7 August Current Affairs

7 August Current Affairs
7 August Current Affairs

फोर्ब्जच्या यादीतही पी व्ही सिंधूची बाजी

•    भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा आणखी एक विक्रम
•    सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय
•    फोर्ब्जनं २०१९ या वर्षासाठी जाहीर केलेल्या यादीत मिळवलं स्थान
•    अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स पहिल्या स्थानी
'फोर्ब्ज'ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील महिला खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली. त्यात स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तेराव्या स्थानी आहे. या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. 
सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील १५ महिला खेळाडूंची यादी फोर्ब्जनं प्रसिद्ध केली आहे. त्यात अमेरिकेची दिग्गज टेनिस स्टार सेरेना विल्यम्स अव्वल स्थानी आहे. फोर्ब्जनं २०१९ या वर्षासाठी जाहीर केलेल्या यादीनुसार, सिंधूची कमाई ५५ लाख डॉलर (जवळपास ३८ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपये) इतकी आहे. 
सेरेना ही पहिल्या स्थानी आहे. तिची कमाई २९.२ दशलक्ष डॉलर आहे. दुसऱ्या स्थानी जपानची नाओमी ओसाका आहे. ओसाकाची एकूण कमाई २४.३ दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. एंजेलिक कर्बर तिसऱ्या स्थानी असून, तिची कमाई ११.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे.
 

समन्वयाचा विजय

भारतात बॅडमिंटन, टेनिस किंवा टेबलटेनिसच्या दुहेरीत यश मिळवणाऱ्यांकडे कायम दुर्लक्ष होते! मात्र इथे एकेरीतील खेळाडूंपेक्षा जास्त कसरत असते. समन्वय साधत जिंकायचे असते. रविवारी थायलंड ओपन सुपर ५०० गुणांची स्पर्धा जिंकून सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या दोघांनीही याच समन्वयाचा छान नजराणा पेश केला आहे. या ऐतिहासिक यशानंतर ही माहिती दिली तर विश्वास बसणार नाही की, २०१६मध्ये जेव्हा त्यांची जोडी जमवली गेली तेव्हा हे दोघेही तयार नव्हते. आता १८ वर्षांचा असलेला सात्विक आणि २१ वर्षांचा चिराग त्यावेळी अनुक्रमे जी कृष्णाप्रसाद आणि एमआर अर्जुनसह खेळत होते, त्यांची कामगिरीही होत होती; पण त्यावेळी भारताच्या दुहेरीतील जोड्यांना मार्गदर्शन करणारे मलेशियन प्रशिक्षक टॅन किम हर यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याशी बोलून या दोघांची जोडी जमवली. सात्विक-चिरागला ते पटले नाही. मुळात या दोघांची जडणघडण वेगळी आहे. चिराग मुंबईत वाढणारा, तर सात्विक दक्षिणेतल्या गावातला. सहाजिकच स्पर्धेदरम्यानचा समन्वय आणि बॅडमिंटन कोर्टच्या बाहेरची मैत्री बहरेना. त्यांनी प्रशिक्षकांची समजूनत काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना एकत्रच खेळावे लागणार असे सांगण्यात आले. एकत्र जेवण, स्पर्धा, शिबिरादरम्यान एकत्र राहणे यामुळे त्यांचा समन्वय साधला गेला, असे चिरागने म्हटले आहे. म्हणूनच या दोघांनी थायलंड स्पर्धा जिंकली ती यंदाचे जगज्जेते लि जून ह्यूइ-ल्यू यू चेन यांना नमवून. उपांत्य फेरीत त्यांनी माजी जगज्जेते को-चेओल जोडीला तर दुसऱ्या फेरीत फझर-मोहम्मद या एशियाड रौप्यपदक विजेत्यांना नमवले. हे यश समन्वयाशिवाय शक्य नाही. लिअँडर पेस-महेश भूपतीने ते एकेकाळी करून दाखविले होते. दुहेरीच्या खेळाडूंमध्ये परस्परांना समजून घेण्याची भावना असेल तर यश मिळतेच. सात्विक-चिरागच्या यशाचे हेच गमक आहे.

7 August Current Affairs
7 August Current Affairs

EMI होणार कमी रेपो दरात घट

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली कपात
आरबीआयच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीचा निर्णय
रेपो दरात ३५ अंकांची कपात
रेपो दर ५.४० टक्के तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के
कर्जाचे हफ्ते कमी होण्याचा मार्ग मोकळा 
कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने ईएमआय घटणार आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला. ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे.
रेपो दर:- तो व्याज दर, ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते. ५.७५ टक्के होता, जो सप्टेंबर २०१० नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यानंतर आरबीआयने तीन वेळा रेपो दर ०.७५ टक्के केला. यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आधीच्या ‘रेपो दर’कपातीचे लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचविण्याची बँकांकडून ग्वाही – अर्थमंत्रालयाकडून खुलासा:-
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निश्चिती समितीच्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकीचे फलित म्हणून बुधवारी कोणता निर्णय घेतला जाईल, हे गुलदस्त्यात असले तरी यापूर्वी तीनदा केलेल्या रेपो दरातील कपातीचे पुरेपूर लाभ बँकांकडून कर्जदारांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि कर्जस्वस्ताईचा अनुभूती आवश्यक असल्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालय आग्रही आहे आणि तशी ग्वाही बँकांकडून दिली गेल्याचे सांगण्यात आले.

डिसेंबर २०१८ पासून, रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात रेपो दरात ०.७५ टक्के (पाऊण टक्क्यांची) कपात केली आहे. परंतु त्या प्रमाणात बँकांकडून कर्जावरील व्याजदरात कपात केली गेलेली नसल्याची रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचीही तक्रार आहे. आता मात्र बँकांनी या मध्यवर्ती बँकेच्या धोरणात्मक निर्णयाचे अनुकरण करून कर्जावरील देय व्याजात कपात करण्याचे मान्य केले असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने सोमवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी, खासगी आणि प्रमुख बहुराष्ट्रीय वाणिज्य बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बठक बोलावली होती. या बठकीस केंद्रीय अर्थ सचिवांसह, अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांसोबत सिटी बँक या देशातील मुख्य बहुराष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राला भेडसावत असलेल्या समस्या, वस्तू आणि सेवा कराच्या दरासंबंधी प्रश्न, मंदावलेली कर्ज मागणी, गृह वित्त कंपन्यांपुढील रोकड सुलभतेचा प्रश्न या व अन्य समस्या जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी ही बठक आयोजित करण्यात आली होती.

या बठकीत अतिश्रीमंत करदात्यांमध्ये गणल्या गेलेल्या विदेशी गुंतवणूकदारांवर (एफपीआय) लादलेला अतिरिक्त कर भार, सूचीबद्ध कंपन्यांच्या प्रवर्तकांकडील मालकीच्या समभाग मर्यादेत केलेली घट इत्यादी विषयांवर बाजार नियंत्रक ‘सेबी’ने संबिंधतांशी चर्चा सुरू केली असून सरकारही त्यांची बाजू ऐकण्यास उत्सुक असून या चच्रेतून लवकर मार्ग काढण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अर्थविषयक बाबी हाताळणाऱ्या खात्याचे सचिव अतनु चक्रवर्ती यांनी परकीय गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींची बठक बोलावली असून अतिरिक्त करभाराबद्दल त्यांचे आक्षेप ऐकण्यात येतील.

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन हे या बठकीस मध्यवर्ती बँकेतर्फे उपस्थित होते. दरम्यान, स्टेट बँकेने आजपासून कर्जावरील व्याजाच्या दरांत कपात केली असून अन्य सरकारी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा बठकीतील निर्णयाची प्रतीक्षा असून अन्य व्यापारी बँका व्याजदर कपात करतील अशी अपेक्षा असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
 

स्पर्धात्मक क्रिकेटमधून मॅक्‍कलम निवृत्त

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅंडन मॅक्‍कलम याने सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मॅक्‍कलम हा सध्या कॅनडात सुरू असलेल्या कॅनडा चषक टी-20 लीगमध्ये टोरांटो आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळत आहे. ही लीग आपली अखेरची स्पर्धा असल्याचे त्याने म्हटले आहे.

मॅक्‍कलमने 2016 मध्येच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटला रामराम केला होता. मात्र, तो विविध देशांमधील टी-20 लीगमध्ये भाग घेत होता. त्याने 101 कसोटीमध्ये प्रतिनिधित्व करताना 6 हजार 453 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 12 शतके टोलविली आहेत. एकदिवसीय 260 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 6 हजार 83 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 5 शतके टोलविली. टी-20च्या 71 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 2 हजार 140 धावा केल्या. त्याने आयपीएलच्या पहिल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध 73 चेंडूंमध्ये नाबाद 158 धावा करीत कोलकाता नाईटरायडर्सला विजय मिळवून दिला होता.
 

7 August Current Affairs
7 August Current Affairs

काश्मीर धोरण संसदेत संमत

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या फेररचनेला लोकसभेची बहुमताने मंजुरी, दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती
जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, या मोदी सरकारच्या ‘काश्मीर धोरणा’वर लोकसभेने मंगळवारी शिक्कामोर्तब केले.
अनुच्छेद ३७० संपुष्टात आणण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणारा प्रस्ताव ३५१ विरुद्ध ७२ मतांनी मंगळवारी मंजूर करण्यात आला. यामुळे गेली ७० वष्रे अमलात असलेला हा अनुच्छेद कायमस्वरूपी रद्द होईल. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्रशासित प्रदेश करणारे विधेयकही
३७० विरुद्ध ७० मतांनी संमत करण्यात आले. अनुच्छेदसंबंधित प्रस्ताव तसेच राज्याच्या फेररचनेचे विधेयक राज्यसभेत सोमवारी संमत झाले आहे. लोकसभेच्या मंजुरीमुळे आता या निर्णयांवर संसदेची मोहर उमटली आहे.
राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही अनुच्छेद ३७० वरील चर्चा वादळी ठरली. चच्रेच्या सुरुवातीलाच तृणमूल काँग्रेसने प्रस्ताव आणि फेररचनेला विरोध करत सभात्याग केला. काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि दोन्ही डाव्या पक्षांनी केंद्र सरकारच्या प्रस्ताव- विधेयकांना विरोध केला.
जम्मू आणि काश्मीरमधील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णाना दहा टक्के आरक्षण लागू करणारे विधेयक लोकसभेत  संमत झाले. मात्र अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये उर्वरित देशातील सर्व कायदे लागू होऊ शकतील. त्यामुळे या विधेयकाची आता गरज उरली नसल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यालाही मंजुरी देण्यात आली.

संसद संस्थगित:-
१७व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय-पावसाळी अधिवेशन या चर्चा आणि मतदानानंतर मंगळवारी संपले. १७  जूनपासून सुरू झालेले हे अधिवेशन तब्बल ५० दिवस चालले. या काळात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली गेली तसेच, संसदेने ३६ विधेयकांचे कायद्यात रुपांतर केले. या अधिवेशनात माहितीचा अधिकार, अवैध कृत्य प्रतिबंध कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. तिहेरी तलाकबंदीचे विधेयकही संमत झाले.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »