4 Nov Current Affairs

4 Nov Current Affairs
4 Nov Current Affairs

अबू धाबी बेटावर लागला जगातील सर्वात प्राचीन ज्ञात नैसर्गिक मोत्याचा शोध

 • अबू धाबीच्या किना .्यापासून काही अंतरावर मारवाह बेटावर नियोलिथिक साइटवर काम करणारे अबू धाबी येथील पुरातत्वशास्त्रज्ञांद्वारे जगातील सर्वात प्राचीन ज्ञात नैसर्गिक मोती सापडला आहे.
 • 'अबू धाबी पर्ल' म्हणून डब केलेले, ते निओलिथिक कालावधीत रेडिओकार्बन दिनांक 5,800–5,600 बीसीई पर्यंतच्या थरांमध्ये आढळले.
 • शोध हा पुरावा आहे की सुमारे 8,000 वर्षांपूर्वी युएईमध्ये मोती आणि ऑयस्टर वापरात होते आणि जगात कोठेही सापडलेल्या मोत्यासाठी पुरातन ज्ञात पुराव्यांचे प्रतिनिधित्व करते.
 • अबू धाबी पर्लच्या शोधापूर्वी, संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात प्राचीन मोती, उम्म अल कायिनमधील नियोलिथिक साइटवरून आला.
 • अमीरात शारजाहमधील जेबेल बुहासजवळील निओलिथिक स्मशानभूमीत प्राचीन मोती देखील सापडले आहेत.

तामिळनाडू कंत्राटी शेतीचा कायदा तयार करणारे पहिले राज्य

 • कत्राटी शेती बाबतचा कायदा तयार करणारे तामिळनाडू हे भारतातले पहिले राज्य ठरले आहे.
 • राज्य सरकारने त्याच्या संदर्भात ‘तामिळनाडू कृषी उत्पन्न व पशुधन कंत्राटी शेती व सेवा (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक-2019’ तयार केला आहे आणि त्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे.
 • या कराराच्या अंतर्गत खरेदीदाराबरोबर करारनाम्याच्या वेळी पूर्वनिर्धारित किंमत ठरवली जाणार, जी उत्पन्न घेतल्यानंतर शेतकर्यांना लागू होणार.
 • हा कायदा मोठ्या प्रमाणात पीक घेताना किंवा चढउतार होणार्या बाजारभावांच्या वेळी मध्यम वर्गातल्या शेतकर्यांचे रक्षण करेल.
 • या कायद्यात कराराचे उल्लंघन करणार्या संस्था किंवा खरेदीदारांसाठी दंड देण्याची तरतूद असून, शेतकर्यांना दिलासा देण्याची तरतूद आहे.
4 Nov Current Affairs
4 Nov Current Affairs

शिव थापा पुजा राणीला सुवर्णपदक

 • टोकियो शहरात सुरु असलेल्या ऑलिम्पिक सराव स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुष गटात भारताच्या शिव थापाने ६३ किलो वजनी गटात तर महिलांमध्ये पुजा राणीने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं आहे.
 • याचसोबत ६९ किलो वजनीगटात भारताच्या आशिषला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
 • ४ वेळा आशियाई खेळांचं विजेतेपद पटकावणाऱ्या शिव थापाने कझाकस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन संताली टोयत्येव वर ५-० ने मात केली.
 • दुसरीकडे पुजा राणीने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.
 • मात्र भारताच्या आशिषला ६९ किलो वजनी गटात जपानच्या सेवॉन ओकाझावाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

नेरूळमध्ये लवकरच भव्य विज्ञान केंद्र

 • नेरूळ येथील वंडर्स पार्कजवळ होणाऱ्या विज्ञान केंद्राच्या नव्या निविदा प्रक्रियेला प्रथमच प्रतिसाद मिळाला आहे. या प्रक्रियेला दोन कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 • विज्ञान केंद्राबरोबरच वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. बंगळूरु आणि पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणेच नवी मुंबईत एक विज्ञान केंद्र तयार करण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी प्रयत्नशील होते. विज्ञान केंद्रासाठी वेगळ्या भूखंडाची मागणी न करता पालिकेने नेरूळ सेक्टर-१९ अ वंडर्स पार्कच्या जमिनीवर हे विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच हजार ९९७ चौरस मीटर क्षेत्रफळावर पालिकेचे विज्ञान केंद्र उभे राहणार आहे. यासाठी ८७ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 • सुरुवातीला पालिकेने या ठिकाणी विज्ञान केंद्र, तसेच व्हिन्टेज कार निर्माण करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जवळजवळ १०७ कोटी खर्चाच्या निविदाही मागविण्यात आल्या होत्या, परंतु दोनदा फेरनिविदा काढल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पालिकेने काढलेल्या नव्या निविदेत विज्ञान केंद्र आणि भव्य सभागृहाची निविदा काढली आहे.

केंद्रात काय?:-

 • विद्यार्थ्यांना आकर्षक तसेच रोजच्या व्यवहारात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो. याची माहिती मिळणार आहे. यासाठी केंद्रात विविध विभाग उभारण्यात येतील.
 • पर्यावरण, जीवन, ऊर्जा, विविध यंत्रे, मानवयंत्र (रोबो), अंतराळ या महत्त्वपूर्ण घटकांचा त्याच्यात अंतर्भाव करण्यात येईल, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.
4 Nov Current Affairs
4 Nov Current Affairs

रेशन दुकानांत मिळणार वह्या पुस्तके

 • सरकारने आता रेशन दुकानांत स्टेशनरी तसेच शाळांसाठी उपयोगी साहित्य विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वह्या, पुस्तके, रजिस्टर अशा स्टेशनरी वस्तू रेशन दुकानांत उपलब्ध होणार आहेत.
 • राज्यातील रेशन दुकानांतून केरोसीन, साखर, तांदूळ या जीवनावश्यक वस्तूंसह ताजा भाजीपाला, कडधान्ये, गूळ, शेंगदाणे, रवा यांसारख्या वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय सरकारने याआधीच घेतला आहे.
 • या वस्तूंचे वितरण आणि विक्रीसाठी मिळणारे कमिशन याबाबत स्वस्त धान्य दुकानदार घाऊक विक्रेत्यांशी वेगळा व्यवहार करू शकतील.
 • हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात राहील. यात शासनाचा कोणताही सहभाग राहणार नाही, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा 2019

 • शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याच्या (एसआयबीएफ) 2019 च्या 38 व्या आवृत्तीचे उद्घाटन
 • जत्रेत 77 देशांचे सुमारे 1800 प्रदर्शक सहभागी होत आहेत.
 • या जत्रेत वैज्ञानिक, ज्ञान आणि साहित्यिक विषय असलेल्या 987 उपक्रमांचे प्रदर्शन केले जाईल.
 • यावर्षीच्या पुस्तक जत्रेत शारजाह वर्ल्ड बुक कॅपिटल (एसडब्ल्यूबीसी) थीम, 'ओपन बुक्स ओपन माइंड्स' देण्यात येणार आहे, ज्यायोगे पुस्तके वाचण्यास आणि वयोगटातील लोकांना आणि समुदायांना वाचण्यास प्रोत्साहित केले जाईल.
 • एसआयबीएफच्या 38 व्या आवृत्तीत मेक्सिकन रिपब्लिकची पाहुणे म्हणून घोषणा केली गेली.
 • शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा हा वार्षिक कार्यक्रम असून तो 11 दिवस चालतो.
4 Nov Current Affairs
4 Nov Current Affairs

सायबर गुन्ह्यांत महाराष्ट्र दुसरा

 • उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात करण्यात आल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ मधील आकडेवारीवरून समोर आले आहे.
 • महाराष्ट्रात २०१७ मध्ये ३६०४ आणि २०१६ मध्ये २३८० सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. उत्तर प्रदेशात याच वर्षांत अनुक्रमे ४९७१ आणि २६३९ सायबर गुन्हे नोंदवण्यात आले.
 • महाराष्ट्रात मागील सहा वर्षांत दाखल झालेल्या १० हजार ४१९ सायबर गुन्ह्यांमधील ७० टक्के प्रकरणांचा गुंता अद्याप सुटलेला नाही.
 • सर्वात गंभीर बाब म्हणजे केवळ ०.३ टक्के गुन्ह्यांमध्येच दोषींना शिक्षा झाली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत राज्यात १० हजार ४१९ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले.
 • राज्यात सहा वर्षांत माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत (२०००) एकूण १६७ विशेष गुन्हे (एसएलपी) दाखल करण्यात आले. त्यातील एकाही गुन्ह्यात दोषीला शिक्षा झालेली नाही. त्याशिवाय भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यातील कलमे लावून दाखल झालेल्या ७४९४ गुन्ह्यांपैकी केवळ ३० प्रकरणांत दोषींना शिक्षा झाली आहे.

मुंबईचा देशात दुसरा क्रमांक:-

 • देशातील मोठ्या शहरांचा विचार केल्यास, २०१७ मध्ये बंगळूरुनंतर मुंबईत सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे, मुंबईत दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे.
 • मुंबईत २०१५ मध्ये ९७९ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, २०१६ मध्ये फक्त एका सायबर गुन्ह्याची भर पडून हा आकडा ९८० झाला. परंतु, २०१७ मध्ये १३६२ सायबर गुन्हे दाखल झाले.
 • २०१७ मध्ये देशातील लैंगिक शोषणाचे सर्वाधिक म्हणजे २०४ गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आले.

आंबेडकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. महेंद्र भवरे यांची निवड

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने 14 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे
आयोजन 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य इतिहासकर डॉ. महेंद्र भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी:-

 1. वामनदादा कर्डक,
 2. बाबुराव बागूल,
 3. डॉ. गंगाधर पानतावणे,
 4. राजा ढाले,
 5. अविनाश डोळस,
 6. यशवंत मनोहर,
 7. रावसाहेब कसबे,
 8. उत्तम कांबळे

अशा दिग्गजांनी या संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.
डॉ. भवरे हे मुंबई विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत. कवी, समीक्षक, संशोधक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
'चिंताक्रांत मुलुखाचे रुदन', 'महासत्तेचे पीडादान' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
'दलित कवितेतील नवे प्रवाह', 'मराठी कवितेच्या नव्या दिशा', 'दलित कविता आणि प्रतिमा' हे समीक्षाग्रंथ बहुचर्चित ठरले. 'प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास' या ग्रंथाच्या संपादनासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी वाङमयेतिहासाच्या आठ पुस्तकांचे संपादन केले आहे.
अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांचा 'मराठी दलित कवितेचा इतिहास' हा बृहद ग्रंथ प्रकाशित केला आहे.


त्यांच्या कार्यासाठी:-

 • महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कारासह
 • अनुष्टुभ प्रतिष्ठानचा विभावरी पाटील पुरस्कार,
 • मुंबई मराठी साहित्य संघाचा समीक्षक पुरस्कार,
 • प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार,
 • विखे पाटील पुरस्कार,
 • शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार,
 • कविता राजधानी,
 • नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार,
 • वामनदादा कर्डक जागृती पुरस्कार

अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

4 Nov Current Affairs
4 Nov Current Affairs

आदित्य मिश्रा भारतीय भूबंदरे प्राधिकरणाचे नवे अध्यक्ष

 • ज्येष्ठ IPS अधिकारी आदित्य मिश्रा ह्यांची भारतीय भू-बंदरे प्राधिकरणाच्या (LPAI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • पदभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या मुदतीसाठी त्यांची ही नेमणूक केली गेली आहे.
 • आदित्य मिश्रा ह्यांच्या या नियुक्तीस मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आणि त्याच्या संबंधी घोषणा कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
 • आदित्य मिश्रा हे उत्तरप्रदेश संवर्गातले 1989 सालाचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत.

भारतीय भू-बंदरे प्राधिकरण (LPAI) विषयी:-

 • भारतीय भू-बंदरे प्राधिकरण (Land Ports Authority of India -LPAI) ही एक वैधानिक संस्था आहे जी गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते.
 • हे भारताच्या संपूर्ण सीमेवर असलेल्या अनेक एकात्मिक तपास नाक्यांचे व्यवस्थापन करते.
 • संस्थेची स्थापना 01 मार्च 2012 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
 • ही भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रवाशांच्या आणि वस्तूंच्या सीमा-वाहतुकीच्या सुविधांचा विकास, स्वच्छता आणि व्यवस्थापन करते.
 • भारताच्या सीमेवर भू-बंदरे तयार करणे, मालवाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक सुरक्षितपणे, अखंडपणे आणि कार्यक्षम प्रणाली उपलब्ध करून देणे, तपासणीसाठी थांबण्याचा वेळ आणि व्यापारातला खर्च कमी करणे
 • तसेच प्रादेशिक व्यापार, लोकांमधला संपर्क यांना प्रोत्साहन देणे आणि सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धती आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे ही या संस्थेची कार्ये आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »