7 Sep Current Affairs

7 Sep Current Affairs
7 Sep Current Affairs

मिशन गगनयान मध्ये दोन मराठी चेहरे

 • 'गगनयान' या भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी हवाई दलातील सर्वोत्तम दहा लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. वैमानिकांची नावे अद्याप हवाई दलाकडून जाहीर झाली नसली तरी, यामध्ये दोन मराठी वैमानिकांचा समावेश असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
 • 'गगनयान' मोहीम डिसेंबर, २०२१ मध्ये प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत अंतराळयानाद्वारे तीन किंवा चार अंतराळवीरांना अवकाशात धाडले जाणार आहे. अंतराळवीरांच्या निवडीची जबाबदारी हवाई दलाकडे आहे. त्यासाठी दहा निपुण लढाऊ वैमानिकांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. 
 • हे वैमानिक प्रामुख्याने ताशी २३०० किमी वेगाने उडणाऱ्या 'सुखोई ३०' चे आहेत. काही वैमानिक 'सूर्यकिरण' या चित्तथरारक हवाई कसरती करणाऱ्या चमूतील आहेत. ज्या दोन मराठी वैमानिकांचा समावेश आहे, त्यापैकी एक 'सुखोई ३०' व दुसरे सूर्यकिरण चमूतील ज्येष्ठ सदस्य आहेत.
 • 'गगनयान' या भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी हवाई दलातील सर्वोत्तम दहा लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण बेंगळुरूमध्ये सुरू झाले आहे. या वैमानिकांची बेंगळुरू येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन'मध्ये प्रशिक्षण व चाचणी सुरू आहे. 
 • पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण शुक्रवारी संपले. त्यामध्ये या वैमानिकांची अत्युच्च शारीरिक क्षमता व ध्वनिलहरी तसेच मानसशास्त्राशी संबंधित तपासण्या झाल्या. यानंतर आणखी तीन टप्प्यात हे प्रशिक्षण होणार आहे. या प्रत्येक प्रशिक्षणानंतर वैमानिकांची विविध पातळ्यांवर चाचणी घेतली जाणार आहे. त्यातून अखेरीस तीन किंवा चार वैमानिकांची या मोहिमेसाठी निवड होईल.
   

रॉबर्ट मुगाबे यांचे निधन

 • झिम्बाब्वेवर ३७ वर्षे सत्ता गाजवणारे रॉबर्ट मुगाबे यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने सिंगापूर येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. राष्ट्रपती इमर्सन मनंग्वा यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.
 • 'मुगाबे स्वाततंत्र्याचे प्रतिक होते. आफ्रिकेतील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि सशक्तीकरणासाठी आपले आयुष्य वेचले. देश त्यांचे योगदान कधीही विसरू शकणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ,' अशा शब्दांत मनंग्वा यांनी मुगाबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 • १९८० मध्ये झिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यापासून मुगाबे सत्तेवर होते. १९८० मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर १९८७मध्ये त्यांनी पंतप्रधान पद रद्द करून स्वत:ला देशाचा राष्ट्रपती घोषित केले. 
 • १४ नोव्हेंबर २०१७ रोजी झिम्बाब्वेच्या सैन्याने लष्करप्रमुख कॉन्स्टँटिनो चिवेंगांच्या नेतृत्वाखाली बंड करून मुगाबे यांना स्थानबद्ध केले आणि देशाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली.
7 Sep Current Affairs
7 Sep Current Affairs

मलिंगाचा विक्रम हॅटट्रिकसह १०० विकेट्स पार

 • श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने मालिकेतील तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिकसह पाच विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने आंतररराष्ट्रीय टी-२०त १०० विकेटचा टप्पाही पूर्ण केला. टी-२०मध्ये शंभर विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने सलग चार चेंडूंत चार विकेट घेतल्या.
 • मालिकेतील अखेरच्या टी-२०त श्रीलंकेने ८ बाद १२५ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ८८ धावांतच आटोपला. यात तिसऱ्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर मलिंगाने अनुक्रमे कॉलिन मुन्रो, हामिश रुदरफोर्डस कॉलिन डीग्रँडहोम, रॉस टेलर यांना बाद केले. 
 • एक वेळ न्यूझीलंडचा निम्मा संघ २३ धावांत माघारी परतला होता. तळाच्या टीम साउदीने नाबाद २८ धावा करून न्यूझीलंडची आणखी नामुष्की टाळली. श्रीलंकेने ही लढत ३७ धावांनी जिंकली. मलिंगाने ४ षटकांत १ षटक निर्धाव टाकून सहा धावांत पाच विकेट घेतल्या. ३६ वर्षीय मलिंगाच्या नावावर ७६ टी-२०त १०४ विकेट जमा आहेत. 
 • पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर ९८ विकेट आहेत. टी-२०त मलिंगाची ही दुसरी हॅटट्रिक ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची पाचवी हॅटट्रिक ठरली.
 • २००७च्या वर्ल्ड कपमध्ये मलिंगाने अशीच कामगिरी केली होती. तर, या वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानच्या रशीद खाननेही चार चेंडूंत चार विकेट घेतल्या होत्या. मलिंगा २०११ मध्ये कसोटीतून, तर या वर्षी जुलैमध्ये वन-डेतून निवृत्त झाला आहे.
 • संक्षिप्त धावफलक : श्रीलंका - ८ बाद १२५ (गुणथिलका ३०, डिकवेल २४, सँटनर ३-१२) विजयी वि. न्यूझीलंड - १६ षटकांत सर्वबाद ८८ (टीम साउदी नाबाद २८, मलिंगा ५-६).
   

गेल्या ६० वर्षात ६० टक्के चांद्रमोहिमा अयशस्वी

 • चांद्रयान २ मोहिम अयशस्वी झाल्याने भारतीयांचा हिरमोड झाला आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, या मोहिमेत नेमकी चूक कोठे झाली. मात्र, अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार गेल्या ६० वर्षात ६० टक्केच चंद्रमोहिमा यशस्वी झाल्या आहेत. 
 • गेल्या ६० वर्षात एकूण १०९ मोहिमा करण्यात आल्या. त्यापैकी ६१ मोहिमा यशस्वी झाल्या तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्याचं नासाच्या अहवालावरून स्पष्ट होतं.
 • भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोची चांद्रयान-२ अंतर्गत चंद्रावर विक्रम लँडर उतविण्याची मोहिम शनिवारी पूर्ण होऊ शकली नाही. लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. यातील ऑर्बिटर पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
 • इस्त्रायलनेही फेब्रुवारी २०१८ मध्ये चंद्रमोहिमेला सुरुवात केली होती. पण त्यानंतर ती रद्द झाली. नासाने दिलेल्या माहितीनुसार, १९५८ ते २०१९ पर्यंत भारतासोबतच अमेरिका, रशिया, जपान, युरोपीय देश, चीन आणि इस्त्राइलने वेगवेगळ्या चंद्र मोहिमा सुरू केल्या.
 • पहिली चांद्र मोहिम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ मध्ये केली पण पायोनिअरचे उड्डाण अयश्स्वी झाले.
 • पहिली यशस्वी चंद्रमोहिम ४ जानेवारी १९६९ मध्ये रशियाची लूना-१ होती. हे यश रशियाला सहाव्या मोहिमेत मिळाले. ऑगस्ट १९५८ पासून नोव्हेंबर १९५९ पर्यंत अमेरिका आणि रशियाने १४ चंद्रमोहिमा केल्या. यात फक्त लूना-१, लूना-२ आणि लूना-३ या तीन मोहिमांना यश मिळालं. या सर्व मोहिमा रशियाने सुरू केल्या होत्या. 
 • जपान, रशिया, चीन, भारत आणि इस्त्राइल या देशांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. जपानने १९९० मध्ये पहिली चांद्रमोहिम हिटेन लाँच केली होती. सप्टेंबर २००७ मध्ये जपानने आणखी एक ऑर्बिटर मोहिम सेलेन लाँच केली होती. वर्ष २००० ते २००९ या दरम्यान आतापर्यंत ६ लुनार मोहिमा लाँच केल्या. 
 • युरोप (स्मार्ट-१), जपान (सेलेन) , चीन (शान ई १), भारत (चंद्रयान) आणि अमेरिका (लुनार). २००९ ते २०१९ या दरम्यान दहा मोहिमा लाँच करण्यात आल्या. यात भारताच्या ५, तीन अमेरिका, चीन आणि इस्रायलच्या प्रत्येकी एक-एक मोहिमेचा समावेश होता. १९९० पासून आतापर्यंत अमेरिका, भारत, जपान, रशिया , चीन आणि इस्त्राइल यांनी १९ चंद्रमोहिमा केल्या आहेत.
   
7 Sep Current Affairs
7 Sep Current Affairs

राष्ट्रपती कोविंद यांना हवाई प्रवेश नाकारला पाकिस्तानची मुजोरी

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पाकिस्ताननं कोविंद यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार दिला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
 • राष्ट्रपती कोविंद हे सोमवारपासून १७ सप्टेंबरपर्यंत आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाऊ द्यावे, अशी परवानगी भारतानं मागितली होती. पण पाकिस्तानने ती नाकारली, असं कुरेशी यांनी सांगितलं. या निर्णयाशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील सहमत आहेत. काश्मीरमधील तणावपूर्ण स्थितीमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही ते म्हणाले.
 • भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी पूर्णपणे बंद केली होती. मार्चमध्ये त्यांनी अंशतः हवाई हद्द खुली केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.
   

डॉन ब्रॅडमॅन यांची नात श्रीमंतांच्या यादीत

 • महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमॅन यांची नात ग्रेटा हिचा ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश झाला आहे. ग्रेटाचे पती डिडिएर एलगिंजा हे उद्योजक आहेत.
 • डिडीएरने जवळपास ९ वर्षांपूर्वी जगभरातील कर्मचाऱ्यांसाठी कल्चर अॅपची निर्मिती केली होती. सध्या जवळपास १० कोटी कर्मचारी या अॅपचा वापर करत आहेत. सध्या या कंपनीचे मूल्य १० कोटी डॉलरहून अधिक आहे. 
 • या अॅपचा वापर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि काही राज्याचे क्रिकेट संघ करत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि अन्य क्रिकेट संघांच्या पदाधिकाऱ्यांना, खेळाडूंना डिडिएर हे ब्रॅडमॅन यांचे नातजावई असल्याचे माहित नसल्याचे व्यावसायिक मेहता यांनी सांगितले. 
 • ग्रेटा आणि डिडिएर यांचा विवाह जवळपास १५ वर्षापूर्वी झाला. डिडिएरचे वडील नेदरलँडमध्ये डॉक्टर असून आई ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध कलाकार आहे.
   
7 Sep Current Affairs
7 Sep Current Affairs

एका शिंपल्याच्या प्रजातीचे मूळ कच्छमध्ये

 • हिंदी महासागर आणि पॅसिफिक  महासागर यांच्या सीमावर्ती भागातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांभोवतीच्या सागरी पाण्यात आढळणाऱ्या डोसिनिस्का या प्रजातीचे शिंपल्याचे मूळ कच्छमध्ये असल्याचे संशोधन पुण्यातील दोन पुराजीव संशोधकांनी केले आहे.
 • फग्र्युसन महाविद्यालयातील अतिथी प्राध्यापक व ज्येष्ठ पुराजीव वैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर आणि आघारकर संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. कांतिमती कुलकर्णी हे दोघे गेल्या २० वर्षांपासून कच्छमधील मायोसीन युगातील मृदुकाय (मालुस्का) गणातील जीवाश्मांवर संशोधन करत आहेत.  
 • त्यांना डोसिनिस्का प्रजातीच्या शिंपल्यांचे जीवाश्म कच्छमधील अबडासा तालुक्यात दोन कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पाषाण प्रस्तरांमध्ये मिळाले. डॉ. विद्याधर बोरकर आणि डॉ. कांतिमती कुलकर्णी यांचा हा संशोधनपर शोधनिबंध ‘जर्नल ऑफ अर्थ सिस्टिम सायन्सेस’ या वैज्ञानिक नियतकालिकाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

डोसिनिस्का प्रजातीचे शिंपले:-

 • हिंदी महासागर आणि पॅसिफिक  महासागर यांच्या सीमावर्ती भागातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांभोवतीच्या सागरी पाण्यात डोसिनिस्का प्रजातीचे शिंपले आढळतात. या शिंपल्याला डोसिनिस्का असे नाव विल्लय़म डॅल यांनी १९०२ मध्ये दिले. त्या काळी या प्रजातीच्या जीवाश्माची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे डोसिनिस्का ही प्रजाती फार प्राचीन नसावी असे मानले गेले.
 • कालांतराने डॉ. ओटूका यांना जपानमधील  प्लाईस्टोसीन युगातील म्हणजे अगदी अलीकडच्या कालखंडातील (जेमतेम २५ लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या)  खडकांमध्ये डोसिनिस्का प्रजातीचे जीवाश्म आढळले. यातून डोसिनिस्का प्रजातीची उत्पत्ती हिंदी आणि पसिफिक महासागराच्या सीमावर्ती भागातच २५ लाख वर्षांंपूर्वी झाली असा निष्कर्ष निघतो.
 • मायोसीन कालखंडात, सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी सिंध, कच्छ आणि काठेवाड येथे सागर अस्तित्वात होता. त्यातील काही सजीव ईस्ट इंडीज बेटांच्या मार्गे थेट ऑस्ट्रेलियापर्यंत स्थलांतर करून गेले होते, असे या संशोधकांनी याआधी प्रसिद्ध केलेल्या शोध निबंधात साधार दाखवून दिले आहे.
 • याच वेळी भारतीय द्वीपकल्प आणि युरेशिया खंड  यामधील सागर तळांवरील गाळ उचलला जाऊन घडय़ांचा पर्वत म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमालय पर्वताच्या निर्मितीचा अखेरचा टप्पा पार पडला. त्यामुळे येथील सागरी प्राण्यांच्या अधिवासाचा संकोच झाला.
 • हिमालय पर्वताचा अडसर आल्याने या प्राण्यांना उत्तरेकडे स्थलांतर करणे अशक्य होते. जगाच्या पटलावरून नाहीसे होण्याचा धोका टाळण्यासाठी ज्यांना शक्य झाले त्या प्राण्यांनी ईस्ट इंडीज बेटांच्या रोखाने स्थलांतर केले. कालांतराने त्यांचे वंशज नंतर हिंदी आणि पॅसिफिक  महासागराच्या सीमावर्ती भागात स्थिरावले.
 • या माहितीच्या आधारे कच्छ मध्ये दोन कोटी वर्षांपूर्वी सागरी जलाने जो तात्पुरता समुद्र तयार झाला होता, त्या समुद्रात डोसिनिस्का प्रजातीच्या शिंपल्याचे मूळ असल्याचे निष्पन्न होते

(अश्या प्रकारच्या टॉपिकवर यूपीएससी स-हास प्रश्न विचारलेच आणि आता एमपीएससी आयोग ही)

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »