31 July Current Affairs

31 July Current Affairs
31 July Current Affairs

मुंबई पुणे हायपरलूपला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता

मुंबई—पुणे (वांद्रे-कुर्ला संकुल ते वाकड) दरम्यान ११७.५० किमी अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यात होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती ४९६ किमी प्रति तास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त २३ मिनिटांचा होणार आहे.
पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून या टप्प्यात ११.८० कि.मी. लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प हा दोन ते अडीच वर्षांत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण प्रकल्प ६ ते ७ वर्षांत पूर्ण करण्यात येईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास व डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नॉलॉजी, आयएनसी यांच्या भागीदारी समूहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 

लाहोर येथील बायोमेकॅनिक्स लॅबला ICC ची मान्यता

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) पाकिस्तान देशातल्या लाहोर या शहरात पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) उभारण्यात आलेल्या “बायोमेकॅनिक्स लॅब” याला मान्यता दिली.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) संशयास्पद वाटणारी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक तपास केंद्र म्हणून “बायोमेकॅनिक्स लॅब” उभारलेली आहे. 
ही प्रयोगशाळा लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) येथे उभारण्यात आली आहे आणि ICC या संस्थेद्वारे मान्यता देण्यात आलेली पाचवी बायोमेकॅनिक्स लॅब आहे.
या ठिकाणी इतर मान्यताप्राप्त केंद्रासारखी प्रगत उपकरणे आणि सॉफ्टवेअर आहेत. या ठिकाणी तीन मापदंडांच्या अंतर्गत माहिती तयार करण्यास सक्षम असलेली किमान 12 हायस्पीड कॅमेरासह मोशन अनॅलिसिस सिस्टम बसविण्यात आली आहे.
शाहरीर खान PCBचे अध्यक्ष असताना 2015-16 या वर्षी प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या बेकायदेशीर गोलंदाजीची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली.
 

31 July Current Affairs
31 July Current Affairs

सीसीडीचे मालक आणि संस्थापक व्ही.जी.सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे (सीसीडी) मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले. मंगळुरू पोलिसांनी सिद्धार्थ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. एकीकडे सिद्धार्थ यांचा शोध सुरु असतानाच शेअर बाजारामध्ये सीसीडीचे शेअर्स २० टक्यांनी पडले आहेत.
साकलेशपूर येथे एका महत्वाच्या मिटिंगसाठी जाताना वाटतेच सिद्धार्थ बेपत्ता झाले. सिद्धार्थ हे शेवटी नेत्रावती नदीवरील उल्लाल पूलाजवळ दिसून आले होते. मंगळूरहून साकलेशपूरला जातना ५५ वर्षीय सिद्धार्थ यांनी अचानक आपल्या गाडीच्या चलाकाला गाडी थांबवण्यास सांगितले. तसेच मी खाली वॉकला जाऊन येत असं सांगून ते निघून गेल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले आहे. २०० हून अधिक पोलीस कर्मचारी, २५ बोटी या पुलाच्या परिसरामध्ये नदीमध्ये सिद्धार्थ यांचा शोध घेत आहे. सिद्धार्थ यांना शोधण्यासाठी बोटींबरोबर पोलीसांनी स्निपर कुत्र्यांनाही आणले आहे. दरम्यान, सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली आहे.
सीसीडीचे भवितव्य धोक्यात
नुकताच सिद्धार्थ यांनी माईंडट्री लिमिटेड या कंपनीमधील आपल्या मालकीच्या शेअर्सपैकी २० टक्के शेअर्स लॉर्सन अॅण्ड टुर्बो लिमिटेड या कंपनीला विकले होते. रॉयर्टसने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थ हे त्यांच्या मालकीची सीसीडीची मालकी कोका कोला कंपनीला विकण्यासंदर्भात कंपनीशी चर्चा करत होते.

दरम्यान यानंतर कॅफे कॉफी डे किंवा CCD या प्रसिद्ध कॉफी शॉप साखळीचे मालक व्ही.जी.सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. गेले दोन दिवस त्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मोहीम राबवण्यात येत होती. व्यवसायात झालेला तोटा आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सोमवारपासून ते  बेपत्ता झाले होते. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांचे ते जावई आहेत. मंगळुरूमध्ये नेत्रावती नदीच्या काठावर होईगे बाजार परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.

विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांच्या संपाला सुरुवात

केंद्र सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (नॅशनल मेडिकल कमिशन) विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी देशातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व खासगी दवाखाने बंद राहणार असून ठिकठिकाणी निदर्शनांना सुरुवात झाली आहे. 
अहमदनगर: डॉक्टरांच्या संपामुळे सर्वच खासगी हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण विभाग बंद. 
> ठाण्याच्या विविध रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु 
> आयएमए ठाणे शाखेच्या बैठकीनंतर दुपारी जिल्हाधिकारींची भेट घेणार 
> आयएमएशी संलग्न असलेल्या ठाणे शहरातील १३०० डॉक्टरांचा संपामध्ये सहभाग 
> सर्व दवाखाने, रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहणार 
> कायद्याच्या विरोधात जनजागृती, साखळी उपोषण, तसेच बंद पुकारून निषेध नोंदविला जाणार 
> 'आयएमए'च्या कृती समितीने २४ तास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय 
> 'इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) पुकारला संप 
 

31 July Current Affairs
31 July Current Affairs

प्रसूती साठी महिलेचा सहा किमी खाटेवर प्रवास

कळमनुरी तालुक्यातील करवाडी भागात रस्ता नसल्याने दोन वर्षांपूर्वी एका महिलेला प्रसूतीसाठी खाटेवरून न्यावे लागल्याच्या घटनेची दखल उच्च न्यायालयाने घेत येथे तातडीने रस्ता तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रस्ता मंजूर करण्यात आला. पण तयार काही झाला नाही. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या भागात मंगळवारी पुन्हा दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. प्रसूतीसाठी महिलेला खाटेवरून रुग्णालयात आणावे लागले.

करवाडी गावातील सुवर्णा ढाकरे यांना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर त्यांना हिंगोली जिल्हा रुग्णालयापर्यंत न्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. रुग्णवाहिका गावात येणे शक्य नव्हते. करवाडी ते नांदापूर हा रस्ता अजूनही चिखलमय आहे. दुचाकी व चारचाकी जाऊ शकत नाही. सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी मग पुन्हा एकदा गावकऱ्यांनी कळा सोसणाऱ्या सुवर्णा ढाकरे यांना खाटेवर टाकले. रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे  बहुतेक जणांना छत्र्या हातात घ्याव्या लागल्या. खाटेवरच्या गर्भवती महिलेला सांभाळताना ती भिजू नये याची काळजी घ्यायची, अशी कसरत करत गावकऱ्यांनी आणि नातलगांनी सहा किलोमीटरचे अंतर पार केले. नांदापूर येथे शासकीय रुग्णवाहिका आली होती. तेथून सुवर्णा ढाकरे यांना हिंगोली जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तोपर्यंत दुपारचे साडेतीन वाजले होते. भरपावसात प्रसूतकळा सोसत सुवर्णा यांच्यासह नातेवाईक पोहोचले. या भागातील रस्ता तातडीने बनवावा, अशी सर्वाची मागणी होती.

गर्भवती सुवर्णाला जिल्हा रुग्णालयात घेऊन येण्यासाठी या महिलेसोबत त्यांचा भाऊ संतोष कऱ्हाळे, आशा कार्यकर्ती प्रेमला रामपोटे व तिची आई अल्काबाई कऱ्हाळे, आत्या रंगूबाई खोकले, काकू लक्ष्मीबाई कऱ्हाळे यांना सहा किलोमीटरचा चिखलमय रस्ता तुडवत यावे लागले.

हाल संपेना..

१९ सप्टेंबर २०१७ रोजी गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात आणावे लागते, या आशयाचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. ५ जुल २०१९ रोजी झालेल्या सुनावणीत, शासनातर्फे दिलेल्या उत्तरात गावासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्यासाठी एक कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. हे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण केले जाईल, असे शासनाने कळविले होते. रस्त्यासाठीची मुदत अद्याप शिल्लक असली तरी गावातले हाल काही अजून थांबलेले नाहीत.

टिपू सुलतान जयंती रद्द

दर वर्षाला साजरा केला जाणारा टिपू सुलतान जयंतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. २०१५पासून ही जयंती साजरी करण्यास सुरुवात झाली. म्हैसूर साम्राज्याचा टिपू सुलतान हा राजा होता. कर्नाटकमधील सत्ता हाती घेतल्यानंतर येडियुरप्पा सरकारने अवघ्या तीन दिवसांतच हा निर्णय घेतला. आमदार बोपैया यांनी येडियुरप्पा यांना टिपू जयंतीचा कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने टिपू जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. २०१५पासून दर वर्षी १० नोव्हेंबर रोजी ही जयंती साजरी केली जाते. काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारने गेल्या वर्षी भाजपचा विरोध डावलून ही प्रथा सुरू ठेवली होती.

31 July Current Affairs
31 July Current Affairs

पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी BCCI नं घातली बंदी

भारतीय क्रिकेटचा उगवता तारा पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी आढळळा असून त्याच्यावर 15 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याआधी शॉ दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. त्यामुळेच त्याला विंडीज दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. इंदौरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी पृथ्वी शॉच्या यूरीनचे सॅम्पल घेण्यात आलं होतं. त्यात बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याचं आढळलं आहे. बीसीसीआयच्या अँटी डोपिंग प्रोग्रॅम अंतर्गत ही चाचणी करण्यात आली होती.
पृथ्वी शॉच्या यूरीन सॅम्पलमध्ये बंदी असलेल्या पदार्थाचा अंश आढळला. टर्ब्यूटलाइन नावाचा हा पदार्थ कफ सिरपमध्ये वापरला जातो. या पदार्थाच्या सेवनावर वाडाने बंदी घातली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलं आहे की, 16 जुलै 2019 रोजी पृथ्वी शॉने अँटी डोपिंग रूल व्हायलेशन आणि बीसीसीआय़आच्या अँटी डोपिंग रूलचे उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. पृथ्वी शॉने आपण या पदार्थाचं सेवन केल्याचं मान्य केलं. मात्र, त्याचा वापर केवळ खोकला थांबावा या उद्देशानेच केल्याचं म्हटलं आहे. बीसीसीआयनं त्याचं म्हणणं मान्य केलं तरी त्याच्या बेजबाबदारपणामुळे 8 महिन्याची बंदी घातली असल्याचं सांगितलं. पृथ्वी शॉवर 16 मार्च ते 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
डोपिंग म्हणजे काय?
डोपिंग टेस्ट ही प्रशिक्षण शिबिरात किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यापूर्वी घेतली जाते. मेक्सिको ऑलिम्पिक वेळी 1968 मध्ये पहिल्यांदाच भारतात डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. स्टेरॉयड, पेप्टाइड हार्मोन, नार्कोटिक्स, डाइयूरेटिक्स आणि ब्लड डोपिंग या 5 प्रकारच्या उत्तेजक घेण्याचा यात समावेश आहे.
दोषी आढळल्यास काय़?
खेळाडूच्या युरीनचे नमुने तपासून त्यात पॉझिटीव्ह आढळल्यास खेळाडूवर बंदी घालण्यात येते. त्यानंतर खेळाडू बी टेस्ट देऊ शकतो. मात्र, त्यातही टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास खेळाडू स्पर्धेतून बाद केला जातो. वाडा म्हणजे विश्व डोपिंग संस्था आणि नाडा म्हणजे राष्ट्रीय डोपिंग संस्था यांच्याकडून ही टेस्ट घेण्यात येते.
 

धनगर समाजासाठी १३ योजना

धनगर समाजास आरक्षण देण्याचे मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यातील तांत्रिक अडचणीमुळे अस्वस्थ झालेल्या राज्य सरकारने अनुसूचित जमातीच्या सर्व योजना या सामाजासाठी लागू करण्याचा निर्णय घेत पुन्हा या सामाजास खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार धनगर समाजाच्या उन्नतीसाठी विविध १३ योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविण्यात आला.

पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. गेली साडेचार वर्षे धनगर समाज आणि विरोधकांकडूनही आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारकडूनही या समाजास आरक्षण देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन देत वेळ मारून नेली  जात आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या आरक्षणावरून विरोधक सरकारची कोंडी करून धनगर समाजात संभ्रम निर्माण करण्याची शक्यता  लक्षात घेऊन या समाजासासाठी भरीव योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी (एसटी) सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

योजना काय? भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयम् योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरू करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे, ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुले बांधून देण्याची योजना आहे.  होतकरू बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण देणे आदी योजना राबविण्यात येणार असल्याचे विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग मंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली.


 

31 July Current Affairs
31 July Current Affairs

आसामचा गोल्डन चहा

आसामच्या एका चहाच्या मळ्यातला चहा आज 70,501 रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. आतापर्यंतच्या चहाच्या दराचा हा विक्रम आहे.
आसामचा गोल्डन टिप्स या चहाला लिलावत बुधवारी 31 जुलैला ही सर्वाधिक बोली लागली.
आदल्याच दिवशी आसामचाच एक दुसरा चहा - मनोहारी टी जगातला सर्वात मौल्यवान चहा ठरला होता. त्याच्यावर 50000 रुपये प्रतिकिलो एवढी बोली लागली होती. गोल्डन टिप्सने या चहाचं रेकॉर्ड मोडलं.
गोल्डन टिप्स चहा नावाप्रमाणे सोनेरी रंगाच्या पानांचा आहे. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या सर्वांत जुन्या चहाच्या मळ्यांपैकी एक असणाऱ्या मजियान मळ्यातला हा चहा आहे.गोल्डन टिप्स चहाची पानं हातानं खुडलेली असतात आणि त्याचं ब्र्युइंग खास पद्धतीनं होतं.
चहाची रोपं साधारण पन्नास वर्षांनी उखडून टाकली जातात. कारण त्यातलं उत्पादन घटतं, असं म्हणतात पण मजियानच्या या मळ्यात 100 वर्षांपूर्वीची रोपं जपली आहेत आणि त्याचंच उत्पादन आता विक्रमी किंमत देत आहे.

जॉन रॉबर्ट श्रीफर

अतिवाहकता म्हणजे सुपरकंडक्टिव्हिटी हा काही पदार्थाचा गुणधर्म आता नवीन राहिलेला नाही. अतिवाहक पदार्थाचा विद्युतरोध जवळपास शून्य असल्याने त्यात विजेची हानी टळते, पण सर्वसामान्य तापमानाला कुठलाही पदार्थ अतिवाहक (सुपरकंडक्टर) नसतो त्यामुळे पदार्थात अतिवाहकतेचा गुण आणणे हे आव्हान आहे. अतिवाहकता संकल्पना १९७० च्या सुमारास स्पष्टपणे अस्तित्वात आली, ती ‘बीसीएस सिद्धांत’ म्हणजे बार्डीन, कूपर, श्रीफर सिद्धांत म्हणून! या सिद्धांतासाठी  १९७२ मध्ये तिघांना नोबेल मिळाले. यातील जॉन रॉबर्ट श्रीफर यांचे नुकतेच निधन झाले. अतिवाहकतेचे सर्वात यशस्वी असे पुंजभौतिकीवर आधारित स्पष्टीकरण त्यांनी केले होते.
श्रीफर यांचा जन्म इलिनॉयमधील ओक पार्कचा. त्यांचे कुटुंबीय १९४० मध्ये न्यूयॉर्कला व नंतर फ्लोरिडात आले. लहानपणी कागदी रॉकेटे, पुढे हॅम रेडिओ या छंदांतून ते आधी विद्युत अभियांत्रिकीकडे, त्यानंतर भौतिकशास्त्राकडे वळले. जॉन स्लॅटर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जड अणूंवर आधारित छोटा प्रबंधही सादर केला होता. नंतर इलिनॉय विद्यापीठात जॉन बार्डिन यांचे सहायक म्हणून, विद्युत वहनातील सैद्धांतिक प्रश्नांवर त्यांनी काम केले. मग बार्डिन व लिऑन कूपर यांच्या समवेत ते अतिवाहकतेच्या संशोधनात सहभागी झाले. अतिवाहक अणूंची गणिती मांडणीही त्यांनी केली होती. तो काळ १९५७ चा. अतिवाहकतेतील ‘कंडेन्सेट’ संकल्पना त्यांना न्यूयॉर्कमधील भुयारी रेल्वेत सुचली, त्यांनी ती लगेच लिहून काढली. १९२० ते १९५७ पर्यंत अतिवाहकतेची सैद्धांतिक मांडणी करता आली नव्हती ती यातून शक्य झाली. अतिवाहक पदार्थातील इलेक्ट्रॉन हे विशिष्ट जोडय़ांनी काम करतात त्यांना ‘कूपर जोडय़ा’ असे म्हणतात. यातूनच पुढे बीसीएस सिद्धांत उदयास आला. तीस वर्षांच्या प्रायोगिक निष्कर्षांना सैद्धांतिक रूप देण्यात या तिघांना यश मिळाले. काही काळ श्रीफर हे ब्रिटिश नॅशनल सायन्स फाउंडेशन व कोपनहेगनच्या नील्स बोहर संस्थेत होते. मायदेशी परतून त्यांनी इलिनॉय विद्यापीठात अध्यापन केले. ‘थिअरी ऑफ सुपरकंडक्टिव्हिटी’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.  १९७२ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाल्यावर ते कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापन करीत होते. १९९२ मध्ये फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत मानद प्राध्यापक झाले. नॅशनल हाय मॅग्नेटिक फील्ड लॅबोरेटरीचे ते प्रमुख होते व कक्ष तापमानाला अतिवाहकता मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू राहिले.
त्यांच्या आयुष्यात एक डाग मात्र राहिला तो म्हणजे २००५ मध्ये त्यांच्या गाडीखाली कॅलिफोर्नियात एकजण ठार, तर सात जखमी झाले होते. त्यासाठी त्यांना दोन वर्षे तुरुंगात जावे लागले होते.
 

31 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »