6 Sep Current Affairs

6 Sep Current Affairs
6 Sep Current Affairs

पाकिस्तान सर्वांत धोकादायक देश जिम मॅटिस

मूलतत्त्ववाद आणि आण्विक क्षमता यांमुळे पाकिस्तान हा सर्वांत धोकादायक देश असल्याचे मत अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानच्या भवितव्याची काळजी करणाऱ्या नेत्यांची कमतरता ही त्या देशाची खरी समस्या आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
जीम मॅटिस:-
जीम मॅटिस यांनी हे अमेरिकेचे माजी रक्षा मंत्री असून त्यांनी गेल्या वर्षी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी ट्रंप यांनी सीरियामधून अमेरिकन फौजा माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. 
अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यानंतर मॅटिस यांनी अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्याचे नेतृत्व केले होते. पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाबरोबर दशकाहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. 
'कॉल साइन केऑस : लर्निंग टू लीड' या त्यांच्या नव्या पुस्तकात त्यांनी पाकिस्तानमधील राजकीय संस्कृती ही त्यांचे स्वत:चेच नुकसान करणारी कशी आहे, हे स्पष्ट केले आहे. 
मॅटिस यांनी म्हटले आहे, 'पाकिस्तान हा असा देश आहे, की ज्याला स्वत:विषयी अजिबात ममत्व नाही. तसेच या देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये स्वत:चाच विनाश करणारा एक धागा सापडतो. माझा जितक्या देशांशी संबंध आला आहे,  त्यातला सर्वांत धोकादायक देश हा पाकिस्तान आहे. 
मूलतत्त्ववाद आणि आण्विक क्षमतेमुळे हा धोका वाढला आहे. जगामध्ये वाढत जाणारी अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडता कामा नयेत. त्याचा परिणाम महाविद्ध्वंसक असेल. पाकिस्तानची समस्या ही आहे, की त्यांच्याकडे देशाच्या भविष्याची काळजी करणारा नेता नाही. पाकिस्तानवर विश्वास नसल्यामुळेच जेव्हा आम्हाला ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्येच लपल्याचे समजले, तेव्हा अमेरिकेचे (तत्कालीन) अध्यक्ष बराक ओबामा यांनी लादेनला मारण्यासाठी पाकिस्तानला न सांगता सैनिकांची टीम पाठवली.'
मॅटिस यांनी म्हटले आहे, 'नाटो देशांच्या रसदपुरवठ्याचा ७० टक्के मार्ग पाकिस्तानातून जात असल्याचे पाहून मी व्यथित झालो. त्यानंतर मी मार्ग बदलण्याचे ठरवले. सप्टेंबर २०११ मध्ये अफगाणिस्तानमधील 'नाटो' चा कमांडर डेव पॅट्रिआस याने पाकिस्तानी लष्कराला इशारा दिला होता. डेवला कळाले होते, की हक्कानी दहशतवादी गट पाकिस्तानातच वाढत असून ट्रक बॉम्बचा वापर करून हल्ला करण्याच्या नियोजनात आहे. 
पाकिस्तानचे (तत्कालीन) लष्करप्रमुख जनरल अश्फाक कयानी यांना या संदर्भात कळवल्यावर त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी काबूलजवळील अमेरिकेच्या तळावर बॉम्बस्फोट झाला. त्यात ७७ अमेरिकी सैनिक जखमी झाले आणि पाच अफगाण सैनिक मृत्युमुखी पडले. त्यानंतर काहीच दिवसांनी काबूलमधील अमेरिकेच्या दूतावासावर हक्कानी गटाने हल्ला केला.'
पाकिस्तानने ठरावीक टप्प्यांमध्ये आमचा शत्रू न बनण्याचे धोरण स्वीकारले. पण, विश्वासू मित्र किंवा अमेरिकेचा, नाटो देशांचा विश्वासू सहकारी देश म्हणूनही न राहण्याचे ठरवले. आमच्यातील भेद आणि परस्परविश्वास आता इतक्या खालच्या पातळीवर गेला आहे, की तो पुन्हा पूर्वपदावर आणणे कठीण आहे. - जिम मॅटिस, माजी संरक्षणमंत्री, अमेरिका
 

भारताकडून रशियाला एक अब्ज डॉलरचे साह्य

 • रशियाच्या अतिपूर्वेकडील प्रदेशाच्या विकासासाठी भारताकडून एक अब्ज अमेरिकी डॉलर कर्ज स्वरूपात देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. 
 • रशियाचा अतिपूर्व प्रदेश हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा आहे. त्या प्रदेशाच्या विकासासाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून उभा असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 'इस्टर्न इकॉनॉमिक फोरम'ने (इइएफ) आयोजित केलेल्या पाचव्या परिषदेमध्ये ते बोलत होते.
 • अशा पद्धतीने भारताने आतापर्यंत कोणत्याही देशाला कर्जाऊ स्वरूपात मदत केलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधाचा विचार केल्यास या घोषणेला वेगळ्या स्वरूपातून पाहिजे जात आहे. 
 • अशा निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक धोरणांवर सकारात्मक अशाच स्वरूपाचा परिणाम होईल. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील अनेक भागांचा वेगाने विकास होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली
   
6 Sep Current Affairs
6 Sep Current Affairs

मलेशियाच्या पंतप्रधानांशी चर्चा

 • 'इस्टर्न इकॉनॉमिक फोरम'ने (इइएफ) आयोजित केलेल्या पाचव्या परिषदेमध्ये मोदी आणि महातीर यांची भेट झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी झाकीरचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला भारताच्या स्वाधीन करण्याची जोरदार मागणी केली.  
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद महातीर यांच्याशी चर्चा केली आणि वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात देण्याचा मुद्दा उपस्थित केला. इस्लामचा प्रचार करण्याचा दावा करणाऱ्या झाकीर नाईकवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे आणि पैशांची अफरातफर केल्याचे अनेक आरोप असून, तो भारताला अनेक खटल्यांमध्ये 'वाँटेड' आहे. 
 • जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने का हटवले आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा का दिला, या संदर्भातही पंतप्रधान मोदी यांनी महातीर यांना माहिती दिली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकारांना दिली. 
 • दोन्ही देशांचे सचिव स्तरावरील अधिकारी तसेच परराष्ट्र खात्यातील इतर वरिष्ठ अधिकारी झाकीर नाईकच्या हस्तांतराच्या मुद्द्यावर परस्परांच्या संपर्कात राहतील आणि हा विषय पुढे नेण्यासाठी चर्चा करीत राहतील. 
   

ब्रिटनच्या व्हिसासाठी इंग्रजी महत्त्वाचे

 • ब्रेग्झिटनंतर ब्रिटनच्या व्हिसा पद्धतीतही बदल होणार आहेत. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजीतील नैपुण्य आणि प्रभुत्व तपासून त्यानुसार गुण देऊन त्याला व्हिसा दिला जाण्याची शक्यता आहे. 
 • ब्रिटनच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी तसा अंतिम मसुदा तयार केला आहे. व्हिसा पद्धतीचा आढावा घेऊन ऑस्ट्रेलियातील गुणस्तर पद्धतीची (पॉइंटबेस्ड) अंमलबजावणी करण्याचे पत्र पटेल यांनी ब्रिटनच्या स्थलांतरण सल्लागार समितीला पाठविण्यात आले आहे.
 • नव्या स्थलांतरण पद्धतीमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासह शैक्षणिक अर्हता आणि कामाचा अनुभव यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. 'ब्रिटिश नागरिकांना त्यांच्या सीमेवरील नियंत्रण पुन्हा त्यांच्याकडे राहील, अशी स्थलांतरण पद्धत हवी आहे. 
 • तसेच, ब्रिटनमधील उद्योगांना महत्त्वाकांक्षी आणि मेहनती माणसेही हवी आहेत. हे वास्तवात आणण्यासाठीच सरकार प्रयत्नशील आहे,' असे पटेल यांनी स्थलांतरण सल्लागार समितीला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात पटेल यांनी सल्लागार समितीला ऑस्ट्रेलियाची स्थलांतरण पद्धती आणि तत्सम पद्धतींचा आढावा घेऊन त्यातील सर्वोत्कृष्ट पद्धत अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियन गुणपद्धतीत आंतरराष्ट्रीयस्तरावरील भाषा चाचणीमध्ये आठ किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या कुशल स्थलांतरितांना २० गुण बहाल केले जातात, तर अशा चाचणीत सात गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला १० गुण बहाल केले जातात. 
 • ज्यांना जेमतेम इंग्रजी येते त्यांना गुण दिले जात नाहीत. या नियमांचा अभ्यास करून सल्लागार समिती त्यांचा अहवाल जानेवारी, २०२०पर्यंत सादर करणार आहे. यातील सूचनांचा विचार करून याचा समावेश नवीन स्थलांतरण विधेयक संसदेत मांडले जाईल.
   
6 Sep Current Affairs
6 Sep Current Affairs

चांद्रयान 2 संपूर्ण विज्ञान जगताचे भारताकडे लक्ष

 • बेंगळुरूजवळील ब्याललू येथील डीप स्पेस नेटवर्कच्या साह्याने लँडरशी संपर्क साधून त्यावरील सर्व सेन्सर, कॅमेरा आणि पाच इंजिनांची सातत्याने कसून तपासणी करण्यात येत आहे. 
 • फक्त लँडिंगची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी विक्रम लँडरवर चार सेन्सर आणि तीन कॅमेरे बसवण्यात आले असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या साह्याने लँडरवरील संगणक स्वतःच लँडरच्या सर्व प्रक्रियांना मार्गदर्शन करणार आहे. 
 • चंद्राच्या दक्षिण गोलार्धात कोणत्याही देशाकडून प्रथमच यान उतरवण्यात येत असल्यामुळे संपूर्ण विज्ञान जगताचे लक्ष्य भारताच्या चंद्रावतरणाकडे लागले आहे.

असे होईल चंद्रावतरण:-

 • लँडर चंद्राभोवतीच्या कक्षेत ३० किलोमीटर उंचीवर असताना एक वाजून ४० मिनिटांनी त्याच्यावरील ८०० न्यूटन शक्तीचे पाचपैकी दोन इंजिन सुरू करण्यात येतील. 
 • ६२० सेकंदांच्या या प्रक्रियेतून (रफ ब्रेकिंग फेज) लँडर ५८७ किलोमीटर अंतर कापून चंद्राच्या जमिनीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर येईल. 
 • पाच किलोमीटर उंचीवर असताना यानाचा ताशी वेग ३३१ किलोमीटर असेल. या वेळी दोन सेन्सर आणि एका कॅमेराच्या मदतीने यानाची जमिनीपासूनची उंची, दिशा बघून त्याला उतरवण्यासाठी सज्ज करण्यात येईल (ऍबसोल्युट नेव्हिगेशन फेज). 
 • त्यानंतर लेझर सेन्सरच्या मार्गदर्शनाने यानाला उभ्या अवस्थेत आणण्यात येईल (फाईन ब्रेकिंग फेज). 
 • लँडरवरील लँडर पोझिशन डिटेक्टर कॅमेराच्या साह्याने यान सुरक्षितपणे उतरू शकेल अशा जागेची पाहणी करण्यात येईल. 
 • जमिनीपासून ४०० मीटर यानाला तरंगते ठेवून सुरक्षित जागेची खात्री करण्यात येईल. त्यानंतर जमिनीपासून १०० मीटर उंचीवर असताना लँडर २२ सेकंदांसाठी तरंगते ठेवून उतरण्याच्या ठिकाणाची पाहणी करेल. 
 • जमिनीपासून १० मीटर उंचीवर असताना लँडरचा वेग शून्य करण्यात येईल. या स्थितीत एक वाजून ५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. लँडर चंद्रावर उतरल्यावर चार तासांनी त्याच्या आतील प्रग्यान रोव्हर बाहेर येऊन चांद्रभूमीवरील प्रवास सुरु करेल.
   

७४ व्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म

 • वयाच्या ७४ व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म देणारी मंग्याम्मा ही जगातील पहिलीच महिला ठरली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये राहणाऱ्या मंग्याम्माने 'आयव्हीएफ' तंत्रज्ञानाच्या मदतीने गुरुवारी अहल्या नर्सिंग होममध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. 
 • हा वैद्यकीय चमत्कार असल्याचे डॉ. एस. उमाशंकर यांनी सांगितले. उमाशंकर यांनी अन्य तीन डॉक्टरांच्या साहाय्याने मंग्याम्मावर शस्त्रक्रिया केली. 
 • वयाच्या ७४ व्या वर्षी यशस्वीरित्या प्रसूत होणारी मंग्याम्मा ही जगातील पहिलीच महिला असल्याचेही उमाशंकर म्हणाले. 
 • या आधी हरियाणातील दलजिंदर कौर या ७० वर्षीय महिलेच्या नावाची नोंद होती. तिने २०१६ मध्ये मुलाला याच तंत्रज्ञानाच्या आधारे जन्म दिला होता.

मंग्याम्मा:-
मंग्याम्मा ही पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नेलापर्तीपडू या गावातील आहे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे पती वाय. राजा यांच्यासह त्यांनी गेल्या वर्षी 'आयव्हीएफ' तज्ज्ञांची भेट घेतली. त्यानंतर त्या गरोदर राहिल्या. मंग्याम्मा यांच्या प्रकृतीकडे आणि आहाराकडे बारकाइने लक्ष देण्यात आले. त्यासाठी तीन डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले होते. १० डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. गुंतागुंत होऊ नये यासाठी सातत्याने चाचण्या व उपचार सुरू होते. 

6 Sep Current Affairs
6 Sep Current Affairs

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार

देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. 
दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. 
•    अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, 
•    मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि 
•    पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी 

या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
 

भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून मराठीतून राज्यपालपदाची शपथ

 • राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी गुरूवारी मराठीतून शपथ घेतली.  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना शपथ दिली.
 • मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले. राज्यपालांचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भगत सिंह कोश्यारी:-

 • राज्यपाल कोश्यारी यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले असून परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी ‘उत्तरांचल प्रदेश क्यू?’ आणि ‘उत्तरांचल संघर्ष एवं समाधान’ या दोन पुस्तकांचे लेखन केले.
 • कोश्यारी हे ३० ऑक्टोबर २००१ ते १ मार्च २००२ या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामे केली आहेत.
   
6 Sep Current Affairs
6 Sep Current Affairs

हा विक्रम करणारा स्टीव्ह स्मिथ पहिलाच

 • ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने दुखापतीतून सावरत पुनरागमन करताना कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात पहिल्या डावात ८ बाद ४९७ धावांपर्यंत मजल मारली. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने १ बाद २३ धावा केल्या.
 • स्मिथने या सामन्यात ३१९ चेंडूत २११ धावा केल्या. या खेळीत त्याने २४ चौकार आणि २ षटकार लगावले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील तसेच अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरे द्विशतक ठरले. त्यामुळे तो मालिकेमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला. 
 • सर डॉन ब्रॅडमन आणि वॅली हॅमंड यांच्यापाठोपाठ स्मिथने ही कामगिरी केली. पण स्मिथने एक अशी कामगिरी केली, जी दिग्गज क्रिकेटपटूंना करता आला नाही. स्मिथने २०१५, २०१७ आणि २०१९ अशा सलग तीन अ‍ॅशेस मालिकेत प्रत्येकी एक द्विशतक केले. सलग तीन अ‍ॅशेस मालिकेत द्विशतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
 • अ‍ॅशेसमध्ये त्याने जुलै २०१५ मध्ये लॉर्ड्सवर २१५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने २०१७ च्या अ‍ॅशेसला पर्थमध्ये २३९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने गुरूवारी अ‍ॅशेस मालिकेत चौथ्या कसोटीत द्विशतकी खेळी केली आहे.
 • दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेत दुसऱ्या दिवशी ३ बाद १७० धावसंख्येवरून खेळाला सुरुवात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडचा (१९) बळी गमावला. त्यानंतर मॅथ्यू वेडलाही (१६) मोठी खेळी करण्यात अपयश आले. 
 • ५ बाद २२४ अशी स्थिती असताना स्मिथने कर्णधार टिम पेनच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १४५ धावांची अभेद्य शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »