4 Oct Current Affairs

4 Oct Current Affairs
4 Oct Current Affairs

कर्नाटकातही एनआरसीचा विचार

 • 'कर्नाटक राज्यात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) लागू करण्याच्या विचारात आहे,' गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
 • 'संपूर्ण देशभरातच 'एनआरसी' लागू करण्याचा विचार सुरू आहे. कर्नाटकमध्ये अनेक स्थलांतरित आहेत.
 • केंद्रीय गृह मंत्रालयाशी चर्चा करूनच या विषयी निर्णय घेतला जाईल,' असे बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'बेंगळुरू आणि इतर मोठ्या शहरांत परदेशी नागरिक येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्यापैकी काहींचा विविध गुन्ह्यांशी संबंध असून, काही जणांना अटकही करण्यात आली आहे. याच आठवड्यात यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 • 'एनआरसी'ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बेकायदा प्रवाशांना कायदेशीर पद्धतीने देशाबाहेर काढले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच सांगितले. पश्चिम बंगालमध्ये सरकारने, या राज्यात 'एनआरसी' लागू करण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले.
 • राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आसाममध्ये राबवण्यात आली असून, त्यात १९ लाख जणांची नावे अंतिम यादीतून वगळण्यात आली आहेत.

निजामाच्या संपत्तीचे १०२ वारस

 • हैदराबादच्या निजामाची, लंडनमधील बॅँकेत असलेल्या तीन अब्ज आठ कोटी ४० लाख रुपयांतून वाटा मिळविण्यासाठी, निजामाचे १०२ वारसदार उत्सुक आहेत. अपवाद वगळता बहुसंख्य वारसदार गरिबीत असून त्यांना पैशांची प्रतीक्षा आहे.
 • ब्रिटनमधील न्यायालयाने या पैशाच्या खटल्यात भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. फाळणीदरम्यान निजामाने लंडनमधील एका बँकेत ठेवलेल्या पैशांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये हा खटला सुरू होता. या पैशांवर भारत आणि निजामाच्या वंशजांचा अधिकार असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याने १०२ वारस पुढे आले आहेत.
 • निजामाने फाळणीदरम्यान लंडनस्थित नेटवेस्ट बँकेत आठ कोटी ८७ लाख रुपये जमा केले होते. या रकमेत वाढ होऊन आता ती तीन अब्ज आठ कोटी ४० लाख रुपये इतकी झाली आहे.
 • निजामाचे वंशज राजपुत्र मुकर्रम आणि त्यांचे छोटे बंधू मुफ्फखम यांच्यासह १०२ जणांना त्यात वाटा मिळेल, अशी चिन्हे आहेत.
 • निजामाचे आणखी एक नातू नजाफ अली खान यांनीही या खटल्यात बाजू लढविली होती.
 • ते निजाम फॅमिली वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. संबंधित वंशज आणि भारत सरकारमध्ये एक गुप्त करार होऊन त्यात नेमका वाटा किती असेल ते स्पष्ट करण्यात आले आहे.
 • दरम्यान, वाटे स्पष्ट करणारा मसुदा आपल्याला दाखवून मंजूर करून घ्यावा लागेल असे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी म्हटले आहे.
4 Oct Current Affairs
4 Oct Current Affairs

वंदे भारत मधून स्वदेशी चे स्वप्न साकार

 • 'राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अलौकिक पुरुष होते. त्यांनी जगभरातील लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला.
 • राष्ट्रपित्याचे 'स्वदेशी'चे उद्दिष्ट 'वंदे भारत एक्स्प्रेस'मधून साकारले आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले.
 • ही एक्स्प्रेस पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.
 • नवी दिल्ली ते जम्मू-काश्मीरमधील कटरापर्यंत जाणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला शहा यांनी हिरवा कंदील दाखवला.
 • गांधीजींना स्वातंत्र्य चळवळीमधील नेता बनविण्यामध्ये त्यांनी केलेल्या रेल्वे प्रवासाची त्यात मोठी भूमिका होती, असेही त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांनी कुठलेही मोठे भाषण दिले नाही. कुठलेही मोठे तत्त्वज्ञान न देता त्यांच्या कामांतून त्यांनी समाजाला दिशा दिली. गांधीजींनी स्वदेशीचा मंत्र दिला. स्वातंत्र्य चळवळीत त्याने मोठी भूमिका निभावली. दिल्लीपासून कटरापर्यंत जाणारी रेल्वे पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.
 • गांधीजींच्या आयुष्यामधील रेल्वेचे स्थान विषद करताना शहा यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढल्याचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, 'भारतामध्ये ही घटना घडली नसली, तरी या घटनेमुळे मोहनदास हे महात्मा झाले. गांधीजींची तत्त्वे पाळण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. देशातील तरुणांमध्ये गांधीजींनी दिलेल्या संदेशाचा आपल्याला प्रसार करायचा आहे.'

'आध्यात्मिक पर्यटन वाढेल':-

 • दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस ही वैष्णोदेवीच्या भाविकांसाठी नवरात्रीची भेट आहे. काश्मीरपर्यंतचा भाग रेल्वेने १५ ऑगस्ट २०२२पर्यंत जोडला जाईल. कटरा ते बनिहारपर्यंतच्या भागात लवकरच रेल्वे ट्रॅक बांधले जातील. चिनाब पुलावरील कामही सुरू आहे. यापूर्वी दहशतवादी कारवायांमुळे कामामध्ये अडथळा येत होता.
 • अनुच्छेद ३७० हा जम्मू व काश्मीरच्या विकासातील अडथळा होता आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाचा प्रवास सुरू होईल. येत्या दहा वर्षांमध्ये जम्मू व काश्मीर हा देशाच्या सर्वाधिक विकसित भागांपैकी एक राहील आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या सोबतीने विकासाचा प्रवासही सुरू झाला आहे. या गाडीमुळे विकासाला, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
 • वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दिल्ली व कटरा यांच्यातील प्रवासाचा वेळ फक्त आठ तासांवर येण्याची शक्यता आहे.
 • २२४३९ वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ६ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि दुपारी २ वाजता कटरा येथे पोहचेल.
 • परतीच्या प्रवासात, २२४४० वंदे भारत एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता कटरा स्थानकावरून सुटून रात्री ११ वाजता नवी दिल्ली स्थानकावर पोहचेल. या गाडीला अंबाला छावणी, लुधियाना व जम्मू तावी या स्थानकांवर प्रत्येकी दोन मिनिटांचा थांबा असेल. ही ‘ट्रेन १८’ मंगळवार वगळता आठवडय़ाच्या सर्व दिवशी धावेल.

 

रेपो दरात पुन्हा घट

 • सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली आहे. कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
 • RBI ने शुक्रवारी आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी घट केली. हा दर आता ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्के एवढा करण्यात आला आहे. ही घट २५ बेसिस पॉइंट्स इतकी आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे २०१० नंतरचा हा सर्वात कमी रेपो दर आहे.
 • रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरातही बदल केला आहे. रिव्हर्स रेपो रेट आता ४.९० टक्के झाला आहे आणि बँक रेट ५.४० टक्के झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने २०१९ मध्ये रेपो दरात केलेली ही सलग पाचवी कपात आहे. या कपातीमुळे गृह आणि वाहन कर्जदरात घट होणार आहे. त्याच लाभ सर्वसामान्यांना होणार आहे.

काय असतो रेपो रेट?:-

 • बँकांना आपल्या दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. या रकमेची आवश्यकता एका दिवसापेक्षा अधिक काळासाठी नसते. अशा वेळी बँकासमोर हा पर्याय असतो की त्यांच्या केंद्रीय बँकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बँकेकडून रात्रभरासाठी कर्ज घेणे. अशा अल्पमुदतीच्या कर्जासाठी बँकांना आरबीआयला व्याज द्यावं लागतं. या दराला रेपो रेट म्हणतात.

काय असतो रिव्हर्स रेपो रेट?:-

 • बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

जीडीपी अनुमान:-

 • केंद्रीय बँकेने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी जीडीपी आउटलुकही रिवाइज करून ६.१ टक्के केला आहे. आधी तो ६.९ टक्के आहे.

 

4 Oct Current Affairs
4 Oct Current Affairs

मयांक अगरवालचे द्विशतक

 • आपला दर्जा दाखवून देत मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीत गुरुवारी शानदार द्विशतक ठोकले. रोहित शर्माला मात्र द्विशतकी मजल मारता आली नाही. भारताने पहिला डाव ७ बाद ५०२ धावांवर सोडला. अखेरच्या सत्रात खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना मदत मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद ३९ अशी स्थिती करून कसोटीवर दुसऱ्या दिवशीही वर्चस्व राखले. दक्षिण आफ्रिका अद्याप ४६३ धावांनी पिछाडीवर आहे. अनुभवी अश्विनने दोन, तर जाडेजाने एक विकेट टिपला आहे.
 • गुरुवारी रोहित आणि मयांकने बिनबाद २०२ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. सकाळच्या सत्राच्या सुरुवातीलाच रोहितला जीवदान मिळाले. फिलँडरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकने त्याचा झेल सोडला. यावेळी रोहित १२५ धावांवर खेळत होता. हा अपवाद वगळता मयांक-रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. रोहितने आक्रमक खेळ केला. मात्र, ८२व्या षटकात केशव महाराजच्या आधीच्या दोन चेंडूंवर सलग एक षटकार व एक चौकार लगावल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रोहित चुकला. यष्टीमागे क्विंटन डीकॉकने थोडीही चूक न करता त्याला यष्टिचीत केले.
 • रोहितने पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मैदान सोडले. यावेळी मैदानावरील सर्व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. रोहित गेल्या वर्षानंतर प्रथमच कसोटी सामना खेळत होता. त्याने २४४ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकारांसह १७६ धावा केल्या. रोहित-मयांकने ३१७ धावांची विक्रमी भागीदारी केली. उपाहारापर्यंत भारताने १ बाद ३२४ धावा केल्या होत्या. उपाहारानंतर पहिल्याच चेंडूवर फिलँडरने पुजाराचा त्रिफळा उडविला.
 • यानंतर मयांकने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने विराट कोहलीसह चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पदार्पणाची कसोटी खेळत असलेल्या मुथूस्वामीने स्वत:च्या गोलंदाजीवर कोहलीला झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर मयांकने अजिंक्य रहाणेला साथीला घेत आणखी ५४ धावांची भर घातली. यात रहाणेचा वाटा १५ धावांचा होता. केशव महाराजने रहाणेला बाद केले. दरम्यान, मयांकने आपल्या पहिल्या शतकाचे रुपांतर द्विशतकात केले. आपल्या या शानदार खेळीतील पहिल्या १०० धावा मयांकने २०४ चेंडूंत, तर दुसऱ्या शंभर धावा १५४ चेंडूंत पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डुप्लेसिसने डीन एल्गरच्या हाती चेंडू सोपविला.
 • कामचलाऊ एल्गरने मयांकला बाद करून आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले. पिटने त्याचा अप्रतिम झेल टिपला. मयांकने ३७१ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकारांसह २१५ धावा केल्या. यानंतर हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा यांनाही मोठी खेळी करता आली नाही. पाचशे धावांचा टप्पा ओलांडताच कर्णधार कोहलीने भारताचा डाव सोडला. यावेळी जाडेजा ३० धावांवर खेळत होता.
 • प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गर आणि मार्करम यांनी सावध सुरुवात केली. मात्र, डावाच्या आठव्या षटकात अश्विनच्या ‘ऑफ-ब्रेक’ने मार्करमचा त्रिफळा उडविला. यानंतर अश्विनने डी ब्रूयनला साहाकरवी झेलबाद केले. पाठोपाठ जाडेजाने डॅनी पिटचा त्रिफळा उडवून भारताला तिसरे यश मिळवून दिले. यात षटकात बवुमाला हनुमा विहारीकडून जीवदान मिळाले. बवुमाने खातेही उघडले नव्हते.
 • स्कोअरबोर्डः भारत १३६ षटकांत ७ बाद ५०२ डाव सोडला (मयांक २१५, रोहित १७६, पुजारा ६, कोहली २०, रहाणे १५, जाडेजा नाबाद ३०, विहारी १०, साहा २१, अश्विन नाबाद १; फिलँडर २२-४-६८-१, महाराज ५५-६-१८९-३, पिट १९-१-१०७-१, मुथूस्वामी १५-१-६३-१, एल्गर १-०-४-१) वि. दक्षिण आफ्रिका २० षटकांत ३ बाद ३९ (एल्गर खेळत आहे २७; इशांत २-०-८-०, शमी २-२-०-०, अश्विन ८-४-९-२, जाडेजा ८-१-२१-१).
 • ४ भारताकडून चार फलंदाजांनी कसोटीतील पहिल्यावहिल्या शतकाचे रुपांतर द्विशतकात केले आहे. मयांक अगरवालच्या आधी अशी कामगिरी दिलीप सरदेसाई (२००*), विनोद कांबळी (२२४), करुण नायर (३०३*) यांनी केली आहे.
 • ३१७ रोहित-मयांकने ३१७ धावांची सलामी दिली. कसोटीतील ही भारताकडून तिसरी सर्वोच्च सलामी ठरली.
 • याआधी १९५६मध्ये विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी न्यूझीलंडविरुद्ध ४१३, तर २००६मध्ये सेहवाग-द्रविडने पाकिस्तानविरुद्ध ४१० धावांची सलामी दिली होती.
 • ३१७ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही भारताची कुठल्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. या आधी २००८मध्ये चेन्नईत सेहवाग-द्रविडने दुसऱ्या विकेटसाठी २६८ धावांची भागीदारी केली होती. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धविरुद्ध यापूर्वीची भारताची सर्वोत्तम सलामी २१८ धावांची होती. २००४मध्ये सेहवाग-गौतमने ही भागीदारी रचली होती.

'हा' चमत्कार करणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय फलंदाज:-

 • भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा यानं सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकून नवा विक्रम रचला आहे. एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा रोहित शर्मा हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे स्कोअरकार्ड:-

 • जगभरात आतापर्यंत सात फलंदाजांनी ही किमया केली आहे. एकाही भारतीय फलंदाजाला आजपर्यंत ही कामगिरी करता आली नव्हती. रोहितनं ही कामगिरी करत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
 • रोहित शर्मा हा एकदिवसीय व टी-२० क्रिकेटसाठी उत्तम फलंदाज मानला जातो. कसोटीमध्ये त्याला अद्याप फारसं यश मिळालं नव्हतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून त्यानं हे अपयश धुवून काढण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
 • एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितनं आतापर्यंत २७ शतकं ठोकली आहेत. त्यातील तब्बल २५ शतकं त्यानं सलामीला येऊन केली आहेत. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्यानं सलामीला खेळताना चार शतकं ठोकली आहेत. हा एक विश्वविक्रम आहे.

तिन्ही प्रकारामध्ये शतकं ठोकणारे सलामीवीर:-

 • क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं ठोकणाऱ्यांमध्ये रोहितसह वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कलम, मार्टिन गप्टिल, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, पाकिस्तानचा अहमद शहजाद, ऑस्ट्रेलियाचे शेन वॉटसन आणि बांगलादेशचा तमीम इकबाल यांचा समावेश आहे. गेल यांनी सलामीवीर म्हणून कसोटीत १५, एकदिवसीय सामन्यात २५ आणि टी-२० मध्ये दोन शतकं ठोकली आहेत.

सर जाडेजा भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत

 • विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारताला चांगलच झुंजवलं आहे. ५०२ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली, मात्र सलामीवीर डीन एल्गरच्या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने फॉलोऑनची नामुष्की टाळली. एल्गरने १६० धावांची खेळी करत आफ्रिकेची बाजू भक्कम करण्यात महत्वाचा वाटा उचलला. त्याला कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि क्विंटन डी-कॉकने चांगली साथ दिली.
 • अखेरीस रविंद्र जाडेजाने एल्गरला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत आपलं स्थान मिळवलं आहे. डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीत सर्वात जलद २०० बळींचा टप्पा गाठणारा जाडेजा पहिला गोलंदाज ठरला आहे.
 • डीन एल्गर हा रविंद्र जाडेजाचा कसोटी क्रिकेटमधला २०० वा बळी ठरला आहे. आतापर्यंत फक्त १० भारतीय गोलंदाजांनाच ही कामगिरी करता आलेली आहे. रविंद्र जाडेजाने आपल्या ४४ व्या कसोटीमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. या यादीमध्ये रविंद्र जाडेजा इतर गोलंदाजांच्या मागे असला तरीही त्याने कमी कसोटींमध्ये हा पल्ला गाठल्यामुळे आगामी काळात तो अनेक दिग्गजांना मागे टाकू शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारताचे १० गोलंदाज:–

 1. अनिल कुंबळे – ६१९ बळी
 2. कपिल देव – ४३४ बळी
 3. हरभजन सिंह – ४१७ बळी
 4. रविचंद्रन आश्विन – ३४५ बळी
 5. झहीर खान – ३११ बळी
 6. इशांत शर्मा – २७९ बळी
 7. बिशनसिंह बेदी – २६६ बळी
 8. जवागल श्रीनाथ – २३६ बळी
 9. रविंद्र जाडेजा – २०० बळी*
 • दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत फॉलोऑनचा धोका टाळला आहे. त्यामुळे पहिली कसोटी अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे.
4 Oct Current Affairs
4 Oct Current Affairs

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा ब्रिटनच्या अ‍ॅशरने सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवला

 • ब्रिटनची महिला धावपटू दिना अ‍ॅशर-स्मिथने बुधवारी मध्यरात्री जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
 • देशाला २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देणारी ती पहिलीच धावपटू ठरली आहे.
 • खलिफा स्टेडियमवर झालेल्या या शर्यतीत २३ वर्षीय अ‍ॅशर-स्मिथने २०० मी. अंतर २१.८८ सेकंदांत गाठले.
 • गेल्या ३६ वर्षांत ब्रिटनच्या एकाही महिला धावपटूला जागतिक स्पर्धेतील १०० अथवा २०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकता आलेले नव्हते, परंतु अ‍ॅशर-स्मिथने हा पराक्रम करण्याची किमया साधली. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
 • अमेरिकेची ब्रिटनी ब्राऊन (२२.२२) आणि स्वित्झर्लंडची मुजिंगा काम्बुनदिज (२२.५१) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.
 • ‘‘जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे माझे स्वप्न आज पूर्ण झाले. मला माझ्या भावना शब्दांत मांडता येणे कठीण आहे.
 • आयुष्यभर केलेल्या अथक परिश्रमांचे फळ प्राप्त झाले आहे,’’ असे अ‍ॅशर-स्मिथ म्हणाली.

गतविजेत्या मॅक्लॉइडवर होलोवेची सरशी :-

 • अमेरिकेचा धावपटू ग्रँट होलोवेने बुधवारी रात्री ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि गतविजेत्या ओमर मॅक्लॉइडला पिछाडीवर टाकून पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले.
 • होलोवेने विजयी अंतर १३.१० सेकंदांत गाठले. दुसरीकडे मॅक्लॉइड शर्यत अंतिम टप्प्यात पोहोचलेली असताना खाली पडल्याने त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 • सर्जे शुबेन्कोव्हने रौप्य, तर पॅस्कल मार्टिनने कांस्यपदक मिळवले.

IMF पेक्षा पाकिस्तानवर चीनचं अधिक कर्ज

बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट संकटात आला

 • कायमच पाकिस्तान चीनला आपला मित्र म्हणत आला आहे. परंतु पाकिस्तान चीनच्याच कर्जात बुडाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
 • आएएमएफने दिलेल्या कर्जापेक्षाही चीनकडून पाकिस्तानने दुप्पट कर्ज घेतलं आहे.
 • सध्या पाकिस्तानसमोर आर्थिक संकट उभं असून त्यांच्यावर असलेला चीनचा कर्जाचा बोजाही दिवसागणिक वाढत चालला आहे. तसंच त्यांच्यावरील परकीय चलनाचंही संकट वाढलं आहे.
 • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आयएमएफने 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहे.
 • सध्या पाकिस्तावर असलेल्या इतर कर्जापोटी त्यांना 2.8 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आपला मित्र चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे.
 • त्यामुळे पाकिस्तावरील संकटात वाढ झाली आहे. तर आयएमएफने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला 2022 पर्यंत चीनकडून घेतलेल्या 6.7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे.
 • बेल्ट अँड रोड प्रकल्पाची सुरूवात केल्यानंतर पाकिस्तावरील कर्जात वाढ झाल्याची माहिती कराचीतील ऑप्टिमस कॅपिटल मॅनेजमेंटच्या हाफिज फैयाज अहमद यांनी सांगितलं.
 • पाकिस्तानने घेतलेल्या कर्जात वाढ होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान कर्ज घेत आहे. त्यामुळेच तो कर्जाच्या कचाट्यात सापडला असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

4 Oct Current Affairs
4 Oct Current Affairs

भारताने डोकलामपर्यंत बांधला नवा रस्ता चीन बरोबरचं लष्करी समीकरण बदलणार

 • भारताच्या सीमा रस्ते विभागाने डोकलामपर्यंत जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची बांधणी केली आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलाला आता सहजतेने डोकलाम खोऱ्यात प्रवेश करता येईल. दोन वर्षांपूर्वी २०१७ साली भारत, चीन आणि भूतानची सीमा जिथे मिळते त्या डोकलाममध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. भारत आणि चीनचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते.
 • ७३ दिवसानंतर या संघर्षावर तोडगा निघाला. आता डोकलामपर्यंत जाण्यासाठी सीमा रस्ते विभागाने पर्यायी रस्त्याची बांधणी केली आहे. यामुळे या भागातील लष्करी समीकरणांमध्ये मोठया प्रमाणात बदल होणार आहे. २०१७ साली पर्यायी मार्ग नसल्यामुळे भारतीय लष्कराला एकाच मार्गावरुन ट्रायजंक्शनवर पोहोचावे लागले होते. डोकलाममध्ये सैन्य तैनातीला विलंब लागला होता.
 • आता संघर्षाची स्थिती उदभवल्यास पर्यायी मार्गामुळे भारताला जलदगतीने हालचाली करता येतील. प्रवासाचा वेळ वाचेल त्याशिवाय तैनातीही वेगाने करता येईल. चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने १६ जून २०१७ साली डोकलाममध्ये घुसून तिथे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली.
 • चीनने कुठलेही बांधकाम करु नये यासाठी भारताने आपले सैन्य तिथे तैनात केले. चीन बांधकाम करुन भारत आणि भूतान बरोबरच्या कराराचे उल्लंघन करत होता. २८ ऑगस्ट २०१७ रोजी या वादावर तोडगा निघाला. बीआरओने भारत-चीन सीमेवर रणनितीक दृष्टीने महत्वाचे ३३४६ किलोमीटरचे ६१ रस्ते बांधले आहेत.

चीनने दाखवली लष्करी ताकत:-

 • चीनने सैन्य ताकतीचे प्रदर्शन केल्यानंतर आता भारत अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपच्या डोंगराळ भागातील युद्ध क्षमतेची चाचपणी करणार आहे. चीनने त्यांच्या ७० व्या वार्षिक परेड दरम्यान बॉम्बर, फायटर जेट, सुपरसॉनिक ड्रोन आणि डाँगफेंग-४१ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ताकत दाखवून दिली.
 • चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेपासून काही अंतरावर ‘हिम विजय’ युद्धसरावाची तयारी सुरु आहे.
 • ‘हिम विजय’मधून १७ व्या ब्रह्मास्त्र कॉर्प्सला शत्रूवर सफाईदारपणे हल्ला करण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. १७ कॉर्प्समधून तीन आयबीजी वेगळे काढण्यात येणार असून प्रत्येक आयबीजीमध्ये ५ हजार सैनिक आहेत.

 

स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ

 • भारतातील स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी भारताचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे हे यश असून त्याची दाखल आता जागतीक स्तरावरही घेण्यात आली आहे.
 • निती आयोगाने तयार केलेल्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकातून (एसईक्यूआय) ही बाब समोर आली आहे. या माहितीच्या आधारे संयुक्त राष्ट्रांच्या भारतातील कार्यालयाकडून याबाबत ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये म्हटले की, मासिक पाळी सुरु असलेल्या महिला आणि विद्यार्थीना आपल्या शाळांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने या काळात घरीच रहावे लागत होते. मात्र, भारताच्या स्वच्छता क्रांतीमुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. स्वच्छ भारत उपक्रमामुळे स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत आता ९८ टक्के वाढ झाली आहे.
 • एसईक्यूआयनुसार, देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९५ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत.
 • २०१६-१७ च्या अहवालानुसार आसाम आणि मेघालयमध्ये अनुक्रमे ८३.४० आणि ८४.१० टक्के सर्वात कमी प्रमाणावर मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध होती. दरम्यान, बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मागील वर्षाच्या तुलनेत समान माहिती नोंदविली तर सिक्कीम आणि नागालँडमध्ये घट नोंदली गेली.
 • केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांची टक्केवारी १०० टक्के, मोठ्या राज्यांमध्ये ९७.६० आणि छोट्या राज्यांमध्ये ९६.७० टक्के होती. २०१६-१७ मध्ये हिमाचल प्रदेशने हे टार्गेट १०० टक्के पूर्ण केले होते.
 • तर गुजरात राज्याने गेल्या वर्षी हे टार्गेट पूर्ण केले. तर २०१६-१७ मध्ये तामिळनाडू आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये अनुक्रमे ९९.९० टक्के आणि ९९.८० टक्के प्रमाण होते. केंद्रशासित प्रदेशांमध्ये १०० टार्गेट पूर्ण झाले होते.
4 Oct Current Affairs
4 Oct Current Affairs

एफई बेस्ट बँक्स पुरस्काराने निपुणतेचा सन्मान

 • बँक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सोबती यांना एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’द्वारे  सोमवारी आयोजित सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • तर बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांना ‘बँकर ऑफ द इयर’ने गौरविण्यात आले.
 • देशाच्या बँक, वित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजले जाणाऱ्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे वितरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका उपस्थित होते.
 • ‘एजीएस’ प्रस्तुत, रुणवाल व केसरी सहयोगी भागीदार असलेल्या तसेच ईवाय हे ‘नॉलेज प्रोव्हायडर’ असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात विविध गटात बँक, वित्त तसेच सेवा उत्पादन, तंत्रस्नेही वित्तीय मंचांना सन्मानित करण्यात आले.
 • रमेश सोबती हे जीवनगौरव पुरस्काराचे तर बजाज समूहातील बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे ‘बँकर ऑफ द इयर’चे मानकरी ठरले. राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व विदेशी बँक गटात अनुक्रमे इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि एचएसबीसी बँक विजेत्या ठरल्या.
 • इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही लहान वित्त बँकांच्या गटातील तर बजाज फायनान्स व क्रेडिटएक्सेस ग्रामीण हे गैर बँकिंग वित्त कंपनी गटात अव्वल ठरले. गृह कर्ज उत्पादन श्रेणीत स्टेट बँक, बचत उत्पादन श्रेणीत कोटक महिंद्र बँक सर्वोत्कृष्टतेच्या मानकरी ठरल्या.
 • तंत्रस्नेही वित्तीय मंचांच्या गटात (डिजिटल बँक) अ‍ॅक्सिस बँक व (फिनटेक) रेझरपे, क्रेडिटविद्या, लोन फ्रेम, अ‍ॅको जनरल इन्शुरन्स, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) हे पुरस्कारपात्र ठरले.

महाराष्ट्र बिहारनंतर राजस्थानात तंबाखू बंदी

 • राजस्थान सरकारकडून महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यात मॅग्नेशियम कार्बोनेट, निकोटीन, तंबाखूसह मिनरल तेल युक्त पान मसाला आणि सुगंधी सुपारीच्या उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर बंदी घातल्याची घोषणा करण्यात आली.
 • याप्रकारच्या बंदीमुळे महाराष्ट्र आणि बिहारनंतर राजस्थान देशातील तिसरे राज्य ठरले आहे.  
 • तरुणांना नशेपासून राखण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
 • अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत या सर्व उत्पादनांवर पूर्णतः बंदी राहणार आहे.
 • यापूर्वीच्या सरकारकडून ई-सिगारेट आणि हुक्का बारवर बंदी घालण्यात आली होती.
 • अशा प्रकारच्या घातक उत्पादनांच्या विक्रीला नियंत्रित करणे तसेच मालाची चोरून विक्री होण्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृती योजना बनविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
4 Oct Current Affairs
4 Oct Current Affairs

विजय पाटील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत बिनविरोध अध्यक्ष

 • मबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी डी.वाय. पाटील स्पोर्टस अकॅडमीचे विजय पाटील हेच बिनविरोध निवडून येणार हे निश्चित झाले आहे. उपाध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेले आणि मुंबई क्रिकेटसाठी अनोळखी असलेले अमोल काळे यांचीही निवड निश्चित मानली जात आहे.
 • बाळ महाडदळकर आणि युनायटेड फॉर चेंज अशी दोन पॅनल या निवडणुकीसाठी आमनेसामने असली तरी या यादीत विजय पाटील आणि अमोल काळे हे समान उमेदवार आहेत.
 • महाडदळकर गटातून संजय नाईक यांनी चिटणीस पदासाठी अर्ज केला आहे तर शाहआलम शेख हे संयुक्त सचिव पदासाठी लढणार आहेत.
 • यनायटेड फॉर चेंज पॅनलमधून चिटणीस पदासाठी मुंबई क्रिकेटमध्ये बराच काळ वावरलेले नदीम मेमन उभे आहेत तर संयुक्त सचिवपदासाठी संगम लाड यांनी अर्ज दाखल केला आहे.
 • खजिनदार म्हणून एमसीएचे पूर्वाश्रमीचे खजिनदार मयांक खांडवाला पुन्हा एकदा या पदासाठी इच्छुक आहेत.

जागतिक अंतराळ सप्ताह 2019

 • जगभरात दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.

2019 संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स”

 • कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.
 • कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, उपग्रहांचे नमुने, चित्रफिती आणि भारतीय अंतराळ मोहिमांविषयी चर्चा अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

पार्श्वभूमी:-

 • 4 ऑक्टोबर 1957 या तारखेला सोव्हिएत संघाकडून ‘स्पुतनिक 1’ नावाचा कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित करण्यात आला होता, तर 10 ऑक्टोबर 1967 रोजी सर्व देशांनी एकत्र येऊन अंतराळनिगडित विविध विषयांवर जागतिक करार (Outer Space Treaty) केला.
 • अतराळाचा मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचे जीवन सुखकारक करण्यासाठी वापर करावा, हा उद्देश यामागे होता.
 • तयामुळे या दोन्ही तारखांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले.
 • 1999 पासून भारतासह जगातल्या विविध 70 देशांमध्ये अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो.

 

 

 

 

4 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »