6 Nov Current Affairs

6 Nov Current Affairs
6 Nov Current Affairs

कर्तारपूर शीख भाविकांसाठी सज्ज

 • 'गुरूनानक देव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर संकुल आणि गुरूद्वारा शीख भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे,' असे सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूद्वारा व परिसराचे फोटो ट्विट केले.
 • भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या करारानुसार, पाकिस्तानने कर्तारपूर कॉरिडॉर भारतीय भाविकांसाठी खुला केला आहे. या कॉरिडॉरचे नऊ नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन आहे.
 • या पार्श्वभूमीवर, इम्रान खान यांनी रविवारी तयारीचे फोटो ट्विट केले. 'शीख भाविकांचे स्वागत करण्यासाठी कर्तारपूर सज्ज आहे' असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी आपल्याच सरकारची पाठही थोपटवून घेतली. गुरू नानक यांची १२ नोव्हेंबर रोजी ५५०वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर, हे कॉरिडॉर खुले होत आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी जाणाऱ्या भारतीय भाविकांकडून पाकिस्तान २० डॉलर शुल्क आकारत आहे. मात्र, या कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या भारतीयांसाठी पासपोर्टची अट मागे घेण्यात आली आहे.
 • दोन्ही देशांमधील करारानुसार, दररोज पाच हजार भाविक या गुरूद्वाऱ्याला भेट देऊ शकतात. विशेष दिवसांसाठी ही मर्यादा वाढविण्याचाही विचार आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काश्मीर प्रश्नावरून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तमाण असतानाही, कर्तारपूर कॉरिडॉरच्या चर्चेमध्ये खंड पडला नव्हता.

विरोधी पक्षांकडून टीका:-    

 • इम्रान खान यांच्या सरकारविरोधात इस्लामाबादमध्ये विरोधी पक्षांकडून निर्दशने करण्यात येत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी इम्रान यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मौलाना फजलूर रेहमान यांच्या या आंदोलनाला पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान पीपल्स पक्ष या प्रमुख पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.
 • विरोधकांनी कर्तारपूर कॉरिडॉरसाठी भारतीयांना पासपोर्टची अट मागे घेतल्याबद्दल विरोधकांकडून टीकाही होऊ लागली आहे. 'आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी इम्रान खान भारतीयांसारख्या परदेशी नागरिकांसाठी पासपोर्टची अट ठेवत नाही, ही खूप मोठी चूक आहे,' अशी टीका पाकिस्तान मुस्लीम लीगचे (नवाझ) नेते अहसान इक्बाल यांनी म्हटले आहे.

आसियान शी सहकार्य वाढवणार

 • बँकॉक येथे भारत-आसियान शिखर परिषदेला उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसियान
 • 'असोसिएशन ऑफ साउथइस्ट एशियन नेशन्स'सोबत (आसियान) विविध पातळ्यांवर सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रूपरेषा मांडली.
 • सोळाव्या भारत-'आसियान' शिखर परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
 • जमीन, हवा आणि समुद्रमार्गे भारत आणि 'आसियान'मधील दहा देशांत संपर्क वाढल्यास या प्रदेशात व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना मिळेल, असे मोदी म्हणाले.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी बँकॉकमध्ये दाखल झाले. 'आसियान'-भारत, पूर्व आशिया आणि 'आरसीईपी' या परिषदांना उपस्थित राहण्यासाठी मोदी या दौऱ्यावर आहेत.
 • 'व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने 'आसियान' ही महत्त्वाची संघटना आहे. समुद्री सुरक्षा क्षेत्र, तसेच समुद्रावर आधारित अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी), तसेच शेती, इंजिनीअरिंग, डिजिटल तंत्रज्ञान आणि शास्त्रीय संशोधन या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याच्या संधी आहेत,' असेही मोदी यांनी सांगितले. सहकार्य वाढीसाठी भारत आणि 'आसियान'मध्ये विचारांचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
 • 'आमच्या इंडो-पॅसिफिक दृष्टीकोनासाठी भारताचे 'अॅक्ट ईस्ट' धोरण महत्त्वाचे असून, 'आसियान' त्याच्या गाभा आहे. एकात्मिक, तसेच आर्थिकदृष्ट्या उत्साही 'आसियान' भारतासाठी महत्त्वाचा आहे,' असे मोदी म्हणाले. 'आसियान' देशांच्या नेत्यांसमोर ते बोलत होते.
 • 'आसियान' ही दहा देशांचा समावेश असलेली संघटना प्रदेशात सर्वांत प्रभावी समजली जाते. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया या दहा देशांचा 'आसियान'मध्ये समावेश आहे.
 • भारतासह अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश या संघटनेत चर्चेतील भागीदार आहेत. भारत आणि 'आसियान' यांच्यातील संबंध वृद्धिंगत होत आले आहेत. दरम्यान, 'आसियान' शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो या नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

'आसियान'चे महत्त्व:-

 • भारत आणि आसियान क्षेत्रातील एकत्रित लोकसंख्या १ अब्ज ८५ लाख इतकी आहे. जगातील लोकसंख्येपैकी ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे. या क्षेत्रचे एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न सुमारे ३.८ हजार अब्ज इतके आहे.
 • 'आसियान' देशांतून भारतामध्ये गेल्या १७ वर्षांत ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. भारताच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी (एफडीआय) ही गुंतवणूक १७ टक्के इतकी आहे.
6 Nov Current Affairs
6 Nov Current Affairs

सुमंत कठपलिया इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

 • इंडसइंड बँक लिमिटेड याच्या संचालक मंडळाने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सुमंत कठपलिया यांची नेमणूक केली आहे.
 • सुमंत कठपलिया यांची निवड सध्याचे CEO रोमेश सोबती यांच्या जागेवर केली गेली आहे. या नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला आहे.
 • गेल्या दशकभरापासून प्रमुखपदी असलेले रोमेश सोबती वयाचे 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
 • सुमंत कठपलिया सध्या हिंदुजा उद्योग-समुहाचा पाठिंबा असलेल्या इंडसइंड बँकेत ग्राहक कर्ज विभागाचे प्रमुख आहेत. 55 वर्षांचे कठपलिया हे 2008 सालापासून बँकेसोबत जुळलेले आहेत.

भारत आणि जर्मनी यांच्यात झालेले सामंजस्य करार

 • जर्मनीच्या चॅन्सेलर डॉ. अँजेला मर्केल यांच्या नेतृत्वात जर्मन प्रतिनिधी मंडळ भारत भेटीवर आले होते.
 • 1 नोव्हेंबर 2019 रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पुढील सामंजस्य करार/करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र
 • सन 2020 - सन 2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (परराष्ट्र कल्याण मंत्रालय)
 • धोरणात्मक प्रकल्पांवरच्या सहकार्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (रेल्वे मंत्रालय)
 • ग्रीन अर्बन मोबॅलिटीसाठी इंडो-जर्मन भागीदारीकरिता हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय)
 • कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत संशोधन व विकासासाठी संयुक्त सहकार्यासाठी हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय)
 • सागरी कचरा रोखण्यासंदर्भात सहकार्य करण्याविषयी हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय)
 • ISRO आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांच्यात कर्मचारी आदान-प्रदान करण्याविषयीच्या व्यवस्थेची अंमलबजावणी
 • हवाई वाहतूक क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र
 • आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी नेटवर्क सहकार्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र
 • कौशल्य विकास व व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सहकार्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र
 • स्टार्टअप क्षेत्रात आर्थिक सहकार्य दृढ करण्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र
 • कृषी बाजार विकासाबाबत द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प उभारण्याबाबत हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र
 • दिव्यांगत्व प्राप्त झालेल्यांसाठी व्यवसायामुळे उद्भवणारे रोग, पुनर्वसन या क्षेत्रात सामंजस्य करार
 • आंतरदेशीय, किनारी, सागरी तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
 • वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देऊन विस्तार करण्यासाठीचा सामंजस्य करार
 • आयुर्वेद, योग आणि ध्यानधारणा यामध्ये शैक्षणिक सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार
 • उच्च शिक्षण क्षेत्रात भारत-जर्मनी भागीदारी याची मुदत वाढवणारा सामंजस्य करार
 • भारताची नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ॲग्रीकल्चर एक्सेंटेंशन मॅनेजमेंट (MANAGE) आणि जर्मनीची DEULA कृषी अकादमी यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि व्यवसायिक प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार
 • सिमेन्स इंडिया लिमिटेड आणि MSDE आणि जर्मन सरकारचे शाश्वत विकासासाठी आर्थिक सहकार्य आणि कौशल्य विकास मंत्रालय यांच्यात हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र
 • संग्रहालय क्षेत्रात सहकार्याबाबतचा सामंजस्य करार
 • अखिल भारतीय फुटबॉल संघटना (AIFF) आणि जर्मनीची DFB फुटबॉल संघटना यांच्यात सामंजस्य करार
 • इंडो-जर्मन मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनर्शिप कराराचे मुख्य घटक याच्या संदर्भात हेतू दर्शक घोषणापत्र
 • जर्मनी हा युरोप खंडाच्या मध्यभागी असलेला एका देश आहे. देशाची राजधानी बर्लिन हे शहर आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे. येथे प्रामुख्याने जर्मन भाषा बोलली जाते.
6 Nov Current Affairs
6 Nov Current Affairs

कुस्ती पूजा गेहलोतला रौप्यपदक

 • २३ वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील हे भारताचे दुसरे रौप्यपदक ठरले.
 • जपानचा माजी विश्वविजेता हारूनो ओकूनोकडून पराभव पत्करल्यामुळे पूजा गेहलोतला ५३ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • २३ वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील हे भारताचे दुसरे रौप्यपदक ठरले.
 • अंतिम सामन्यात आकुनोने पूजाचा २-० अशा फरकाने पराभव केला.
 • भारताच्या खात्यावरील पहिले रौप्यपदक आठवडय़ाच्या पूर्वार्धात रविंदरने (६१ किलो) कमावले आहे.
 • तीन वेळा जागतिक कनिष्ठ पदकविजेत्या साजन भानवालने (७७ किलो) उपांत्य लढतीत जपानच्या कोडाय साकुराबाकडून ४-५ असा पराभव पत्करला.
 • त्यामुळे त्याला कांस्यपदकाची लढत द्यावी लागणार आहे.

श्रीलंकेविरूद्ध वॉर्नरची अनोखी हॅटट्रिक विराटच्या विक्रमाशी बरोबरी

 • श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ३-० असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वॉर्नर तीनही टी २० सामन्यात नाबाद राहिला.
 • तिसर्या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद ५७ धावा केल्या आणि संघाला ७ गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतकाच्या जोरावर वॉर्नरने टी २० क्रिकेटमध्ये विक्रमांची नोंद केली.
 • श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात वॉर्नरने ३७ धावा करत टी २० क्रिकेटमध्ये आपला ९,००० धावांचा पूर्ण केला.
 • याबरोबर त्याने या सामन्यात ४९ धावा केल्या त्यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये २,००० धावांचा टप्पा गाठला.
 • ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये २,००० धावा करणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज ठरला.
 • वॉर्नरने ७३ सामन्यात २,००० धावांचा टप्पा गाठला. कर्णधार आरॉन फिंच ५५ सामन्यात १,७७२ धावांसह दुसर्या स्थानी आहे.
 • वॉर्नरने या मालिकेत तीन अर्धशतके ठोकली. तीनही सामन्यात नाबाद रहात ५० पेक्षा जास्त धावा केल्या.
 • पहिल्या सामन्यात त्याने नाबाद १०० धावा केल्या. दुसर्या सामन्यात त्याने नाबाद ६० धावा केल्या.
 • तर तिसऱ्या सामन्यात वॉर्नरने तिसऱ्या सामन्यात नाबाद ५७ धावा केल्या.
 • यासह कोणत्याही उभय देशांच्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेत ३ किंवा त्याहून अधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला.
 • त्याच्या आधी हा पराक्रम भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कॉलिन मुनरो यांनी केला होता. २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यावर कोहलीने नाबाद ९०, ५९ आणि ५० धावा केल्या होत्या.
 • याशिवाय, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी २० कारकीर्दीमधील १६ वे अर्धशतक झळकावले.
 • बंदीनंतरची ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय टी २० मालिका होती. तो त्यात पूर्णपणे यशस्वी ठरवला.
6 Nov Current Affairs
6 Nov Current Affairs

जम्मू व काश्मीर लडाख येथे बांबू टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणार

 • 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या घोषणेनुसार, नव्याने तयार झालेल्या जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये बांबूच्या शेतीला व्यवसायिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने तीन ‘बांबू टेक्नॉलॉजी पार्क’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू, श्रीनगर आणि लेह येथे हे तीन केंद्र उभारण्यात येणार आहेत.
 • जम्मू व काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आणि शेजारच्या पंजाबमधील हिमालयाच्या पायथ्याशी जिल्ह्यात बांबू नैसर्गिकरित्या वाढतात आणि त्या भागात बांबूच्या शेतीचा फायदा घेतला जाण्याची मोठी शक्यता आहे.
 • ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेले गुवाहाटी येथले केन अँड बांबू टेक्नॉलॉजी सेंटर (CBTC) हा प्रकल्प राबविणार आहे.
 • ‘बांबू टेक्नॉलॉजी पार्क’ याचा उद्देश्य बांबूचा विविध क्षेत्रांमध्ये होणारा वापर पाहता त्यापासून विविध उपयोगी वस्तूंची निर्मिती करणे हा आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »