3 Sep Current Affairs

3 Sep Current Affairs
3 Sep Current Affairs

शक्तिशाली अपाचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

 • भारताकडे डोळे वटारून पाहण्याआधी शत्रूला आता दहा वेळा विचार करावा लागणार आहे.
 • भारतीय हवाई दलात आता जगातील सर्वात शक्तिशाली अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. 
 • हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. 
 • भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे. एकूण आठ लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. 
 • टप्प्याटप्प्याने आणखी २२ लढाऊ हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल होतील. सर्वात शक्तिशाली आणि अचूक मारा करण्याची क्षमता या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये आहे, अशी माहिती हवाई दलाचे प्रवक्ता अनुपम बॅनर्जी यांनी दिली. 
 • अपाचे एएच-६४ ई या जातीचे हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कर वापरतं. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टी-रोल कॉम्बॅट तसंच शक्तिशाली लढाऊ हेलिकॉप्टर आहे. 
 • मार्चमध्येच भारतीय हवाई दलाच्या छत्तीसगड हवाई तळावर अत्याधुनिक चिनुक हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला होता.
   

मुंबईतील सीएसएमटी जगातील दुसरं आश्चर्यकारक स्टेशन

 • जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. 
 • 'वंडर्सलिस्ट' या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात सीएसटीएमचाही समावेश केला आहे.
 • या यादीत सीएसटीएम दुसऱ्या तर न्यूयॉर्कचं ग्रँड सेंट्रल टर्मिनल पहिल्या स्थानावर आहे. 
 • या यादीत लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल तिसऱ्या, मॅड्रिडचं अटोचा स्टेशन चौथ्या आणि अँटवर्पमधील अँटवर्प स्टेशन पाचव्या स्थानावर आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान:-

 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे.(आपण 2018 च्या चालू घडामोडीमध्ये ही बातमी कव्हर केली होती )
 • हे स्टेशन म्हणजे वास्तूकलेचा अद्भूत नमूना असून फेड्रीक विल्यम स्टिव्हन्सने हे स्टेशन बांधलं आहे.
 • मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित हे स्टेशन आहे. 
 • या स्टेशनचं नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. 
 • भारतातलं सर्वात व्यस्त असं हे स्टेशन असून रोज तीन दशलक्ष प्रवासी प्रवास करतात, असा गौरव या संकेतस्थळानं केला आहे. 
3 Sep Current Affairs
3 Sep Current Affairs

आम्ही युद्धाला सुरुवात करणार नाही इम्रान खान

 • काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरूच असून, आता पाकिस्तान भारताविरोधात युद्धाला पहिल्यांदा सुरुवात करणार नाही, असे सांगून पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी संघर्षांचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. 
 • 'आम्ही युद्धाला पहिल्यादा सुरुवात करणार नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आणि तणाव वाढला, तर जगाला धोका निर्माण होईल,' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. लाहोरमधील शिख समुदायाच्या मेळाव्यात ते बोलत होते. 
 • 'युद्ध हे कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसते. युद्धातला विजेता हा पराभूतही असतो. कारण युद्ध अन्य अनेक गोष्टींना जन्म देत असते,' असे ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानातील समस्या सारख्याच आहेत, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला, त्या वेळी म्हटले होते, असे ते म्हणाले.
 • या वेळी त्यांनी हवामान बदल व पाणीटंचाईचा उल्लेख केला. काश्मीरचा मुद्दा आपण संवादातून सोडवू, असे आपण मोदी यांना म्हटले होते, असे ते पुढे म्हणाले. 
   

कुलभूषणांवर पाकचा दबाव भारताचा आरोप

 • पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपांखाली २०१६पासून तुरुंगात डांबलेले भारतीय कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या प्रचंड दबावाखाली असल्याचा आरोप भारताने सोमवारी केला आहे.
 • पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराची माहिती देण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचे भारताने कुलभूषण जाधव यांच्या भेटीनंतर म्हटले आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज जाधव यांच्या आईशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना घडामोडींची माहिती दिली. 
 • भारताचे पाकिस्तानातील उप-उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी सोमवारी जाधव यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. या भेटीनंतर भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानवर दबावाचा आरोप केला. ते म्हणाले, 'या भेटीचा लवकरच विस्तृत अहवाल प्राप्त होईल. पण पाकिस्तानने जे खोटे दावे केले आहेत तेच सांगण्याचा दबाव जाधव यांच्यावर असल्याचे या भेटीत दिसून आले. 
 • अहलुवालिया यांच्याकडून भेटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.' जाधव यांना न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असेही रवीश कुमार यांनी सांगितले. 
 • जाधव हे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. दहशतवाद्यांनी २०१६मध्ये त्यांचे इराणमधून अपहरण केले आणि त्यांना पाकिस्तानच्या ताब्यामध्ये दिले. त्यातून पाकिस्तानच्या लष्कराने कांगावा करत, कुलभूषण जाधव भारताचे हेर असल्याचे खोटे आरोप केले. 
 • पाकिस्तानी लष्कराच्या कोर्टाने एकतर्फी खटला चालवत जाधव यांना फाशीची शिक्षाही सुनावली होती. त्यावर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयाने फाशीला स्थगिती दिली आणि जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशी चर्चा (कौन्सुलर अॅक्सेस) करण्याची मुभा द्यावी, असे आदेश पाकिस्तानला दिले. 
 • त्यानुसार सोमवारी जाधव यांना 'कौन्सुलर अॅक्सेस' मिळाला. जाधव आणि अहलुवालिया यांच्यातील ही भेट एक तास झाली. जाधव यांची भेट घेण्यापूर्वी अहलुवालिया यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते व दक्षिण आशियाविषयक संचालक महंमद फैझल यांची भेट घेतली. याआधी ही भेट दोन ऑगस्टला होणार होती. पण भेटीसाठी पाकिस्तानने अटी घातल्याने ती होऊ शकली नव्हती. 

कर्तारपूर कॉरिडॉरविषयी उद्या चर्चा:-

 • भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रस्तावित कर्तारपूर कॉरिडॉरविषयी बुधवारी उच्चस्तरीय चर्चा होणार आहे, असे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ही बैठक चार सप्टेंबर रोजी होणार असून, अट्टारी येथे ही बैठक होईल. 
 • यामध्ये दोन्ही बाजूंकडून कॉरिडॉर खुला करण्याविषयीच्या कराराच्या मसुद्यावर चर्चा होणार आहे. यावर शुक्रवारी दोन तास बैठक झाली होती आणि त्यामधील तांत्रिक बाबींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
 • पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागातील दक्षिण आशियाविषयक संचालक महंमद फैझल यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे शिष्टमंडळ सहभागी होईल.
   
3 Sep Current Affairs
3 Sep Current Affairs

शेअर बाजार कोसळला

 • जीडीपी दर अपेक्षेपेक्षा कमी; तसंच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीनं सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल ८०० अंकांची घसरण नोंदवली आणि तो ३६,५००वर पोहोचला. 
 • निफ्टीतही २४.४० अंकांची घसरण नोंदवून तो १०७८२.८५ वर पोहोचला. 
 • सुरुवातीच्या सत्रात सकाळी १०.२२ वाजता सेन्सेक्स ४१३.५८ अंकांनी घसरून ३६, ९१९.२१ अंकांवर व्यवहार सुरू होते. निफ्टीतही १२९.३० अंकांची घसरण नोंदवली होती. दरम्यान, उत्पादन क्षेत्रात ऑगस्टमध्ये विक्री घटल्यानं शेअर बाजारात निराशा आहे. 
 • उत्पादन घटल्यानं केलेली गुंतवणूक आणि खर्च यातील नुकसानही अद्याप भरून निघालं नाही. याआधी जूनच्या तिमाहीत जीडीपी दर सहा वर्षांतील निच्चांकीवर पोहोचलं होतं. ऑगस्टमध्ये वाहन विक्रीच्या आकडेवारीमुळं शेअर बाजारात निराशा आहे. 
 • मारुती सुझुकीच्या विक्रीत ३३ टक्क्यांहून अधिक घट झाली. टाटा मोटर्सच्या पेसेंजर वाहनांची विक्रीही ५८ टक्क्यांनी घसरली आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटोच्या वाहन विक्रीतही घट नोंदवली आहे.
   

इलेक्ट्रिक वाहनांच्या अनुदानाला मान्यता

 • केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाइल फोनच्या बॅटरी उत्पादनासाठी अनुदान देण्याच्या निती आयोगाच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे वार्षिक सातशे कोटी रुपये अनुदान देण्याचा हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. 
 • केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एक्स्पेंडिचर फायनान्स कमिटीने देशात ५० गिगावॉट क्षमतेचा बॅटरी निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी निती आयोगाने समोर ठेवलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. 
 • त्यामुळे हा प्रस्ताव आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार असून, डिसेंबरमध्ये निती आयोग त्यासाठी लिलाव पुकारणार आहे. त्यानंतर लगेचच या प्रकल्पाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. 
 • आगामी काळात देशातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प वेगाने उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. २०२२पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निती आयोगाचा मानस आहे. एक अहवालानुसार २०२० ते २०३० या कालावधीत देशात ६०० गिगावॉट क्षमतेच्या बॅटरींची आवश्यकता भासणार आहे. 
 • येत्या काळात देशातील बॅटरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यास बॅटरीच्या किमतीत घट होण्याची शक्यता सरकार बाळगून आहे. सध्या प्रति किलोवॉट बॅटरीसाठी २७६ डॉलरचा (१९,८०० रुपये) खर्च येतो. 
 • हा खर्च ७६ डॉलरपर्यंत (५,४५० रुपये)कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी चार ते पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत घट करून पारंपरिक वाहनांइतक्याच त्यांच्या किमती राखण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. 
 • सध्या देशात उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण किमतीत बॅटरीची किंमत ५० टक्के आहे. 
   
3 Sep Current Affairs
3 Sep Current Affairs

कसोटी रँकिंगमध्ये विराटची घसरण स्मिथ नंबर वन

 • वेस्ट इंडिजविरुद्धच्या जमैका येथील कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला महागात पडलं आहे. 
 • त्यामुळे त्याचा कसोटी क्रमावारीवरही परिणाम झाला असून कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या रँकिंगमध्ये त्याची पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या क्रमवारीत स्मिथ ९०४ गुण मिळवून अव्वल स्थानी असून विराट ९०३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
 • विराटने जमैका कसोटीत पहिल्या डावात ७६ धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात तो केमार रोचकच्या गोलंदाजीवर खातंही न खोलता बाद झाला होता. 
 • त्यामुळे कसोटी क्रमावारीतील त्याचे गुण कमी झाले. तर अॅशेजमध्ये तिसरी कसोटीत खेळू न शकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचा विराटपेक्षा एक अंक वाढल्याने त्याला गोलंदाजांच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळालं आहे. ऑगस्ट २०१८ नंतर तो कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. 
 • डिसेंबर २०१५ पासून ऑगस्ट २०१८पर्यंत स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये सातत्याने अव्वल स्थानी होता. मार्च २०१८मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी दरम्यान चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रकरणात दोषी आढळला. 
 • त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती. मात्र अॅशेस कसोटी मालिकेतून त्याने धडाकेबाज पुनरागमन करत विराटकडून कसोटी क्रमवारीतील नंबर वनचा किताब हिसकावून घेतला आहे. 
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »