6 July Current Affairs

6 July Current Affairs
6 July Current Affairs

विज्ञान संशोधनातील गुंतवणुकीत भारत मागे

विज्ञान संशोधनातील गुंतवणुकीत चीनने आक्रमक धोरण ठेवले असून तुलनेने भारतात ‘लालफितीचा कारभार’ असल्याने अनेक अडचणी येत आहेत त्यात वैज्ञानिक व सरकार यांच्यात पुरेशा संपर्काचा अभावही आहे, अशी टीका नोबेल विजेते वैज्ञानिक क्लॉस व्हॉन क्लिटझिंग यांनी केली आहे.
संशोधन व विकास यात चीन हा अमेरिकेखालोखाल जास्त खर्च करीत आहे, असे अमेरिकेच्या ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन व नॅशनल सायन्स बोर्ड’  या दोन संस्थांनी दिलेल्या माहितीतून २०१८ मध्ये दिसून आले आहे.
१९८५ मध्ये ‘इंटिगर क्वांटम हॉल इफेक्ट’च्या शोधासाठी नोबेल मिळवणारे क्लिटझिंग यांनी सांगितले की, भारत व चीन हे जगातील दोन मोठे उदयोन्मुख देश आहेत पण संशोधन क्षेत्राचा विचार करता चीन जास्त आक्रमक आहे. संशोधन क्षेत्रात त्यांची गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात आहे. चिनी अर्थव्यवस्थेचा भर हा विज्ञान व नवप्रवर्तनावर आहे. पायाभूत सेवा व विकास यात त्यांची गुंतवणूक खूप मोठी आहे.
६८ व्या लिंडाव नोबेल मानकरी परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, वर्षभराच्या कुठल्याही कालावधीचा विचार करता चीनने भारतापेक्षा अधिक पेटंट नोंदवले आहेत. शिवाय त्यांच्या शोधनिबंधांची संख्याही जास्त आहे.
२०१७ मध्ये चीनने एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या २.१ टक्के भाग पायाभूत सेवा व संशोधनावर खर्च केला होता. भारताने यात १ टक्क्य़ांपेक्षा कमी गुंतवणूक केली होती. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या मते चीनने २०१६ मध्ये  पेटंटसाठी १.३४ दशलक्ष अर्ज केले. त्याचवेळी  भारताने पेटंटसाठी  ४५००० अर्ज केले. चीन कृत्रिम बुद्धिमत्ता, चालकविरहित मोटार , रोबोटिक्स यातील गुंतवणुकीत भारताच्या फार पुढे आहे.
ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी चीनचे व्हिसा धोरण खुले आहे. त्यामुळे चीनने नवप्रवर्तनात आघाडी घेतली आहे असे सांगून ते म्हणाले की, भारताने ‘मटेरियल सायन्स’च्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. तेथून व्याख्यानासाठी निमंत्रणे येतात पण तेथे जाण्यासाठी व्हिसा पाहिजे. तो मिळण्यात लालफितीचा कारभार आहे. चीनमध्ये तसे नाही, नोबेल विजेत्यांना दीर्घकालीन व्हिसा ते  देतात. भारताने ३० दिवसांची व्हिसा योजना सोडून आता पाच वर्षांची व्हिसा योजना सुरू केली पाहिजे. तरूण भारतीय वैज्ञानिक जर्मनीत येत नाहीत. अमेरिकेत जातात कारण भाषेची अडचण येईल अशी भीती त्यांना वाटते पण तो गैरसमज आहे. चीन, दक्षिण कोरिया, जपानचे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या शिफारशी उच्च संशोधनासाठी करीत असतात. भारतातून तसे होत नाही. राष्ट्रवाद हा विज्ञानाला धोकादायक असतो. वैज्ञानिक म्हणून त्याच्याशी लढावे लागेल. विज्ञानात खुली चर्चा व एकमेकांशी संवाद आवश्यक असतो.

गुलाबी शहर आता जागतिक वारसा स्थळ

गडकोटांचे शहर, गुलाबी शहर अशी विविध वैशिष्ट्ये मिरवित पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या जयपूरला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) शनिवारी याबाबतचे अधिकृत ट्विट करून जयपूरवासीयांचे विशेष कौतुक केले. 
या सन्मानाने जयपूरच्या स्थापत्यकलेच्या शतकांपासूनच वैभवी परंपरेचा आणि झळाळत्या संस्कृतीचा पुन्हा एकवार जगभर गजर झाला आहे. 
अझरबैझानमधील बेकूमध्ये 'युनेस्को'ची ४३वी परिषद ३० जूनपासून सुरू आहे. त्यातच जयपूरच्या (राजस्थान) प्रस्तावावर चर्चा करून त्यावर मोहोर लावण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. 
'जयपूर  हे वीरता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. मनमोहक आणि हर्षोल्हासाची भूमी आहे. जयपूरकरांचे आदरातिथ्य जगभरातील नागरिकांना तिथे आकर्षित करीत असते. हे शहर वारसास्थळ बनल्याने आनंद झाला आहे,' अशा शब्दांत मोदी यांनी ट्विट केले आहे. स्मारके आणि स्थळांबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेने 'आयसीओएमओएस' जयपुरात २०१८मध्ये भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तो तपासल्यानंतर बेकूमध्ये मंजुरी देण्यात आली. 'शहर नियोजन आणि स्थापत्याचा सुरेख संगम आणि कल्पनांच्या आदानप्रदानातून मध्ययुगाच्या अखेरीचे चे अनुकरणीय उदाहरण म्हणून जयपूरबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मध्ययुगीन काळात दक्षिण आशियात, संपन्न व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्र म्हणून जयपूर अपवादात्मक उदाहरण आहे. जोडीला या शहरात जिवंत असलेल्या हस्तकलेच्या विविध प्रकारांना आजही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता आहे', अशा शब्दांत 'युनेस्को'च्या येथील अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावात जयपूरचा गौरव केला होता. 
स्थापत्याचा समृद्ध वारसा:-
सवाई जयसिंह दुसरे यांनी १७२७मध्ये या शहराची स्थापना केली. सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या राजस्थानची राजधानी म्हणून तेव्हापासून शहर प्रसिद्ध आहे. शहर नियोजनात प्राचीन हिंदू, मुघल आणि समकालीन पाश्चिमात्य संकल्पनांचा सुरेख मेळ घालून हे शहर वसवण्यात आले आहे. 
अशी आहे युनेस्कोच्या वारसा समितीची रचना 
-२१ सदस्य देशांचे प्रतिनिधी वार्षिक परिषदेत घेतात निर्णय 
-परिषद बोलावण्याचा अधिकारही संबंधितांनाच 
आतापर्यंत १६७ देशांतील १०९२ स्थळांना वारसा दर्जा 
जयपूरला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणे ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. या सन्मानामुळे राजस्थानच्या या राजधानीला अधिक झळाळी मिळाली आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायाला बळ मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यातून पायाभूत सुविधा बळकट करण्यासही मदत होईल. 

6 July Current Affairs
6 July Current Affairs

दिल्ली आणि विजयवाडा येथे UIDAI चे पहिले आधार सेवा केंद्र उघडले

भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) त्याचे पहिले आधार सेवा केंद्र (ASK) दिल्ली आणि विजयवाडा या शहरांमध्ये उघडण्यात आले आहेत.
यावर्षीच्या शेवटपर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत असे 114 केंद्र उघडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 
UIDAIची ही महत्वाकांक्षी योजना देशातल्या 53 शहरांमध्ये राबविण्यात येणार असून त्यासाठी 300-400 कोटी रूपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे.
आधार सेवा केंद्र (ASK) आत्ताच्या आधार सेवा पुरविणार्‍या सरकारी परिसरातल्या आणि अन्य केंद्रांप्रमाणेच कार्य करणार आहे. सध्या ही सेवा बँक आणि टपाल कार्यालयात उपलब्ध आहे.
या केंद्राची संकल्पना पासपोर्ट सेवा केंद्राच्या संकल्पनेसारखीच आहे. या केंद्रांवर आधारची नोंदणी करणे, माहिती अद्ययावत करणे आणि त्यासंबंधी इतर कार्ये चालवली जाणार.
UIDAI बाबत:-
भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक बहुउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेमधून ‘भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरण’ (Unique Identification Authority of India -UIDAI) याची 2009 साली स्थापना करण्यात आली.
या संस्थेकडून ‘आधार’ नावाने बनविण्यात आलेले ओळखपत्र नागरिकांना दिले जाते. त्यामधून संबंधित व्यक्तीला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, जो आधार क्रमांक म्हणून ओळखला जातो. 
आधार क्रमांक ही 12 अंकी एक विशिष्ट संख्या आहे, जी त्या व्यक्तीसाठी एक कायम ओळख आहे. शिवाय, संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे, रेटीना स्कॅन (डोळ्यांची माहिती) अश्या सुरक्षाविषयक माहितीला या प्रकल्पामार्फत गोळा केले जात आहे.

पेटीएमवर जूनमध्ये ७० कोटी व्यवहार

पेमेंट अॅपमध्ये आघाडीवर असणाऱ्या पेटीएमवर जूनमध्ये एकूण ७० कोटी व्यवहारांची नोंद झाली. यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) आधारित पेमेंट सेवा देणाऱ्या अॅमेझॉन पे, गुगल पे, व्हॉट्सअॅप पे आणि फोनपे या माध्यमांच्या एकत्रित यूपीआय व्यवहारांच्या तुलनेत पेटीएमवरील व्यवहारांचा आकडा अधिक आहे. मात्र पेटीएमवर नोंदवण्यात आलेल्या या ७० कोटी व्यवहारांमध्ये यूपीआयसह पेटीएम वॉलेट, कार्ड पेमेंट, नेट बँकिंग आदी व्यवहारांचाही समावेश आहे. थोडक्यात, पेमेंट गेट वे म्हणून वापर झालेल्या एकूण व्यवहारांचा आकडा गृहीत धरल्यास अन्य माध्यमांच्या तुलनेत पेटीएमवरील व्यवहारांचा आकडा अधिक ठरला आहे. चालू आर्थिक वर्षात अडीच कोटी नव्या व्यापारी/व्यावसायिकांना आपल्याशी जोडण्याचे उद्दिष्ट पेटीएमने आखले आहे. 
यूपीआयमध्ये गुगल पे आघाडीवर:-
यूपीआय व्यवहारांत मात्र गुगलच्या 'गुगल पेमेंट'ने पेटीएमला मागे टाकले आहे. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार 'गुगल पे'च्या माध्यमातून २४ कोटींहून अधिक यूपीआय व्यवहार झाले. तर, 'फोन पे' आणि 'पेटीएम'वर अनुक्रमे २३ कोटी आणि २० कोटी व्यवहार झाले. एप्रिलमध्ये देशभरात एकूण ७३.३५ कोटी 'यूपीआय' व्यवहार झाले होते. तर, मेमध्ये या व्यवहारांची संख्या ७८.१० कोटींवर पोहोचली. जूनची आकडेवारी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.

6 July Current Affairs
6 July Current Affairs

परकीय चलन साठ्याने 427.67 अब्ज डॉलरचा नवा उच्चांक गाठला

5 जुलै 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बॅंकेनी जाहीर केल्याप्रमाणे, दिनांक 28 जून 2019 रोजी परकीय चलन साठ्यात 1.262 अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडून त्याने 427.678 अब्ज अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक गाठला आहे. उच्च परकीय गुंतवणूकीमुळे आणि स्थिर रुपयामुळे ही विक्रमी पातळी गाठण्यास प्रोत्साहन मिळाले.
RBIच्या आकडेवारीनुसार -
भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 22.958 अब्ज डॉलर या पातळीवर राहिले.
आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून निधी घेण्याचा विशेष हक्क असलेली पातळी 3 दशलक्ष डॉलरने वाढून 1.456 अब्ज डॉलरवर गेली.
निधीसह देशाचा साठा 7 दशलक्ष डॉलरने वाढून 3.361 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.अमेरिकन डॉलरमध्ये मोजल्या जाणाऱ्या 'परकीय चलन मालमत्ता'मध्ये 'नॉन युएस करन्सीज'च्या (म्हणजे युरो, ब्रिटिश पौंड, जपानी येन, ज्यामध्ये भारतीय रिर्झव्ह बँक आपला परकीय चलन साठा ठेवते) विनिमय मूल्यात होणारी घट किंवा वाढीचा परिणाम समाविष्ट असतो.
थेट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते.
परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवितात आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात.

पश्चिम बंगालचे नामांतर करण्यास केंद्र सरकारचा नकार

पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पुन्हा अडचण वाढवली आहे. पश्चिम बंगालचे नामांतर ‘बांग्ला’ करण्याची ममतांची मागणीला केंद्र सरकारने नकार दिला आहे.
तसेच केंद्रीय गृह राज्यामंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत बोलताना बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे सांगितेले आहे. तसेच राज्याचे नाव बदलण्यासाठी संविधानिक दुरुस्तीची गरज असल्याचे ही ते म्हणाले.
तर 29 ऑगस्ट 2016 ला विधानसभेच्या सर्वसाधारण सभेत पश्चिम बंगालचे नाव तीन वेगवेगळ्या भाषेत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यात बंगालीमध्ये ‘बांग्ला’, इंग्रजीत ‘बेंगाल’ आणि हिंदीत ‘बंगाल’ ठरले होते.
मात्र त्यावेळी विरोधात असलेल्या काँग्रेस आणि भाजपने विरोध केला होता. तर केंद्र सरकारने सुद्धा यावेळी आक्षेप घेतला होता. त्या नंतर 26 जुलै 2018 रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्याचे नाव बांग्ला करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करण्यात आला.
त्यानंतर हा प्रस्ताव मंजूरीसाठी गृह मंत्रालयायकडे पाठवण्यात आला होता. मात्र राज्यसभेत बोलताना नित्यानंद राय यांनी बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

6 July Current Affairs
6 July Current Affairs

ब्रायन लारा यांना ‘डी.वाय’ची डॉक्टरेट

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने समान्मित करण्यात आले.
नेरुळ येथे पदवीप्रदान समारंभ झाला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त शिवानी पाटील, क्रिकेटपट्ट अ‍ॅबी कुरुविल्ला, विद्यापीठाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहणार असल्याचे यावेळी लारा यांनी सांगितले. तर विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी ब्रायन लाराच्या भेटीने व त्याच्या खेळावरील प्रचंड प्रेमामुळे खेळासाठी आणखी भरीव कार्य करण्याची नवी ऊर्मी मिळाली असे सांगितले.

पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत जगात चौथ्याक्रमांकाचा देश

ब्लूमबर्ग एनईएफ आणि पॉवर-टेक्नॉलॉजी या संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार, 2018 सालापर्यंत प्रस्थापित झालेल्या पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत आज भारत जगातला चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताने आतापर्यंत देशात पवन ऊर्जेच्या निर्मितीसाठी 35 गीगावॉट (GW) एवढी क्षमता प्रस्थापित केलेली आहे.
पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत, एकूण 35 GW क्षमतेसह भारत आशियातला द्वितीय क्रमांकाचा देश आहे. तामिळनाडूमध्ये 1,500 MW क्षमतेचा मुपांडल पवन ऊर्जा प्रकल्प आणि राजस्थानमध्ये 1,064 MW क्षमतेचा जैसलमेर पवन ऊर्जा प्रकल्प हे जगातले तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे सर्वात मोठे किनारपट्टीलगतचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत.
10 देशांच्या या यादीत चीन 221 गीगावॉट एवढ्या क्षमतेसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ अमेरिका (96.4 GW) आणि जर्मनीचा (59.3 GW) क्रमांक लागतो.पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत, केवळ एकट्या चीनचाच जगात प्रस्थापित करण्यात आलेल्या एकूण क्षमतेच्या जवळजवळ एक तृतियांश हिस्सा आहे. चीनकडे 7,965 मेगावॉट (MW) क्षमता असलेला जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.जगातल्या 10 सर्वात मोठ्या किनारपट्टीलगतच्या पवन ऊर्जा प्रकल्पांपैकी सहा अमेरिका या देशात आहेत. तेथे कॅलिफोर्निया येथील 1,548 MW क्षमतेचा अल्टा विंड एनर्जी सेंटर हा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.अन्य देशांमध्ये स्पेनमध्ये 23 GW, ब्रिटनमध्ये 20.7 GW, फ्रान्समध्ये 15.3 GW, ब्राझीलमध्ये 14.5 GW, कॅनडामध्ये 12.8 GW आणि इटलीमध्ये 10 GW पवन ऊर्जा क्षमता प्रस्थापित केली गेली आहे.

6 July Current Affairs
6 July Current Affairs

देशात १६ कोटी लोक करतात मद्यसेवन ५.७ कोटी लोकांना व्यसन

देशातील १६ कोटी लोक मद्यसेवन करत असून तब्बल ५.७ कोटी लोकांना दारुचं व्यसन असल्याचं सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. तसंच शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांच्या मद्यपानाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचं ही या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. 
सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाने पहिल्यांदाच असं सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी सर्वस्वी एम्स आणि एनडीडीसी( नॅशनल ड्रग्स डिपेंडन्सी सेंटर)वर होती. ३६ राज्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात २ लाखांहून अधिक कुटुंब सहभागी झाले. देशातील १६ कोटी मद्यसेवन करतात तर ३.१ कोटी लोकं भांगचे सेवन करत असल्याचं या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. त्याचप्रमाणे १.१८ कोटी लोकं सीडेटिव्ह ड्रग्जचे सेवन करतात. 
या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून १० शहरांमध्ये शालेय विद्यार्थी आणि कॉलेजमधील तरुणांचे सर्वेक्षण अजूनही सुरू असून या सर्वेक्षणाचा अहवाल नोव्हेंबर २०१९ मध्ये मिळेल अशी माहिती सामाजिक आणि न्यायविकास मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली आहे.

पाकिस्तानाचा वरिष्ठ क्रिकेटपटू शोएब मलिकची निवृत्तीची घोषणा

दिनांक 5 जुलै 2019 रोजी बांग्लादेशला पराभूत करत पाकिस्तान संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेचा विजयी समारोप केला. त्याचवेळी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या 20 वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून त्याची निवृत्ती जाहीर केली आहे. तो त्याची क्रिकेट विश्वचषक 2019 मोहीम पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होणार असल्याची त्याने घोषणा केली.
शोएब मलिकने 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. शोएब मलिकने 287 एकदिवसीय सामन्यात 7,534 धावा केल्या आहेत. त्याने 9 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. तर 287 एकदिवसीय सामन्यांमध्ये 158 बळी घेतल्या आहेत. त्याशिवाय त्याने 158 बळी घेतले. या विश्वचषकमध्ये भारताविरुद्ध झालेला सामना हा शोएबचा अखेरचा सामना ठरला.

6 July Current Affairs
6 July Current Affairs

अ‍ॅपमार्फत मिळणार टपालाची रिअल टाइम माहिती

टपाल खात्याद्वारे एखादी वस्तू, पार्सल पाठवल्यास ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचले की नाही याबाबत त्याची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी टपाल खात्याच्या पोस्टमन मोबाइल अ‍ॅपचा (पीएमए) लाभ होत आहे. हे अ‍ॅप पोस्टमनसाठी तयार केले असून याद्वारे डिलिव्हरी झाल्यानंतर तत्काळ त्याची माहिती या अ‍ॅपवर अपलोड करत ज्यांना पार्सल दिले त्यांची डिजिटल स्वाक्षरी घेतली जाते. त्यामुळे टपालाद्वारे पाठवलेल्या पार्सल व इतर वस्तूंची माहिती आता क्षणाक्षणाला मिळणे शक्य झाले आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाच्या वर्धापन दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई जीपीओचे संचालक के. मुनीरमय्याह यांनी ही माहिती दिली.
मोबाइल अ‍ॅपसाठी राज्यातील सुमारे सव्वासात हजार पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. पार्सल व इतर वस्तू पोचवल्यानंतर त्वरित त्याची नोंद या अ‍ॅपवर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पूर्वी पोस्टमन सायंकाळी काम संपवून कार्यालयात आल्यावर माहिती अपडेट केली जात होती. आता ही माहिती वेळोवेळी अपडेट होणार असल्याने ती ग्राहकांना मिळू शकेल. तसेच पोस्ट आॅफिस सेव्हिंग्ज बँकेच्या (पीओएसबी) खातेदारांसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवण्यात आली असून टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये सध्या सुमारे ३ हजार ग्राहकांद्वारे त्याचा लाभ घेतला जात आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) ४२ शाखांद्वारे व १२ हजार २ अ‍ॅक्सेस पॉइंटच्या माध्यमातून ५ लाख ३६ हजार ४६५ जणांनी खाते उघडले असून पीओएसबीच्या ७१ हजार ५३१ खातेदारांनी त्यांचे खाते आयपीपीबीला संलग्न केले आहे. याचाच पुढचा भाग म्हणून डिजिटल ग्राम संकल्पना राज्यात राबवण्यात येत आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »