ही प्रयोगशाळा लक्ष केंद्रित करणार आहे.
   

दिपा मलिक खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

 • रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिला खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. 
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपाचा गौरव करण्यात आला आहे. आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पैलवान बजरंग पुनियालाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र भारताबाहेर असल्याने हा पुरस्कार घेण्यासाठी तो उपस्थित राहू शकला नाही. 
 • राष्ट्रपती भवनात रंगलेल्या शानदार सोहळ्यात दीपाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

द्रोणाचार्य पुरस्कार:-

 • सायना नेहवाल आणि लक्ष्य सेनसारख्या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे विमल कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
 • यावेळी टेबल टेनिस कोच संदीप गुप्ता, राबीर सिंह खोकर (कबड्डी), मेजबान पटेल (हॉकी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांनाही द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

अर्जुन पुरस्कार:-

 • जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविणारे बी. साई प्रणित, स्वप्ना बर्मन (हेप्टॅथलॉन), एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग), सोनिया (बॉक्सिंग), पूनम यादव (क्रिकेट), रेसलर पूजा ढांडा, प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), हरमीत देसाई (टेबल टेनिस) आणि फवाद मिर्जा यांना अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे. 
 • जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविणारे बी. साई प्रणित, स्वप्ना बर्मन (हेप्टॅथलॉन), एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग), सोनिया (बॉक्सिंग), पूनम यादव (क्रिकेट), रेसलर पूजा ढांडा, प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), हरमीत देसाई (टेबल टेनिस) आणि फवाद मिर्जा यांना अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे. 
 • तेजिंदरपाल सिंह तूर (अॅथलेटिक्स), मोहम्मद अनस याहिया (अॅथलेटिक्स), एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग), सोनिया लाथर (बॉक्सिंग), रविंद्र जडेजा (क्रिकेट), चिंगलेनसाना सिंह कंगुजम (हॉकी), अजय ठाकुर (कबड्डी), गौरव सिंह गिल (मोटर स्पोर्ट्स), अंजुम मोद्गिल (शूटिंग), हरमीत राजुल देसाई (टेबल टेनिस), सुंदर सिंह गुर्जर (पैरा स्पोर्ट्स), सिमरन सिंह शेरगिल (पोलो) 

ध्यानचंद अवॉर्ड:-

 • मॅन्यूअल फेड्रिक्स (हॉकी), अरूप बसक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितेन किर्रताने (टेनिस) आणि लालरेमसानगा (तिरंदाजी)
30 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »