5 Oct Current Affairs

5 Oct Current Affairs
5 Oct Current Affairs

भारत बांगलादेश यांच्यात ७ करारांवर स्वाक्षऱ्या

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण ७ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
 • दोन्ही नेत्यांनी बांगलादेशहून एलपीजी आयात करण्यासह ३ प्रोजेक्ट्स लाँच केले. तिन्ही प्रोजेक्टची लाँचिंग ही व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे करण्यात आली.
 • शेख हसीना यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामोरे गेले व त्यांनी या कराराची माहिती दिली.
 • गेल्या वर्षभरात भारत-बांगलादेशच्या १२ संयुक्त प्रोजेक्ट्सचे उद्धाटन करण्याची संधी मला मिळाली. दोन्ही देशात एक एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
 • दोन्ही देशांदरम्यान उड्डाण होणाऱ्या विमानांची संख्या वाढून ती आता आठवड्यात १२० केली जाणार आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, मला आज खरोखरच आनंद होत आहे.
 • भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ आणि द्विपक्षीय योजनाचे उद्धाटन करण्याची संधी मला मिळाली. आजच्या तिन्ही योजना वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत.
 • एलपीजी इंपोर्ट, व्होकेशनल ट्रेनिंग आणि सोशल फॅशिलिटी. तिन्ही योजनांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावणे. बांगलादेशहून एलपीजी आयात, बांगलादेश-इंडिया प्रफेशनल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि ढाकात रामकृष्ण मिशनमध्ये विवेकानंद भवन हे होय.
 • बांगलादेश-इंडिया प्रफेशनल स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट बांगलादेशच्या औद्योगिक विकासासाठी कुशल मनुष्यबळ, आणि टेक्निशियन तयार करणे हे होय. ढाका येथील रामकृष्ण मिशनमध्ये विवेकानंद भवनचे प्रोजेक्ट, जे दोन महानुभावांच्या जीवनांवर प्रेरणा देतील.
 • आपला समाज आणि मूल्यांवर आधारित स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. बांग्लादेश सांस्कृतिकची उदारता आणि खुली भावना यांच्याप्रमाणे या मिशनमध्ये सर्व पंथांना मानणाऱ्यांना स्थान असणार आहे. विवेकानंद भवनमध्ये १०० हून अधिक विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधन स्कॉर्लसला राहण्याची संधी मिळणार आहे.
 • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या गुरूवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. भारतात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शेख हसीना यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

बांगलादेश:-

 • बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो.
 • तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
 • ढाका ही बांगलादेश ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रम्हपुत्रा व गंगा ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.

प्रश्न:- गंगेला बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते?

 

चांद्रयान २ च्या ऑर्बिटरने पाठवली चंद्राची छायाचित्रे

 • इस्रोने चांद्रयान २ ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून घेतलेली चंद्राची छायाचित्रे जारी केली आहेत. ऑर्बिटरच्या हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यातून काढलेल्या या छायाचित्रांमधून चंद्राची वेगळीच झलक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ऑर्बिटरमधून काढलेल्या छायाचित्रांद्वारे विक्रम लँडर नेमकं कुठे आहे, त्याची माहिती मिळाली असल्याचेही इस्रोने सांगितले. चांद्रयान साडेसात वर्षे चंद्राची परिक्रमा करत राहणार आहे.

चंद्राभोवती फिरतेय चांद्रयान:-

 • ७ सप्टेंबरला विक्रम लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग होऊ शकली नव्हती आणि विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला होता. नंतर लँडरचे हार्ड लँडिंग झाल्याचे नासा आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले होते. आताही चंद्राच्या कक्षेत चांद्रयान - २ चं ऑर्बिटर आहे, जे साडेसात वर्षांपर्यंत आपलं काम करत राहणार आहे. याच ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून चंद्राची नवी छायाचित्रे समोर आली आहेत.
 • ऑर्बिटरने लँडरने विक्रमचं पहिलं थर्मल छायाचित्र घेतलं:-
 • काही दिवसांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमच्या लोकेशनबाबत माहिती कळली होती. ऑर्बिटरने विक्रम लँडरची एक थर्मल इमेज क्लिक केली होती. मात्र नंतर चंद्रावर रात्र झाल्यानंतर इस्रोच्या लँडर विक्रमशी संपर्क होण्याच्या आशा मावळल्या.
 • 'विक्रम'ला शोधण्यासाठी चंद्रावरील सकाळची प्रतिक्षा

साडेसात वर्षं काम करणार चांद्रयान २:-

 • इस्रोचे प्रमुख के. सिवन म्हणाले होते की 'चांद्रयान ऑर्बिटरचं वय साडे सात वर्षांहून अधिक आहे; आधी सांगितल्याप्रमाणे एक वर्ष नव्हे. त्यामुळे यानात खूप जास्त इंधन वाचलेलं आहे. ऑर्बिटरवर लागलेल्या उपकरणांच्या आधारे लँडर विक्रमचा ठावठिकाणा लागणं शक्य आहे.'

१०० कि.मी. अंतरावरून चंद्राला न्याहाळत आहे ऑर्बिटर:-

 • चंद्राचा आजवरचा इतिहास, चंद्रावर आजपर्यंत झालेले बदल, चंद्राची संरचना, चंद्रावरील खनिज संपत्ती, पाणी या सर्व गोष्टींची माहिती व अभ्यास इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेमुळे मिळणे शक्य होणार आहे. भारताकडून पाठवण्यात आलेला ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत स्थिरावला असून, तो चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावर आहे.
 • २२ जुलै रोजी लाँच केलेल्या चांद्रयान २ मधील लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते आणि ऑर्बिटरवर चंद्राच्या कक्षेत फिरत राहून माहिती गोळा करण्याची जबाबदारी होती ७ सप्टेंबर रोजी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी २.१ कि.मी. अंतरावर असताना त्याचा इस्रोशी संपर्क तुटला. हा संपर्क अद्याप पुनर्प्रस्थापित झालेला नाही.
 • 'चांद्रयान २' ही इस्रोची अतिशय महत्त्वाची मोहीम होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागाचा अभ्यास करण्यासाठी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र पाठवण्यात आले होते. आतापर्यंत इतर देशांनी आपल्या चांद्र मोहिमेत उत्तर ध्रुवाकडील भागात यान उतरवले होते.

5 Oct Current Affairs
5 Oct Current Affairs

वनस्पती परस्परांशी बोलतात करंट बायोलॉजी जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध

 • धोक्याची जाणीव होताच वनस्पती विशिष्ट वास असलेली रसायने तयार करून एकमेकांना संदेश देतात, असे महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. वनस्पतींचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी या संशोधनाचा पुढे वापर होऊ शकेल.
 • 'करंट बायोलॉजी' या जर्नलमध्ये नुकतेच याबद्दलचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हे रसायन म्हणजे एक कार्बनी संयुग असून, ते स्थायूरूपातून थेट वायूरूपात रूपांतरित होत असल्याने वनस्पतींना एकमेकांना संदेश देणे सोपे होते. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
 • ईशान्य अमेरिकेतील सॉलीदॅगो अल्टिसिमा (Solidago Altissima) या स्थानिक वनस्पतीवर हा प्रयोग करण्यात आला. पाने कुरतडणाऱ्या कीटकांचा हल्ला होताना त्यावरील प्रतिक्रिया म्हणून वनस्पती हा पदार्थ स्रवतात, असे समोर आले आहे.
 • वनस्पतींवर काही रोग पडतो किंवा किडीचा हल्ला होतो तेव्हा त्यांच्यामधील रासायनिक प्रक्रिया बदलत असल्याचे आढळले, असे अँड्रे कोसलर या संशोधकाने म्हटले आहे. 'हे बरेचसे माणसांमधील रोगप्रतिकारक शक्तीसारखे आहे. त्यांच्यामध्ये अँटिबॉडीज नसतात मात्र, रासायनिक पद्धतीने या वनस्पती जोरदार हल्ला चढवू शकतात,' असेही त्यांनी म्हटले आहे.
 • ही रसायने हल्ला करणारे कीटक किंवा किडींना मारण्यात उपयोगी ठरतात. हे संशोधन किडीवरील प्रतिबंधासाठी आणि सेंद्रिय शेतीमध्ये उपयोगी ठरू शकेल, असे केसलर यांनी म्हटले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता ठरतेय घातक

[अश्या प्रकारच्या टॉपिकवर युपीएससी मुख्यला प्रश्न येऊ शकतात]

 • 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरून जगभरात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
 • काहींच्या मते 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'मुळे नोकऱ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काही लोकांच्या मते जेवढ्या नोकऱ्या जातील, तितक्याच नोकऱ्या मिळविण्यात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' तंत्रज्ञान यशस्वी ठरण्याची शक्यता आहे.
 • मात्र, या संदर्भात विश्लेषकांनी मांडलेला तर्क अनेकांना बुचकळ्यात पाडणारा आहे. त्यांच्या मते 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'मुळे शंभर नोकऱ्या जाऊन त्याजागी नव्याने केवळ दहा नोकऱ्याच उपलब्ध होत आहेत.
 • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या जागा रिकाम्या होतील, त्या तत्काळ भरल्या जातील याचीही शक्यता नाही. कारण, ज्या जागा रिकाम्या होतील, त्या भरण्यासाठी कंपन्यांना संबंधितांना 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच त्यांना नव्या तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
 • 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या 'टेक्नॉलॉजी टॅलेंट इक्विलिब्रियम' या चर्चासत्रात नेक्स्टवेल्थ आंत्र्यप्रुनरचे संस्थापक श्रीधर मित्ता, इंटेल इंडियाचे प्रमुख प्रकाश मल्ल्या आणि विप्रो टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष सुप्रियो दास यांच्याशी झालेल्या संवादातून वरील निष्कर्ष समोर आले आहेत.

शाळांमध्ये 'एआय' उपयुक्तच:-

 • मित्ता यांच्या मते 'आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शंभर नोकऱ्या गेल्यास केवळ १० नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ज्या लोकांच्या नोकऱ्या जातील, त्यांची कौशल्ये काळातीत नसल्याने ते स्पर्धेतून आपोआपच बाहेर टाकले जातील. ज्यांना नव्याने नोकऱ्या मिळतील, त्यांची कौशल्ये निश्चितच इतरांपेक्षा वेगळी असतील.'
 • 'इंटेलने शाळाशाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित शिक्षण देण्याची सुरुवात केली आहे. माझ्यामते केवळ उद्योगांमध्येच नव्हे तर, त्याहीपेक्षा वेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी जागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना नवनवीन उद्योग, डेव्हलपर्स आणि स्टार्टअप्स यांच्याकडे पोहोचण्याची आवश्यकता आहे,'असेही मल्ल्या यांनी नमूद केले.

दहा वर्षांत १५.७ कोटी डॉलरच्या संधी:-

 • 'इंटेल इंडिया एआय रेडी टॅलेंट'च्या माध्यमातून २०१७पासून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक डेव्हलपर्स, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना या विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
 • गेल्या वर्षी 'पीडब्ल्यूसी'ने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार २०३०पर्यंत जगभरात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' क्षेत्रात १५.७ लाख डॉलरच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान सेवा पुरवठादार कंपन्यांकडून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी निरंतर वाढत आहे.

यत्रतत्रसर्वत्र 'एआय'ची गरज:-

 • विप्रो टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष सुप्रियो दास यांच्या मते आगामी काळात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' अर्थात 'एआय'च्या जाणकारांची कमतरता भासणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान उपलब्ध असलेल्यांची नेमकी किती गरज असून, भविष्यात ती किती वाढणार आहे याचा अंदाज बांधण्याची गरज आहे.
 • भविष्यात कोणते क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित किती नोकऱ्या निर्माण करते, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या आमच्या कंपन्यांना ज्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे, तेथे सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जाणकारांची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.'
5 Oct Current Affairs
5 Oct Current Affairs

हिटमॅन रोहित शर्माचा २५ वर्षापूर्वीचा विक्रम मोडित

 • टीम इंडियाचा 'हिटमॅन' अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
 • रोहित शर्माने आता कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला. रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका वन डे सामन्यात १६ षटकार ठोकले होते.
 • त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते. तर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत.
 • याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.
 • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने आतापर्यंत ४ षटकार ठोकले आहेत. याबरोबरच तो एका कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक १० षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.
 • या आधी हा विक्रम भारताचा माजी सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंह सिद्धूच्या नावावर होता. सिद्धूने १९९४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना एका डावात ८ षटकार ठोकले होते. याप्रमाणे रोहित शर्माने नवजोत सिंह सिद्धूचा २५ वर्षापूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे.
 • भारताने पहिल्या डावात ७ गडी गमावून ५०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावाची घोषणा केली होती. भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल (२१५ धावा) आणि रोहित शर्मा (१७६ धावा) यांच्या खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ५०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतासाठी सर्वात जास्त षटकार:-

 • कसोटीः १०* विरुद्ध दक्षिण आफ्रिका (विशाखापट्टणम २०१९)
 • वन डेः १६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया बेंगळुरू २०१३
 • टी-२० : १० विरुद्ध श्रीलंका इंदूर २०१७

 

रविचंद्रन आश्विनचे ७ बळी हरभजन सिंहला टाकलं मागे

 • आफ्रिकेच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दिलेल्या कडव्या झुंजीमुळे पहिला कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकण्याची शक्यता तयार झाली आहे.
 • भारतीय संघाच्या ५०२ धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांमध्ये आटोपला. भारताने पहिल्या डाव्यात ७१ धावांची आघाडी घेतली. रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना आफ्रिकेच्या ७ फलंदाजांना माघारी धाडलं.
 • या कामगिरीदरम्यान आश्विनने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ६ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्विनने दुसरं स्थान पटकावलं आहे.

कसोटीत सर्वाधिकवेळा ६ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारे गोलंदाज –

 1. अनिल कुंबळे – १९ वेळा
 2. रविचंद्रन आश्विन – १४ वेळा
 3. हरभजन सिंह – १३ वेळा
 • पहिल्या डावात रविंद्र जाडेजाने २ तर इशांत शर्माने १ बळी घेत आश्विनला चांगली साथ दिली.

 

5 Oct Current Affairs
5 Oct Current Affairs

ई सिगरेटचे अमेरिकेत १८ बळी

 • ई-सिगरेटच्या व्यसनामुळे  अमेरिकेत आतापर्यंत १०८०  लोकांच्या फुफ्फुसात जखमा झाल्या असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अमेरिकी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 • सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी म्हटले आहे की, ई-सिगरेटमुळे होणाऱ्या घातक परिणामातील हे हिमनगाचे केवळ  टोक आहे. अमेरिकेतील लोकांमध्ये या सिगरेटने व्हेपिंग करण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या आठवडय़ापासून २७५ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या दोन आठवडय़ात ई-सिगरेटच्या व्हेपिंगने आजारी पडलेल्या व्यक्तींचे प्रमाण वाढले आहे.
 • एकूण ५७८ रुग्णांची माहिती घेतली असता त्यात असे दिसून आले की, ७८ टक्के लोकांनी टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (टीएचसी) या पदार्थाचा वापर निकोटिनसह किंवा निकोटिनशिवाय केला. १७ टक्के लोकांनी निकोटिनयुक्त उत्पादनांचा वापर केला होता. टीएचसी हा सायकोअ‍ॅक्टिव्ह रसायनाचा मारिजुआना सारखा प्रकार आहे. यात ८० टक्के रुग्ण पस्तीशीखालील असून ७० टक्के रुग्ण हे पुरुष आहेत.
 • जुलैत हे प्रमाण सर्वात जास्त होते. मेयो क्लिनिकने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, १७ रुग्णांच्या फुफ्फुसांची तपासणी करण्यात आली असता त्यात जखमा झाल्याचे दिसून आले. विषारी वाफांमुळे या जखमा झाल्या. ई-सिगरेट अमेरिकेत २००६ पासून सुरू झाल्या असून त्यांचा वापर वाढून आताच दुष्परिणाम कसे दिसू लागले किंवा पूर्वी या रुग्णांचे चुकीचे निदान झाले होते का, असे अनेक प्रश्न यात अनुत्तरित आहेत.
 • विशिष्ट वासाच्या ई-सिगरेटवर बंदी घालण्याची घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतीच केली आहे. भारतातही सर्व प्रकारच्या ई-सिगरेट्सवर बंदी आली आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »